दौलतनगर दि.12 (जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- राज्याचे
लोकप्रिय,कर्तबगार मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या कुशल नेतृत्वाखालील
सरकार आज महाराष्ट्र राज्यामध्ये प्रभावीपणे राज्याला प्रगतीच्या दिशेने नेणारे, विकासाला
चालना देणारे काम करीत आहे. राज्य शासनामार्फत तालुकास्तरावर लोककार्यासाठी ज्या
काही जनहितार्थ समित्या गठीत करण्यात येतात त्या तालुकास्तरीय समित्या गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे शिफारशीवरुन
पाटण विधानसभा मतदारसंघात गठीत करण्यात आल्या आहेत.राज्याचे माजी गृहमंत्री
लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 112 व्या जयंतीचे औचित्य साधून तालुकास्तरीय
समित्यावर निवड झालेल्या विविध पदाधिकाऱ्यांना जयंती कार्यक्रमामध्ये युवा नेते
यशराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे हस्ते नियुक्ती
पत्र प्रदान करण्यात येवून निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार
करण्यात आला.
राज्य
शासनामार्फत तालुकास्तरावर लोककार्यासाठी ज्या काही जनहितार्थ समित्या गठीत
करण्यात येतात त्या तालुकास्तरीय समित्या राज्याचे
लोकप्रिय,कर्तबगार मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे शिफारशीवरुन गठीत करण्यात
आल्या आहेत.मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब
यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य शासनाचे प्रभावीपणे व
राज्याला प्रगतीच्या दिशेने नेणारे,विकासाभिमुख असे काम सुरु आहे.मुख्यमंत्री ना. उध्दवजी
ठाकरेसाहेब यांना अभिप्रेत असणारे विकासाभिमुख कार्य पाटण विधानसभा मतदारसंघात
करुन घेणेकरीता तालुकास्तरीय समित्यावर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी अनेक
वर्षापासून सामाजीक, राजकीय क्षेत्रात जनहितार्थ उत्कृष्ट व उल्लेखनीय असे कार्य
करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लावली आहे.यामध्ये
एकात्मिक विकासासाठी तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती, संजय
गांधी निराधार अनुदान योजना समिती, रोजगार हमी योजना समिती, राज्य विद्युत मंडळ तालुका
सल्लागार समिती, तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती या पाच समित्या गठीत करण्यात
आल्या आहेत. यामध्ये एकूण 23 पदाधिकारी यांच्या अध्यक्ष व सदस्य म्हणून निवडी झाल्या
आहेत.
दरम्यान तालुकास्तरीय
महत्वाच्या समितीवर निवड झालेल्यां पदाधिकाऱ्यांना पाटण विधानसभा मतदारसंघाचे
आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री या नात्याने गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी त्यांचे अभिनंदन
केले असून सामाजिक कार्याला जोड मिळावी म्हणून या समितीवर निवड करण्यात आली असल्याचे
लेखी नियुक्ती पत्रही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे. या पत्रामध्ये
समितींच्या माध्यमातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांना
अभिप्रेत असणारे विकासाभिमुख कार्य आपल्या हातून पाटण विधानसभा मतदारसंघातील
सर्वसामान्य तळागाळातील जनतेकरीता घडावे, अशी सदिच्छा व्यक्त
करुन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी हार्दिक
शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment