Wednesday 27 May 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोरोनाच्या दोन महिन्यातील कामांचा अहवाल मुख्यमंत्र्याकडे केला सादर.अहवालात पाटण मतदारसंघ,सातारा,वाशिम व इतर जिल्हयात मंत्री म्हणून केलेल्या कामांचा तपशिल.



 
          

             
                 दौलतनगर दि.२७ :- महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोनाच्या लढयात गेली दोन महिने ज्याप्रमाणे संपुर्ण राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,आरोग्यमंत्री,पर्यावरणमंत्री हे अहोरात्र लढा देण्याचे काम करीत आहेत त्याप्रमाणे राज्याच्या ग्रामीण भागात सलग दोन महिने राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे रस्त्यावर उतरुन कोरोनासंदर्भात लढा देत आहेत.२२ मार्चला सुरु झालेल्या लॉकडाऊनपासून मे महिन्यांतील कालच्या तारखेपर्यंत मागील ६० दिवसात त्यांनी प्रतीरोज केलेल्या कामांचा अहवाल काल राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे अवलोकनार्थ सादर केला आहे.या अहवालात त्यांनी दोन महिन्यात पाटण मतदारसंघात,सातारा वाशिम व राज्यातील इतर जिल्हयातील ग्रामीण भागातील जनतेच्या विविध अडीअडचणी सोडविण्याकरीता व कोरोनावर नियंत्रण आणणेकरीता केलेल्या कामांचा तपशिलच मुख्यमंत्र्याकडे सादर केला आहे.
               मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे सादर केलेल्या अहवालात मंत्री ना.शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, कोरोनामुळे ओढवलेल्या संकटाला पावणेतीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असून राज्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे संकट पोहचून दोन महिने झाले आहेत.या महामारी संकटातून महाराष्ट्र राज्यातील जनतेला सुखरुप बाहेर काढणेकरीता आपण राज्याचे मुख्यमंत्री व राज्यातील तमाम जनतेचे, आमचे प्रमुख या नात्याने गेली दोन महिन्याहून अधिक काळ अहोरात्र कष्ट घेत आहात.सद्यपरिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजनबध्द उपक्रम, सुनियोजीत पध्दतीने जागेवर धाडसी निर्णय घेवून येणाऱ्या संकटावर ठोस कृतीव्दारे मात करीत असून संकट काळात जनतेला कणखर आणि प्रगल्भ नेतृत्वच उपयोगी पडते हे आपण आपले कार्यातून दाखवून दिले आहे.याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे.
              या दोन महिन्याच्या काळात आपण वेळोवेळी दिलेल्या सुचनांनुसार पाटण मतदारसंघात,सातारा व वाशिम जिल्हयामध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी,जनता यांना बरोबर घेवून कोरोना संकटाचा सामना करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करीत आहोत. कोरोना काळात पाटण मतदारसंघात सातारा व वाशिम जिल्हयात बाहेरगांवाहून येणाऱ्यांची संख्या मोठी असली तरीही पाटण मतदारसंघात,सातारा जिल्हा व वाशिम जिल्हयामध्ये कोरोनावर नियंत्रण आणण्यास आम्हास यश मिळाले आहे.आपल्या सुचना या तळागाळातील लोकापर्यंत पोहचविल्यामुळेच व संकटावर मात करण्याचे योग्य नियोजन केल्यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे.
              आपण माझेवर गृहराज्यमंत्री तसेच वाशिम जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी दिली आहे त्यानुसार मी मागील दोन महिन्यातील ६० दिवसांमध्ये किमान ४७ दिवसात माझे अधिकारात सातारा असो वा वाशिम जिल्हयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून कोरोनाशी लढण्याचे योग्य नियोजन केले आहे.या ४७ दिवसात मी प्रतिरोज रस्त्यावर उतरुन सर्वांना बरोबर घेत कोरोनाच्या संकटाशी लढण्याचे काम करीत आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील अनेक जिल्हयातील ग्रामीण भागातील जनतेला विविध अडचणींचा सामना करावा लागला.कोरोनाचा संसर्ग थांबविण्याकरीता मी पाटण मतदारसंघात,सातारा व वाशिम जिल्हयात आवश्यक त्या उपाययोजना राबवून कोरोनाचा संसर्ग थांबविण्या बरोबरच राज्यातील इतर जिल्हयातील ग्रामीण भागातील लोकांच्या ज्या ज्या अडीअडचणी माझेपर्यंत आल्या त्या सर्व अडीअडचणी हिरीरीने सोडविण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.
             संचारबंदीच्या काळात पाटण मतदारसंघ,सातारा व वाशिम जिल्हयातील जनतेला जीवनावश्यक वस्तू वेळेत मिळण्याचे नियोजन केल्यामुळे संचारबंदीमध्ये जनतेला काही अडचणी आल्या नाहीत तसेच लॉकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेला गृहविभागाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या मार्फत आवश्यक असणारे सर्व सहकार्य करण्याची भूमिका बजावली काही ठिकाणी विघ्नसंतोषी लोक वगळता दोन महिन्यांच्या काळात गृह विभागातील पोलीस अधिकारी असो वा कर्मचारी यांच्यामुळे राज्यातील जनतेला कोणताही त्रास झाला नाही.हे त्यांनी आर्वजुन अहवालात मांडले असून पाटण विधानसभा मतदारसंघ,सातारा जिल्हा व वाशिम जिल्हयामध्ये तसेच राज्याच्या अनेक जिल्हयामध्ये गत दोन महिन्यात त्यांनी ४७ दिवसात प्रत्यक्षात फिल्डवर जावून केलेल्या पाटण,सातारा येथून केलेल्या प्रत्येक घडामोडीची माहिती अहवाल रुपाने मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे अवलोकनार्थ सादर केली असल्याचे मंत्री ना.शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.

पाटण मतदारसंघात जीप,रिक्षा वाहतूक,सलून,पानटपरी चालविणारे,मोलमजुरी करणाऱ्यांना बांधकाममंत्री व गृहराज्यमंत्र्यांनी दिला मायेचा आधार. ११५०० कुंटुबांना धान्याच्या वाटपास पहिल्या टप्प्यात प्रारंभ.




          
           दौलतनगर दि.२७ : - कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेली दोन महिने झाले राज्यभर संचारबंदी करण्यात आली असून लॉकडाऊनमुळे पाटण विधानसभा मतदारसंघात रोजगार तसेच व्यवसाय बंद झालेल्या जीप,रिक्षा,टमटम यातून प्रवासी व माल वाहतूक करणारे,सलून तसेच पानटपरी चालविणारे आणि मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब व हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाना शिवसेना पक्षाच्या वतीने सार्वजनीक बांधकाममंत्री ना.एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई या दोघांनी मायेचा आधार देत १०-१० किलोचे पॅकेट तयार करुन ११५०० कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यास पहिल्या टप्प्यात सुरुवात करण्यात आली आहे.मागील महिन्यात लॉकडाऊनच्या काळात ना.शिंदे व ना.देसाईंनी पाटण मतदारसंघात हातावर पोट असणाऱ्या ९५०० कुटुंबाना १०-१० किलो धान्याचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले होते. त्यांच्या या उपक्रमामुळे मतदारसंघातील २१ हजार कुटुंबाना आधार देण्याचे काम ना.शिंदे व ना.देसाईंनी केले आहे.
            कोरोनामुळे गेले दोन महिने झाले लॉकडाऊनच्या काळात सर्वत्रच  रोजगार,व्यवसाय  बंद झाले आहेत. ग्रामीण भागात तर रोजगार आणि व्यवसाय बंद झाल्याने हातावर पोट असणाऱ्या जीप,रिक्षा,टमटम वाहतूक करणारे,सलून तसेच पानटपरी चालविणारे आणि मोलमजुरी करणारी कुटुंबे ही गेली दोन महिने घरीच बसून आहेत. पाटण या ग्रामीण व डोंगरी मतदारसंघातही तीच परिस्थिती असून पाटण मतदारसंघातील रेशनिंग कार्ड धारकांना शासकीय यंत्रणेमार्फत तीन महिन्याचे धान्य देणेची व्यवस्था गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सुरवातीसच केली होती. परंतू हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कुटुंबांना तसेच ज्यांचे रेशनिगंचे कार्ड नाही अशा कुटुंबाना शिवसेना पक्षाच्या वतीने राज्याचे सार्वजनीक बांधकाममंत्री व विधानसभेतील पक्षाचे गटनेते ना.एकनाथ शिंदे व राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघात मागील महिन्यात सुमारे ९५०० कुटुबांना १०-१० किलोचे अन्नधान्याचे एक पॅकेट तयार करुन ते वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली व आता रोजगार व व्यवसाय बंद झालेल्या जीप,रिक्षा,टमटम वाहतूक करणारे,सलून तसेच पानटपरी चालविणारे आणि मोलमजुरी करणाऱ्या गरीब ११५०० कुटुबांना दुसऱ्या टप्प्यात वाटप करावयाचे १०-१० किलो धान्याचे कीट तयार केले असून ११५०० कुटुंबांना दयावयाच्या धान्याच्या कीटचे वाटपास आज पहिल्या टप्प्यात सुरुवात करण्यात आली आहे.
            या पॅकेटमध्ये गहू,मैदा,तांदूळ,डाळ,तेल व साखर अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक भागामध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिलेल्या सुचनानुसार त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत ही धान्याची पॅकेट व्यवसाय व रोजगार बंद झालेल्या प्रत्येक कुटुंबाच्या घरी जावून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गांवागांवामध्ये तसेच वाडीवस्तीमध्ये शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन सामाजीक अंतर ठेवून वाटप करण्याचे काम सुरु झाले आहे.मतदारसंघातील प्रत्येक विभागात दोन टप्प्यामध्ये हे धान्य वाटप करण्यात येणार असून आज पहिल्या टप्प्यातील धान्याच्या वाटपास सुरुवात करण्यात झाली आहे. मंगळवार दि.२९ ते ३० मे पर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील गांवागावांतील तसेच वाडीवस्तीतील या कुटुंबापर्यंत या धान्याचे वाटप पुर्ण होईल असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.
           अडचणीच्या काळात पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब जनतेकरीता नेहमीच धावून आले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मागील दोन महिने झाले ते पाटण मतदारसंघात कोरोनाचा संसर्ग होवू नये तसेच कोरोनाच्या संसर्गावर नियत्रंण राहावे याकरीता दररोज रस्त्यावर उतरुन काम करीत आहेत. रोजगार व व्यवसाय बंद झालेल्यांच्या व्यथा ओळखून प्राधान्यक्रमाने जीप,रिक्षा,टमटम वाहतूक करणारे,सलून तसेच पानटपरी चालविणारे आणि मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबांना मायेचा आधार मिळावा लॉकडाऊनच्या काळात त्यांची धान्याची अडचण दुर व्हावी याकरीता त्यांनी पक्षाच्यावतीने तसेच राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने पुढाकार घेतला असून या दोघांच्या प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात ९५०० गरीब कुटुंबापर्यंत व आता दुसऱ्या टप्प्यात ११५०० असे एकूण २१००० कुटुंबापर्यंत जीवनावश्यक अशा धान्याचे पॅकेट पोहचणार आहे.

Tuesday 26 May 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई होमपीचवरुन पाहतायत राज्याचा कारभार.



­      
दौलतनगर दि.२६ :- सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुंबई,पुणे शहरातून सुमारे 74 हजार लोक आपल्या मुळगांवी परत आले आहेत.एवढया मोठया प्रमाणात लोक येवून देखील पाटण तालुक्यात कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी तालुक्याचे आमदार,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे गत दोन महिन्यांपासून रोज रस्त्यावर उतरुन नियोजन करीत आहेत त्यांच्या योग्य नियोजनामुळेच आणि सर्वांना बरोबर घेवून काम करण्यामुळेच पाटण तालुक्यात कोरोना नियंत्रणात आहे.कोरोनाच्या संदर्भातील या सर्व कार्यबाहुल्यामुळे त्यांना सलग दोन महिने मुंबईला जाता आले नाही.मंत्री म्हणून मंत्रालयात जाता आले नसले तरी ते त्यांच्या होमपिच असणाऱ्या सातारा जिल्हयातून व पाटण मतदारसंघातूनच राज्याच्या गृहविभागाचा ग्रामीण भागाचा कारभार पहात असून तो कर्तव्य भावनेतून सांभाळत देखील आहेत.गृहविभागाशी निगडीत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील जनतेचे त्यांचेकडे येणारे अनेक प्रश्न ते गत दोन महिन्यात हिरीरीने सोडविताना दिसत आहेत.
             राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी ना.शंभूराज देसाईंवर गृहराज्यमंत्री म्हणून राज्याच्या ग्रामीण भागाची गृह विभागाची तसेच वाशिम जिल्हयाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली असून वाशिम जिल्हा हा “नीती” आयोगाने आकांक्षीत जिल्हा म्हणून घोषित केला आहे.वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी लिलया उचलली असून वाशिम जिल्हयातील जनतेसाठी त्यांचे अहोरात्र काम सुरु आहे. वाशिम जिल्हयातून येणारी प्रत्येक समस्या ते पालकमंत्री व गृहराज्यमंत्री म्हणून विनाविलंब सोडविताना दिसत आहेत.
             अतिशय संवेदनशील असणारा राज्याचा गृह विभाग गृहराज्यमंत्री ना.देसाई तितक्याच संवेदनशील पणाने सांभाळत असल्याचे पहावयास मिळत आहे.राज्यातील सर्व जिल्हयातील जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या फोनने आणि ब्रीफींगने त्यांचा दिनक्रम सुरु होतो.यामध्ये राज्यातील कोणत्या जिल्हयात काल काय घडले,कुठे अनुचित प्रकार घडला नाही ना,कायदा सुव्यवस्था सुस्थितीत आहे ना? गंभीर काही बाबी जिल्हयामध्ये घडल्या आहेत काय? अनुचित प्रकार किंवा गंभीर बाबी काही घडल्या असतील तर आपल्या विभागाने काय उपाययोजना केल्या? काय कार्यवाही केली ? अश्या अनेक प्रश्नावली व पुढच्यांकडून त्याची उत्तरे त्यांच्याकडे येत असतात.कुठे गंभीर प्रकार घडला असेल तर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मग तेवढाच वेळ त्यांचा सकाळी असो वा दिवसभरात कधीही असो घेत असतात.ना.शंभूराज देसाई हे घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती घेत असल्याने प्रसारमाध्यमेही त्यांना अधिकचे प्रश्न न करता आपल्या उत्तराने आमचेही व जनतेचीही समाधान झाले असल्याचे त्यांचे प्रतिनिधी अनेकदा सांगून जातात.
              गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे होमपिचवरुन कसे धडाकेबाज काम सुरु आहे याचा अनुभव आज दि.24 रोजी नांदेड जिल्हयामध्ये शिवाचार्य महाराज यांच्या खुनाच्या घटनेवरुन पहावयास मिळाले.पाटण तालुक्यात ढेबेवाडी, कुंभारगांव विभागातील सहा गांवामध्ये मोठया प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने या गांवाना भेटी तसेच गावांच्या पहाणी करण्याचा आणि येथील आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचा त्यांचा पुर्वनियोजीत दौरा होता. दौऱ्यावर जाण्यापुर्वीच त्यांनी वृत्तवाहिनीला नांदेड जिल्हयामध्ये शिवाचार्य महाराज यांचा खुन झाल्याची घटना घडली असल्याचे पाहिले तात्काळ नांदेडचे जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांना ना.शंभूराज देसाईंनी फोन लावला व काय घटना घडली आहे याची माहिती घेतली आणि तात्काळ चार टीम तयार करा जनतेमध्ये उद्रेक होण्यापुर्वी या खुन्याचा तपास लागला पाहिजे असे सांगून त्यांनी त्यांच्या पुर्वनियोजीत दौऱ्याला सुरुवात केली पहिल्या गांवामध्ये भेटीकरीता गेल्या गेल्याच त्यांना वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींचे व प्रसारमाध्यमांचे फोनवर फोन येवू लागले.ना.शंभूराज देसाईंनी प्रसार माध्यमांच्या व वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना सकाळीच मी या घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलीस अधीक्षक यांना आदेश दिले आहेत. चार टीम त्यांच्या या घटनेच्या अनुषगांने कामाला लागल्या आहेत लवकरच खुनी हाती लागेल असे सांगत होते.या विभागातील सहाव्या गावांच्या भेटीचा दौरा संपण्यापुर्वीच नांदेड पोलीस अधीक्षकांचा ना.शंभूराज देसाईंना फोन आला शिवाचार्य महाराज यांच्या खुन्याचा तेलंगणा हद्दीच्या ठिकाणी तपास लागला असून त्यांस नांदेड पोलिस यंत्रणेने ताब्यात देखील घेतले आहे व आम्ही पुढील कायदेशीर कार्यवाही सुरु केली आहे.
              गृहविभागाची आजची ही घटना आम्ही सर्व गृहराज्यमंत्री यांच्या सोबत दौऱ्यामध्ये असल्यामुळे अनुभवण्यास मिळाली.या लॉकडाऊनच्या काळात  अशा प्रकारचे अनेक प्रसंग गेल्या दोन महिन्यात सातारा आणि पाटण या त्यांच्या होमपिचवरुन त्यांनी हाताळले असून गृहराज्यमंत्री गेल्या दोन महिन्यात मंत्रालयात नसले तरी राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांकडे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील जनतेची असणारी अनेक कामे त्यांनी पाटणसारख्या ग्रामीण भागात राहून मार्गी लावली आहेत.प्रशासनातील दांडगा अभ्यास असणारा गृहराज्यमंत्री त्यांच्या रुपाने महाराष्ट्र राज्याला मिळाला असून त्यांचे आजोबा राज्याचे माजी करारी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा राज्याच्या गृहविभागात जो दरारा होता तोच दरारा गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनीही निर्माण केला असल्याचे आजच्या घटनेवरुन पहावयास मिळाले.

Sunday 24 May 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई अलर्ट टू हायअलर्ट. कोरोना रुग्ण सापडलेल्या म्हावशी गावाची अधिकाऱ्यांसह पहाणी.


        
दौलतनगर दि.२४ :-गत दोन दिवसात पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढली असल्यामुळे पाटण तालुक्यात सर्वत्र काळजीचे सावट निर्माण झाले आहे.कोरोनांचा संसर्ग तालुक्यात होवू नये याकरीता गेले दोन महिने तालुक्याचे आमदार,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे सातत्याने अलर्ट राहून त्यांनी तालुक्यातील प्रशासन अलर्ट ठेवण्याचे काम केले.सुरवातीला दोन तीन रुग्ण सापडलेल्या पाटण तालुक्यात २५ कोरोनाचे रुग्ण सापडल्याने गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई अलर्ट टू हायअलर्ट झाले असून त्यांनी या सर्व पार्श्वभूमिवर तालुक्यातील सर्व प्रशासनही हायअलर्ट केले आहे. कोरोना रुग्ण सापडलेल्या म्हावशी गावात त्यांनी काल अधिकाऱ्यांना समवेत घेत प्रत्यक्ष भेट देवून तालुका प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सुचना केल्या आहेत. 
               पाटण तालुक्यातील बनपुरी,ताईचीवाडी (शिरळ) या दोन गावात प्रत्येकी एक कोरोनाचा रुग्ण सापडला असून या दोन्ही गांवाना भेटी दिल्यानंतर म्हावशी येथेही कोरोनाबाधित रुग्ण सापडला असल्याने राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी या गावातील जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन करण्याकरीता तसेच प्रशासनाने केलेल्या उपाययोजना पाहणेकरीता थेट म्हावशी गांवात अधिकाऱ्यासमवेत एन्ट्री करुन येथील सर्व परिस्थितीची पहाणी केली. 
               यावेळी गावामध्ये कुणीही भिऊन जावू नका असे आवाहन करीत त्यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याकरीता आम्ही सर्वजण कार्यरत आहोत असे म्हावशी गावातील जनतेला सांगितले.तसेच गावकऱ्यांना जीवनावश्यक साहित्य मिळणेसंदर्भात प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत.याचीही माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.गावकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी गावांमध्ये २४ तास पिण्याचे पाणी तसेच वीजपुरवठा सुरळीत राहील याची प्रशासनाने व्यवस्था करा.गावात नाकाबंदी करण्यात आलीच आहे परंतू बाहेरचे कोणी गांवात येत नाही ना? आणि गावातील कोण बाहेर जात नाही ना?  याची तपासणी गावकऱ्यांनीच करावी जेणेकरुन संकट वाढणार नाही.सापडलेल्या रुग्णावर उपचार सुरुच आहे परंतू त्या व्यक्तीच्या कोण संपर्कात आले असतील तर त्यांनी माहिती न लपविता प्रशासनाला सांगावी. प्रशासनाचे सहकार्य आहेच गावकऱ्यांनीही प्रशासनाला सहकार्य करुन लवकरात लवकर हे गांव कोरोनामुक्त होईल याची काळजी गावकऱ्यांनीच घ्यावी असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.गावांत कसल्या प्रकारची अडचण तर नाही ना? अशा प्रकारे विचारणा करुन अडचणी असतील तर प्रशासनाला सांगा असेही ना.शंभूराज देसाईंनी गावचे सरपंच शंकर घाडगे, उपसरपंच सर्जेराव घाडगे, ग्रामपंचायत सदस्य नथूराम दाभाडे यांना सांगितले.
               यावेळी पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सपोनि तृप्ती सोनावणे, कारखान्याचे माजी संचालक मधूकर भिसे, सरपंच शंकर घाडगे,उपसरपंच सर्जेराव घाडगे ग्रामपंचायत सदस्य नथूराम दाभाडे यांची उपस्थिती होती.

कोरोना रुग्ण सापडलेल्या गावातील जनतेला दिलासा देणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई गांवागावात. भालेकरवाडी,शितपवाडी,धामणी,भरेवाडी,चाळकेवाडी व गलमेवाडी गांवाना दिल्या भेटी.


        

दौलतनगर दि.२४ :- पाटण तालुक्यात आज तारखेला कोरोनाचे एकूण २५  रुग्ण सापडले असल्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेले दोन महिने कसलाही कोरोनाचा संसर्ग तालुक्यात नव्हता.लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात बाहेरगांवाहून काही व्यक्ती तालुक्यात आल्यानंतर दोनचार दिवसापुर्वी कोरोनाचा चांगलाच प्रसार झाला असून कोरोना रुग्ण सापडलेल्या गांवाना भेटी देवून तेथील परिस्थितीची पहाणी करीत अधिकाऱ्यांना सतर्क ठेवण्याचे काम तालुक्याचे आमदार राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई करीत आहेत.त्यांनी आज तालुक्यातील ढेबेवाडी व कुंभारगांव भागातील भालेकरवाडी, शितपवाडी,धामणी, भरेवाडी,चाळकेवाडी (कुंभारगांव) व गलमेवाडी येथे कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या सहा गांवाना भेटी देवून प्रत्यक्ष फिल्डवर जावून येथील परिस्थितीची पहाणी केली व या गांवातील जनतेला दिलासा दिला देत प्रशासनाने अजुन सतर्क रहा अशा सुचना केल्या.
           गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दोन दिवसापुर्वी बनपुरी,ताईचीवाडी (शिरळ),म्हावशी या कोरोना रुग्ण सापडलेल्या गांवाना भेटी देवून तेथील पहाणी केल्यानंतर त्यांनी आज भालेकरवाडी, शितपवाडी,धामणी, भरेवाडी, चाळकेवाडी(कुंभारगांव) व गलमेवाडी याठिकाणीही तालुकास्तरीय अधिकाऱ्यासमवेत गावागांवात जावून भेटी दिल्या व येथील सर्व परिस्थितीची पहाणी केली. हायअलर्ट नामदार हे फिल्डवर येवून जनतेची विचारपुस करीत आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत हे पाहून या गांवातील ग्रामस्थांनी, महिलांनी ना.शंभूराज देसाईंचे जनतेची काळजी घेणारा नेता म्हणून कौतुक करुन त्यांचे विशेष आभारही मानले.
           दरम्यान या भेटीमध्ये त्यांनी गांवातील रुग्णांची विचारपुस करीत तालुका प्रशासनाच्या वतीने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना इन्स्टिटयुट कॉरन्टाईंन (विलगीकरण कक्ष) करण्यात आले आहे. आपणांस जीवनावश्यक वस्तू गावपोहोच करण्याच्या सुचना तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत त्यामुळे ग्रामस्थांना काही अडचण येणार नाही. तसेच या सहाही गांवात जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील तसेच ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी एक आरोग्य पथक तयार करुन दिवसातून एकदा गावात कुणाला ताप येत असेल, थंडी वाजत असेल तर त्या पथकाने गांवात येवून तपासणी करण्याच्याही सुचना केल्या आहेत. माहे मे महिन्यांचे स्वस्त धान्य सगळया गांवामध्ये पोहचविण्याचे काम करण्यात आले आहे. तसेच गांवामध्ये ग्रामस्थांना २४ तास पाणी व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेशही संबधितांना देण्यात आले आहेत. त्यामुळे काळजी करु नका असा दिलासा त्यांनी कोरोना रुग्ण सापडलेल्या या सहा गांवातील जनतेला प्रत्यक्ष गांवात जावून दिला. तसेच या व्यतिरिक्त  काहीही अडचण आली तर मला डायरेक्ट फोन करा माझा फोन नंबर तुमच्याकडे आहेच  असेही त्यांनी हक्काने प्रत्येक गांवातील नागरिकांना सांगितले.
         तसेच भितीचे काही कारण नाही प्रशासनाचे सर्व अधिकारी ठिकठिकाणी सतर्क आहेत आपल्याला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना मी सातत्याने देत आहे. आपणच आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. विनाकारण घराबाहेर पडू नका, महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास आवश्यक ती काळजी घ्या. असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी ना.शंभूराज देसाईंनी या सहा गांवामध्ये कोरेाना रुग्ण सापडल्याने तालुका प्रशासनाने काय काय उपाययोजना केल्या आहेत याची प्रत्यक्ष पहाणी केली. गांवामध्ये नाकाबंदी केल्यानंतर बाहेरगांवचे कोण गांवात येत नाही ना ? याची तपासणी पोलिस विभागाने करावी. अशाही सुचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. 
चौकट:  ना.शंभूराज देसाईंनी गांवाना भेटी देताना प्रतिबंधित क्षेत्राचे केले पालन.
              भालेकरवाडी, शितपवाडी,धामणी,भरेवाडी,चाळकेवाडी (कुंभारगांव) व गलमेवाडी या गांवात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने ही गांवे प्रतिबंधित करण्यात आली आहेत.ज्याठिकाणी गावात प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. या सहाही गांवाच्या भेटीदरम्यान ना.शंभूराज देसाईंनी गावांच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरच थांबून प्रतिबंधित क्षेत्राचे पालन करीत प्रमुख गावकऱ्यांना बोलवून जनतेची विचारपुस केली व काळजी घेण्याचे सर्वांनाच आवाहन केले. 
  

Thursday 21 May 2020

कोरोना रुग्ण सापडलेल्या बनपुरी,शिरळ गांवाना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिल्या तातडीने भेटी. नाकाबंदी काळात गावांत जीवनावश्यक वस्तू देण्याच्या व आरोग्य तपासण्या करण्याच्या केल्या सुचना.


         
पाटण दि. २१:- पाटण तालुक्यातील बनपुरी गांवामध्ये मुंबई शहरातून आलेल्या ४३ वर्षीय महिलेचा गावांत आल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू झाला असून ताईचीवाडी शिरळ या गांवातील ७० वर्षीय व्यक्ती ही अहमदाबाद येथून गांवी आल्यानंतर त्यास कोरोनाची लागण झाली असल्याने पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.पाटण तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढू नये याकरीता मतदारसंघाचे आमदार,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तातडीने तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेवून तात्काळ त्यांनी कोरोना रुग्ण सापडलेल्या बनपुरी आणि ताईचीवाडी (शिरळ) या दोन्ही गांवाना भेटी देत या गांवातील जनतेला धीर दिला व नाकाबंदी काळात या गांवामधील जनतेला जीवनावश्यक वस्तू देण्याच्या तसेच या गांवातील नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्याच्याही सुचना अधिकाऱ्यांना केल्या.
                पाटण तालुक्यात सुमारे ७४ हजार नागरिक हे मुंबई, पुणे तसेच इतर राज्यातून आपल्या मुळगांवी आले आहेत मात्र तालुक्यात कोरोनाची कुणालाही लागण झाली नव्हती दोन तीन दिवसापुर्वी बनपुरी येथील महिलेचा मुंबईहून आल्यानंतर मृत्यू झाला तर ताईचीवाडी (शिरळ) येथे आढळून आलेल्या एका रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत. या दोन्ही गांवात आता १४ दिवसांकरीता नाकाबंदी करण्यात आली असून या दोन्ही गावांत कोरोनाचा प्रसार होवू नये याकरीता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याकरीता व या गांवातील जनतेला या १४ दिवसात आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तू देण्याचे नियोजन करण्याकरीता, जनतेची आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन करण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी काल तातडीने तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेत या दोन्ही गांवाना भेटी दिल्या व येथील सर्व परिस्थितीची पहाणी केली.या भेटीत या गांवातील जनतेला आधार देत आवश्यक त्या सर्व उपाययोजना तालुका प्रशासनाने तातडीने करण्याच्या सुचना दिल्या.
            यावेळी सुचना देताना ना.शंभूराज देसाई म्हणाले, या दोन्ही गांवात आता १४ दिवस नाकाबंदी करण्यात येणार असल्याने गांवातील जनतेला जीवनावश्यक साहित्य,भाजीपाला पुरविण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे तसेच आवश्यकतेनुसार गांवातील जनतेची दिवसातून किमान एकदा आरोग्य तपासणी करणेकरीता आरोग्य पथक याठिकाणी नेमण्यात यावेत.येथील प्राथमिक आरेाग्य उपकेंद्रामध्ये औषधांचा साठा कमी असेल तर शेजारच्या प्राथमिक आरेाग्य केंद्रातून तसेच ग्रामीण रुग्णालयातून औषधसाठा उपलब्ध करुन देण्यात यावा.गावांत २४ तास पिण्याच्या पाण्याची तसेच वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सक्त सुचना देत ना.देसाईंनी या गावांतील पदाधिकाऱ्यांना तसेच ग्रामस्थांना भिऊन जाण्याचे काही कारण नाही प्रशासन सेवेकरीता तत्पर आहे.मात्र या काळात प्रत्येकांने घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे कोणतीही अडचण आली तरी डायरेक्ट मला संपर्क करा. नाकाबंदीच्या काळात या गांवामध्ये कोणतीही अडचण जनतेला येणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेत आहोत. कोरोनाचा प्रसार गांवामध्ये होणार नाही याकरीता आपणच आपली काळजी घेणे गरजेचे असून या दोन्ही गांवातील जनतेने घरातून बाहेर न पडता स्वत:ची व परिवाराची काळजी घ्यावी असे सांगून त्यांनी या दोन्ही गांवामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासण्या तात्काळ करुन घेणेत याव्यात जेणेकरुन आपल्याला कोरोनाच्या प्रसाराचा अंदाज येईल व त्यादृष्टीने या गांवामध्ये आणखीन काही उपाययोजना कराव्या लागतील का?  याचेही नियोजन करता येईल असेही यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.
             यावेळी पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी. पाटील,कोयनेचे सपोनि महेश बावीकट्टी,ढेबेवाडीचे सपोनि उत्तम भजनावळे यांची याठिकाणी उपस्थिती होती.
चौकट:- नाकाबंदीच्या काळात सेवेत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जेवणांची व्यवस्था करा- ना.शंभूराज देसाई.
             कोरोनाचे रुग्ण सापडल्याने या दोन्ही गांवात नाकाबंदी करण्यात आली असून या काळात सेवेत असणारे पोलिस, महसूलचे, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका व ग्रामसेवक ही यंत्रणा दिवसरात्र या गांवामध्ये काम करीत असून सेवेतील या अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही ना.शंभूराज देसाईंनी या भेटीत आस्थेवाईकपणे विचारपुस करीत या अधिकारी, कर्मचाऱ्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्याच्याही सुचना त्यांनी यावेळी वरीष्ठांना दिल्या.

Wednesday 20 May 2020

पाटण तालुक्यात आता काळजी वाढली,खबरदारी घ्या. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना. पाटण तालुक्यात कोरोनाचे तीन रुग्ण सापडल्याने उपाययोजनेकरीता ना.शंभूराज देसाईंनी घेतली तातडीची बैठक.



           
दौलतनगर दि.२० :- कोरोनाच्या संकटात सातारा जिल्हयात सर्वात जास्त मुंबई,पुणे व इतर राज्यातून नागरिक हे पाटण तालुक्यात आले आहेत.लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत सुमारे ६५ हजार तर चौथ्या टप्प्याच्या सुरवातीला सुमारे नऊ हजार असे एकूण ७४ हजार नागरिक आजमितीला तालुक्यात आले आहेत.इतके दिवस कोरोनांचा संसर्ग तालुक्यात नव्हता परंतू बाहेरगांवाहून आलेले तीन व्यक्ती या कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने धोका आणि काळजी दोन्ही वाढले आहे. या तीन व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या तातडीने तपासण्या करुन घ्या. आता खऱ्या अर्थाने खबरदारी घेणे गरजेचे आहे नाहीतर गेली दोन महिने घेतलेल्या खबरदारीवर आणि उपाययोजनेवर पाणी फिरेल.ज्या गांवात जास्त लोक बाहेरगांवाहून आले आहेत त्यांना घराच्या बाहेर पडू न देण्याची जबाबदारी आता प्रशासनाची आहे त्यापध्दतीने अधिकाऱ्यांनी कामाला लागावे अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या.
          पाटण तालुक्यात मागील दोन दिवसात कोरोनाचे तीन रुग्ण सापडल्याने तसेच त्यातील दोघांचा मृत्यू झाल्यामुळे खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज पाटण तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची दौलतनगर ता.पाटण येथे तातडीची बैठक घेतली.यावेळी बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.चंद्रकांत यादव,डॉ.दत्तात्रय डोंगरे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.बी.पाटील,सपोनि तृप्ती सोनावणे,नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी,ढेबेवाडीचे सपोनि उत्तम भजनावळे, कोयनानगरचे सपोनि एम.एस.बावीकट्टी यांची उपस्थिती होती.
            याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले,बाहेरगांवाहून आलेल्यांनी प्रशासनाला सहकार्य करुन घरातच थांबावे,बाहेर पडू नये बाहेरगांवाहून आलेल्यांनी घरात राहणेच तालुक्याच्या आणि गावांच्या हिताचे होणार आहे हे मी वारंवार आवाहन बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांना करीत आहे.कोरोनाचा धोका दिवसेदिवस वाढत आहे.गेली दोन महिने पाटण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग नव्हता पंरतू अचानक तीन रुग्ण सापडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील दोन दिवसात मुंबई शहरातून तालुक्यात आलेल्या बनपुरी येथील महिलेचे तसेच भारसाखळे येथील पुरुषाचे कोरोना पॉझिटिव्हमुळे निधन झाल्याने पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता जे लोक बाहेरगांवाहून तालुक्यात आले आहेत ज्या गांवात बाहेरगांवाहून आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी पोलीस आणि महसूल विभागाने गावभेटी देवून हे लोक घरातच कसे राहतील यावर प्रशासनाने जादा लक्ष दयावे जेणेकरुन कोरोनाचा प्रसार वाढणार नाही.पोलीस यंत्रणेला बंदोबस्ताकरीता यंत्रणा कमी पडत असेल तर जिल्हा पोलिस अधिक्षकांना सुचना करुन मी जादाची यंत्रणा पाटण तालुक्यात देण्यास सांगतो. परंतू आता कुठलाही निष्काळजीपणा करु नका.न आलेले संकट आता आपल्या तालुक्यावर आले आहे. हीच वेळ आहे खबरदारी घेण्याची.असे सांगून ते म्हणाले बनपुरी, भारसाखळे व शिरळ या गांवात आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात किती व्यक्ती आल्या आहेत अशाची यादी तयार करुन तात्काळ त्यांच्या आरोग्याच्या तपासण्या करुन घ्या त्यांचे नमुने तपासणीकरीता सादर करा अशा सुचना ना.शंभूराज देसाईंनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
चौकट: बाहेरगांवाहून आलेल्यांनो सावधता बाळगा- ना.देसाईंचे आवाहन.
            पाटण तालुक्यात बाहेरगांवाहून आलेल्यांची संख्या जास्त असली तरी कोरोनाचा संसर्ग तालुक्यात नव्हता आता चौथ्या टप्प्यामध्ये बाहेरगांवाहून आलेल्यांमध्ये दुर्दैवाने संसर्ग होवू शकतो हे दोनतीन दिवसापुर्वी मुंबईहून आलेल्या दोन व्यक्तींच्या निधनामुळे आपल्या लक्षात आले आहे त्यामुळे चौथ्या टप्प्यात बाहेरगांवाहून आलेल्यांनो जरा सावधता बाळगा,आपला त्रास गावाकडंच्याना होणार नाही काळजी घ्या असे आवाहनही ना.शंभूराज देसाईंनी या बैठकीत केले. 

कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे ६१ व्या पुण्यतिथीनिमित्त गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंकडून विनम्र अभिवादन.




दौलतनगर दि.२०:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६१ वी पुण्यतिथी दौलतनगर ता.पाटण येथे अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.कै.ताईसाहेब यांचे व्या पुण्यतिथीनिमित्त मरळी ता.पाटण येथील कै.सौ. वत्सलादेवी देसाई हायस्कुलच्या प्रांगणातील पुतळयास तसेच महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये प्रतिमेस पुष्प्हार अर्पण करुन राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी विनम्र अभिवादन केले.
            कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत साध्या पध्दतीने केवळ पुष्प्हार अर्पण करुन राज्याचे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६१ वी पुण्यतिथी करण्याचा निर्णय ना.देसाईंनी घेतला व पुण्यतिथीनिमित्त त्यांनी पुतळयास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींना महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा कार्यक्रम कोरोनाच्या संकटामुळे आम्ही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.या शिष्यवृत्तीचे वितरण कोरोनाचे संकट संपल्यानंतर करण्यात येणार असल्याचे यावेळी ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले.
          यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,जयराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,ॲड.डी.पी जाधव,जिल्हा परीषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,माजी सदस्य राजेंद्र चव्हाण,बबनराव भिसे,कारखान्याचे संचालक पांडूरंग नलवडे,माजी संचालक मधूकर भिसे,मरळी सरपंच राजाराम माळी, माजी सरपंच प्रवीण पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tuesday 19 May 2020

लॉकडाऊनच्या काळात गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई ग्रामीण भागातील सर्वसामान्यांकरीता ठरले आधार.




           पाटण दि.१९ :- कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन होवून ५० ते ५५ दिवसापासून अधिकचा कालावधी उलटून गेला.मुंबई,पुणे या मोठया शहरात मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजित पवार,आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे, पर्यावरणमंत्री ना.आदित्य ठाकरे हे कोरोनाशी लढा देणेकरीता दिवसरात्र काम करीत आहेत तर राज्यातील ग्रामीण भागात राज्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे दिवसरात्र कोरोनाशी लढा देण्याचे,लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांच्या येणाऱ्या अनेक समस्या सोडविण्याचे काम सुरु असून या काळातील त्यांच्या प्रत्येक कामांमुळे ग्रामीणचे गृहराज्यमंत्री ग्रामीण भागातील सर्वसामान्यांकरीता “ आधार ” ठरले आहेत.
          कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात २२ मार्चला लॉकडाऊन सुरु झाले १४ दिवसांचा कालावधी पुर्ण होण्याअगोदरच पुढच्या लॉकडाऊनचे नियोजन शासनाकडून करण्यात येत असल्याने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमुळे नोकरी,व्यवसाय, रोजगाराकरीता मुंबई,पुणे व राज्यातील इतर शहरात गेलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागले आहे.अडचणीत सापडलेल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना गत ५०-५५ दिवसात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे एक सच्चा जनतेचा सेवक म्हणूनच लाभले आहेत.जनतेचे कुठलेही काम एकदम छोटेसे असले तरी ते मन लावूनच करायचे हा त्यांचा शिरस्ता असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता हक्काचा आधार देणारा मंत्री म्हणून ना.शंभूराज देसाईंकडे पहात आहे.ना.शंभूराज देसाईंचा मोबाईल नंबर राज्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचला असून या माध्यमातून जनतेला येणाऱ्या अनेक समस्या ते ना.देसाईंकडून सोडवून घेत आहेत.
             कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी पोलिस विभागाचे अधिकारी,कर्मचारी जागोजागी तैनात करण्यात आले आहेत. गृह (ग्रामीण)राज्यमंत्री या नात्याने ना.शंभूराज देसाईंना कायम सतर्क रहावे लागत आहे.कारण या काळात कुठलाही विषय आला तरी तो पोलिसांपाशी येवून थांबत आहे.लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणायच्या झाल्या तरी पोलिसांचा कडा पहारा,शहरातून गावांकडे जायचे तरी पोलिसांची परवानगी मग पोलिस एैकणार कुणाचे तर गृहमंत्र्यांचे. उचलला फोन,लावला गृहमंत्र्यांना,आपली समस्या सांगितली आणि ती त्यांच्याकडून सोडवून घेतली असेच गत ५० दिवसांपासून सुरु असल्याचे ना.शंभूराज देसाई सांगत असून ना.देसाई सुध्दा ग्रामीण भागातील सर्वच स्तरातील सर्वसामान्यांकरीता दिवसरात्र २४ बाय ७ अलर्ट राहून लॉकडाऊनमध्ये आधार देण्याबरोबर सर्वसामान्यांचे प्रश्न जागेवर सोडविण्याचे काम करीत आहेत.
              ना.शंभूराज देसाई वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री आहेत लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक फोन त्यांना वाशिम जिल्हयातून आले.विशेष म्हणजे वाशिम जिल्हयातील येणारे सर्व फोन ते स्वत: घेतात आणि समोरच्या व्यक्तींचे सगळे म्हणणे एैकून घेवून त्यावर ते तात्काळ तोडगा काढून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याची भूमिका बजावित आहेत.कुणाला धान्य मिळाले नाही,कुणाला पोलिसांनी अडविले,कुणाच्या गाडीवर कारवाई झाली,कुणाला दवाखान्यात जायला गाडी मिळाली नाही तर ॲम्ब्यूलन्स पाठवायला सांगा,आम्ही इथे इथे अडकून पडलो आहे,आमचे धान्य संपले आहे,भाजीपाला मिळत नाही असे अनेक सामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी एका फोनवर सोडविले आहेत.यात काही ठिकाणी पत्रकारांस मारहाण झाली तर कुठे पोलिसांवर हल्ले झाले असेही प्रकार आहेत.त्या सगळया प्रश्नांची सोडवणूक ते आपलेपणाने करीत आहेत. केवळ वाशिम जिल्हयातीलच नाहीत तर रायगड,रत्नागिरी,पुणे,सांगली,कोल्हापुर,बीड,जालना,अमरावती,उस्मानाबाद या ग्रामीण जिल्हयातीलही समस्या त्यांनी या काळात सोडवून ग्रामीण भागातील जनतेला आधार देण्याचे काम केले आहे.
             दिवसातून सुमारे १२५ ते १५० फोनकॉल स्वत: स्विकारणारे ते पहिले ग्रामीण मंत्री आहेत.यामध्ये विविध जिल्हयातील विधानसभा सदस्य,शिवसेनेसह सर्वच पक्षांचे पदाधिकारी व सामान्य जनता यांचा समावेश आहे.या काळात विविध जिल्हयामध्ये अडकून पडलेल्यां सुमारे १००० लोकांना त्यांनी गृह,महसूल विभागामार्फत धान्यांचे कीट पोहचविण्याचे महत्वाचे काम केले आहे.तर विविध जिल्हयामध्ये काही वयस्कर व्यक्ती, लहान मुले आजारी आहेत त्यांना उपचाराकरीता नेणेकरीता प्रवासाचा पास देण्यापर्यंतचे देखील काम त्यांनी केले आहे.“ घार हिंडे आकाशी,चित्त तिचे पिलापाशी” या उक्तीप्रमाणे राज्याचा गृह विभागाचा गाडा हाकत असताना देखील त्यांनी आपल्या मतदारसघांकडे कणभरही दुर्लक्ष केले नाही.पाटण मतदारसंघात मुंबई,पुणे तसेच राज्यातील इतर शहरातून ६५ हजारहून अधिक नागरिक मुळगांवी आले आहेत. मतदारसंघातील जनतेचा कोरोनापासून बचाव करण्याकरीता त्यांनी ग्रामीण,डोंगरी भागात सुरुवातीसच १० हजार मास्कचे वाटप केले.जनतेला पुढील तीन महिन्यांचे स्वस्त धान्यही मिळवून दिले. प्राथमिक आरोग्य केंद्रांना, ग्रामीण रुग्णालयांना भेटी देवून बाहेरगांवाहून आलेल्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी करुन घेणेसाठी पुढाकार घेतला.आठवडयातून दोनवेळा कधी तीनवेळा शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून बारीक सारीक गोष्टींवर स्वत: बारकाईने लक्ष ठेवून त्या बारीकसारीक गोष्टींवर तात्काळ अंमलबजावणी करुन शासकीय यंत्रणा सातत्याने अलर्ट ठेवण्याचे काम ते हिरीरीने करीत आहेत.      
          लॉकडाऊनच्या काळात मतदारसंघातील डोंगरी भागातील हातावर पोट असणाऱ्या तसेच रोजंदारी बंद झाल्यामुळे अन्नधान्य नसणाऱ्या सुमारे ९८५० कुटुंबांना त्यांनी राज्याचे बांधकाममंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून संयुक्तीकपणे धान्याच्या कीटचे वाटप केले.बंदोबस्तात भरऊन्हात आपले कर्तव्य बजाविणाऱ्या सातारा जिल्हयातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना थोडासा थंडावा मिळावा याकरीता त्यांनी १८२५ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस्सीचे वाटप केले तर दुचाकीवरून फेरफटका मारुन बंदोबस्तातील पोलिस अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विचारपुस करणारे ते पहिले गृहराज्यमंत्री ठरले आहेत.सातारा जिल्हयात कराड तालुक्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यांनी जिल्हयातील एक मंत्री या नात्याने येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेवून कोरोनावर प्रतिबंध आणण्यासाठीही पुढाकार घेतला.जिल्हयाचे जिल्हाधिकारी असो वा पोलिस अधीक्षक असो आपला सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्यांच्या कार्यालयात जावून ना.शंभूराज देसाई कोरोनाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना राबवून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांकरीता जनतेचा आधार बनत जनतेकरीता ते सातत्याने लढा देताना दिसून येत आहेत.

Monday 18 May 2020

बाहेरगांवाहून आलेल्यांनी प्रशासनाला सहकार्य करा घरातच थांबा,बाहेर पडू नका. ना.शंभूराज देसाईंचे बाहेरगांवाहून आलेल्यांना आवाहन. तालुक्यातील धरणात पाणीसाठे मर्यादित तरीही काळजी घ्या - कोयना व सिंचन मंडळाच्या अधिकाऱ्यांना सुचना.



           दौलतनगर दि.१८ :- लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत सुमारे ६५ हजार नागरिक तर चौथ्या टप्प्याच्या सुरवातीला चार ते पाच हजार नागरिक तालुक्यात आले आहेत.कोरोनाचा धोका दिवसेदिवस वाढत आहे.मागील दोन दिवसात मुंबई शहरातून आलेल्यामध्ये नाडोली येथे २३ वर्षीय महिला क्षयरोगाने तर बनपुरी येथे आलेली ४५ वर्षीय महिला जिच्या निधनाचे अजुन कारण समजू शकले नाही अशा दोन महिलांचे निधन झाल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे आपण सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तालुक्यातील प्रशासन अलर्ट आहे परंतू बाहेरगांवाहून आलेल्यांनी प्रशासनाला सहकार्य करुन घरातच थांबावे,बाहेर पडू नये म्हणजे धोका वाढणार नसल्याचे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज पाटण तालुक्यात बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांना केले तर पावसाळयापुर्वी तालुक्यातील धरणात मर्यादित पाणीसाठे आहेत तरीही काळजी घ्या अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोयना व सातारा सिंचन मंडळाच्या अधिकाऱ्यांना आज केल्या.
          पाटण तहसिल कार्यालयात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यात येत्या दोन तीन दिवसात मुंबई,पुणे तसेच राज्यातील इतर शहरातून आलेल्या नागरिेकांच्या संदर्भात काय उपयायोजना करावयाच्या याविषयी तसेच पावसाळयापुर्वी पाटण तालुक्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे.माहे जुनपर्यंत किती पाणीसाठा शिल्लक राहील व पावसाळयात धरणातील पाण्याचे कशाप्रकारे नियोजन करावयाचे यासंदर्भात संयुक्त बैठक पार पडली यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले व सुचना केल्या.यावेळी आढावा बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे,शशिकांत गायकवाड, जलसंधारण अधिकारी अविनाश पदमाळे,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.चंद्रकांत यादव,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील, सपोनि तृप्ती सोनावणे,नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी, नायब तहसिलदार प्रशांत थोरात यांची उपस्थिती होती.
                याप्रसंगी प्रांरभी ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यात मागील दोन तीन दिवसात पाटण तालुक्यात बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांची माहिती घेतली या नागरिकांना त्या त्या गांवातील शाळांमध्ये तसेच होम कॉरन्टाईन करण्यात आले आहे. होम कॉरन्टाईन करण्यात आलेले नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत ना ? याची तपासणी मंडलाधिकारी,तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचेमार्फत करण्यात येत असून बाहेरगांवाहून आलेल्या ज्यांना होम कॉरन्टाईन तसेच शाळामध्ये वास्तव्यास ठेवले आहे त्यांना बाहेर न पडण्याच्या सक्त सुचना दिल्या आहेत. बाहेरगांवाहून आलेल्यांची आवश्यक ती सर्व काळजी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून घेणे सुरु असून माहे मे पर्यंतचे सर्व कार्डधारकांना रेशनिगंचे धान्याचे वाटप करण्यात आले आहे. धान्यांच्या संदर्भात कुणाचीही अडचण सध्या नाही.असे प्रांताधिकारी यांनी सांगितले.यावर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तालुक्यातील प्रशासन अलर्ट आहे परंतू बाहेरगांवाहून आलेल्यांनी प्रशासनाला सहकार्य करुन घरातच थांबावे,बाहेर पडू नये बाहेरगांवाहून आलेल्यांनी घरात राहणेच तालुक्याच्या आणि गावांच्या हिताचे होणार आहे त्यामुळे कुणीही लॉकडाऊनचे नियम मोडू नयेत असे आवाहन केले.
                तसेच पाटण तालुक्यातील कोयना,तारळी,वांग मराठवाडी,मोरणा गुरेघर तसेच उत्तरमांड या प्रमुख धरणांमध्ये आज तारखेला किती पाणीसाठा आहे,माहे जुनअखेर किती पाणीसाठा या धरणांमध्ये राहणार व पावसाळयात येणाऱ्या पाण्याचे कसे नियोजन अधिकाऱ्यांनी केले आहे याचाही आढावा सातारा सिचंन मंडळाचे व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला.यावेळी तालुक्यातील पाचही प्रमुख धरणांमध्ये मर्यादित पाणीसाठा असून पावसाळयात येणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.वांग मराठवाडी धरणप्रकल्पात पावसाळयात पाणीसाठा झालेनंतर उमरकांचन गांवात पाणी शिरते यासंदर्भात काय उपाययोजना केली आहे असे ना.देसाईंनी विचारल्यानंतर गांवाला पाणी लागल्यानंतर कोणत्याही घराला पाणी लागणार नाही परंतू अशा कुटुंबाकरीता सुरक्षित ठिकाणी शेड उभारण्यात आले आहेत त्यामुळे अशा कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येईल.असे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले.यावर ना.शंभूराज देसाईंनी यंदाही चांगल्या प्रमाणात पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून तालुक्यातील धरणात मर्यादित पाणीसाठे असले तरी धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याच्या सुचना केल्या तर मे महिना सुरु होण्यापुर्वीच तालुक्यातील आठ गावांकरीता पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजुर केले आहेत या गांवाना सुरळीत पाणी पुरवठा होत आहे का? असाही प्रश्न ना.देसाईंनी करुन पाणीपुरवठा होत नसेल तर सुरळीत पाणीपुरवठा करा अशाही सुचना यावेळी दिल्या.


दि.२० मे रोजी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६१ वी पुण्यतिथी होणार साध्यापध्दतीने. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शिष्यवृत्तीचे वितरणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.



दौलतनगर दि.1:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची वा पुण्यतिथी यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत साध्या पध्दतीने बुधवार दि.२० मे, २०२० रोजी सकाळी १०.०० वा.     “ महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात येणार आहे.प्रतिवर्षाप्रमाणे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या शिष्यवृत्तीचे वितरणाचा कार्यक्रम कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आला असून या शिष्यवृत्तीचे वितरण कोरोनाचे संकट संपल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून त्यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी दि.२० मे रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने साजरा करण्यात येतो.राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.यंदाचे हे अकरावे वर्ष असून आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील १५० हुन अधिक मुलींना प्रत्येकी ५००० रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. गरजू कुटुंबातील मुलींना शिक्षणाकरीता हातभार लागावा याकरीता या शिष्यवृत्तीबरोबर वहया,शालेय गरजांच्या साहित्याचे वितरणही करण्यात येते. मागील वर्षापासून ५५०० रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येत असून यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे शिष्यवृत्ती वितरणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.कोरोनाचे संकट कमी झालेनंतर या शिष्यवृत्तीचे वितरणाचे नियोजन करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची यंदाच्या वर्षीची१ वी पुण्यतिथी बुधवार दि. २० मे २०२० रोजी सकाळी १०.०० वाजता लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक व राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते कै.ताईसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करुन अत्यंत साध्या पध्दतीने दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न होणार असल्याचे पत्रकांत म्हंटले आहे.