मुंबई दि.28 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- राज्याचे गृह,वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंनी महाराष्ट्र विधानपरीषद सभागृहात अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला तसेच
विरोधी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या मुद्दयांना अगदी मुद्देसुद उत्तर देत सरकारची व
वित्त विभागाची बाजू भक्कमपणे मांडल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री
ना.अजितदादा पवार हे वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंवर बेहद खुश झाले. विधानपरीषदेचे
कामकाज संपवून विधानसभेत आलेल्या ना.शंभूराज
देसाईंना जवळ बोलवून घेत शंभूराजे,
अर्थसंकल्पावरील
तुमचा रिप्लाय जोरदार, खुप
छान आणि मुद्देसुद झाला असे सांगून ना.अजितदादांनी
ना.शंभूराज देसाईंच्या कामांचे व उत्तराचे कौतुक
केले.
नुकत्याच झालेल्या सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकाच वेळी
विधानसभा व विधानपरीषद सभागृहात अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेचे उत्तर आल्याने
विधानसभा सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवार यांनी तर विधानपरीषद सभागृहात गृह व
वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी
अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला उत्तरे दिली.विधानसभा
सभागृहाचे कामकाज पहात वित्तमंत्री ना. अजितदादा
हे विधानसभा सभागृहातून संगणकावर ना.शंभूराज
देसाईंचा विधान परीषदेतील अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण
चर्चेचा रिप्लाय एैकत होते.
विधानपरीषदेचे
कामकाज संपवून विधानसभेत आलेल्या ना.शंभूराज
देसाईंना पाहिल्यानंतर ना.अजितदादांनी त्यांना जवळ
बोलवून घेतले आणि शंभूराजे,अर्थसंकल्पावरील तुमचा
रिप्लाय एैकला.रिप्लाय जोरदार, खुप
छान,मुद्देसुद झाला शासनाची भूमिका व वित्त
विभागाची बाजू तुम्ही भक्कमपणे
मांडली
खुप छान असे सांगून ना.अजितदादांनी ना.शंभूराज देसाईंच्या उत्तराचे तोंडभरुन कौतुक केले. या अधिवेशनात विधानपरीषद सभागृहात गृह आणि वित्त विभागाचे
बहूतांशी कामकाज हे ना.शंभूराज देसाईंनीच पाहिले.त्यांच्याकडे असणाऱ्या गृह,वित्त
विभागाची बाजू तसेच शासनाची भूमिका त्यांनी विधानपरीषद
सभागृहात योग्यप्रकारे आणि भक्कमपणे मांडली आणि विरोधी पक्षाला सडेतोड उत्तरे देत ना.शंभूराज देसाईंनी विरोधकांच्या सगळया प्रश्नांचे निरसण केले, ना.शंभूराज देसाईंकडे
महाविकास आघाडीतील अभ्यासू राज्यमंत्री व हजरजबाबी आणि सभागृहात सडेतोड बोलणारा
चेहरा म्हणून पाहिले जात आहे.
आपल्या
कार्यशैलीतून ते सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही लक्ष वेधून घेत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा
पवार यांनी विधानसभा सभागृहात तर विधानपरीषद सभागृहात गृह व वित्त राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी राज्यातील जनतेच्या हिताचा विकासाची
पंचसुत्री घेवून सन 2022-23 चा दर्जेदार असा
अर्थसंकल्प मांडला. कृषी, सार्वजनीक आरोग्य, मनुष्यबळ
विकास, दळणवळण व उद्योग या
पंचसुत्रीच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना देण्याचे कार्य यंदाच्या
अर्थसंकल्पातून करण्यात आले आहे.राज्यातील जनतेवर कोणताही
कर न लादता या अर्थसंकल्पातून बहूतांशी कर कमी करण्याचे काम शासनाने या
अर्थसंकल्पातून केले आहे.
राज्यमंत्री
म्हणून ना.शंभूराज देसाईंच्या कामकाजावर सत्ताधाऱ्यांसह
विरोधकही या अधिवेशनात चांगलेच खुश दिसून आले. अर्थसंकल्पावरील
सर्वसाधारण चर्चेच्या मुद्देसुद उत्तरावर कौतुक केलेल्या वित्तमंत्री ना.अजितदादा पवार यांचे गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आभार व्यक्त केले.
चौकट:- आमचे शंभूराज,
सक्षम
आहेत- ना.अजितदादा पवार.
अर्थसंकल्पीय अधिवेशन
कालावधीमध्ये एका महत्वाच्या बैठकीदरम्यानही आमचे शंभूराज, सक्षम
आणि भक्कम आहेत त्यांचेवर जबाबदारी दया शंभूराज,
ती पार पाडतील असे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा
पवार यांनी सांगून ना.शंभूराज देसाईंच्या
कामकाजाला व सक्षमतेला त्यांनी पाठबळ दिले
आहे.
No comments:
Post a Comment