Saturday 26 March 2022

वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सोपविली अजुन एक महत्वाची जबाबदारी. सव्वा दोन वर्षातील राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा परफॉर्मन्स उत्कृष्ट

 


 

            मुंबई दि.26 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- राज्याचे गृह,वित्त व नियोजन,राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास,उद्योजकता,पणन अशा राज्यातील महत्वाच्या पाच खात्यांची जबाबदारी सांभाळणारे राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचेवर राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब,उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवारसाहेब यांनी अजुन एक महत्वाची जबाबदारी सोपविली आहे.राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आला असून याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवारसाहेब यांनी काल विधानपरिषद सभागृहात केली. गृह व वित्त अशा महत्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळणारे ना.शंभूराज देसाईंचा राज्यमंत्री म्हणून गत सव्वा दोन वर्षातील परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट असल्यानेच त्यांच्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अत्यंत विश्वासाने अधिकची जबाबदारी सोपविली आहे.

             राज्य सरकारमध्ये एक नोव्हेंबर,2005 पुर्वी कंत्राटी, हंगामी व नंतर सेवेत कायम झालेल्या शासकीय  व निमशासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्यासंदर्भातील विषय गेली अनेक वर्षापासून प्रलंबीत होता. या प्रलंबीत असणाऱ्या विषयासंदर्भात बैठका घेवून यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्याची महत्वाची जबाबदारी ना.शंभूराज देसाईंवर दिली आहे.यासंदर्भात निवृत्तीवेतन अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे आणि या अभ्यासगटाचे अध्यक्ष वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी करण्यात आले आहे. याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवारसाहेब यांनी काल विधानपरिषद सभागृहात केली. मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब,उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवारसाहेब यांनी वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा राज्यमंत्री म्हणून परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट असल्याचे अनेक दाखले विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान तसेच राज्य शासनाच्या विविध बैठकांच्या निमित्ताने यापुर्वी दिले आहेत.अभ्यासू आणि हजरजबाबी राज्यमंत्री म्हणून ना.शंभूराज देसाईंची ओळख संपुर्ण राज्यभर असल्यानेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी ही अधिकची प्रमुख पदाची जबाबदारी ना.शंभूराज देसाईंवर सोपविली आहे. निवृत्तीवेतन देण्यासंदर्भातील हा विषय राज्यातील सुमारे दोन ते अडीच लाख कंत्राटी, हंगामी व नंतर सेवेत कायम झालेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांशी निगडीत असून सन 2021-22 या आर्थिक वर्षात ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अभ्यासगटाकडून कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनासंदर्भात बैठका ही सुरु केल्या असल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवारसाहेब यांनी काल सभागृहात सांगितले आहे. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनासंदर्भात सकारात्मक असा प्रस्ताव वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे शासनाकडे निवृत्तीवेतन अभ्यासगटाच्या माध्यमातून सादर करतील असा विश्वासही राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवारसाहेब यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment