Sunday 3 May 2020

जीवनावश्यक सुविधा घरपोहोच देण्याची जिल्हा प्रशासनाने व्यवस्था करावी. घरपोहोच सुविधा देणेस वाव नसेल त्याठिकाणी नियम पाळून किमान 03 तास दुकाने उघडावीत. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुचना.




                 

              सातारा दि.03 :- सातारा जिल्हयामध्ये सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवरती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून सातारा जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या 77 वर गेली आहे. त्यामुळे  सातारा जिल्हा हा रेड झोनमध्ये आला आहे खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या चार पाच दिवसापासून संपुर्ण जिल्हयामध्ये लॉकडाऊन अतिशय कडक पध्दतीने राबविले जात आहे त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक सुविधा मिळणे कठीण झाले आहे याकरीता जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात जीवनावश्यक सुविधा घरपोहोच देण्याची व्यवस्था करावी तसेच ज्याठिकाणी घरपोहोच सुविधा देणेस वाव नाही अशा ठिकाणी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून सामाजीक अंतर ठेवून दुसऱ्या टप्प्यात सकाळी किमान 03 तास जीवनावश्यक साहित्यांची दुकाने उघडी ठेवावीत अशा सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हाधिकारी यांना आज केल्या.
                 गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी वरील महत्वाच्या विषयासंदर्भात आज सगळा प्रोटोकॉल (राजशिष्टाचार) बाजुला ठेवून सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जावून प्रत्यक्ष भेट घेतली व या महत्वाच्या विषयासंदर्भात त्यांनी सुमारे एक तास जिल्हाधिकारी यांचेबरोबर चर्चा केली. यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवरती लॉकडाऊनच्या काळात शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करुन देणेकरीता जिल्हयातील सर्व अधिकारी यांची बैठक घेवून यासंबधीचा आराखडा तयार करुन आवश्यक त्या उपायायोजना केल्या जातील असे सांगितले.
                         गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह या दोघांमध्ये झालेल्या चर्चेमध्ये ना.शंभूराज देसाईंनी लॉकडाऊनच्या काळात सातारा जिल्हयातील सर्वसामान्य जनतेची सुरु असणारी परवड मांडताना घेतलेल्या भूमिकेमध्ये  सातारा जिल्हयामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून सातारा जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या 77 वर गेली असून सातारा जिल्हा हा रेड झोनमध्ये आला आहे खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या चार पाच दिवसापासून संपुर्ण जिल्हयामध्ये लॉकडाऊन अतिशय कडक पध्दतीने राबविले जात आहे.आता केंद्र शासनानेच 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे.सर्वसाधारण लोकांच्यामध्ये 03 तारखेपर्यतच लॉकडाऊन आहे आणि 03 तारखेला लॉकडाऊन शिथील होणार ही मानसिकता असल्यामुळे घरातील धान्य म्हणा, घरगूती साहित्य किंवा भाजीपाला म्हणा हा केवळ 03 तारखेपर्यंतचाच लोकांनी आपल्या घरात भरुन ठेवला होता लॉकडाऊन वाढल्यामुळे संपुर्ण जिल्हयामध्ये धान्याची दुकाने बंद आहेत, भाजीपाला फळफळे दुकाने बंद आहेत आता सुरु आहे काय केवळ दुध आणि औषधे घरपोहोच सेवा आणि औषधांची दुकाने उघडी आहेत या पार्श्वभूमिवरती जिल्हयातल्या ग्रामीण तसेच शहरी भागातील बऱ्याचश्या लोकांनी माझेशी संपर्क साधला आणि त्यांच्या अडचणी सांगितल्या. आमचेकडे धान्य नाही, आम्हाला भाजीपाला मिळत नाही, आम्हाला जीवनावश्यक वस्तू काहीच मिळत नाही. या संदर्भातील अडचणी समोर आल्यानंतर निश्चीतपणे लोकांची गैरसोय होत आहे याबाबत दुमत नाही.
                      लॉकडाऊनचा कालावधी वाढला असल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेला धान्य, भाजीपाला या जीवनावश्यक वस्तू मिळाल्या पाहिजेत.किमान दोन वेळेचे अन्न लोकांना खायला मिळाले पाहिजे याची खबरदारी,दक्षता आपण शासन म्हणून घेणे गरजचे आहे उद्याचा दिवस जावून परवाच्या दिवासापासून आपल्याला ही सेवा सुरु करता येते का हे पहावे असे ना.शंभूराज देसाईंनी पहिल्या टप्प्यात  जिल्हाधिकारी यांना सुचविले. तसेच दुसऱ्या टप्प्यात सातारा जिल्हयात येत्या दोन तीन दिवसात रुग्णांची संख्या वाढते का? कमी होते याचा ही अंदाज जिल्हा प्रशासनाने घ्यावा व त्यानंतर ज्यांना घरपोहोच सुविधा देण्यास वाव नाही त्यांना किमान जीवनावश्यक बाबी मिळणेकरीता दुकाने किमान सकाळी 09 ते 12 पर्यंत तीन तास उघडी ठेवावीत व लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून सामाजीक अंतर ठेवून गर्दी होणार नाही याची दक्षता घेवून या जीवनावश्यक बाबी जनतेला मिळण्याची व्यवस्था करावी.या दोन्ही विषयांचा आराखडा तयार करुन यावर अंमलबजावणी व्हावी असे ना.शंभूराज देसाईंनी सांगितल्या नंतर जिल्हयातील  कुठल्या विभागात काय उपाययोजना करता येतील याचा जिल्हयातील अधिकारी यांना घेवून आराखडा तयार करुन लोकांची जीवनावश्यक वस्तूंची अडचण होणार नाही याची दक्षता घेवू आणि सेवा सुरु करु जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले त्यावर जिल्हाधिकारी मी मांडलेल्या सुचनासंदर्भात अधिकाऱ्यांना घेवून याचा आराखडा व नियोजन करतील व येत्या दोन तीन दिवसात सातारा जिल्हयामध्ये या  जीवनावश्यक सुविधा लोकांना मिळतील अशी खात्री आणि विश्वास ना.शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे.


1 comment:

  1. Thank you Sir. For taking these steps.

    -----------Affected areas-----------:
    Patan Nagar Panchayat and 5 Gram Panchayats: Dhebewadi, Talmavale, Malhar Peth, Nade (new road) and Tarle, etc

    Applicant Details:
    Me [Mayur Sagavkar] and my father are residents of Dhebewadi, Tal - patan, Dist-Satara. Due to lockdown I am in Pune.

    --------What is the Problem we are facing? : No Grocery and vegetables at home---------
    • Since 26 April, we have been under Section 144 of Criminal Procedure Code, 1973 in the mentioned Gram Panchayats.
    • There have been similar restrictions at Dhebewadi also since April 22 [May be applied at Tehsil level] preceding the district magistrate's order on april 26, which have continued the restrictions.
    • Today it's been more than 10 days and the essential services [groceries and vegetables] are not allowed to people as all the shop are shut down.
    • People in villages do not have habit of creating grocery stock, given the current situation, the groceries have run out of stock.
    • Home delivery option is not suitable since connecting villages are huge in number, which depend on the mentioned Panchayats.

    ReplyDelete