दौलतनगर दि.1८ :- मराठा आरक्षणासाठी राज्यामध्ये आंदोलनाचे
रान पेटले असताना मुंबईतील दंगलीमध्ये बळी गेलेल्या पाटण तालुक्यातील खोणोली गावच्या
२१ वर्षीय कै.रोहन तोडकर या युवकाच्या कुटुंबिंयाना आधार देणेकरीता पाटण तालुका सातारा
मित्र मंडळाचेवतीने मित्र मंडळाचे व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई
यांचे हस्ते कै. रोहन तोडकर याचे वडील श्री. दिलीप तोडकर यांना आर्थिक मदतीचा धनादेश
देण्यात आला.
नवी मुंबई येथील कोपरखैरणे येथे नोकरीकरीता
गेलेल्या रोहन तोडकर या २१ वर्षीय तरुणाचा झालेल्या मृत्यूमुळे तोडकर कुटुंबावर मोठा
आघात झाला असून घरीची आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याने आपल्या कुटुंबाच्या उदर-निर्वाहासाठी
मुंबई येथे नोकरीला गेलेला घरातला कमवता एकुलता
एक मुलाच्या अचानक जाण्याने तोडकर कुटुंबियांना
मोठा धक्का बसला आहे. तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी या कुटुंबांला मुख्यमंत्री
यांचे आश्वासनानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन
या कुटुंबाला दिले असून सदरची मदत मिळणेकरीताचा प्रस्ताव लवकरात लवकर मुख्यमंत्री यांचे
कार्यालयाकडे पाठविणेकरीता आमदार शंभूराज देसाई यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.
येत्या दोन तीन दिवसात हा प्रस्ताव मुख्यमंत्री यांचे कार्यालयाकडे पाठविण्याचे नियोजन
करण्यात आले आहे. दरम्यान या तोडकर कुटुंबियांची पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र
मंडळाचे व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई व मित्र मंडळातील पदाधिकारी
यांनी कुटुंबिंयाची खोनोली येथे जावून प्रत्यक्ष भेट घेतली व या कुंटुंबातील सदस्यांचे
त्यांनी सात्वंन केले. तसेच पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळाच्यावतीने रविराज देसाई यांचे हस्ते कै. रोहन तोडकर याचे वडील श्री. दिलीप तोडकर यांना आर्थिक मदतीचा धनादेश देऊन
तोडकर कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला आहे. यावेळी पाटण तालुका सातारा रहिवाशी
मंडळातील अनिल निकम, अनिल खराडे, देवानंद चव्हाण, रघुनाथ मगर, तुकाराम मोळावडे, अविनाश
मोरे, शंकर मोरे, नरेंद्र शेलार, चंद्रकांत निकम, दत्तात्रय कुंभार, भरत साळुंखे, प्रकाश
नेवगे, जयदिप पाटील, बळवंत तोडकर,उमेश पवार या प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment