Thursday, 10 November 2022

पाटण तालुक्यातील भूस्खलन बाधित 7 गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी निधी मंजूर. पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे पाठपुराव्याला यश,बाधित सात गावांच्या पुनर्वसनाला मिळणार गती.

 

 

दौलतनगर दि.10:- पाटण तालुक्यातील भूस्खलनामुळे धोकादायक स्थितीतमध्ये असलेल्या भूस्खलन बाधित सात गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याकरीता गतवर्षापासून राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांचा पाठपुरावा सुरु होता. या गावांचे कायमस्वरुपी  पुनर्वसन करण्याचे अनुषंगाने केलेल्या मागणीनुसार दि. 05 ऑगस्ट,2022 रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये पाटण तालुक्यातील भूस्खलन बाधित सात गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने खाजगी जमिन खरेदी करण्याकरीता आवश्यक असलेल्या  कोटी रूपयांच्या निधीची तरतूद  करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे,अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी,शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात भूस्खलन बाधित गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनास प्रशासकीय मान्यता तसेच त्याकरीता आवश्यक निधी मंजूरीस मान्यता दिली असल्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभाग(मदत व पुनर्वसन) विभागाने दि.10 नोव्हेंबर,2022 पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

             प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, गतवर्षी माहे जुलै 2021 मध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमध्ये पाटण तालुक्यात मोठया प्रमाणांत भूस्खलन होऊन जिवीत व वित्त झाली होती. मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये भूस्खलनासह दरडी कोसळण्याचे घटना घडल्याने या धोकादायक गावांचे तात्पुरते स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आले होते. या धोकादायक गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणे गरजेचे असल्याने सदर गावांचा कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा जागा मागणी व घर बांधणीचा प्रस्ताव शासनस्तरावर आज अखेर प्रलंबित होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे या प्रलंबित असलेल्या प्रस्तावासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेण्यासंदर्भात विनंती केली होती. त्यानुसार दि. 05 ऑगस्ट,2022 रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे अध्यक्षतेखाली व राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे उपस्थितीत अतिवृष्टीमध्ये भूस्खलन होऊन बाधित झालेल्या गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचे अनुषंगाने उच्चस्तरीय  बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी या गावांचे पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या खाजगी जमिन खरेदी प्रस्तावास लागणारा निधी तात्काळ देण्याचे निर्देश दिले.त्यानुसार संभाव्य अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे,अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी,शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात भूस्खलन बाधित गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ठरावासह प्रस्तावत केले आहे. सदर पुनर्वसन खाजगी मालकीच्या जमिनीमध्ये करण्यासाठी मान्यता मिळणेबाबत व सदर खाजगी जमिन खरेदीसाठी एकूण रु. 03 कोटी 88 लक्ष 60 हजार इतका निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी सातारा यांनी शासनास सादर केला होता. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार पुनर्वसनासाठी आवश्यक असलेली खाजगी जमिन खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून रु. 03 कोटी 88 लक्ष 60 हजार इतका निधी मंजूर करुन तो आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन विभागस हस्तांतरीत केला शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभाग(मदत व पुनर्वसन) विभागाने दि.10 नोव्हेंबर,2022 पारित केला असून पुनर्वसनांतर्गत बाधित कुटुंबांना द्यावयाची एकूण 588 घरे बांधून देणे वतेथील ले आऊट विकास कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी करण्याचा निर्णय झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार व राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे पाठपुराव्यामुळे पाटण तालुक्यातील भूस्खलन बाधित सात गावांचे पुनर्वसनाला आता गती मिळणार असून बाधित गावातील ग्रामस्थांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे आभार मानले असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत नमूद केले आहे.

 

Wednesday, 2 November 2022

मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते शुक्रवार दि. 04 ते रविवार दि. 06 नोव्हेंबर दरम्यान विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमांचे आयोजन. मोरणा,पाटण,ढेबेवाडी,कुंभारगाव,चाफळ व तारळे विभागात होणार भूमिपूजन कार्यक्रम.

 

दौलतनगर दि.02:-पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये राज्याचे अर्थसंकल्प,पुरवणी अर्थसंकल्प,अतिवृष्टी व पूरहानी दुरुस्ती कार्यक्रम या लेखाशिर्षाखाली मंजूर असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते शुक्रवार दि. 04 नोव्हेंबर ते रविवार दि. 06 नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये मोरणा,पाटण,ढेबेवाडी,कुंभारगावं,चाफळ व तारळे विभागांमध्ये आयोजित केले असल्याची माहिती  राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

                प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये राज्याचे अर्थसंकल्प,पुरवणी अर्थसंकल्प, अतिवृष्टी व पूरहानी दुरुस्ती कार्यक्रम या लेखाशिर्षाखाली मंजूर असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते संपन्न होणार असून यामध्ये शुक्रवार दि. 04 नोव्हेंबर रोजी अर्थसंकल्प 2021-22  मधून मंजूर प्रजिमा 53 ते चोपडी बेलवडे खुर्द सुळेवाडी सोनवडे हुंबरवाडी नाटोशी धावडे रस्ता प्रजिमा 124 किमी 0/00 ते 19/00 भाग किमी 4/00 ते 8/400 सुळेवाडी ते शिंदेवाडी चे बांधकाम करणे. र.रु.440.00 लक्ष व प्रजिमा 53 ते चोपडी बेलवडे खुर्द सुळेवाडी सोनवडे हुंबरवाडी नाटोशी धावडे रस्ता प्रजिमा 124 किमी 0/00 ते 19/00 भाग किमी  8/400 ते 12/600 शिंदेवाडी ते कुसरुंड चे बांधकाम र.रु.420.00 लक्ष या कामांचे भूमिपूजन कार्यक्रम होणार असून दुपारी 03.00 वा कुसरुंड येथे जाहिर सभा होणार आहे. शनिवार दि.05 नोव्हेंबर रोजी पाटण येथे सकाळी 10.30 वा. अर्थसंकल्प 2021-22  मधून मंजूर पाटण,जि.सातारा येथील प्रशासकीय इमारत र.रु. 15 कोटी या कामाचे भूमिपूजन होणार आहे. तर अर्थसंकल्प 2021-22  मधून मंजूर भोसगाव आंब्रुळकरवाडी नवीवाडी रुवले कारळे पाणेरी रस्ता प्रजिमा 122 किमी 0/00 ते 12/500 भाग किमी 0/00 ते 2/500 भोसगाव ते आंब्रुळकरवाडी चे रुंदीकरण व सुधारणा र.रु. 200.00 लक्ष,अतिवृष्टी व पूरहानी दुरुस्ती 2021-22 मधून मंजूर ढेबेवाडी भोसगाव उमरकांचन जिंती मोडकवाडी सातर रस्ता प्रजिमा 126 किमी 2/500, 7/200  येथील मोऱ्यांचे ठिकाणी बॉक्स सेल बांधणे,किमी 0/00 ते 2/500 येथील अतिवृष्टीमुळे तुटलेल्या रस्त्याची दुरुस्ती 61.00 लक्ष,कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत मंजूर वांग मध्यम प्रकल्प अंतर्गत पुनर्वसित गावठाण मौजे मेंढ,ता.पाटण येथील डोंगराकडील बाजूने संरक्षक भिंत बांधणे र.रु. 532.62 लक्ष या कामांचे भूमिपूजन होणार असून ढेबेवाडी येथे दुपारी 02.00 वा. जाहिर सभा होणार आहे. तसेच अतिवृष्टी व पूरहानी दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत मंजूर इजिमा 138 ते निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी मस्करवाडी घराळवाडी रस्ता प्रजिमा 121 किमी 8/500,23/350 येथे मोऱ्यांचे ठिकाणी बॉक्स सेल/लहान पूल बांधणे र.रु.45.00 लक्ष,इजिमा 138 ते निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी मस्करवाडी घराळवाडी रस्ता प्रजिमा 121 किमी 9/400,23/100 येथे मोऱ्यांचे ठिकाणी बॉक्स सेल/लहान पूल बांधणे र.रु.240.00 लक्ष,इजिमा 138 ते निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी मस्करवाडी घराळवाडी रस्ता प्रजिमा 121 किमी 9/100,5/620 येथे मोऱ्यांचे ठिकाणी बॉक्स सेल/लहान पूल व किमी 20/650,21/600,27/300 येथे दरड काढणे,किमी 13/070 येथे पुलाचे/मोरींचे तुटलेले पेाहोच मार्ग दुरुस्त करणे. र.रु.230.00 लक्ष,इजिमा 138 ते‍ निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी मस्करवाडी घराळवाडी रस्ता प्रजिमा 121 कि.मी.22/700,23/100 येथील मोऱ्यांचे ठिकाणी बॉक्स सेल बांधणे,किमी 19/500,21/100,21/400,21/650 या ठिकाणी रस्त्यालगर कोसळलेली दरड काढणे किमी 9/080 येथे पुलाचे मोरींचे तुटलेले पोहोच मार्ग दुरुस्त किमी 7/00 ते 9/00, 9/200 ते 18/300, 18/400 ते 20/400 येथील अतिवृष्टीमुळे तुटलेल्या रस्त्याची दुरुस्ती करणे. र.रु.140.00 लक्ष पुरवणी अर्थसंकल्प माहे डिसेंबर 2021-22 मधून मंजूर इजिमा 138 ते निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी  मस्करवाडी घराळवाडी रस्ता प्रजिमा 121 कि.मी. 10/200  कसणी गांवाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे.र.रु.200.00 लक्ष,अर्थसंकल्प 2021-22  मधून मंजूर इजिमा 138 ते निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी मस्करवाडी घराळवाडी रस्ता प्रजिमा 121 किमी 0/00 ते 25/00 भाग 18/00 ते 23/00 डाकेवाडी ते वाझोली फाटा चे रुंदीकरण व सुधारणा करणे.र.रु.400.00 लक्ष या कामांचे भूमिपूजन होऊन दुपारी 04.00 वा. वाझोली येथे जाहिर सभा होणार आहे.रविवार दि.06 नोव्हेंबर रोजी अर्थसंकल्प 2021-22  मधून मंजूर चरेगाव चाफळ दाढोली रस्ता प्रजिमा 53 किमी 0/00 ते 6/500 भाग चाफळ फाटा ते गमेवाडी रस्ता सुधारणा करणे.र.रु.270.00 लक्ष व नागठाणे तारळे सडावाघापूर पाटण रस्ता प्रजिमा 37 किमी 26/300 ते 38/00 भाग सडावाघापूर ते खंडूआईचे ‍ मंदिर रस्ता सुधारणा व रुंदीकरण करणे.र.रु. 150.00 लक्ष या कामांचे भूमिपूजन व सकाळी 10.30 वा. माजगाव येथे जाहिर सभा होणार आहे.तर अर्थसंकल्प 2021-22  मधून मंजूर लोरेवाडी प्रजिमा 37 पासून कोंजवडे भुडकेवाडी कडवे खुर्द रस्ता प्रजिमा 129 किमी 0/00 ते 5/00 भाग कोंजवडे ते कडवे खुर्द मधील लांबीची सुधारणा करणे. र.रु.150.00 लक्ष,काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी रस्ता प्रजिमा 128 किमी 0/00 ते 7/00 भाग काटेवाडी ते मुरुड मधील लांबीची सुधारणा व रुंदीकरण करणे. र.रु.350.00 लक्ष,अतिवृष्टी व पूरहानी दुरुस्ती काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी रस्ता प्रजिमा 128 किमी 0/980 मध्ये नवीन पूल बांधणे.र.रु. 190.00 लक्ष,काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी रस्ता प्रजिमा 128 किमी7/910 व 9/110 मध्ये नवीन पूल बांधणे. र.रु.245.00 लक्ष या कामांचे भूमिपूजन व दुपारी 01.00 वा. तारळे येथे जाहिर सभा होणार असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहनी शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

Friday, 28 October 2022

राज्य सरकार साखर कारखानदारीच्या पूर्णपुणे पाठीशी- पालकमंत्री ना.शंभूराज देसाई. लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा 49 वा गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न.

            

दौलतनगर दि.7 :- राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील सरकार हे शेतकऱ्यांचे हिताचेच निर्णय वेगाने घेत आहे. राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून अडचणीत असलेल्या बळीराजाला आवश्यक ते सर्व सहकार्य करणे ही या सरकारची भूमिका आहे.नुकतेच कमी गाळप क्षमता असलेल्या कारखान्यांचे विस्तारीकरणासाठी शासनाकडून भागभांडवल देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.यामध्ये आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा  समावेश असून कारखान्याचे विस्तारीकरणासाठी  सुमारे सोळा कोटींचे शासकीय भागभांडवल कारखान्यास मिळणार असल्याने राज्य सरकार साखर कारखानदारीच्या पुर्णपणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा  सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

       ते दौलतनगर, ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०22-3 मधील 49 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे श्री.हिंदूराव देसाई बनपूरी,भिमराव चव्हाण कुंभारगाव,शंकर माने खिलारवाडी,बबन कदम मारुलहवेली,सुरेश काटे चाफळ,संभाजी पाटील माजगाव,भाऊसाहेब भंडारे महाडीकवाडी नुने,उत्तम साळूंखे येराड, शामराव पवार मल्हारपेठ,अधिकराव देसाई विहे,सुभाष निकम ऊरुल या ज्येष्ठ 11 सभासदांचे शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा),चि.आदित्यराज देसाई यांचेसह व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,मा.चेअरमन अशोकराव पाटील,संचालक शशिकांत निकम,बबनराव शिंदे,प्रशांत पाटील,भागोजी शेळके,शंकरराव पाटील,सोमनाथ खामकर,विजय सरगडे,सुनील पानस्कर, विजय सरगडे,संचालिका श्रीमती जयश्री कवर, सौ.दिपाली पाटील,विजय पवार,जालंदर पाटील,विजयराव मोरे,डी.एम.शेजवळ,संतोष गिरी,पांडूरंग शिरवाडकर,म विष्णू पवार,बबनराव भिसे,प्रकाशराव जाधव, विजयराव जंबुरे यांचेसह सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी कार्यकर्ते,कारखाना अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी गळीत हंगाम शुभारंभानिमित्त कारखान्याचे संचालक सर्जेराव लक्ष्मण जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रुपाली सर्जेराव जाधव यांचे शुभहस्ते सत्यनारायण महापुजा संपन्न झाली.

               ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले,राज्यातीला सहकारी साखर उद्योग सध्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालला असून सहकारी साखर कारखाने शंभर टक्के शासनाच्या नियमाचे पालन करूनच  कारखाने चालवावे लागतात . लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे कार्यक्षेत्र पाहिल्यानंतर निम्माहून अधिेक क्षेत्र हे डोंगंरी भागात आहे. सध्या  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राज्यातील सहकारी साखर कारखानदारीची वाटचाल सुरु आहे.कमीत कमी 2500 प्र..मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता व एखादा उपपदार्थ निर्मिती प्रकल्प असणे ही आता काळाजी गरज झाली आहे.त्यामुळे आताचे सरकार हे ग्रामीण भागातील सहकार क्षेत्राला जास्तीत जास्त मदत होण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबत मंत्रीमंडळ बैठकीमध्येही चर्चा झाली. सभासदांचे हित डोळयासमोर ठेऊन विशेषबाब म्हणून कमी क्षमतेच्या कारखान्यांना सरकारकडून शासकीय भागभांडवल मंजूर करत मदत करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये घेतला.तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष 50 हजार अनुदान जमा करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत शेती नुकसान भरपाईचे जे नियम होते त्यामध्ये बदल करुन,निकषात बदल करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. ऐन दिवाळी सणामध्ये सर्व मंत्री व लोकप्रतिनिधी हे जिल्हा व तालुका प्रशासनासोबत परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामामध्ये व्यस्त होते असे सांगत ते पुढे म्हणाले की, ज्या विश्वासाने सभासदांनी हा कारखाना आपल्याकडे सोपवला आहे त्या सभासदांचे हित डोळयासमोर ठेऊन सर्वांच्या हातून चांगले काम होईल असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त करत सभासदांनी आपला पिकविलेला सर्व ऊस गळीतास देऊन हा  गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सर्वोत्परी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

                  कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) म्हणाले की, सध्या आपल्या कारखान्याचे पहिल्या टप्प्यातील विस्तारीकरणाचे काम पुर्ण झाले असून लवकरच प्रत्यक्ष गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे.तर येणाऱ्या काळामध्ये विस्तारीकरणासह उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणीचा मानस असल्याचे स्पष्ट करत केंद्र शासनाने निर्यातीचे धोरणात बदल करण्याची गरज असल्याचे सांगत राज्य शासनाने कमी गाळप क्षमता असलेल्या सहकारी साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढविण्यासाठी शासकीय भाग भांडवल देण्यास मंजूरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,सहकार मंत्री ना.अतुल सावे व मंत्रीमंडळाचे यांचे आभार मानले.

चौकट: आपला कारखाना राज्यामध्ये एक मॉडेल होईल असं आदर्शवत काम करा-ना.शंभूराज देसाई.

मरळी,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा डोंगरी व दुर्गम भागातील कमी क्षमतेचा कारखाना असून कारखान्याचे पहिल्या टप्प्याचे विस्तारीकरणाचे पहिल्या टप्प्याचे काम सध्या पुर्णत्वाकडे गेले आहे.तर कमी गाळप क्षमता असलेल्या कारखान्यांना शासकीय भागभांडवल देण्याचा जो निर्णय झाला त्यामध्येही आपल्या कारखान्याचा समावेश त्यामुळे आपला कारखाना राज्यामध्ये एक मॉडेल होईल असं आदर्शवत काम सर्व संचालक मंडळ,अधिकारी  व कर्मचारी यांचेकडून व्हावं ,अशी अपेक्षाही ना.शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.

Tuesday, 25 October 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा नामदार शंभूराज देसाई व ज्येष्ठ ११ सभासदांच्या हस्ते गुरुवार दि.२7 ऑक्टोंबर रोजी गळीताचा शुभारंभ – पांडूरंग नलवडे व्हा. चेअरमन

   

 दौलतनगर दि.5:- दौलतनगर, ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२2-3 मधील ४9 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ समारंभ गुरुवार दि.27ऑक्टोंबर,२०२२ रोजी दुपारी 02.00 वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्मितादेवी शंभूराज देसाई, कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळ,दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

                 पत्रकात म्हंटले आहे की,या वर्षीच्या गळीत हंगामातील गळीताकरीता मागील हंगामाच्या जवळपास कारखान्याकडे कार्यक्षेत्रातील ऊसाची नोंद झाली असून कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस गळीताचे उद्दीष्ट कारखाना व्यवस्थापनाने ठेवले आहे. चालु गळीत हंगामाची पुर्वतयारी पुर्ण झाली असून गाळप हंगाम पुर्ण क्षमतेने होण्याच्या दृष्टीने कारखान्यातील सर्व कामकाज पुर्णत्वाकडे गेले आहे. कारखान्याने ऊस तोडणी व वाहतूकीकरीता पुरेसे तोडणी मजुर व वाहनांचे करार पुर्ण केलेले असून कारखान्याकडे करार केलेली सर्व ऊस तोडणी व वाहतूक तोडणी मजुर यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.यंदाचाही गळीत हंगाम कारखान्याचे सभासद,ऊस उत्पादक शेतकरी यांचे सहकार्यातून यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करीत या गळीत हंगामाचा शुभारंभ हा प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद श्री.हिंदूराव मारुती देसाई बनपूरी,भिमराव रामचंद्र चव्हाण कुंभारगाव,सदाशिव रामा नलवडे नावडी,बबन यशवंत कदम मारुलहवेली,सुरेश गणपती काटे चाफळ,संभाजी गणपती पाटील माजगाव,भाऊसाहेब सावळा भंडारे महाडीकवाडी नुने,उत्तम रामचंद्र साळूंखे येराड, शामराव यशवंत पवार मल्हारपेठ,अधिकराव आनंदा देसाई विहे,अशोक भिकाजी खामकर सनगरवाडी ऊरुल या ज्येष्ठ 11 सभासदांचे शुभहस्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.स्मितादेवी शंभूराज देसाई, कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत गुरुवार दि.27ऑक्टोंबर,२०२२ रोजी दुपारी 02.00 वा. संपन्न होणार असून या गळीत हंगाम शुभारंभानिमित्त कारखान्याचे संचालक सर्जेराव लक्ष्मण जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रुपाली सर्जेराव जाधव यांचे शुभहस्ते सत्यनारायण महापुजा आयोजीत केलेली आहे. तरी या समारंभास कारखान्याचे सर्व सभासद,ऊस उत्पादक शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी शेवठी पत्रकात केले आहे.

 

चौकट:-

नामदार शंभूराज देसाई यांचे उपस्थितीमध्ये गुरुवार दि.27 ऑक्टोंबर रोजी दिवाळी फराळाचे आयोजन.

प्रतिवर्षा प्रमाणे यंदा दिपावली सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेवतीने दिवाळी फराळ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि. 27 ऑक्टोंबर 2022 रोजी साय.05 ते 08 या वेळेमध्ये महाराष्ट्र दौलत,लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक,दौलतनगर,ता.पाटण येथे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमास सातारा जिल्हयातील लोकप्रतिनिधी, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी, सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांना निमंत्रण देण्यात आले आहे.दरम्यान दिवाळी फराळ कार्यक्रमाचे निमित्ताने सुप्रसिध्द गायक श्री. श्रीधर फडके यांचे फिटे अंधाराचे जाळे या संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.

Monday, 17 October 2022

पाटण तालुक्यातील चार ग्रामपंचायतीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे घवघवीत यश. मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदशनाखाली चार ग्रामपंचायतीमध्ये सत्ता. मोरणा‍ विभागातील मोरगिरी ग्रामपंचातीमध्ये तब्बल 60 वर्षानंतर सत्तांतर करत राष्ट्रवादीला धोबी पछाड.

     

दौलतनगर दि.17:-पाटण तालुक्यामध्ये माहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला होता. निवडणूक लागलेल्या ग्रामपंचातींमध्ये भिलारवाडी,सुतारवाडी,मान्याचीवाडी,मोरगिरी व घाणव या ग्रामपंचातयींचा समोवश होता. दरम्यान महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखाली भिलारवाडी,सुतारवाडी व मान्याचीवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर मोरणा विभागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मोरगिरी व शिरळ गणातील घाणव या दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लागली होती. आज मतमोजणी  झाल्यानंतर निवडणुक झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये मोरणा विभागातील मोरगिरी या ग्रामपंचायतीमध्ये तब्बल 60 वर्षानंतर सत्तांतर करत तालुक्यातील पाच पैकी चार ग्रामपंचायतीवर राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेची सत्ता आली.

           पाटण तालुक्यातील भिलारवाडी, सुतारवाडी, मान्याचीवाडी, मोरगिरी व घाणव या ग्रामपंचातयींचा या ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम नुकताच पार पडला.यामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखाली भिलारवाडी,सुतारवाडी व मान्याचीवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.तर निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मोरणा विभागातील मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या मोरगिरी ग्रामपंचायतीची निवडूण लागली होती.या निवडणूकीमध्ये ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली  गावातील युवा वर्गाने भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे गेले होते.ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये ना.शंभूराज देसाई यांनी मोरगिरी गावामध्ये केलेल्या विकास कामांचा घरोघरी प्रचार करत  पहिल्यापासून निवडणूकीमध्ये चूरस निर्माण केली  होती. या निवडणूकीमध्ये सरपंच म्हणून सौ.अर्चना किरण गुरव या 307 मतांच्या फरकाने विजयी झाल्या.तसेच विठ्ठल वार्ड क्र.1 मध्ये सचिन कृष्णाजी मोरे,श्रीमती सरिता कृष्णत कुंभार, सौ. वैशाली सचिन मोरे गणेश वार्ड क्र. 2 मधून संदिप गजानन सुतार, सौ.सुनिता सुरेश गुरव तर जोतिर्लिंग वार्ड क्र.3 मधून श्री. जगन्नाथ परशराम माने,सौ.निर्मला रावसाहेब चव्हाण हे सात उमेदवार विजयी झाले.विजयी उमेदवार व कार्यकर्ते यांनी  दौलतनगर,ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा) यांची भेट घेतली. यावेळी मा.यशराज देसाई (दादा) यांनी विजयी उमेदवारांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.विजयी उमेदवारांचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,मा.जिल्हा परिषद सदस्या सौ.सुग्रा खोंदू, बशीर खोंदू,मा.पंचायत समिती सदस्य सौ.निर्मला देसाई,नथूराम कुंभार गणेश भिसे यांनी अभिनंदन केले.निवडणुकीमध्ये विजय संपादन करण्याठी सी.डी.केळकर (काका), विलास कुंभार, राजेंद्र साने, राघू भाईंगडे, रंगा झांजुगडे, संजय कानडे, पंढरीनाथ मोरे, संतोष मोरे, महेश कुंभार, बळीराम कुंभार, दशरथ पवार, अशोक नाडेकर, मोहन कोळेकर, धनाजी मोहिते, लक्ष्मण मोरे, सतिश कदम, प्रकाश पवार, प्रविण कुंभार, बाळू केळकर, भगवान कुंभार, शामराव कुंभार, प्रकाश गुरव, सचिन लाड, संदिप नाडेकर, सचिन मोरे, युवराज चव्हाण, महेंद्र सरनोबत, अर्जुन चव्हाण, पंढरीनाथ मोरे, मारुती कुंभार, महादेव सरनोबत, किशोर गुरव तसेच मुंबई व पुणे रहिवाशी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

Saturday, 15 October 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून गत गळीत हंगामातील एफ.आर.पी.ची रक्कम बँक खाती वर्ग. शेतकऱ्यांच्या बँक खाती अंतिम बिल वर्ग करत शेतकऱ्यांना चेअरमन यशराज देसाई यांचेकडून दिपावलीच्या शुभेच्छा.


दौलतनगर दि.15 :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांस सन 2021-22 च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलापोटी लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी नुसार उर्वरित अंतिम रु. 215/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी रक्कम रु.572.95 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने गत सन 2021-22 च्या गळीत हंगामातील एफ.आर.पी.प्रमाणे होणारी ऊसबिलाची संपूर्ण रक्कम अदा केली असल्याची माहिती कारखान्याचे  चेअरमन मा.यशराज शंभूराज देसाई (दादा) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2021-22 चे गळीत हंगामामध्ये 02 लाख 66 हजार 488 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 11.82% सरासरी साखर उताऱ्यांने 03 लाख 14 हजार 850 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सन 2021-22 च्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसबिलाची एफआरपीच्याप्रमाणे  एकूण रक्कम रु.7101.91  लाख इतकी होत असून कारखान्याने यापूर्वी रु. 6528.96  लक्ष रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली आहे. दरम्यान लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमप्रसंगी दिवाळीपूर्वी गत गळीत हंगामातील उर्वरित एफ.आर.पी.ची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार आज रोजी गत गळीत हंगामातील उर्वरित अंतिम रु. 215/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी रक्कम रु.572.95 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करत लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पाटण तालुक्यातील तमाम ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे  मार्गदर्शक,महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापन चांगल्या पध्दतीने नियोजन करत दैनंदिन खर्चांमध्ये काटकसर करण्याचे धोरण राबविले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचे हित डोळयांसमोर ठेऊन नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने सन 2021-22 च्या गळीत हंगामात कारखान्याला गळीतास आलेल्या ऊसाला एफआरपीच्या उर्वरित रक्कम ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खाती वर्ग केली असल्याचे सांगत सन 2021-22 च्या गळीत हंगामामध्ये कारखान्याला गळीतास पुरविलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांशी संपर्क साधावा असे सांगत ते पुढे म्हणाले की,ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांना भासणारी आर्थिक निकड लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत गत गळीत हंगामातील उर्वरित एफ.आर.पी.ची रक्कम दिवाळीपूर्वी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली आहे. सन 2022-23 च्या गळीत हंगामाची संपूर्ण तयारी करण्यात आली असून तोडणी वाहतूक यंत्रणा कारखान्यावर दाखल होण्यास सुरुवातही झाली आहे.तसेच कारखान्याचे आधुनिकीकरणासह विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष ऊस गळीत हंगामास लवकरच सुरुवात होणार आहे.त्यामुळे चालू गळीत हंगाम यशस्वी करण्याच्या उद्देशाने कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस हा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास गळीतास देऊन गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन  चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

Monday, 10 October 2022

चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेबरोबर युवकांची मांदीयाळी.

             

दौलतनगर दि.10:- महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून पाटण विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच युवकांची मांदीयाळी होती.तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने पारंपारीक वाद्यांचे नियोजनही करण्यात आले होते.दरम्यान मुंबई येथील नियोजित बैठकांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी कालच मा.यशराज देसाई (दादा) यांना कोयना दौलत निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच आज श्रीमती विजयादेवी देसाई(मॉसाहेब),सौ.स्मितादेवी देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा), सौ.अस्मितादेवी देसाई,चि.जयराज देसाई,चि.आदित्यराज देसाई,ईश्वरी दिदी यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस  प्रतिवर्षी  मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक यांचेकडून विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी मा.यशराज देसाई (दादा) यांना साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा प्रशासनाचेवतीने सातारा येथील कोयना दौलत निवासस्थानी  प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.त्यानंतर वाढदिवसाचे औचित्य साधून सातारा येथील एहसास मतीमंद मुलांचे शाळेमध्ये खाऊवाटप करण्यात आले. त्यांनतर त्यांनी दौलतनगर येथील श्री गणेश मंदिरामध्ये श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर मा. यशराज देसाई दादा यांचे औक्षण केले.तद्नंतर मरळी गावचे ग्रामदैवत श्री निनाईदेवी मंदिर येथे निनाईदेवीचे दर्शन घेतले. श्री. निनाईदेवी मंदीरामध्ये मरळी ग्रामस्थांच्या मा. यशराज देसाई यांनी शुभेच्छा स्विकारल्या. त्यानंतर कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब), स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयाचे दर्शन घेऊन त्यांनी कारखाना परिसरातील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे  पुर्णाकृती  पुतळयाचे दर्शन घेतल्यानंतर शिवविजय हॉल येथे मा.यशराज देसाई (दादा)  यांचे पारंपारीक वाद्यांच्या गजरात आगमण झाले. शिवविजय हॉल येथे वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केल्यानंतर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांचेकडून शुभेच्छा स्विकारल्या.वाढदिवसानिमित्त तारळे विभागातील वजरोशी येथील पारंपारिक लेझीम पथक, आदमापूर येथील गजी नृत्य तसेच हालगी वादक अशा पारंपारिक कला या वेळी उपस्थितांना बघायला मिळाल्या.

            मा.यशराज देसाई यांना  शुभेच्छा देण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. मा.यशराज देसाई यांना दूरध्वनीव्दारे व समक्ष भेटून हजारो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे,खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, प्रदीप पाटील, प्रकाश तवटे, सारंग पाटील,कृष्णा बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले(बाबा),विनायक भासले(बाबा) सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनावणे,परिक्षित थोरात, राजेंद्र देसाई, परेश शेठ, राजेंद्र देसाई कोल्हापूर, कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडूरंग नलवडे, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण, अशोकराव पाटील शिवदौलत बँकेचे माजी चेअरमन ॲङ मिलिंद पाटील, संचालक शशिकांत निकम, बळीराम साळुंखे, शंकर पाटील, सोमनाथ खामकर,गजानन जाधव,विकास गिरी-गोसावी,विजयराव जंबुरे, प्रकाशराव जाधव,प्रकाश पवार, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,बशीर खोंदु,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई सुरेश पानस्कर,संतोष गिरी, पांडूरंग शिरवाडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, विजयराव मोरे, टी.डी. जाधव, शिवाजीराव शेवाळे, गणेश काजारी, शिवसेना पदाधिकारी राजेश चव्हाण,सागर नलवडे, रत्नदिप जाधव, राजकुमार कदम, हणमंत जाधव, आनंदाराव काळे, अमोल पाटील, शिवाजी देसाई, गोरख देसाई, माणिक पवार, विजय पवार फौजी, अमोल घाडगे, कांता सोनवले, शिवाजी बोंगाणे, प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील, अशोकराव पाटील, सावळाराम लाड,भागोजी शेळके,दिपक सुतार, मिलींद पाटील, सलीम इनामदार, गणीभाई चाफेरकर, सुरेश जाधव विठ्ठल पवार, विलास कु-हाडे, वाय. के. जाधव,संजय शिर्के विनायक शिर्के,अरविंद पवार, विष्णू पवार, गणेश भिसे,किसन गालवे,संजय देशमुख, उत्तम मोळावडे,प्रविण पाटील, जालंदर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य ॲङ डी.पी.जाधव,नथूराम कुंभार, बबनराव शिंदे,अमोल चव्हाण, अभिजित चव्हाण,धनाजी केंडे, राजेंद्र पाटील, विष्णू पवार,अरविंद पवार, शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे,नाना साबळे,संजय शिर्के,हेमंत पवार, प्रकाश टोपले,महिपती गायकवाड,नथूराम सावंत,निवृत्ती कदम,दादा जाधव,संतोष पवार,शंकर पाटील,किसन पवार,माणिक पवार, विठ्ठलराव जाधव, बाळासो सुर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, विश्वास निकम,रविंद्र सपकाळ,रामभाऊ कदम, रविंद्र जाधव,नाना पवार,मनोज मोहिते, शिवाजी घार्गे, राजाराम मोहिते, मधुकर पाटील,नेताजी मोरे, ॲङ बाबूराव नांगरे, प्रकाश पाटील, हणमंतराव चव्हाण, सचिन पवार, मोहन चव्हाण, अविनाश पाटील, सचिन पाटील, नारायण कारंडे, पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे, तहसिलदार रमेश पाटील, गट विकास अधिकारी गोरख शेलार, उपअभियंता विद्याधर शिंदे,घंटे, शाखा अभियंता संदीप पाटील, नरबट, हराळे भोसले, शंभूराज युवा संघटनेचे अध्यक्ष भरत साळूंखे,अभिजित पाटील, धनाजी शेवाळे, जय मल्हार मातंग संघटनेचे अध्यक्ष बबनराव भिसे, उत्तम मगरे, कारखान्याचे व्हा. चेअरमन राजाराम पाटील, माजी संचालक मधूकर भिसे,बबनराव पाटील, दै.पुढारीचे तुषार देशमुख, दै.तरुण भारतचे संपादक दिपक प्रभावळकर, संभाजी भिसे, दैनिक सकाळचे अरुण गुरव यांच्यासह विविध गावातील सरपंच, उपसरपंच, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पाटण तालुका, जयमल्हार मातंग संघटना पाटण तालुका, कोयना परिसर साखर कामगार संघटना,शिवसेना,युवासेना,पाटण तालुका शंभूराज युवा संघटना तसेच तालुक्यातील देसाई कुटूंबावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.