Friday 17 August 2018

आमदार शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात महामॅरेथॉन बैठका. विविध विषयांवर चर्चा व तातडीने निर्णय.




दौलतनगर दि.18:  गुरूवार दिवस पाटण तालुक्यातील तहसिल कार्यालयात महामॅरेथॉन बैठकांचा ठरला.पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली यादिवशी तहसिल कार्यालयात पाटण तालुक्यातील विविध विषयासंदर्भात महामॅरेथॉन बैठका पार पडल्या.विविध विषयावंर आमदार शंभूराज देसाईंनी चर्चा करुन यावर तातडीने निर्णयही घेतले.यामध्ये प्रामुख्यांने कराड चिपळूण रस्त्याचे सुरु असलेले काम या कामामुळे नागरिकांना आणि प्रवाशाना होणा-या अडचणी व रस्त्यांवर कराड ते घाटमाथा पर्यंत पडलेले मोठमोठे खड्डे संदर्भात सविस्तर अशी चर्चा झाली यावर येत्या आठ दिवसात रस्त्यावर पडलेले खड्डे भरुन घेण्याच्या तसेच रस्त्याच्या कामांस गती देण्याच्या सुचना करीत नुसते हो ला हो नको तर रिर्झल्ट दाखवा, अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जा असा गर्भीत इशाराच आमदार शंभूराज देसाईंनी राष्ट्रीय महामार्गाचे संबधित अधिकारी आणि एल ॲन्ड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांना बैठकीत दिला.
               गुरूवार आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालयात कराड चिपळूण रस्त्याचे सुरु असलेले कामांच्यासंदर्भात व यामुळे जनतेला निर्माण होणा-या अडचणींच्या संदर्भात तसेच तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कामांचा आढावा,स्वच्छ भारत अभियानातंर्गत पाटण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात करावयाच्या उपाययोजना आणि पाटण येथील बसस्थानकाच्या कामांस लवकरात लवकर सुरुवात करणेसंदर्भात बैठका आयोजीत करण्यात आल्या होत्या. आमदार देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे चार तास या बैठका याठिकाणी पार पडल्या.यावेळी विविध बैठकीस पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले, सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता कांडगांवे,उपअभियंता पन्हाळकर,एल ॲन्ड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर घोष,बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजाराम खंडागळे, नाईक,घोडके,तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे, लपा जिल्हास्तर उपअभियंता अविनाश पदमाळे,शाखा अभियंता बंगे,श्रीमती गायकवाड,सहाय्यक गटविकास अधिकारी वाघ, तालुका आरोग्य अधिकारी दिपक साळुंखे,पाणी पुरवठा शाखा अभियंता खाबडे,एस.टी महामंडळ बांधकाम विभागाच्या उपअभियंता श्रीमती अडसूळ,पाटण आगार व्यवस्थापक निलेश उथळे या अधिका-यांची तसेच महसूल विभागाचे सर्व मंडला धिकारी, तलाठी यांची प्रमुख उपस्थिती होती.
               आमदार शंभूराज देसाईंनी वरीलप्रमाणे विविध विषयांचा आढावा या बैठकांमधून घेतला.कराड चिपळूण रस्त्याच्या सुरु असलेल्या कामांसंदर्भात व या कामामुळे नागरिकांना तसेच प्रवाशांना जाणवणा-या अडीअडचणीसंदर्भात आमदार शंभूराज देसाईंनी बैठकीत राष्ट्रीय महामार्गाचे संबधित अधिकारी आणि एल ॲन्ड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांना चांगलेच खडसावले. कराड ते घाटमाथा मार्गावर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. येत्या आठ दिवसात रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे भरुन घ्या. आठदिवसानंतर काहीएक एैकले जाणार नाही. कंपनीच्या विरोधात वरीष्ठाकडे तक्रार करुन नोटीशी देण्याची वेळ आणू नका. नुसते हो करतो हे अजिबात चालणार नाही मोठया प्रमाणात यंत्रणा लावा मला रिर्झल्ट हवा आहे.आठ दिवसात रिर्झल्ट दिसायला हवा असा इशाराच त्यांनी बैठकीत दिल्यानंतर येत्या आठ दिवसात या मार्गावरील खड्डे भरुन घेत असल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे संबधित अधिकारी आणि एल ॲन्ड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांनी सांगितले.त्यांनतर विभागवार त्यांनी पाटण तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतंर्गत सन २०१७-१८ मध्ये करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला तसेच सन २०१८-१९ मध्ये जी कामे प्रस्तावित केली आहेत त्या कामांची आजची स्थिती काय आहे हेही आमदार शंभूराज देसाईंनी जाणून घेतले.पावसाळा संपताच या कामांना सुरुवात करण्याच्या सुचना त्यांनी अधिका-यांना दिल्या. डोंगरपठारावरील गांवामध्ये पावसाळयाचे पाणी अडले पाहिजे याकरीता जलयुक्त शिवार योजनेतंर्गत आपण गतवर्षी केलेल्या कामांतून किती प्रमाणात पाणी अडले याचीही माहिती त्यांनी अधिकारी यांना विचारली व या योजनेतंर्गत डोंगंरपठारावरील कामांना प्रथम प्राधान्य दयावे असेही त्यांनी सुचित केले.लघू पाटबंधारे विभाग,वनविभाग,पाणी पुरवठा विभाग व कृषी विभागाने केलेल्या कामांची माहिती त्यांच्या त्यांच्या संकेतस्थळावर अपलोड करावी जेणेकरुन केलेली कामे जनतेपर्यंत पोहचतील असे सांगून त्यांनी शहरी व ग्रामीण भागात आज मोठया प्रमाणात रस्त्यांच्या बाजूला कचरा टाकण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्वच्छ भारत अभियांनातंर्गत विविध उपाययोजना ग्रामीण आणि शहरी भागांना देण्यात आल्या आहेत. रस्त्यांच्या बाजूला टाकण्यात येणारा कचरा आरोग्याला धोका निर्माण करणारा असून यासंदर्भात महसूल आणि ग्रामविकास विभागाने तात्काळ अशा जागांची पहाणी करुन कच-यांची विल्हेवाट लावणेसंदर्भात योग्य ती उपाययोजना करावी.ज्या गावांच्या लगत अशाप्रकारे कचरा टाकण्यात येत आहे त्या गावांमध्ये यासंदर्भात जनजागृती करावी अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.त्यानंतर पाटण बसस्थानकाचे कामांस पहिल्या टप्प्यात १.७० कोटी व आता २.४४ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.कामाचे भूमिपुजन होवून दोन महिने उलटले काम का सुरु नाही ? निधीची काही अडचण नसताना पावसाचे कारण सांगून कामाला विलंब लागत असल्याचे सांगणे चुकीचे आहे.तात्काळ या कामांना सुरुवात करा. प्रथम बसस्थानकात पडलेले खड्डे भरण्याकरीता या कामात समाविष्ट असणारे काँकीटचे काम हाती घ्यावे व त्यानंतर इमारतीचे काम हाती घ्यावे असेही आमदार देसाईंनी यावेळी सांगितले.उपस्थितांचे आभार तहसिलदार रामहरी भोसले यांनी मानले.
चौकट:- आमदार शंभूराज देसाईंच्या माध्यमातून कामांचा तातडीने निपटारा.

             महामॅरेथॉन बैठका संपल्यानंतर तहसिल कार्यालयात वैयक्तीक कामांकरीता आलेल्या सुमारे दोनशेहून अधिक लोकांनी आपल्या समस्या आमदार शंभूराज देसाईंच्या निदर्शनास आणून दिल्या व त्यांच्या माध्यमातून आपल्या कामांचा तातडीने निपटारा करीत तहसिल कार्यालयातील अधिका-याकडून त्या समस्या सोडवून घेतल्या.


No comments:

Post a Comment