दौलतनगर
दि.२५ :- राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१८-१९
करीता सुचविण्यात आलेल्या पाटण तालुक्यातील सहा मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या
ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून या कामांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेचा
शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि.२३ ऑगस्ट, २०१८ रोजी पारित केला आहे.पाटण
तालुक्यातील विविध भागातील सहा महत्वाच्या रस्त्यांच्या कामांकरीता १६ कोटी ३४ लाख
७७ हजार रुपयांचा निधी मंजुर केला असून २१.७७० किलोमीटर रस्त्याची लांबी या निधीतून
पुर्ण होणार असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे
की, पाटण तालुक्यातील ग्रामीण आणि डोंगरी भागातील मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य
शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत प्रतिवर्षाप्रमाणे सन २०१८-१९ मध्ये आवश्यक
असणारा निधी मंजुर करणेविषयी राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचेकडे
विनंती करुन सहा कामांचे प्रस्ताव शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे मुख्यमंत्री ग्रामसडक
योजनेच्या संबधित यंत्रणेमार्फत सादर करण्यात आले होते.सदरच्या कामांना ग्रामीण विकास
मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचे सुचनेवरुन राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रशासकीय
मान्यता देवून या सहा रस्त्यांच्या कामांकरीता १६ कोटी ३४ लाख ७७ हजार रुपयांचा निधी
मंजुर केला आहे. या निधीमधून २१.७७० किलोमीटर रस्त्याची लांबी पुर्ण होणार आहे. प्रशासकीय
मान्यता दिलेल्या कामांमध्ये पाटण तालुक्यातील आंबळे घोट ते जुगाईवाडी रस्ता करणे ५.००
किमी ३ कोटी ०८ लाख ३७ हजार, कडवे खुर्द ते वरची केळेवाडी रस्ता करणे ५.०० किमी ४ कोटी
९६ लाख ९२ हजार, बहुले ते हावळेवाडी रस्ता करणे १.१५० किमी ९५ लाख ५४ हजार, तामकणे
गावपोहोच रस्ता करणे ०१.०० किमी ६४ लाख ९० हजार, बनपेठ येराड ते रोमणवाडी रस्ता करणे
३.५०० किमी ०२ कोटी २० लाख ५९ हजार व म्हारवंड गावपोहोच रस्ता करणेकरीता ५.५०० किमी
३ कोटी ६८ लाख ४९ हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. तर या सहाही कामांची पाच
वर्षाकरीता नियमीत देखभाल दुरुस्ती करणेकरीता अनुक्रमे १९ लाख, १७ लाख ४२ हजार, ५ लाख
९६ हजार, ३ लाख ७६ हजार, १२ लाख ९७ हजार व २० लाख ८५ हजार रुपयांची तरतूदही शासनाने
केली असून या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास
विभागाने दि.२३ ऑगस्ट, २०१८ रोजी पारित केला आहे या कामांच्या निविदा लवकरच प्रसिध्द
होवून या कामांना लवकरच सुरुवात होईल असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले
असून सदरचे ग्रामीण भागातील अडचणीतील हे रस्ते पुर्ण करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई
यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे या सहा गांवातील ग्रामस्थांनी आमदार शंभूराज देसाई
यांचे आभार व्यक्त केले आहेत.
No comments:
Post a Comment