सातारा दि.१०:- कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता लाॅकडाऊनच्या काळात बंदोबस्ताकरीता रस्त्यावर भरऊनात उभे राहून आपले कर्तव्य बजाविणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह कनिष्ठ पोलीस कर्मचारी यांना राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी थंडावा दिला आहे. भरऊनात प्रत्यक्षात बंदोबस्तात कार्यरत असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या वतीने लस्सीचे वाटप करण्यात आले. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रातिनिधीक स्वरुपात सातारा येथे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस्सीचे वाटप केले तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी यांचेमार्फत लस्सीचे वाटप करण्यात आले.
राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंकडून नेहमीच सामाजीक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येतात. कोरोनाचे संकट वाढत असताना कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता आपला जीव धोक्यात घालून दिवसरात्र बंदोबस्तात कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्याकरीता त्यांच्या आरोग्याची विचारपुस करण्याकरीता ना.शंभूराज देसाईंनी त्यांच्या संरक्षणाकरीता असणारा सर्व लवाजमा बाजूला ठेवून स्वत: दुचाकीवरून सातारा शहरात फेरफटका मारुन पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्याची तसेच बंदोबस्तामध्ये कसली अडचण नाही ना ? याची विचारपुस करुन पोलिस यंत्रणेचे मनोबल वाढविले होते.
आज त्यांनी संपुर्ण सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोनाच्या संकटसमयी लाॅकडाऊनच्या बंदोबस्तात कार्यरत असणाऱ्या आणि भरऊनात आपली ड्यूटी करून कर्तव्य बजाविणाऱ्या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना भरऊनात थंडावा मिळावा याकरीता पोलिस यंत्रणेतील सर्वांना लस्सी वाटपाचा आगळावेगळा उपक्रम राबविला. प्रातिनिधीक स्वरुपात ना.शंभूराज देसाईंनी सातारा येथील बाॅम्बे रेस्टाॅरन्ट चौकात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस्सीचे वाटप केले तर जिल्ह्यातील सातारा,कराड,पाटण,वाई, माण-खटाव,कोरेगांव,फलटण या तालुक्यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी यांचेमार्फत सर्वांना लस्सीचे वाटप करण्यात आले. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेमार्फत सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सुमारे १८७५ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना लस्सीचे वाटप करण्यात आले. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या या उपक्रमांबद्दल सातारा जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी ना. शंभूराज देसाईंचे आभार व्यक्त करुन पोलिसांची काळजी घेणारा गृहराज्यमंत्री ना .शंभूराज देसाईंच्या रुपाने महाराष्ट्र राज्याला मिळाला असल्याची प्रतिक्रिया पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी व्यक्त केल्या.
No comments:
Post a Comment