Saturday 12 March 2022

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा बेरोजगारांनी लाभ घ्यावा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे पुढाकाराने दौलतनगरला योजनेचा शुभारंभ संपन्न. व्यवसाय करणाऱ्या तरुणांच्या पंखाना गृहराज्यमंत्री यांचे बळ. युवा नेते यशराज देसाई

 

            दौलतनगर दि.12 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांचे संकल्पनेतून राज्यातील बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या शासकीय योजनेतून संधी मिळवून देण्यासाठी माझा व्यवसाय माझा हक्क हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमाअंतर्गत व्यवसायासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केला असून पाटण मतदारसंघातील बेरोजगारांना शासकीय योजनेतून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याकरीता मतदारसंघाचे नेते राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला आहे.या योजनेचा भव्य शुभारंभ गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संमतीने आज झाला. या योजनेच्या माध्यमातून सध्या बेरोजगार असणाऱ्या व स्वत:च्या पायावर उभे राहण्याची जिद्द बाळगणाऱ्या तरुणांच्या पंखाना बळ देण्याचे काम गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब करीत आहेत.पाटण मतदारसंघातील बेरोजगार तरुणांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवानेते यशराज देसाईंनी केले.

           दौलतनगर ता.पाटण येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत पाटण मतदारसंघातील बेरोजगार तरुणांना स्वत:चा व्यवसाय मिळवून देणेसाठी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शुभारंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख,माजी चेअरमन ॲड.मिलींद पाटील, जि.प. सदस्य प्रदीप पाटील,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतंर्गत माझा व्यवसाय माझा हक्क चे समन्वयक सचिन पवार यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

               याप्रसंगी बोलताना यशराज देसाई म्हणाले,आपले तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पहाता मोठे उद्योग उभे राहू शकत नाहीत मात्र छोटे छोटे उद्योग उभे करणे त्यातून व्यवसाय उभे करणे सहज शक्य आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या, कडधान्यांचे, दुधाचे उत्पादन होतं, सध्याचे युग हे मार्केटिंगचे युग असून कुठलीही वस्तू विकायची झाली आपली वस्तू किती चांगली आहे याचे मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करणे आवश्यक आहे.उत्पन्नांसाठी चांगले साधन असणाऱ्या चांगल्या योजना माझा व्यवसाय माझा हक्क या उपक्रमातंर्गत समावेश आहेत.या योजनेअंतर्गत पालेभाज्या,कडधान्यांचे,दुधाचे संकलनासाठी गाडी असेल किंवा इतर गोष्टी असतील लवकरात लवकर कर्ज देऊन शासनामार्फत सुमारे 35 टक्कयापर्यंत सबसिडी देऊन त्याच्यामध्ये सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने काम करणे शक्य आहे. ग्रामीण भागांमध्ये काही तरी करण्याची जिद्द आहे त्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा यामुळे अधिक सक्षमपणे छोटे-मोठे उद्योग आपल्या पाटण तालुक्यामध्ये निश्चितपणे निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करुन दि.12 मार्च पासून 25 मार्चपर्यंत फॉर्म स्विकारण्यात येवून आपल्याला कुठल्या व्यवसायामध्ये काम करण्याची इच्छा आहे त्याचे पूर्ण मार्गदर्शन करुन सगळे सहकार्य हे साहेबांच्या कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

             याप्रसंगी बोलताना रविराज देसाई म्हणाले, आपल्या मतदारसंघातील युवकांनी नवीन नवीन उद्योग सुरू करावेत यासाठी साहेबांचे विशेष प्रयत्न सुरु आहेत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतुन हा कार्यक्रम राज्य सरकार राबवित आहे. आपल्या डोंगरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या संधीचा निश्चित फायदा घ्यावा आणि या संधीचं सोनं करून घ्यावे. यावेळी समन्वयक सचिन पवार यांनी या योजनेची माहिती देवून कशाप्रकारे शासनामार्फत सबसिडी दिली जाते याचे मार्गदर्शन करुन या योजनेचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. मेळाव्यास तरुण युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला. उपस्थितांचे स्वागत पं.स सदस्य संतोष गिरी यांनी केले व आभार सुरेश पानस्कर यांनी मानले.

चौकट:- गृहराज्यमंत्री यांनी मेळाव्याला दिल्या शुभेच्छा.

            या मेळाव्याकरीता स्वत: गृहराज्यमंञी ना.शंभूराज देसाई उपस्थित राहणार होते कालच त्यांनी विधिमंडळामध्ये सन 2022 चा अर्थसंकल्प सादर केला.सोमवारपासून नियमित अधिवेशन असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी मुंबई येथून स्वयंरोजगार मेळाव्याला शुभेच्छा देवून या उपक्रमातंर्गत शासनाच्या योजना आहेत या योजनांचा लाभ घ्यावा या योजनेकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment