Monday 18 May 2020

बाहेरगांवाहून आलेल्यांनी प्रशासनाला सहकार्य करा घरातच थांबा,बाहेर पडू नका. ना.शंभूराज देसाईंचे बाहेरगांवाहून आलेल्यांना आवाहन. तालुक्यातील धरणात पाणीसाठे मर्यादित तरीही काळजी घ्या - कोयना व सिंचन मंडळाच्या अधिकाऱ्यांना सुचना.



           दौलतनगर दि.१८ :- लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत सुमारे ६५ हजार नागरिक तर चौथ्या टप्प्याच्या सुरवातीला चार ते पाच हजार नागरिक तालुक्यात आले आहेत.कोरोनाचा धोका दिवसेदिवस वाढत आहे.मागील दोन दिवसात मुंबई शहरातून आलेल्यामध्ये नाडोली येथे २३ वर्षीय महिला क्षयरोगाने तर बनपुरी येथे आलेली ४५ वर्षीय महिला जिच्या निधनाचे अजुन कारण समजू शकले नाही अशा दोन महिलांचे निधन झाल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे आपण सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तालुक्यातील प्रशासन अलर्ट आहे परंतू बाहेरगांवाहून आलेल्यांनी प्रशासनाला सहकार्य करुन घरातच थांबावे,बाहेर पडू नये म्हणजे धोका वाढणार नसल्याचे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज पाटण तालुक्यात बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांना केले तर पावसाळयापुर्वी तालुक्यातील धरणात मर्यादित पाणीसाठे आहेत तरीही काळजी घ्या अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोयना व सातारा सिंचन मंडळाच्या अधिकाऱ्यांना आज केल्या.
          पाटण तहसिल कार्यालयात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यात येत्या दोन तीन दिवसात मुंबई,पुणे तसेच राज्यातील इतर शहरातून आलेल्या नागरिेकांच्या संदर्भात काय उपयायोजना करावयाच्या याविषयी तसेच पावसाळयापुर्वी पाटण तालुक्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे.माहे जुनपर्यंत किती पाणीसाठा शिल्लक राहील व पावसाळयात धरणातील पाण्याचे कशाप्रकारे नियोजन करावयाचे यासंदर्भात संयुक्त बैठक पार पडली यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले व सुचना केल्या.यावेळी आढावा बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे,शशिकांत गायकवाड, जलसंधारण अधिकारी अविनाश पदमाळे,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.चंद्रकांत यादव,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील, सपोनि तृप्ती सोनावणे,नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी, नायब तहसिलदार प्रशांत थोरात यांची उपस्थिती होती.
                याप्रसंगी प्रांरभी ना.शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यात मागील दोन तीन दिवसात पाटण तालुक्यात बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांची माहिती घेतली या नागरिकांना त्या त्या गांवातील शाळांमध्ये तसेच होम कॉरन्टाईन करण्यात आले आहे. होम कॉरन्टाईन करण्यात आलेले नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत ना ? याची तपासणी मंडलाधिकारी,तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचेमार्फत करण्यात येत असून बाहेरगांवाहून आलेल्या ज्यांना होम कॉरन्टाईन तसेच शाळामध्ये वास्तव्यास ठेवले आहे त्यांना बाहेर न पडण्याच्या सक्त सुचना दिल्या आहेत. बाहेरगांवाहून आलेल्यांची आवश्यक ती सर्व काळजी तालुका प्रशासनाच्या माध्यमातून घेणे सुरु असून माहे मे पर्यंतचे सर्व कार्डधारकांना रेशनिगंचे धान्याचे वाटप करण्यात आले आहे. धान्यांच्या संदर्भात कुणाचीही अडचण सध्या नाही.असे प्रांताधिकारी यांनी सांगितले.यावर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तालुक्यातील प्रशासन अलर्ट आहे परंतू बाहेरगांवाहून आलेल्यांनी प्रशासनाला सहकार्य करुन घरातच थांबावे,बाहेर पडू नये बाहेरगांवाहून आलेल्यांनी घरात राहणेच तालुक्याच्या आणि गावांच्या हिताचे होणार आहे त्यामुळे कुणीही लॉकडाऊनचे नियम मोडू नयेत असे आवाहन केले.
                तसेच पाटण तालुक्यातील कोयना,तारळी,वांग मराठवाडी,मोरणा गुरेघर तसेच उत्तरमांड या प्रमुख धरणांमध्ये आज तारखेला किती पाणीसाठा आहे,माहे जुनअखेर किती पाणीसाठा या धरणांमध्ये राहणार व पावसाळयात येणाऱ्या पाण्याचे कसे नियोजन अधिकाऱ्यांनी केले आहे याचाही आढावा सातारा सिचंन मंडळाचे व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला.यावेळी तालुक्यातील पाचही प्रमुख धरणांमध्ये मर्यादित पाणीसाठा असून पावसाळयात येणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.वांग मराठवाडी धरणप्रकल्पात पावसाळयात पाणीसाठा झालेनंतर उमरकांचन गांवात पाणी शिरते यासंदर्भात काय उपाययोजना केली आहे असे ना.देसाईंनी विचारल्यानंतर गांवाला पाणी लागल्यानंतर कोणत्याही घराला पाणी लागणार नाही परंतू अशा कुटुंबाकरीता सुरक्षित ठिकाणी शेड उभारण्यात आले आहेत त्यामुळे अशा कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येईल.असे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले.यावर ना.शंभूराज देसाईंनी यंदाही चांगल्या प्रमाणात पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून तालुक्यातील धरणात मर्यादित पाणीसाठे असले तरी धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याच्या सुचना केल्या तर मे महिना सुरु होण्यापुर्वीच तालुक्यातील आठ गावांकरीता पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजुर केले आहेत या गांवाना सुरळीत पाणी पुरवठा होत आहे का? असाही प्रश्न ना.देसाईंनी करुन पाणीपुरवठा होत नसेल तर सुरळीत पाणीपुरवठा करा अशाही सुचना यावेळी दिल्या.


No comments:

Post a Comment