Wednesday 13 May 2020

साहेब, तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही, तुमच्यामुळेच माझ्या मारुतीला चांगले उपचार मिळून संजीवन मिळेल.डोंगरपठारावरील कसणी धनगरवाडयाच्या बयाजी यमकरने व्यक्त केली भावना.





पाटण दि. 13  :- रामायणामध्ये बलशाली मारुतीने संजीवनी आणून लक्ष्मण देवाचे प्राण वाचविल्याचे आपण पाहिले आहे, एैकले आहे आणि वाचले आहे.आत्ताच्या युगात पाटण तालुक्यातील कसणी धनगरवाडयाच्या शेतकरी व गरीब कुटुंबातील बयाजी बाबू यमकर यांच्या चौथीत शिकणाऱ्या 10 वर्षाच्या मारुती या मुलासाठी संजीवनी देण्याचे काम राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.गेल्या एक वर्षापासून लिव्हरच्या त्रासाने त्रस्त असलेल्या मारुतीला मुंबईच्या मोठया रुग्णालयात चांगले उपचार मिळणेकरीता सर्वोत्तोपरी मदत करणारे ना.शंभूराज देसाई  धनगरवाडयाच्या बयाजी यमकर व त्याचा मुलगा मारुती यांच्याकरीता देवदूताप्रमाणे धावून आले असून ना.शंभूराज देसाईंनी केलेली मदत पाहून “साहेब,तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही,तुमच्यामुळेच माझ्या मुलाला आता चांगले उपचार मिळून त्याला संजीवन मिळेल” अशी भावना  कसणीच्या धनगरवाडयाच्या बयाजी यमकर या गरीब कुटुंबातील शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
                     पाटणच्या नकाशावरचे एका टोकाचे डोंगरपठारावर वसलेले कसणी गांव या गांवातंर्गत असणारा धनगरवाडा येथील बयाजी बाबू यमकर यांचा चौथीत शिकणारा 10 वर्षाचा मुलगा मारुती गेल्या एक वर्षापासून लिव्हरच्या त्रासाने त्रस्त आहे.त्याचे लिव्हर खराब झाल्याने पोटात पाणी साचून राहत आहे त्यामुळे शरीरापेक्षा पोटाचा भागच मोठा दिसत असल्याने त्याच्यावर उपचार करण्याकरीता वर्षभरापासून मारुतीचे गरीब वडील कधी कराड, कधी कोल्हापुर, कधी सांगली येथील वेगवेगळया दवाखान्यात मारुतीला घेवून जात आहेत. त्याच्या या आजारावर शस्त्रक्रिया करायची तर पाच लाखांचा खर्च येईल असे अनेक डॉक्टरांनी सांगितल्यामुळे एवढा मोठा खर्च आपल्याला परवडणारा नाही तसेच वैद्यकीय मदत मिळून मिळून किती मिळणार या चिंतेत असणाऱ्या बयाजी यमकरांनी मागील आठवडयात राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची भेट घेतली.
                   साहेब, हा माझा मुलगा मारुती त्याचे पोट बघा, डॉक्टरांनी त्याचे लिव्हर खराब झाले असल्याचे सांगितले आहे. मी गरीब आहे त्याचेवर उपचार करण्याची माझी परिस्थिती नाही तुम्हीच काहीतरी करा.माझे मुलाला चांगल्या दवाखान्यात चांगले उपचार मिळवून दया आणि त्याला यातून वाचवा अशी कैफियत मांडली. क्षणाचाही विलंब न करता ना.शंभूराज देसाईंनी राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे यांना व त्यांचेकडे वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थेतील पदाधिकाऱ्यास फोन लावला आणि बयाजी यमकरने मांडलेली त्याच्या मुलाच्या आजारपणाची कैफियत सांगितली. सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी व त्यांच्या संस्थेतल्या पदाधिकाऱ्यांनी त्या मुलाला तात्काळ उपचाराकरीता मुंबईला पाठवून दया असे ना.देसाईंना सांगितले.
                  लॉकडाऊनच काळ असल्यामुळे हा गरीब बयाजी आपल्या मुलाला घेवून मुंबईला जाणार कसा? असा प्रश्न पडलेल्या ना.शंभूराज देसाईंनी लगेच पाटणच्या प्रांताधिकारी यांना फोन लावला आणि कसणीच्या धनगरवाडयाच्या बयाजी यमकरच्या मुलाला तात्काळ उपचाराकरीता मुंबईला पाठवयाचे आहे त्याच्या प्रवासाची परवानगी देणेकरीता तुम्ही स्वत: ऑनलाईन अर्ज भरा आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करा मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो. बयाजीला प्रांताधिकारी यांची भेट घ्यायला सांगून आवश्यक ती कागदपत्रे त्यांना दाखव तुमच्या प्रवासाचा पास मिळेल, पास मिळाला की मला सांग मी आरोग्य विभागाची 108 ची ॲम्ब्युलन्स तुला तुझ्या मुलाला मुंबईच्या रुग्णालयापर्यंत पोहचविण्याकरीता देण्याची व्यवस्था करतो. असे सांगितले. दुसऱ्या दिवशी प्रवासाचा पास मिळताच ना.शंभूराज देसाईंनी बयाजी यमकर आणि त्याच्या मुलाला 108 ॲम्ब्युलन्स उपलब्ध करुन देत या ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयाकडे रवाना केले आणि ना.एकनाथ शिंदे यांच्या संस्थेत व रुग्णालयात फोन करुन सांगितले पेशंन्ट पाठविला आहे त्याच्या वडीलाची परिस्थिती नाही त्या मुलावर मोफत उपचार करा.बयाजी यमकर आणि त्याचा 10 वर्षाचा मारुती मुंबईच्या रुग्णालयात सुखरुप पोहचले असून मारुतीवर उपचार करण्याचे काम रुग्णालयात सुरु झाले आहे. उपचारासाठी सर्वोत्तोपरी मदत करणाऱ्या गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना बयाजीने फोन करुन सांगितले साहेब, माझे मारुतीवर उपचार सुरु झाले आहेत मी व माझे कुटुंब तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही.

No comments:

Post a Comment