Monday 28 March 2022

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा, वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंवर बेहद खुश. अर्थसंकल्पावरील चर्चेला मुद्देसुद उत्तर दिल्याने ना.अजितदादांनी बोलवून ना.शंभूराजेंचे केले कौतुक.

 


 

            मुंबई दि.28 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- राज्याचे गृह,वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी महाराष्ट्र विधानपरीषद सभागृहात अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला तसेच विरोधी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या मुद्दयांना अगदी मुद्देसुद उत्तर देत सरकारची व वित्त विभागाची बाजू भक्कमपणे मांडल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवार हे वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंवर बेहद खुश झाले. विधानपरीषदेचे कामकाज संपवून विधानसभेत आलेल्या ना.शंभूराज देसाईंना जवळ बोलवून घेत शंभूराजे, अर्थसंकल्पावरील तुमचा रिप्लाय जोरदार, खुप छान आणि मुद्देसुद झाला असे सांगून ना.अजितदादांनी ना.शंभूराज देसाईंच्या कामांचे व उत्तराचे कौतुक केले.

           नुकत्याच झालेल्या सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकाच वेळी विधानसभा व विधानपरीषद सभागृहात अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेचे उत्तर आल्याने विधानसभा सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवार यांनी तर विधानपरीषद सभागृहात गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला उत्तरे दिली.विधानसभा सभागृहाचे कामकाज पहात वित्तमंत्री ना. अजितदादा हे विधानसभा सभागृहातून संगणकावर ना.शंभूराज देसाईंचा विधान परीषदेतील अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेचा रिप्लाय एैकत होते. विधानपरीषदेचे कामकाज संपवून विधानसभेत आलेल्या ना.शंभूराज देसाईंना पाहिल्यानंतर ना.अजितदादांनी त्यांना जवळ बोलवून घेतले आणि शंभूराजे,अर्थसंकल्पावरील तुमचा रिप्लाय एैकला.रिप्लाय जोरदार, खुप छान,मुद्देसुद झाला शासनाची भूमिका व वित्त विभागाची बाजू तुम्ही भक्कमपणे मांडली खुप छान असे सांगून ना.अजितदादांनी ना.शंभूराज देसाईंच्या उत्तराचे तोंडभरुन कौतुक केले. या अधिवेशनात विधानपरीषद सभागृहात गृह आणि वित्त विभागाचे बहूतांशी कामकाज हे ना.शंभूराज देसाईंनीच पाहिले.त्यांच्याकडे असणाऱ्या गृह,वित्त विभागाची बाजू तसेच शासनाची भूमिका त्यांनी विधानपरीषद सभागृहात योग्यप्रकारे आणि भक्कमपणे मांडली आणि विरोधी पक्षाला सडेतोड उत्तरे देत ना.शंभूराज देसाईंनी विरोधकांच्या सगळया प्रश्नांचे निरसण केले, ना.शंभूराज देसाईंकडे महाविकास आघाडीतील अभ्यासू राज्यमंत्री व हजरजबाबी आणि सभागृहात सडेतोड बोलणारा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. आपल्या कार्यशैलीतून ते सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही लक्ष वेधून घेत आहेत.

            राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवार यांनी विधानसभा सभागृहात तर विधानपरीषद सभागृहात गृह व वित्त राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी राज्यातील जनतेच्या हिताचा विकासाची पंचसुत्री घेवून सन 2022-23 चा दर्जेदार असा अर्थसंकल्प मांडला. कृषी, सार्वजनीक आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण व उद्योग या पंचसुत्रीच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना देण्याचे कार्य यंदाच्या अर्थसंकल्पातून करण्यात आले आहे.राज्यातील जनतेवर कोणताही कर न लादता या अर्थसंकल्पातून बहूतांशी कर कमी करण्याचे काम शासनाने या अर्थसंकल्पातून केले आहे. राज्यमंत्री म्हणून ना.शंभूराज देसाईंच्या कामकाजावर सत्ताधाऱ्यांसह विरोधकही या अधिवेशनात चांगलेच खुश दिसून आले. अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेच्या मुद्देसुद उत्तरावर कौतुक केलेल्या वित्तमंत्री ना.अजितदादा पवार यांचे गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आभार व्यक्त केले.

चौकट:- आमचे शंभूराज, सक्षम आहेत- ना.अजितदादा पवार.

            अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीमध्ये एका महत्वाच्या बैठकीदरम्यानही आमचे शंभूराज, सक्षम आणि भक्कम आहेत त्यांचेवर जबाबदारी दया शंभूराज, ती पार पाडतील असे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी सांगून ना.शंभूराज देसाईंच्या कामकाजाला  व सक्षमतेला त्यांनी पाठबळ दिले आहे.

Saturday 26 March 2022

वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सोपविली अजुन एक महत्वाची जबाबदारी. सव्वा दोन वर्षातील राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा परफॉर्मन्स उत्कृष्ट

 


 

            मुंबई दि.26 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- राज्याचे गृह,वित्त व नियोजन,राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास,उद्योजकता,पणन अशा राज्यातील महत्वाच्या पाच खात्यांची जबाबदारी सांभाळणारे राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचेवर राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब,उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवारसाहेब यांनी अजुन एक महत्वाची जबाबदारी सोपविली आहे.राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आला असून याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवारसाहेब यांनी काल विधानपरिषद सभागृहात केली. गृह व वित्त अशा महत्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळणारे ना.शंभूराज देसाईंचा राज्यमंत्री म्हणून गत सव्वा दोन वर्षातील परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट असल्यानेच त्यांच्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अत्यंत विश्वासाने अधिकची जबाबदारी सोपविली आहे.

             राज्य सरकारमध्ये एक नोव्हेंबर,2005 पुर्वी कंत्राटी, हंगामी व नंतर सेवेत कायम झालेल्या शासकीय  व निमशासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्यासंदर्भातील विषय गेली अनेक वर्षापासून प्रलंबीत होता. या प्रलंबीत असणाऱ्या विषयासंदर्भात बैठका घेवून यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्याची महत्वाची जबाबदारी ना.शंभूराज देसाईंवर दिली आहे.यासंदर्भात निवृत्तीवेतन अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे आणि या अभ्यासगटाचे अध्यक्ष वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी करण्यात आले आहे. याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवारसाहेब यांनी काल विधानपरिषद सभागृहात केली. मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब,उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवारसाहेब यांनी वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा राज्यमंत्री म्हणून परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट असल्याचे अनेक दाखले विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान तसेच राज्य शासनाच्या विविध बैठकांच्या निमित्ताने यापुर्वी दिले आहेत.अभ्यासू आणि हजरजबाबी राज्यमंत्री म्हणून ना.शंभूराज देसाईंची ओळख संपुर्ण राज्यभर असल्यानेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी ही अधिकची प्रमुख पदाची जबाबदारी ना.शंभूराज देसाईंवर सोपविली आहे. निवृत्तीवेतन देण्यासंदर्भातील हा विषय राज्यातील सुमारे दोन ते अडीच लाख कंत्राटी, हंगामी व नंतर सेवेत कायम झालेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांशी निगडीत असून सन 2021-22 या आर्थिक वर्षात ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अभ्यासगटाकडून कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनासंदर्भात बैठका ही सुरु केल्या असल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवारसाहेब यांनी काल सभागृहात सांगितले आहे. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनासंदर्भात सकारात्मक असा प्रस्ताव वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे शासनाकडे निवृत्तीवेतन अभ्यासगटाच्या माध्यमातून सादर करतील असा विश्वासही राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवारसाहेब यांनी व्यक्त केला आहे.

Wednesday 16 March 2022

विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर धडाकेबाज उत्तरे दिल्याने मुख्यमंत्र्यांकडून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे पाठीवर शाबासकीची थाप.

 




 

            मुंबई दि.16 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सोमवारचा (14 जुन) दिवस चांगलाच गाजविला. .वि.प अन्वये विरोधी पक्षाकडून गृह विभागाशी संबधित 260 च्या आणलेल्या प्रस्तावावर विरोधकांकडून आलेल्या प्रत्येक मुद्दयांना अगदी शिवसेना स्टाईलने ना.शंभूराज देसाईंनी धडाकेबाजपणे मुद्देसुद आणि गृह विभागाची, शासनाची बाजू अगदी कणखर व भक्कमपणे मांडून विरोधकांना सडेतोड उत्तरे देत गप्पगार करीत विरोधकांची बोलतीच बंद केली. त्यामुळे सोमवारी ना.शंभूराज देसाई खुप चर्चेत आले.महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी दाखविलेला धडाकेबाजपणा राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे कानावर गेल्यानंतर रात्री उशीरा मुख्यमंत्री यांनी स्वत: वर्षा निवासस्थानावरुन ना.देसाईंना दुरध्वनी केला व शंभूराज,260 चा आजचा रिप्लार्य एक नंबर झाला,अभिनंदन तुमचे,तुमच्यासारखा धडाकेबाज गृहराज्यमंत्री महाविकास आघाडीत आहे, खुप छान असे गौरवोद्गार काढत शंभूराज देसाईंच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

           मुंबईला राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून सन 2022 चा अर्थसंकल्प शुक्रवार (दि.11) रोजी सादर झालेनंतर विरोधी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये .वि.प अन्वये 260 चा गृहविभागाशी निगडीत प्रस्ताव चर्चेला आणला होता. विरोधी पक्षाकडून या प्रस्तावावर राज्यातील विविध विषयांवर सभागृहामध्ये चर्चा केली.यामध्ये गृहविभागाशी निगडीत असणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेवरही विविध मुद्दे मांडून विरोधकांनी राज्य सरकारवर विविध आरोप केले.

               राज्याचे गृहराज्यमंत्री असणारे ना.शंभूराज देसाई हे महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये राज्याची गृह आणि वित्त विभागाची संपुर्ण जबाबदारी शासनाच्या वतीने चोख बजावित आहेत. महाविकास आघाडीमध्ये वित्त विभागाचे कॅबिनेट मंत्री ना.अजितदादा पवार व गृह विभागाचे कॅबिनेट मंत्री ना.दिलीप वळसे पाटील असून या दोघांनीही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना,शंभूराजजी,महाराष्ट्र विधानसभा आम्ही पहातो तुम्ही विधानपरिषदेचे सगळे काम पहा असे अधिवेशन सुरु होण्यापुर्वीच सांगितले होते.

              शुक्रवारी अर्थराज्यमंत्री म्हणून ना.शंभूराज देसाईंनी राज्याचा मुद्देसुद व अभ्यासूपुर्ण अर्थसंकल्प मांडलेनंतर सोमवार (दि.14) चा पुर्ण दिवसही चांगलाच गाजविला.महाराष्ट्र विधानपरिषदेतील सदस्यांसह, विधानसभेतील कॅबिनेट मंत्री व राज्याचे मुख्यमंत्र्यांचेही लक्ष गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी त्यादिवशी वेधले. .वि.प अन्वये विरोधी पक्षाकडून आणलेल्या 260 च्या प्रस्तावावर विरोधकांच्या प्रत्येक मुद्यांची नोंद घेत ना.शंभूराज देसाईंनी अगदी शिवसेना स्टाईलने या प्रस्तावाचा सडेतोडपणे रिप्लार्य दिला.गृहराज्यमंत्री या प्रस्तावाला उत्तर देताना अगदी मुद्देसुद आणि अभ्यासपुर्ण सभागृहात बोलत होते.अनेक ठिकाणी त्यांनी आपला धडाकेबाजपणा दाखवित शासनाची,गृह विभागाची बाजू किती कणखर आणि भक्कम आहे.गृह विभाग राज्यामध्ये जनहितार्थ व कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कशापध्दतीने काम करीत आहेत हे त्यांनी विरोधकांना पुराव्यानिशी पटवून दिले. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही राज्याचे गृहराज्यमंत्री हे अतिशय संवेदनशील आणि जागेवर निर्णय घेणारे गृहराज्यमंत्री आहेत.विरोधी पक्षाकडून त्यांना गृहविभागाशी निगडीत एखादे काम सांगितले की ते लगेच त्यावर अंमलबजावणी करतात असे कौतुक रिप्लार्यनंतर लगेच केले होते.

               दरम्यान रिप्लार्य सुरु असताना राज्याचे पर्यटनमंत्री ना.आदित्यजी ठाकरे हे विधानपरिषद सभागृहामध्ये उपस्थित होते त्यांनीही ना.शंभूराज देसाईंचा 260 वरील प्रस्तावाचा रिप्लार्य एैकल्यानंतर ना.शंभूराज देसाईंचे अभिनंदन केले. राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी माझेवर राज्याच्या विविध महत्वाच्या पाच खात्यांची जबाबदारी दिली असून माझे राज्यमंत्रीपदाच्या कामकाजावर खुष होवून त्यांनी गौरवोद्गार काढलेने व शाबासकीची थाप दिल्याने काम करण्यास आपल्याला अधिक बळ मिळाले असल्याची प्रतिक्रिया ना.शंभूराज देसाईंनी व्यक्त करुन कौतुकाबद्दल मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे मनपुर्वक आभार व्यक्त केले.

 

Saturday 12 March 2022

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा बेरोजगारांनी लाभ घ्यावा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे पुढाकाराने दौलतनगरला योजनेचा शुभारंभ संपन्न. व्यवसाय करणाऱ्या तरुणांच्या पंखाना गृहराज्यमंत्री यांचे बळ. युवा नेते यशराज देसाई

 

            दौलतनगर दि.12 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांचे संकल्पनेतून राज्यातील बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या शासकीय योजनेतून संधी मिळवून देण्यासाठी माझा व्यवसाय माझा हक्क हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमाअंतर्गत व्यवसायासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केला असून पाटण मतदारसंघातील बेरोजगारांना शासकीय योजनेतून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याकरीता मतदारसंघाचे नेते राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला आहे.या योजनेचा भव्य शुभारंभ गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संमतीने आज झाला. या योजनेच्या माध्यमातून सध्या बेरोजगार असणाऱ्या व स्वत:च्या पायावर उभे राहण्याची जिद्द बाळगणाऱ्या तरुणांच्या पंखाना बळ देण्याचे काम गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब करीत आहेत.पाटण मतदारसंघातील बेरोजगार तरुणांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवानेते यशराज देसाईंनी केले.

           दौलतनगर ता.पाटण येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत पाटण मतदारसंघातील बेरोजगार तरुणांना स्वत:चा व्यवसाय मिळवून देणेसाठी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शुभारंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख,माजी चेअरमन ॲड.मिलींद पाटील, जि.प. सदस्य प्रदीप पाटील,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतंर्गत माझा व्यवसाय माझा हक्क चे समन्वयक सचिन पवार यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

               याप्रसंगी बोलताना यशराज देसाई म्हणाले,आपले तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पहाता मोठे उद्योग उभे राहू शकत नाहीत मात्र छोटे छोटे उद्योग उभे करणे त्यातून व्यवसाय उभे करणे सहज शक्य आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या, कडधान्यांचे, दुधाचे उत्पादन होतं, सध्याचे युग हे मार्केटिंगचे युग असून कुठलीही वस्तू विकायची झाली आपली वस्तू किती चांगली आहे याचे मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करणे आवश्यक आहे.उत्पन्नांसाठी चांगले साधन असणाऱ्या चांगल्या योजना माझा व्यवसाय माझा हक्क या उपक्रमातंर्गत समावेश आहेत.या योजनेअंतर्गत पालेभाज्या,कडधान्यांचे,दुधाचे संकलनासाठी गाडी असेल किंवा इतर गोष्टी असतील लवकरात लवकर कर्ज देऊन शासनामार्फत सुमारे 35 टक्कयापर्यंत सबसिडी देऊन त्याच्यामध्ये सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने काम करणे शक्य आहे. ग्रामीण भागांमध्ये काही तरी करण्याची जिद्द आहे त्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा यामुळे अधिक सक्षमपणे छोटे-मोठे उद्योग आपल्या पाटण तालुक्यामध्ये निश्चितपणे निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करुन दि.12 मार्च पासून 25 मार्चपर्यंत फॉर्म स्विकारण्यात येवून आपल्याला कुठल्या व्यवसायामध्ये काम करण्याची इच्छा आहे त्याचे पूर्ण मार्गदर्शन करुन सगळे सहकार्य हे साहेबांच्या कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

             याप्रसंगी बोलताना रविराज देसाई म्हणाले, आपल्या मतदारसंघातील युवकांनी नवीन नवीन उद्योग सुरू करावेत यासाठी साहेबांचे विशेष प्रयत्न सुरु आहेत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतुन हा कार्यक्रम राज्य सरकार राबवित आहे. आपल्या डोंगरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या संधीचा निश्चित फायदा घ्यावा आणि या संधीचं सोनं करून घ्यावे. यावेळी समन्वयक सचिन पवार यांनी या योजनेची माहिती देवून कशाप्रकारे शासनामार्फत सबसिडी दिली जाते याचे मार्गदर्शन करुन या योजनेचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. मेळाव्यास तरुण युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला. उपस्थितांचे स्वागत पं.स सदस्य संतोष गिरी यांनी केले व आभार सुरेश पानस्कर यांनी मानले.

चौकट:- गृहराज्यमंत्री यांनी मेळाव्याला दिल्या शुभेच्छा.

            या मेळाव्याकरीता स्वत: गृहराज्यमंञी ना.शंभूराज देसाई उपस्थित राहणार होते कालच त्यांनी विधिमंडळामध्ये सन 2022 चा अर्थसंकल्प सादर केला.सोमवारपासून नियमित अधिवेशन असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी मुंबई येथून स्वयंरोजगार मेळाव्याला शुभेच्छा देवून या उपक्रमातंर्गत शासनाच्या योजना आहेत या योजनांचा लाभ घ्यावा या योजनेकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन दिले.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 112 जयंतीचे औचित्य साधून तालुकास्तरीय समित्यांवर निवड झालेल्यांना नियुक्ती पत्र प्रदान. युवा नेते यशराज देसाई, रविराज देसाईंची प्रमुख उपस्थिती.

 


­­

           दौलतनगर दि.12 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- राज्याचे लोकप्रिय,कर्तबगार मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या कुशल नेतृत्वाखालील सरकार आज महाराष्ट्र राज्यामध्ये प्रभावीपणे राज्याला प्रगतीच्या दिशेने नेणारे, विकासाला चालना देणारे काम करीत आहे. राज्य शासनामार्फत तालुकास्तरावर लोककार्यासाठी ज्या काही जनहितार्थ समित्या गठीत करण्यात येतात त्या तालुकास्तरीय समित्या गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे शिफारशीवरुन पाटण विधानसभा मतदारसंघात गठीत करण्यात आल्या आहेत.राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 112 व्या जयंतीचे औचित्य साधून तालुकास्तरीय समित्यावर निवड झालेल्या विविध पदाधिकाऱ्यांना जयंती कार्यक्रमामध्ये युवा नेते यशराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येवून निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

          राज्य शासनामार्फत तालुकास्तरावर लोककार्यासाठी ज्या काही जनहितार्थ समित्या गठीत करण्यात येतात  त्या तालुकास्तरीय समित्या राज्याचे लोकप्रिय,कर्तबगार मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे शिफारशीवरुन गठीत करण्यात आल्या आहेत.मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य शासनाचे प्रभावीपणे व राज्याला प्रगतीच्या दिशेने नेणारे,विकासाभिमुख असे  काम सुरु आहे.मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरेसाहेब यांना अभिप्रेत असणारे विकासाभिमुख कार्य पाटण विधानसभा मतदारसंघात करुन घेणेकरीता तालुकास्तरीय समित्यावर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी अनेक वर्षापासून सामाजीक, राजकीय क्षेत्रात जनहितार्थ उत्कृष्ट व उल्लेखनीय असे कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लावली आहे.यामध्ये  एकात्मिक विकासासाठी तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती, संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती, रोजगार हमी योजना समिती, राज्य विद्युत मंडळ तालुका सल्लागार समिती, तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती या पाच समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण 23 पदाधिकारी यांच्या अध्यक्ष व सदस्य म्हणून निवडी झाल्या आहेत.

             दरम्यान तालुकास्तरीय महत्वाच्या समितीवर निवड झालेल्यां पदाधिकाऱ्यांना पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री या नात्याने गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी त्यांचे अभिनंदन केले असून सामाजिक कार्याला जोड मिळावी म्हणून या समितीवर निवड करण्यात आली असल्याचे लेखी नियुक्ती पत्रही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे. या पत्रामध्ये समितींच्या माध्यमातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांना अभिप्रेत असणारे विकासाभिमुख कार्य आपल्या हातून पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य तळागाळातील जनतेकरीता घडावे, अशी सदिच्छा व्यक्त करुन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस  गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.