Saturday 4 August 2018

मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील सात ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यास मंजुरी. आमदार शंभूराज देसाई.



दौलतनगर दि.05 :- राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाहीत अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी राज्य शासनाने मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला मंजूरी दिली आहे.या योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील बांधवाट,मरळी,जळव, गव्हाणवाडी, गुंजाळी, उधवणे व बोडकेवाडी सात ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या बांधकाम करणेच्या कामाला महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने अनुक्रमे दि.30 जुन,2018 व  दि. ०३ ऑगस्ट, २०१८ रोजीचे शासन निर्णयाव्दारे मंजूरी दिली असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
         आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकांत म्हंटले आहे , ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची असणारी आवश्यकता व त्यासाठी उपलब्ध असणा-या स्तोत्रांची मर्यादा विचारात घेऊन राज्य शासनाने राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारती नाहीत अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. सदरचा निर्णय शासनाने घोषित केलेनंतर राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री ना.दादाजी भूसे यांचेकडे पाटण तालुक्यातील बांधवाट,मरळी, जळव,गव्हाणवाडी,गुंजाळी,उधवणे व बोडकेवाडी सात ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या बांधकामांना मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत मंजुरी देवून आवश्यक असणारा निधी मंजुर करणेबाबत लेखी पत्राव्दारे मागणी केली होती त्यानुसार शासनाच्या ग्रामविकास विभागाने अनुक्रमे दि.30 जुन,2018 व  दि.०३ ऑगस्ट, २०१८ रोजीचे शासन निर्णयाव्दारे पाटण तालुक्यातील बांधवाट,मरळी,जळव,गव्हाणवाडी,गुंजाळी,उधवणे व बोडकेवाडी सात ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या बांधकामांना मंजूरी दिली आहे. लवकरच या कामांना आवश्यक असणारा निधी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून प्राप्त होणार असून या कामांना यंदाच्या वर्षीच सुरुवात होईल असा विश्वास आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.



No comments:

Post a Comment