दौलतनगर
दि.२४:- आमचे नेते पाटणचे लोकप्रिय आमदार शंभूराज देसाई यांनी केंद्रीय
मंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडे पाठपुरावा करुन केंद्रीय महामार्ग योजनेतून प्रत्यक्षात
एकूण ३२० कोटी रुपयांच्या मंजुर करुन आणलेल्या आणि प्रत्यक्षात रस्त्याच्या कामांस
सुरुवात झालेल्या कराड चिपळूण या रस्त्यावर रस्त्याचे काम सुरु असताना पडलेल्या
खड्डयात झाडे लावून स्टंटबाजी करणा-या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो, तुमच्या
बांधकाम मंत्र्यांच्या काळात याच रस्त्यावर दोन ठिकाणी टोल लावला होता.टोल घेवूनही
त्यांना पडलेले खड्डे मुजविता आले नव्हते.हे तुम्हालाही माहिती आहे.तुमच्या
नेत्यांप्रमाणे आमचे नेते नुसत्या घोषणा करीत नाहीत तर प्रत्यक्षात काम करुन
दाखवितात म्हणूनच त्यांनी ३२० कोटी रुपयांचा बिनटोलचा रस्ता मंजुर करुन
दिलाय,रस्त्याचे काम सध्या सुरु आहे,बिनटोलचा डांबरी नाही तर काँक्रीटचा रस्ता कसा
असतो हे तुम्हाला लवकरच दिसेल.स्टंटबाजी आम्हालाही करता येते पण थोडा धीर धरा असा
इशारा देसाई गटाच्या पदाधिका-यांनी निसरे येथे खड्डयात झाडे लावणा-या
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिला आहे.
विहे,मल्हारपेठ,
नाडे व अडूळ येथील देसाई गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या पत्रकात
म्हंटले आहे की,आमचे नेते पाटणचे लोकप्रिय आमदार शंभूराज देसाई यांना माजी बांधकाम
मंत्र्यांप्रमाणे कोटयावधी रुपयांच्या केवळ घोषणा करण्याची सवय नाही तर कोटयावधी
रुपयांचा निधी तालुक्यातील कामांना प्रत्यक्षात कसा मिळतो हे त्यांनी पाटण
तालुक्याला आणि पर्यायाने विरोधकांनाही दाखवून दिले आहे.आमदार शंभूराज देसाई यांचे
विशेष प्रयत्नामुळेच केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी केंद्रीय महामार्ग योजनेतून कराड ते चिपळूण
रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून ३२० कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन
दिला आहे. हा रस्ता डांबरीकरण नाहीतर काँक्रीटी करणाचा होणार आहे. त्याची लांबी
सुमारे ६३ ते ६५ किलोमीटरची आहे. तालुक्याच्या माजी बांधकाम मंत्र्यांना राज्याचे
कॅबिनेट बांधकाम मंत्री असतानाही एवढया लांबीच्या रस्त्याकरीता राहू दया परंतू १०
ते १५ किलोमीटरच्या रस्त्याला काँक्रीटीकरण करणेकरीता सुध्दा राज्याच्या तिजोरीतून
निधी आणता आला नाही व नव्हता.त्यांनी बांधकाम मंत्री
असताना याच कराड ते चिपळूण रस्त्यावरील कराड ते नाडे या भागात २५ किलोमीटरचा
केलेला रस्ता हा सरळमार्गाने तालुक्यातील जनतेच्या पदरात न टाकता बांधा,वापरा व
हस्तांतरीत करा या तत्वावर तालुक्यातील जनतेच्या टोलच्या रुपाने मानगुटीवर बसविला
होता.रस्ता २५ किलोमीटरचा आणि यात दोन ठिकाणी त्यांनी टोल लावला. हा कुठला न्याय. सर्वसामान्य
जनतेकडून टोल वसूल करुनही माजी बांधकाम मंत्र्यांना त्या काळात रस्त्यावर पडलेले खड्डे मुजविते आले नव्हते.हे तालुक्याचे
दुर्दैव होते.उलट आमदार शंभूराज देसाईंच्या प्रयत्नामुळे मंजुर झालेल्या ६५
मिलोमीटरच्या बिनाटोलच्या रस्त्याच्या कामांस प्रत्यक्षात सुरुवात देखील झाली आहे.बिनाटोलचा
काँक्रीटीकरणाचा रस्ता कसा होणार हे आता तालुक्यातील जनतेला दिसू लागले आहे. हा
फरक माजी बांधकाम मंत्री आणि विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांच्या कामातील असून केवळ
घोषणा आणि आश्वासने देण्यात आमचे नेते वेळ घालवित नाहीत ते जनतेला दिलेल्या
आश्वासनाची आणि घोषणांची कृती त्यांच्या प्रत्यक्ष कामांतून दाखवून देतात त्याचेच
उदाहरण कराड चिपळूण हा कॉक्रीटींकरणाचा रस्ता आहे. नाचता येईना अंगण वाकडे अशी
स्थिती माजी बांधकाम मंत्र्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची झाली आहे.चांगल्या
सुरु असलेल्या कामांत खोडा घातलाच पाहिजे ही लागलेली सवय राष्ट्रवादीच्या
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची जाता जाणार नाही हे तालुक्यातील लोकांनाही चांगलेच
माहिती आहे.रस्त्याच्या कामांस प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. मोठया प्रमाणात पाऊस
पडत आहे. रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करताना रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत
हे सर्वांनाच दिसत आहे. आमदार शंभूराज देसाईंनी सदरचे पडलेले खड्डे आठ दिवसात भरुन
घेण्याच्या सुचना ठोसपणे संबधित कंपनीला आणि प्रशासनाला दिल्याही आहेत त्यानुसार
खड्डे भरण्याचे कामही सुरु आहे.तरीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खड्डयात
झाडे लावण्याची केलेली स्टटंबाजी ही निंदनीय असून स्टंटबाजी आम्हालाही करता येते
पण जरा धीर धरा सगळे व्यवस्थित होईल. आमचे नेते तालुक्याचे लोकप्रिय आमदार याकरीता
सक्षम आहेत तुम्ही विनाकारण याकरीता कष्ट घेण्यात वेळ घालवू नका असा इशारा निसरे
येथे खड्डयात झाडे लावणा-या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देसाई गटाच्या
पदाधिका-यांनी दिला आहे.पत्रकावर जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्य
सुरेश पानस्कर,कारखान्याचे संचालक पांडूरंग नलवडे,विजयराव जंबुरे,शंभूराज युवा संघटनेचे
विजय शिंदे,अमोल पाटील,हिंदूराव जंबुरे,संतोष कदम,अभिजित पवार,संदिप देसाई,अमोल
चव्हाण,संरपच विष्णू पवार,धनाजी केंडे,विनायक शिर्के,संजय शिर्के, मानसिंग मोरे यांच्या
सह्या आहेत.
No comments:
Post a Comment