Saturday 2 May 2020

वादळी पावसामुळे झालेल्या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या सुचना. नुकसानीच्या जागी ना.शंभूराज देसाईंनी दिल्या प्रत्यक्ष भेटी.



                 

              पाटण दि.02 :-  दि. 29 एप्रिल रोजी पाटण मतदारसंघात सर्वच विभागात मोठया प्रमाणात झालेल्या वादळी पावसामुळे डोंगरपठारावरील तसेच सकल भागातील गांवामधील घरांच्या तसेच शेडांच्या वरील पत्रे उडून जावून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर पिकांचे आणि फळबांगाचेही नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या घरांच्या,शेडांच्या,पिकांच्या व फळबागांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना मदत मिळणेकरीताचा अहवाल शासनाकडे सादर करावा अशा सक्त सुचना राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी त्याचदिवशी पाटणचे प्रातांधिकारी,तहसिलदार व कृषी विभागाला दिल्या आहेत तर आज त्यांनी तारळे विभागातील वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या गांवाना भेटी देत झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी केली व नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देणेकरीता मी प्रयत्नशील असल्याचे सांगून त्यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा दिला.
              कोरोनाच्या संकटामुळे संचारबंदीच्या काळात मुळातच हैरान झालेल्या पाटण मतदारसंघातील जनतेला दि.29 एप्रिल रोजी झालेल्या वादळी पावसामुळे मोठा फटका बसला आहे. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीतून नुकसानग्रस्त जनतेला सावरण्याकरीता मतदारसंघाचे आमदार,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी नुकसानग्रस्तांपर्यंत तातडीने धाव घेतली असून कोरोनाचे संकट असतानाही त्यांनी आज तारळे विभागात जावून घोट व मरळोशी या गांवाना प्रत्यक्ष भेट दिली आणि झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महसूल,कृषी विभागाचे संबधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                  दि.29 एप्रिल रोजी पाटण मतदारसंघातील विविध भागात वादळी पावसामुळे डोंगरी भागातील गांवामधील, वाडयावस्त्यांमधील घरांचे तसेच शेडांचे पत्रे मोठया प्रमाणात उडून गेले आहेत तर शेतातील पिकांचे व फळबागांचे मोठया संख्येने नुकसान झाले आहे असे समजताच गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तात्काळ पाटणचे प्रातांधिकारी,तहसिलदार यांना दुरध्वनीवरुन वादळी पावसामुळे मतदारसंघातील विविध भागात मोठे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीचे उद्याच्या उद्या पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु करा आणि लवकरात लवकर नुकसानीचा अहवाल शासनास सादर करा जेणेकरुन नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळवून देता येईल अशा सक्त सुचना दिल्या होत्या. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या सुचनांवरुन पाटण मतदारसंघातील महसूल व कृषी विभागाकडून तात्काळ वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानीची पहाणी करुन पंचनामे करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली असून पाटण मतदारसंघात मेंढोशी,बिबी,धडामवाडी,म्हावशी,सुरुल,पिपंळोशी,टोळेवाडी, नारळवाडी, आंब्रुळे,पापर्डे,मुरुड,घोट,ढोरोशी,मरळोशी,जंगलवाडी,धायटी,पाडळोशी,सडावाघापूर,काळोली,मुळगांव,   येराड,नेरळे,कवरवाडी,नेचल,गोषटवाडी,किल्लेमोरगिरी,सणबूर या गांवामध्ये व वाडयावस्त्यां मध्ये घरांचे तसेच चाफळ,पेठशिवापुर, किल्लेमोरगिरी, डोंगळेवाडी या गांवामध्ये पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल व कृषी विभागामार्फत प्रगतीपथावर सुरु आहे.
               गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज तारळे विभागातील घोट व मरळोशी या गांवातील नुकसानीच्या ठिकाणांना भेटी दिल्यानंतर दि.29 एप्रिल रोजी वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या पाटण मतदारसंघातील वरील सर्व गांवातील, वाडयावस्त्यांमधील घरांच्या, शेडांच्या,पिकांच्या व फळबागांच्या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना प्रातांधिकारी,तहसिलदार यांना दिल्या असून नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल शासनाकडे तात्काळ सादर करण्याची प्रक्रिया महसूल व कृषी विभागामार्फत प्रगतीपथावर सुरु आहे,वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व नुकसानग्रस्तांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याकरीता मी प्रयत्नशील आहे असे त्यांनी यावेळी सांगितले व नुकसानग्रस्तांना आधार देत दिलासा दिला.

No comments:

Post a Comment