दौलतनगर दि. १७: पाटण तालुक्यात पावसाचा जोर कायम असून तालुक्यातील
कोयना धरणातून गेली दोन दिवस ५० हजारहून अधिक क्युकेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात
केला जात असल्यामुळे कोयना नदीवरील मुळगांव येथील पुल पाण्याखाली गेला आहे. मुसळधार
कोसळणा-या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक मोठया प्रमाणात होत आहे. दि.१६ व १७
ऑगस्ट रोजी प्रतिदिन अनुक्रमे ५०४२० व ४९९४३ क्युकेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात
येत आहे. नदीपात्रातील पाण्यामुळे मुळगांव पुल दि.१६ रोजी रात्रीच पाण्याखाली गेला
असल्यामुळे तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई हे मतदारसंघात रात्रीपासून अलर्ट असून त्यांनी
आज सकाळी पाण्याखाली गेलेल्या मुळगांव पुलाची व तालुक्यातील पुरपरिस्थितीची पहाणी केली.आमदार
शंभूराज देसाईंच्या या अलर्टपणामुळे तालुक्यातील प्रशासन व प्रशासकीय अधिकारीही तत्पर
असून पहाणी दौ-यात अधिकारीवर्गही आमदार देसाई यांचेसमवेत उपस्थित होता.
कोयना धरणातून मोठया प्रमाणात सोडण्यात
येणा-या पाण्यामुळे पाटण तालुक्यातील कोयना नदीकाठच्या पाटण,जमदाडवाडी, मंद्रुळहवेली
व नावडी या गावांना पाण्याचा धोका निर्माण होतो. सध्या कोयना नदीपात्रात पावसाच्या
पाण्याबरोबर कोयना धरणातून सोडण्यात येणा-या ५० हजारहून अधिक क्युकेक्स पाण्याचा विसर्ग
असल्यामुळे कोयना नदीपात्र तुंडुब भरुन वहात आहे. मुळगांव पुल पाण्याखाली गेला असल्याचे
वृत्त मिळताच त्यांनी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,पाटण पोलिस निरिक्षक भापकर यांना दुरध्वनीवरून पाटण, जमदाडवाडी,
मंद्रुळहवेली व नावडी याठिकाणी कुठे नदीपात्रातील पाणी आले आहे काय? याची पहाणी महसूल
आणि ग्रामविकास यंत्रणेने तातडीने करावी अशा सुचना रात्री १०.०० वाजताच अधिका-यांना
दिल्या.मुळगांव पुल वगळता कुठेही पाणी आले नसल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंना
अधिका-यांकडून देण्यात आल्यानंतर त्यांनी सकाळी मुळगांव पुलाची अधिका-यांना घेवून पहाणी
केली व मुळगांव पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरेकेटींग लावून पुलाचा मार्ग बंद करण्याच्या
सुचना पोलीस यंत्रणा व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिल्या. पोलीस
निरीक्षक भापकर यांना याठिकाणी दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्याच्याही सुचना आमदार
देसाईंनी दिल्या. त्यानुसार याठिकाणी दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
पहाणी दौरा झालेनंतर
आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण विश्रामगृह याठिकाणी तालुकास्तरीय अधिका-यांची
बैठक झाली या बैठकीत निर्माण होणा-या पुरपरिस्थितीच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजनांच्या
अनुषंगाने आमदार शंभूराज देसाईंनी तालुकास्तरीय सर्व अधिका-यांना सतर्क राहण्याच्या
सुचना दिल्या. यावेळी पाटण पोलीस स्टेशनला ४९ पोलीस कर्मचारी यांच्या नियुक्त्या असून
केवळ ३७ कर्मचारी आहेत. १२ कर्मचारी नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे पोलीस निरीक्षक
भापकर यांनी सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना
दुरध्वनीवरुन येथील पुरपरिस्थितीची माहिती देवून पाटण पोलीस स्टेशनला आवश्यक कर्मचारी
देणेबाबत तसेच येथील अधिकारी यांना बाहेरील बंदोबस्त न लावणेबाबतही कल्पना दिली यावर
जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ यापुढे पाटण येथील पोलीस अधिकारी कुठेही बंदोबस्ताकरीता
न पाठविण्याचे आणि पाटण पोलीस स्टेशनला आवश्यक पोलीस मनुष्यबळ तसेच आज दुपारपर्यंत
जादा पोलीस यंत्रणा पाठविण्याचे आश्वासन आमदार शंभूराज देसाईंना दिले.आज पारसी दिनाची
सुट्टी असली तरी सर्व अधिकारी या परिस्थितीची पहाणी करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई
यांच्या सोबत तत्परतेने हजर होते. आपतकालीन कक्षामध्ये सक्षम मंडलाधिकारी यास बोलावून
घेवून तालुक्यातील इतर ठिकाणच्या परिस्थितीचाही अहवाल घ्यावा अशा सुचना आमदार शंभूराज
देसाईंनी तहसिलदार यांना दिल्या व तालुक्यातील म्हारवंड, बाटेवाडी, जिमनवाडी, मसुगडेवाडी
पाडळोशी येथील कडयाखालच्या गांवातील घरांची पावसाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने माहिती
घेतली.तर मोठा पाऊस कोसळत असल्यामुळे वाटोळे,घाणबी,मरड भिकाडी,काठी अवसरी,पांढरेपाणी,आटोली,पाचगणी
याठिकाणी लाईट जाण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या
सुचनाही त्यांनी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांना दिल्या. आमदार शंभूराज
देसाई यांचेसोबत पहाणी दौ-यामध्ये पाटणचे तहसिलदार रामहरी भोसले,पाटण पोलिस निरिक्षक
भापकर,पाटणचे मंडलाधिकारी,तलाठी, गटविस्तार अधिकारी,सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद
बांधकाम विभागाचे सर्व शाखा अभियंता हे शासकीय अधिकारी व पाटण शहरातील प्रमुख पदाधिकारी
उपस्थित होते.
चौकट:- आमदार शंभूराज देसाईंच्या
आदेशामुळे शासकीय यंत्रणा रात्रीपासूनच अलर्ट.
मुळगांव पुल पाण्याखाली
गेल्याची बातमी मिळताच तातडीने रात्री आमदार शंभूराज देसाईंनी प्रातांधिकारी, तहसिलदार,पाटण
पोलीस निरीक्षक यांना दुरध्वनीवरुन तात्काळ पुलाच्या ठिकाणी पोहचून येथील दोन्ही बाजू
वाहतूकी करीता बंद करण्याच्या सुचना दिल्या.दोन दिवस ते वैयक्तीक कामासाठी बाहेरगांवी
दौ-यावर जाणार होते तो दौरा रद्द करुन आमदार शंभूराज देसाईंनी दुसरेदिवशी सकाळी मुळगांव
पुल गाठणे व तालुक्यातील पुरपरिस्थितीचा आढावा घेणे पसंत केले.आमदार शंभूराज देसाईंच्या
आदेशामुळे रात्रीपासूनच शासकीय यंत्रणा तालुक्यात अलर्ट होती
No comments:
Post a Comment