Wednesday 29 August 2018

एकाच वेळी ११८ गांवाच्या नळ पाणी पुरवठा योजना मंजुर होणे ही पाटण तालुक्याचे आतापर्यंतचे वाटचालीतील पहिलीच घटना. आमदार शंभूराज देसाई यांचेमुळे जिल्हयात सर्वात जास्त पाटण तालुक्यातील गांवाचा समावेश.




दौलतनगर दि.२९ :- डोंगरी विभागाने वेढलेला पाटण तालुका. पाटण तालुक्यातील प्रमुख असणा-या कोयना वांग, उत्तरमांड, मोरणा व तारळे नदयांच्या दोन्ही बाजूची काही ठराविक गांवे व वाडया सोडल्या तर या तालुक्यातील बहूतांशी गांवे व वाडयावस्त्या या डोंगरपठारावर वसलेल्या आहेत.त्यामुळे येथील जनतेच्या मुलभूत गरजा पुर्ण करणे हे क्रमप्राप्तच असल्याने त्या दृष्टीने येथे विकासाचे धोरण ठरवावे लागते.या तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी आमदार झालेपासून जनतेच्या मुलभूत गरजा पुर्ण करणे हा एककलमी कार्यक्रमच हाती घेतला आहे.मग त्यात डोंगरी भागातील गावांना जोडणा-या रस्त्यांची कामे असोत वा पिण्याच्या पाण्याच्या योजना असोत. ही कामे पुर्णत्वाकडे नेण्याकरीता त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असतात. शासनाच्या विविध योजनांचा निधी आपल्या तालुक्यात कशाप्रकारे आणता येईल याकडे ते लक्ष केंद्रीत करतात.त्याचाच एक भाग पाहिला तर दोन चार दिवसापुर्वी राज्य शासनाने सातारा जिल्हयातील डोंगरी भागातील गांवांचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांचा तयार केलेला आराखडा व त्यास दिलेली मंजुरी जाहीर केली असून जिल्हयात सर्वात जास्त पाटण तालुक्यातील ११८ गांवाचा यामध्ये  समावेश आहे.एकाच वेळी ११८ गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळणे ही पाटण तालुक्याचे आतापर्यंतचे वाटचालीतील पहिलीच घटना असून तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचेमुळेच जिल्हयात सर्वात जास्त पाटण तालुक्यातील गांवाचा समावेश झाला आहे. ही बाब कौतुकास्पद आहे.
                  सातारा जिल्हयातील पाटण तालुक्याकडे पाहिले की असे दिसून येते हा तालुका आठ गठामध्ये विखुरलेला तालुका असून प्रत्येक विभागात जायचे म्हंटले तर एक तरी डोंगर ओलांडून जावे लागते.पाटण तालुक्यात कोयना नदी ही प्रमुख नदी मानली जाते.तसेच वांग,उत्तरमांड,मोरणा आणि तारळे खो-यातील नदयांचाही समावेश होतो.नदयांकडेच्या दोन्ही बाजूची हिरव्या पट्टयातील काही ठराविक गांवे व वाडया सोडल्या तर या तालुक्यातील बहूतांशी गांवे व वाडयावस्त्या या डोंगरपठारावर वसलेल्या आपल्याला दिसून येतात.डोंगरपठारा वरील गांवाच्या आणि वाडयावस्त्यांच्या मुळच्या प्रमुख गरजा दोन,पहिली म्हणजे गांवाला, वाडीवस्तीला जोडणारा मुख्य रस्ता आणि दुसरे म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय.तालुक्याच्या विकासाकरीता डोंगरपठारावरील गांवाना त्यांच्या प्रमुख असणा-या या दोन मुलभूत गरजा दिल्याशिवाय तालुक्याचा विकास अशक्य आहे.याची पुरेपुर जाणिव या तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांना असल्यामुळे तालुक्याच्या आणि तालुक्यातील जनतेच्या विकासाच्या दृष्टीनेच त्यांच्या मुलभूत गरजांचा आराखडा त्‍यांनी तालुक्याचे आमदार म्हणून गत चार वर्षात तयार केला असून शासनाच्या विविध योजनांमधून रस्ता नसणा-या गांवाना,वाडयावस्त्यांना रस्ता मिळवून देणे,ज्या गांवात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे किंवा भासणार आहे तसेच ज्या गांवातील पिण्याच्या पाण्याच्या योजना कालबाह्य झाल्या आहेत त्या गांवाना आणि वाडयावस्त्यांना नवीन नळ पाणी पुरवठा योजना मंजुर करुन देणे हा एककलमी कार्यक्रमच आमदार शंभूराज देसाई यांनी हाती घेतला असून शासनाच्या विविध योजनेत गरजेची आणि सुचविलेली कामे लवकरात लवकर पुर्णत्वाकडे कशी नेता येतील याकरीता त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे आणि त्यापध्दतीनेच त्यांचे कामकाज सुरु असल्याचे आपल्याला पहावयास मिळत आहे.
                 त्यातीलच एक भाग हा पाटण तालुक्यातील ग्रामीण आणि डोंगरी भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा आहे. तालुक्यातील ज्या डोंगरी गांवामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे तसेच मधल्या पट्टयातील ज्या सकल गांवातील पिण्याच्या पाण्याच्या योजना कालबाह्य झाल्या आहेत त्या गांवाना आणि वाडयावस्त्यांना शासनाने नवीन नळ पाणी पुरवठा योजना मंजुर करुन दयाव्यात याकरीता त्यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या पाठपुराव्याला राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर यांनी मुहुर्त स्वरुप दिले असून ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर यांनी चारच दिवसापुर्वी सातारा जिल्हयातील डोंगरी आणि दुर्गम तालुक्यातील टंचाईग्रस्त तसेच कालबाह्य झालेल्या नळपाणी पुरवठा योजना करणेकरीता राज्य शासनाने तयार केलेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचा यंदाच्या वर्षीचा आराखडा आणि त्याकरीता लागणा-या निधीची मंजुरी जाहीर केली असून यामध्ये आमदार शंभूराज देसाई यांच्या मागणीप्रमाणे पाटण तालुक्यातील एकूण ११८ गांवातील पाणी पुरवठा योजनांचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत समावेश करुन या ११८ योजनांच्या कामांकरीता एकूण २३ कोटी ५८ लक्ष १४ हजार रुपयांचा निधीही मंजुर करण्यात आला आहे. आमदार शंभूराज देसाई यांच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे सातारा जिल्हयात सर्वात जास्त पाटण तालुक्यातील ११८ गांवाचा यामध्ये समावेश असल्याने एकाच वेळी ११८ गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळणे ही पाटण तालुक्याचे आतापर्यंतचे वाटचालीतील पहिलीच घटना म्हणावी लागेल.तालुक्याला कार्यक्षम लोकप्रतिनिधी मिळाल्यानंतर कशाप्रकारे शासनाच्या विविध योजनांचा निधी आपल्या तालुक्यात आणता येतो याचा प्रत्यय आमदार शंभूराज देसाई यांच्या रुपाने तालुक्यातील जनतेला आला व येत असल्याने एकाच वेळी सातारा जिल्हयात सर्वात जास्त म्हणजे ११८ गांवाना व वाडयावस्त्यांना नळ पाणी पुरवठा योजना मंजुर करुन आणलेबद्दल तालुक्यातील जनता आमदार शंभूराज देसाई यांना धन्यवाद देत आहे.
चौकट:- आमदार शंभूराज देसाईंचे लक्षवेदी सुचनेमुळे योजनांना मंजुरी.
             पाटण तालुक्यातील टंचाईग्रस्त व कालबाह्य नळपाणी पुरवठा योजना नव्याने करणेकरीता निधी मंजुर करावा यासाठी आमदार शंभूराज देसाईंनी गतवर्षी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेदी सुचनेवर आमदार देसाईंनी मागणी केलेल्या पाटण तालुक्यातील आवश्यक असणा-या पिण्याच्या पाण्याच्या योजनांना निधी देण्याचे आश्वासन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर यांनी दिले होते त्यानुसार या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.आमदार शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या पाठपुराव्याचा हा परिपाक आहे..

2 comments:

  1. मजबूत फेकायला लागलात भाजप मध्ये जाणार वाटत

    ReplyDelete
  2. फेकत नाहीत हेय खरी गोष्ट आहे. ११८ गावांना निधी आणलाय साहेबांनी, गावांची लिस्ट पण आहे.

    ReplyDelete