दौलतनगर दि.10 :- मराठा आरक्षणासाठी राज्यामध्ये आंदोलनाचे
रान पेटले असताना मुंबईतील दंगलीमध्ये बळी गेलेल्या पाटण तालुक्यातील खोणोली गावच्या
२१ वर्षीय कै.रोहन तोडकर या युवकाच्या कुटुंबिंयाना आधार देणेकरीता आणि अत्यंसंस्कारादिवशी
या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या
आश्वासनानुसार मिळवावयाच्या आर्थिक मदतीकरीता शासकीय स्तरावर सुरु असलेल्या शासकीय
कार्यवाहीसंदर्भात माहिती देणेकरीता आणि लवकरात लवकर ही शासकीय मदत या कुटुंबांस मिळवून
देणेसाठी आमदार शंभूराज देसाईंनी कै.रोहन तोडकर यांचे कुटुंबिंयाची खोनोली येथे जावून
प्रत्यक्ष भेट घेतली व या कुंटुंबातील सदस्यांचे त्यांनी सात्वंन केले.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात नवी मुंबई
येथील कोपरखैरणे येथे नोकरीकरीता गेलेल्या रोहन तोडकर या २१ वर्षीय तरुणाचा झालेला
मृत्यू या मृत्यूमुळे या विभागात त्यांचे पार्थिव चाफळ भागात आलेनंतर निर्माण झालेला
तणाव तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच निवळला होता. त्यादिवशी
त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना घडलेली हकीकत सांगून मुख्यमंत्री
यांचेकडून कै.रोहन तोडकर यांचे कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत तसेच कुटुंबातील सज्ञान
व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन घेतलेमुळे तसेच या कुंटुबांला आर्थिक
मदत मिळणेसंदर्भात लवकरात लवकर प्रस्ताव सादर
करण्याचे जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हा तणाव निवळला होता.
दरम्यान आमदार शंभूराज देसाईंनी यासंदर्भात
तातडीने दुसरे दिवशी राज्याचे मुख्यमंत्री
यांना लेखी पत्र देवून कै.रोहन तोडकर यांचे कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत तसेच कुटुंबातील
सज्ञान व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेण्याचे लेखी पत्र दिले होते तसेच जिल्हयाच्या
जिल्हाधिकारी यांनीही सदरचा पत्रव्यवहार मुख्यमंत्री यांचे कार्यालयाकडे केला होता.आमदार
शंभूराज देसाई यांचे पत्राचे अनुषंगाने मुख्यमंत्री यांचे आदेशावरून सदर कुटुंबाला
आर्थिक मदत देणेसंदर्भात विहीत नमुन्यातील प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सुचना
जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या असून त्यानुसार पाटणचे उपविभागीय अधिकारी
आणि तहसिलदार यांचेकडून हा विहीत नमुन्यातील प्रस्ताव लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांनी
मागविला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंना देण्यात आली असून सदरची शासकीय कार्यवाही
संदर्भातील माहिती आमदार देसाई यांनी तोडकर कुटुंबाला दिली व त्यांनी कुंटुंबातील सदस्यांचे
यावेळी सात्वंन केले.रोहनचे वडील दिलीप तोडकर यांनीही आता आमचा तुमच्यावरच विश्वास
असून आपणच आम्हाला न्याय मिळवून देवू शकता असे यावेळी बोलताना आमदार शंभूराज देसाईंना
सांगितले. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन राजाराम
पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष भरत साळुंखे,प्रकाश नेवगे,चंद्रकांत
पाटील,उमेश पवार या प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment