दौलतनगर दि.23 :- राज्य शासनाच्या संजय
गांधी योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील पाच महिलांना स्वातंत्र्य सैनिक दुखवटा निधी, स्वातंत्र्य
सैनिक वैद्यकीय बील, राष्ट्रीय कुटुंब लाभ देयक या योजनांतंर्गत एकूण ७५ हजार रुपयांचे
अनुदान पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते आज तहसिल कार्यालय,पाटण येथे वाटप करण्यात
आले.
यामध्ये अनुक्रमे स्वातंत्र्य सैनिक दुखवटा निधी योजनेंतर्गत श्रीमती
खाशीबाई तुकाराम जमदाडे जमदाडवाडी यांना ५०००/- स्वातंत्र्य सैनिक वैद्यकीय बील योजनेंतर्गत
श्रीमती वेणूताई संतराम पाटील नानेगांव खुर्द यांना १०,०००/- आणि राष्ट्रीय कुटुंब
लाभ देयक योजनेंतर्गत श्रीमती लता शिवाजी कांबळे,पाटण यांना २०,०००/- श्रीमती अर्पणा
अरविंद गुरव,मोरगिरी यांना २०,०००/- व श्रीमती सुनिता रमेश कापसे,मंदुळकोळे खुर्द यांना
२०,०००/- असे एकूण ७५,०००/- रुपयांचे अनुदानाचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी पाटणचे
उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष
भरत साळुंखे, सदस्य सदानंद साळुंखे,बबनराव भिसे,संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार दत्तात्रय
लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार शंभूराज देसाईंनी संजय गांधी योजनेतंर्गत
पाटण तालुक्यातील जास्तीत जास्त गरीब, निराधार कुटुंबातील व्यक्तींना या योजनेचा लाभ
होणेकरीता समितीचे सदस्य तसेच तालुक्यातील महसूल विभागाचे प्रत्येक विभागांचे मंडलाधिकारी,
तलाठी यांनी पुढाकार घेवून अशा व्यक्तींचा शोध घेवून त्यांना संजय गांधी योजनेतंर्गत
अनुदान मंजुर करुन दयावे असे आवाहनही बोलताना केले.
No comments:
Post a Comment