मुंबई दि.16 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-महाराष्ट्र
विधानपरिषदेमध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंनी सोमवारचा (14 जुन) दिवस चांगलाच गाजविला. म.वि.प अन्वये विरोधी पक्षाकडून
गृह विभागाशी संबधित 260 च्या आणलेल्या
प्रस्तावावर विरोधकांकडून आलेल्या प्रत्येक मुद्दयांना अगदी शिवसेना स्टाईलने ना.शंभूराज देसाईंनी धडाकेबाजपणे मुद्देसुद आणि गृह विभागाची, शासनाची बाजू अगदी कणखर व भक्कमपणे मांडून विरोधकांना सडेतोड उत्तरे देत
गप्पगार करीत
विरोधकांची बोलतीच बंद केली. त्यामुळे सोमवारी ना.शंभूराज
देसाई खुप चर्चेत आले.महाराष्ट्र
विधानपरिषदेमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी दाखविलेला धडाकेबाजपणा राज्याचे
मुख्यमंत्री ना.उध्दवजी
ठाकरे यांचे कानावर गेल्यानंतर रात्री उशीरा मुख्यमंत्री यांनी स्वत: वर्षा निवासस्थानावरुन ना.देसाईंना दुरध्वनी केला व शंभूराज,260 चा आजचा रिप्लार्य एक नंबर झाला,अभिनंदन तुमचे,तुमच्यासारखा धडाकेबाज गृहराज्यमंत्री महाविकास आघाडीत आहे, खुप छान असे गौरवोद्गार काढत शंभूराज देसाईंच्या
पाठीवर शाबासकीची थाप दिली.
मुंबईला राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु
असून सन 2022 चा
अर्थसंकल्प शुक्रवार (दि.11) रोजी सादर झालेनंतर विरोधी पक्षाच्या वतीने
महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये म.वि.प अन्वये
260 चा
गृहविभागाशी निगडीत प्रस्ताव चर्चेला आणला होता. विरोधी
पक्षाकडून या प्रस्तावावर राज्यातील विविध विषयांवर सभागृहामध्ये चर्चा केली.यामध्ये गृहविभागाशी निगडीत असणाऱ्या कायदा व
सुव्यवस्थेवरही विविध मुद्दे मांडून विरोधकांनी राज्य सरकारवर विविध आरोप केले.
राज्याचे गृहराज्यमंत्री असणारे
ना.शंभूराज देसाई हे महाराष्ट्र
विधानपरिषदेमध्ये राज्याची गृह आणि वित्त विभागाची संपुर्ण जबाबदारी शासनाच्या
वतीने चोख बजावित आहेत.
महाविकास
आघाडीमध्ये वित्त विभागाचे कॅबिनेट मंत्री ना.अजितदादा
पवार व गृह विभागाचे कॅबिनेट मंत्री ना.दिलीप
वळसे पाटील असून या दोघांनीही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंना,शंभूराजजी,महाराष्ट्र
विधानसभा आम्ही पहातो तुम्ही विधानपरिषदेचे सगळे काम पहा असे अधिवेशन सुरु
होण्यापुर्वीच सांगितले होते.
शुक्रवारी अर्थराज्यमंत्री
म्हणून ना.शंभूराज देसाईंनी राज्याचा मुद्देसुद व
अभ्यासूपुर्ण अर्थसंकल्प मांडलेनंतर सोमवार (दि.14) चा पुर्ण दिवसही चांगलाच गाजविला.महाराष्ट्र विधानपरिषदेतील सदस्यांसह, विधानसभेतील कॅबिनेट मंत्री व राज्याचे मुख्यमंत्र्यांचेही
लक्ष गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी
त्यादिवशी वेधले. म.वि.प अन्वये विरोधी पक्षाकडून आणलेल्या 260 च्या प्रस्तावावर विरोधकांच्या प्रत्येक
मुद्यांची नोंद घेत ना.शंभूराज देसाईंनी अगदी
शिवसेना स्टाईलने या प्रस्तावाचा सडेतोडपणे रिप्लार्य दिला.गृहराज्यमंत्री या प्रस्तावाला उत्तर देताना अगदी मुद्देसुद
आणि अभ्यासपुर्ण सभागृहात बोलत होते.अनेक
ठिकाणी त्यांनी आपला धडाकेबाजपणा दाखवित शासनाची,गृह
विभागाची बाजू किती कणखर आणि भक्कम आहे.गृह
विभाग राज्यामध्ये जनहितार्थ व कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कशापध्दतीने काम करीत
आहेत हे त्यांनी विरोधकांना पुराव्यानिशी पटवून दिले. यावर
राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही राज्याचे गृहराज्यमंत्री हे अतिशय
संवेदनशील आणि जागेवर निर्णय घेणारे गृहराज्यमंत्री आहेत.विरोधी
पक्षाकडून त्यांना गृहविभागाशी निगडीत एखादे काम सांगितले की ते लगेच त्यावर
अंमलबजावणी करतात असे कौतुक रिप्लार्यनंतर लगेच केले होते.
दरम्यान रिप्लार्य सुरु असताना
राज्याचे पर्यटनमंत्री ना.आदित्यजी ठाकरे हे
विधानपरिषद सभागृहामध्ये उपस्थित होते त्यांनीही ना.शंभूराज
देसाईंचा 260 वरील प्रस्तावाचा
रिप्लार्य एैकल्यानंतर ना.शंभूराज देसाईंचे अभिनंदन
केले. राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी माझेवर राज्याच्या विविध महत्वाच्या
पाच खात्यांची जबाबदारी दिली असून माझे राज्यमंत्रीपदाच्या कामकाजावर खुष होवून त्यांनी
गौरवोद्गार काढलेने व शाबासकीची थाप दिल्याने काम करण्यास आपल्याला अधिक बळ मिळाले
असल्याची प्रतिक्रिया ना.शंभूराज
देसाईंनी व्यक्त करुन कौतुकाबद्दल मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे मनपुर्वक आभार व्यक्त केले.
प्रतिबिंब लोकनेत्यांचे!
ReplyDeleteअभिनंदन साहेब!!!
पाटण तालुक्याचा बुलंद आवाज उत्कृष्ट संसदपटू मा.नामदार साहेब
ReplyDeleteपाटण तालुक्याचा बुलंद आवाज शंभूराजे देसाई साहेब अभिनंदन
ReplyDeleteएकच वादा शंभुराजे दादा
ReplyDeleteदेसाई साहेबांचे खुप खुप अभिनंदन
ReplyDeleteदेसाई साहेबांचा खुप खुप अभिनंदन
ReplyDeleteअभ्यासू व्यक्तीमत्व 🙏
ReplyDeleteOnly साहेब
ReplyDeleteBrilliant Leadership Saheb
ReplyDeleteअभिनंदन साहेब
ReplyDeleteGreat साहेब
ReplyDeleteसाहेबांचे मनापासून खूप खूप अभिनंदन
ReplyDeleteअभिनंदन साहेब
ReplyDeleteअपकमिंग व डिजर्विंग कॅबिनेट . .
ReplyDelete