Saturday 25 August 2018

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील ११८ गांवाचा समावेश. एकूण २३ कोटी ५८ लक्ष १४ हजार रुपयांचा निधी मंजुर. यंदाच्या वर्षी ७९ नवीन कामे मंजुर. आमदार शंभूराज देसाईंची माहिती.




दौलतनगर दि.२५ :- पाटण या डोंगरी आणि दुर्गम तालुक्यातील टंचाईग्रस्त तसेच कालबाह्य झालेल्या नळपाणी पुरवठा योजना करणेकरीता राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांचेकडे आवश्यक असणारा निधी मंजुर करणेकरीता केलेल्या मागणीनुसार पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर यांनी पाटण तालुक्यातील एकूण ११८ गांवातील पाणी पुरवठा योजनांचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत केला असून या ११८ योजनांच्या कामांकरीता एकण २३ कोटी ५८ लक्ष १४ हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. सन २०१८-१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखडयात ७९ नवीन नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश करुन या कामांना निधी मंजुर करण्यात आला  असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
    पत्रकामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, पाटण तालुक्यातील डोंगरी, दुर्गम आणि पठारावरील अनेक गांवे व वाडयावस्त्यांमधील नळ पाणी पुरवठा योजना या कालबाह्य झाल्या आहेत तर अनेक ठिकाणी नव्याने करावयाच्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा समावेश हा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत करावा अशी आग्रही मागणी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर यांचेकडे केली होती. राज्य शासनाच्या पाणी पुरवठा विभागाने सन २०१७-१८ व २०१८-१९ असा संयुक्तपणे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचा आराखडा तयार केला होता.त्यामध्ये सन २०१७-१८ आर्थिक वर्षात पाटण तालुक्यातील ३९ नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे तर सन २०१८-१९ आर्थिक वर्षात ७९ नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश करण्यात येवून एकूण ११८ योजनांचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत समावेश करण्यात आला आहे. सन २०१८-१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखडयात नव्याने ७९ नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी मंजुरी देण्यात आली असून  या ११८ योजनांच्या कामांकरीता एकण २३ कोटी ५८ लक्ष १४ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन देण्यात आला आहे. यामध्ये सन २०१८-१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखडयात नव्याने मंजुर करण्यात आलेल्या ७९ गांवामध्ये पांढरेपाणी,जंगलवाडी चाफळ,कोळगेवाडी, मुट्टुलवाडी चौगुलेवाडी,नवजा कामरगांव,गलमेवाडी,बोर्गेवाडी घोट,फडतरवाडी घोट,चाफळ,काढोली,काहीर,काहीर वरची वस्ती,काळगांव, लोहारवाडी काळगांव,लोटलेवाडी काळगांव,कामरगांव,मानाईनगर कामरगांव, काठी,किल्लेमोरगिरी दलितवस्ती, मोगरवाडी कोजंवडे,मरळोशी,मस्करवाडी नं.१,शेडगेवाडी मस्करवाडी,जाधववाडी नाटोशी,नुने,पाचगणी, खडकचावाडा पाचगणी,पाळशी,रुवले,साईकडे,कोतावडेवाडी साखरी,शिद्रुकवाडी,तामिणे,ताईगडेवाडी तळमावले, सलतेवाडी वाझोली,भिलारवाडी,आटोली,मसुगडेवाडी पाडळोशी,पाडळोशी,तावरेवाडी पाडळोशी,गणेवाडी ठोमसे, उधवणे,बौध्दवस्ती झाकडे,आंबेघर तर्फ मरळी दलितवस्ती,आटोली बौध्दवस्ती,भारसाखळे,जौरातवाडी, चाफळ बौध्दवस्ती, चिटेघर, बौध्दवस्ती चोपदारवाडी, वर्पेवाडी गोकुळ, कडवे खुर्द बौध्दवस्ती, काळगांव बौध्दवस्ती, काळेवाडी काळगांव,केळोली बौध्दवस्ती,कुसरुंड मागासवर्गीय वस्ती, मंद्रुळकोळे, कुभांरवाडा मंदुळकोळे, मंदुळकोळे खुर्द,यादववाडी मंदुळकोळे,मानेगांव,मणेरी बौध्दवस्ती,मराठवाडी,मस्करवाडी नवीन वसाहत,पाटीलवाडी मस्करवाडी नं.१,मोगरमाळ म्हावशी,नावडी बौध्दवस्ती, निसरे, सडावाघापूर, साखरी बौध्दवस्ती,विठ्ठलवाडी शिरळ, शिंवदेश्वर बौध्दवस्ती, उरुल शिवाजीनगर, वेखंडवाडी, वेखंडवाडी खबालवाडी, वांझोळे, डोणीचावाडा व धामणी या ७९ गांवातील नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश करण्यात आला आहे. एवढया मोठया संख्येने पाटण या डोंगरी तालुक्यातील नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत करुन सन २०१७-१८ व २०१८-१९ मधील आराखडयात करुन या ११८ गावातील नळ पाणी पुरवठा योजनांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिलेबद्दल आमदार शंभूराज देसाई यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर यांचे आभार व्यक्त केले असून एवढया मोठया प्रमाणात अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची गैरसोय असणा-या गांवाना राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत निधी उपलब्ध झाल्याने या गांवाची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दुर होण्यास फार मोठी मदत होणार असल्याने आपण यासंदर्भात अत्यंत समाधानी असल्याची प्रतिक्रियाही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात व्यक्त केली आहे.
चौकट:- सातारा जिल्हयात सर्वाधिक जास्त ११८ नळ पाणी पुरवठा योजनांचा आराखडयात समावेश.
राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत सातारा जिल्हयातील एकूण ५६८ एवढया नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश करण्यात आला असून आमदार शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे पाटण तालुक्यातील ११८ इतक्या सर्वाधिक नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत झाला आहे.




No comments:

Post a Comment