दौलतनगर दि.२७:- सन 1999 ला झालेल्या कारगील
युध्दात शहिद झालेले पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील शहिद जवान कै.गजानन मोरे यांचे
आज दि. 27 ऑगस्ट रोजीचे 18 वे पुण्यस्मरण दिनानिमित्त पाटण तालुक्याचे आमदार
शंभूराज देसाई यांनी प्रतिवर्षाप्रमाणे शहिद जवान कै.गजानन मोरे यांना पुष्पचक्र
अर्पण करुन अभिवादन केले. शहिद जवान कै.गजानन मोरे यांचे वडीलांचे यावर्षी निधन
झालेने यंदाच्या वर्षीचा पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम आमदार शंभूराज देसाई यांचे
उपस्थितीत अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी पाटणचे उपविभागीय
अधिकारी श्रीरंग तांबे आणि उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी.ए.भोसले यांची
प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी
आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते शहीद जवान कै.गजाजन मोरे यांचे भूडकेवाडी ता.पाटण
येथील शहीद स्मारकातील अर्धाकृती पुतळयाला पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करण्यात
येवून अभिवादन करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण केले.
अभिवादनानंतर आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते शहीद स्मारक पुढील ध्वजारोहण
करण्यात आला.याठिकाणी भुडकेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील तसेच कडवे येथील
माध्यमिक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर केले.त्यानंतर
शहीद कै.गजानन मोरे यांचे वडील कै.पांडूरंग मोरे यांना उपस्थितांकडून श्रध्दांजली
वाहण्यात आली.
देशाच्या संरक्षणासाठी सातारा
जिल्हयातील अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आहूती दिली आहे. यामध्ये सर्वाधिक जवान
हे पाटण तसेच कराड तालुक्यातील आहेत. सन 1999 ला झालेल्या कारगील युध्दात शहिद
झालेले पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील शहिद जवान कै.गजानन मोरे हे त्यातीलच एक.
पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने प्रतिवर्षी आजच्या दिवशी
शहिद जवान कै.गजानन मोरे यांचा स्मृतीदिन भुडकेवाडी या डोंगराळ व दुर्गम भागात
साजरा करुन शहिद जवान कै. मोरे यांच्या स्मृतिला उजाळा दिला जातो. प्रतिवर्षी
आमदार शंभूराज देसाई यांचे विनंतीवरुन जिल्हास्तरीय अधिकारी याठिकाणी उपस्थित
राहून कै.मोरे यांना अभिवादन करतात.
कार्यक्रमास याप्रसंगी लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक गजानन जाधव, सोमनाथ खामकर,बबनराव
भिसे,माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, शिवदौलत सहकारी बँकेचे संचालक अभिजित पाटील, राजेंद्र चव्हाण यांच्यासह
विविध गावचे सरपंच,सदस्य कै.गजानन मोरे यांच्या मातोश्री श्रीमती चतुराबाई मोरे
आणि त्यांचे कुटुंबिय यांची प्रमुख
उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment