काल
संपुर्ण राज्यामध्ये राज्यातील सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणाकरीता व विविध
मागण्याकरीता मराठा ठिय्या आंदोलने करुन संपुर्ण महाराष्ट्र बंद आंदोलन
केले.सातारा जिल्हयाच्या सर्व तालुक्यात मोठया प्रमाणात शांततेच्या मार्गाने मराठा
ठिय्या आंदोलने पार पडली.पाटणच्या मराठा ठिय्या आंदोलनात पाटणचे आमदार शंभूराज
देसाई यांचा सक्रीय सहभाग हा लक्षवेदी ठरला.सातारा जिल्हयात हजारो मराठा
नागरिकांना सोबत घेवून अत्यंत शांततेच्या मार्गाने व शिस्तबध्दपणांने ठिय्या
आंदोलन करणारे ते एकमेव आमदार ठरले.या मराठा ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने आमदार
शंभूराज देसाईंनी याअगोदर पाटण याठिकाणीच पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्तांच्या
दाखल्यांकरीता तसेच कोयना भूकंप निधी मिळणेकरीता अत्यंत शिस्तप्रिय भूमिकेतून दोन
दोन दिवस केलेल्या आंदोलनांच्या आठवणी तालुक्यातील जनतेमध्ये जाग्या झाल्याचे
पहावयास मिळाले.
एखादया आंदोलनात वा मोर्चात शिस्तबध्दपणा
कसा असावा तसेच शिस्तीचे पालन कसे करावे हे शिकावे तर पाटणचे आमदार शंभूराज देसाई
यांच्याकडून.सर्वसामान्य जनमानसात उठबस करणारा हा नेता किती नेतृत्वसंपन्न आहे
याचे दर्शन घडले ते काल झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनामध्ये.आमदार शंभूराज देसाई यांच्या
सहभागामुळे
तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.सुमारे दोन ते अडीच हजार सकल मराठा
समाजातील युवक,नागरिक नवारस्ता याठिकाणी जमले आणि आमदार शंभूराज देसाई यांच्या
समवेत ठिय्या आंदोलनात सहभागी होणेकरीता पाटणला येवून त्यांनी पाटण जुना स्टॅन्ड
ते तहसिल कार्यालय असे अत्यंत शांतपणे पायी गेले.आमदार शंभूराज देसाईंबरोबर पायी
चालणा-या सर्वच युवकांमध्ये एकप्रकारचा उत्साह व शिस्तबध्दपणा पाहायला मिळाला. ठिय्या
आंदोलनात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळयाचे दर्शन
घेवून ठिय्या आंदोलन करणारे आमदार शंभूराज देसाई यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या
आंचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करीत मराठा आरक्षणासंदर्भातील तसेच इतर काही
मागण्या त्यांनी शासनापर्यंत पोहचविण्याकरीता आम्ही मराठा लोकप्रतिनिधी यांनी
विधानसभा या सर्वोच्च सभागृहात आणि सभागृहाबाहेर कसे प्रयत्न केले आहेत ही भूमिका
अत्यंत शांतपणे मराठा समाजापुढे मांडली.त्यांनी मांडलेली भूमिका तालुक्यातील सकल
मराठा समाजाला ऊर्जा देणारी ठरली.
दरम्यान यापुर्वी
आमदार शंभूराज देसाईंनी तालुक्यातील जनतेला बरोबर घेवून तालुक्याच्या ठिकाणी केलेली
आंदोलने असो वा सलग तीन तीन दिवस केलेले आमरण उपोषण असो किंवा इतर जनहितार्थ
काढलेले मोर्चे असोत हे नेहमीच लक्षवेदी ठरले आहेत.यामध्ये महत्वाचे मानले जाणारी
दोन आंदोलने पाटण तालुक्याच्या कायमस्वरुपी लक्षात राहणारी आहेत त्यामध्ये पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्तांना त्यांचे
हक्काचे भूकंपाचे दाखले मिळवून देणेकरीता केलेले आंदोलन तसेच त्यांनी सन २००४ ते
२००९ या आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये तालुक्यातील कोयना धरणाच्या
वीजनिर्मितीमधून पाटण तालुक्याला मिळणारा कोयना भूकंप निधी वाढवून मिळणेकरीता
केलेले प्रयत्न आणि प्रतिवर्षी ३५ टक्कयाप्रमाणे तालुक्याला मिळणारा ५ कोटी
रुपयांचा मंजुर करुन आणलेला निधी जो आघाडी शासनाने दुसरीकडे वळविला तो तालुक्यातील
७९ गावातींलच कामांना मिळणेकरीता जीवावर बेतणारे त्यांनी केलेले तीन दिवसीय आमरण
उपोषण हे अविस्मरणीय असून सलग तीन दिवस या आमरण उपोषणाकरीता ते तहसिल कार्यालया समोर
तालुक्यातील जनतेच्या बरोबर बसले होते.आज ते मराठा ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने
तहसिल कार्यालयासमोरच्या मंडपात मराठा आरक्षणाकरीता आमदार शंभूराज देसाई यांना बसलेले
पाहून त्यांच्या आमरण उपोषणाच्या आठवणी तालुक्यातील जनतेच्या मनात जाग्या झाल्या.तालुक्यातील
जनतेच्या हिताकरीता त्यांनी केलेल्या या आंदोलनाच्या आणि आमरण उपोषणांच्यांमुळे
पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्तांना त्यांचे हक्काचे भूकंपग्रस्तांचे दाखले मिळाले
आणि प्रतिवर्षी कोयना भूकंप निधी जो त्यांनी शासनाकडून वाढवून आणला तो पाटण
तालुक्यातील विविध विकासकामांकरीता मिळत आहे.शंभूराज देसाईंचा आंदोलनातील आणि
उपोषणातील शिस्तबध्द पणाने असलेला सहभाग आणि त्यांच्या सोबत उपोषणात असो वा आंदोलनात
सहभागी होण्याचा तालुक्यातील जनतेचा उत्साह व नेत्यांनी घालून दिलेले शिस्तीचे धडे
हे तालुक्याच्या दृष्टीने अनेकदा फलदायी ठरले असून आता तर ते आमदार आहेत सकल मराठा
समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यासाठी त्यांनी आंदोलनामध्ये घेतलेला सहभाग हा नक्कीच
पाटण तालुक्यातील सकल मराठा समाजाकरीता फलदायी ठरणार असल्याची चर्चा कालपासून पाटण
तालुकयात सुरु असून मराठा ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी यापुर्वी
केलेल्या आंदोलनाच्या व उपोषणाच्या चर्चा यानिमित्ताने करीत जुन्या आठवणींना तालुक्यातील
जनतेच्या मनामध्ये उजाळा मिळाल्याचे दिसून आले.
No comments:
Post a Comment