Monday 27 August 2018

जनसुविधा योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील ४ ग्रामपंचायत कार्यालय व ८ गावांच्या स्मशानभूमि सुधारणा कामांना ६९.५० लाख रुपयांचा निधी मंजुर. कामांचे प्रशासकीय मान्यता आदेश प्राप्त - आमदार शंभूराज देसाईंची माहिती.




दौलतनगर दि.२7 :- जिल्हा नियोजन समितीतंर्गत सन २०१८-१९ मध्ये ग्रामपंचायतींना जन सुविधा पुरविणेसाठी देण्यात येणा-या विशेष अनुदानातून पाटण तालुक्यातील ४ ग्रामपंचायत कार्यालय व ८ गावांच्या स्मशानभूमि सुधारणा करण्याच्या कामांना ६९.५० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून या कामांचे प्रशासकीय मान्यता आदेशही प्राप्त करुन देण्यात आले असून लवकरच या कामांच्या निविदा प्रसिध्द होवून कामांना सुरुवात होईल अशी  माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
         आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकांत म्हंटले आहे, जिल्हा नियोजन समितीतंर्गत ग्रामपंचायतींना जनसुविधा व नागरी सुविधा पुरविणेसाठी प्रतिवर्षी अनुदान देण्यात येते. यंदाच्या वर्षी सन २०१८-१९ मध्ये ग्रामपंचायतींना जनसुविधा पुरविणेसाठी पाटण तालुक्यातील चार ग्रामपंचायती व ८ गांवातील स्मशानभूमि सुधारणा करणे ही कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार या योजनेतंर्गत या कामांना विशेष अनुदानातून ग्रामपंचायत कार्यालय बांधणेसाठी अनुक्रमे मौजे पवारवाडी कुठरे ग्रामपंचायतीस १०.०० लक्ष रुपये, धावडे ग्रामपंचायत कार्यालय १०.00 लक्ष, दुसाळे ग्रामपंचायत कार्यालय १०.०० लक्ष व मुळगांव ग्रामपंचायत कार्यालय ०८.०० लक्ष असे ३८ लक्ष रुपयांचा निधी ग्रामपंचायत कार्यालये बांधणेकरीता मंजुर करण्यात आला आहे तर ८ गांवातील स्मशानभूमि पोहोच रस्ते, निवारा शेड, स्मशानभूमि रस्ता सुधारणा करणे,स्मशानभूमिचे ठिकाणी पाण्याची टाकी उभारणे या कामाकरीता ३१.५० लक्ष रुपयांचा असे एकूण ६९.५० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. मौजे मोरेवाडी कुठरे येथे स्मशानभूमि पोहोच रस्ता करणे ४.०० लक्ष, मरळी येथे स्मशानभूमि निवारा शेड व स्मशानभूमि रस्ता करणे ५.०० लक्ष   आडूळपेठ येथे स्मशानभूमि व रस्ता सुधारणा करणे ४.०० लक्ष,कडववाडी (नानेगांव) स्मशानभूमि सुधारणा करणे ३.५० लक्ष, धुमुकवाडी (मुरुड) येथे स्मशानभूमि व पाण्याची टाकी ते स्मशानभूमि रस्ता सुधारणा करणे ३.०० लक्ष, झाकडे बौध्दवस्ती स्मशानभूमि रस्ता सुधारणा करणे ४.०० लक्ष, माणगांव येथे स्मशानभूमि बांधणे ४.०० लक्ष व पापर्डे येथे स्मशानभूमि सुधारणा करणे ४.०० लक्ष असा निधी मंजुर करुन देण्यात आला आहे. या कामांच्या प्रशासकीय मान्यता आदेशही संबधित यंत्रणेकडून प्राप्त करुन देण्यात आले असून मंजुर झालेल्या या  कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्याचे आदेश संबधित विभागांना देण्यात आले असल्याचेही आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकात म्हंटले आहे.


No comments:

Post a Comment