Tuesday 19 May 2020

लॉकडाऊनच्या काळात गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई ग्रामीण भागातील सर्वसामान्यांकरीता ठरले आधार.




           पाटण दि.१९ :- कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन होवून ५० ते ५५ दिवसापासून अधिकचा कालावधी उलटून गेला.मुंबई,पुणे या मोठया शहरात मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजित पवार,आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे, पर्यावरणमंत्री ना.आदित्य ठाकरे हे कोरोनाशी लढा देणेकरीता दिवसरात्र काम करीत आहेत तर राज्यातील ग्रामीण भागात राज्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे दिवसरात्र कोरोनाशी लढा देण्याचे,लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांच्या येणाऱ्या अनेक समस्या सोडविण्याचे काम सुरु असून या काळातील त्यांच्या प्रत्येक कामांमुळे ग्रामीणचे गृहराज्यमंत्री ग्रामीण भागातील सर्वसामान्यांकरीता “ आधार ” ठरले आहेत.
          कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात २२ मार्चला लॉकडाऊन सुरु झाले १४ दिवसांचा कालावधी पुर्ण होण्याअगोदरच पुढच्या लॉकडाऊनचे नियोजन शासनाकडून करण्यात येत असल्याने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमुळे नोकरी,व्यवसाय, रोजगाराकरीता मुंबई,पुणे व राज्यातील इतर शहरात गेलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागले आहे.अडचणीत सापडलेल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना गत ५०-५५ दिवसात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे एक सच्चा जनतेचा सेवक म्हणूनच लाभले आहेत.जनतेचे कुठलेही काम एकदम छोटेसे असले तरी ते मन लावूनच करायचे हा त्यांचा शिरस्ता असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता हक्काचा आधार देणारा मंत्री म्हणून ना.शंभूराज देसाईंकडे पहात आहे.ना.शंभूराज देसाईंचा मोबाईल नंबर राज्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचला असून या माध्यमातून जनतेला येणाऱ्या अनेक समस्या ते ना.देसाईंकडून सोडवून घेत आहेत.
             कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी पोलिस विभागाचे अधिकारी,कर्मचारी जागोजागी तैनात करण्यात आले आहेत. गृह (ग्रामीण)राज्यमंत्री या नात्याने ना.शंभूराज देसाईंना कायम सतर्क रहावे लागत आहे.कारण या काळात कुठलाही विषय आला तरी तो पोलिसांपाशी येवून थांबत आहे.लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणायच्या झाल्या तरी पोलिसांचा कडा पहारा,शहरातून गावांकडे जायचे तरी पोलिसांची परवानगी मग पोलिस एैकणार कुणाचे तर गृहमंत्र्यांचे. उचलला फोन,लावला गृहमंत्र्यांना,आपली समस्या सांगितली आणि ती त्यांच्याकडून सोडवून घेतली असेच गत ५० दिवसांपासून सुरु असल्याचे ना.शंभूराज देसाई सांगत असून ना.देसाई सुध्दा ग्रामीण भागातील सर्वच स्तरातील सर्वसामान्यांकरीता दिवसरात्र २४ बाय ७ अलर्ट राहून लॉकडाऊनमध्ये आधार देण्याबरोबर सर्वसामान्यांचे प्रश्न जागेवर सोडविण्याचे काम करीत आहेत.
              ना.शंभूराज देसाई वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री आहेत लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक फोन त्यांना वाशिम जिल्हयातून आले.विशेष म्हणजे वाशिम जिल्हयातील येणारे सर्व फोन ते स्वत: घेतात आणि समोरच्या व्यक्तींचे सगळे म्हणणे एैकून घेवून त्यावर ते तात्काळ तोडगा काढून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याची भूमिका बजावित आहेत.कुणाला धान्य मिळाले नाही,कुणाला पोलिसांनी अडविले,कुणाच्या गाडीवर कारवाई झाली,कुणाला दवाखान्यात जायला गाडी मिळाली नाही तर ॲम्ब्यूलन्स पाठवायला सांगा,आम्ही इथे इथे अडकून पडलो आहे,आमचे धान्य संपले आहे,भाजीपाला मिळत नाही असे अनेक सामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी एका फोनवर सोडविले आहेत.यात काही ठिकाणी पत्रकारांस मारहाण झाली तर कुठे पोलिसांवर हल्ले झाले असेही प्रकार आहेत.त्या सगळया प्रश्नांची सोडवणूक ते आपलेपणाने करीत आहेत. केवळ वाशिम जिल्हयातीलच नाहीत तर रायगड,रत्नागिरी,पुणे,सांगली,कोल्हापुर,बीड,जालना,अमरावती,उस्मानाबाद या ग्रामीण जिल्हयातीलही समस्या त्यांनी या काळात सोडवून ग्रामीण भागातील जनतेला आधार देण्याचे काम केले आहे.
             दिवसातून सुमारे १२५ ते १५० फोनकॉल स्वत: स्विकारणारे ते पहिले ग्रामीण मंत्री आहेत.यामध्ये विविध जिल्हयातील विधानसभा सदस्य,शिवसेनेसह सर्वच पक्षांचे पदाधिकारी व सामान्य जनता यांचा समावेश आहे.या काळात विविध जिल्हयामध्ये अडकून पडलेल्यां सुमारे १००० लोकांना त्यांनी गृह,महसूल विभागामार्फत धान्यांचे कीट पोहचविण्याचे महत्वाचे काम केले आहे.तर विविध जिल्हयामध्ये काही वयस्कर व्यक्ती, लहान मुले आजारी आहेत त्यांना उपचाराकरीता नेणेकरीता प्रवासाचा पास देण्यापर्यंतचे देखील काम त्यांनी केले आहे.“ घार हिंडे आकाशी,चित्त तिचे पिलापाशी” या उक्तीप्रमाणे राज्याचा गृह विभागाचा गाडा हाकत असताना देखील त्यांनी आपल्या मतदारसघांकडे कणभरही दुर्लक्ष केले नाही.पाटण मतदारसंघात मुंबई,पुणे तसेच राज्यातील इतर शहरातून ६५ हजारहून अधिक नागरिक मुळगांवी आले आहेत. मतदारसंघातील जनतेचा कोरोनापासून बचाव करण्याकरीता त्यांनी ग्रामीण,डोंगरी भागात सुरुवातीसच १० हजार मास्कचे वाटप केले.जनतेला पुढील तीन महिन्यांचे स्वस्त धान्यही मिळवून दिले. प्राथमिक आरोग्य केंद्रांना, ग्रामीण रुग्णालयांना भेटी देवून बाहेरगांवाहून आलेल्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी करुन घेणेसाठी पुढाकार घेतला.आठवडयातून दोनवेळा कधी तीनवेळा शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून बारीक सारीक गोष्टींवर स्वत: बारकाईने लक्ष ठेवून त्या बारीकसारीक गोष्टींवर तात्काळ अंमलबजावणी करुन शासकीय यंत्रणा सातत्याने अलर्ट ठेवण्याचे काम ते हिरीरीने करीत आहेत.      
          लॉकडाऊनच्या काळात मतदारसंघातील डोंगरी भागातील हातावर पोट असणाऱ्या तसेच रोजंदारी बंद झाल्यामुळे अन्नधान्य नसणाऱ्या सुमारे ९८५० कुटुंबांना त्यांनी राज्याचे बांधकाममंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून संयुक्तीकपणे धान्याच्या कीटचे वाटप केले.बंदोबस्तात भरऊन्हात आपले कर्तव्य बजाविणाऱ्या सातारा जिल्हयातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना थोडासा थंडावा मिळावा याकरीता त्यांनी १८२५ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस्सीचे वाटप केले तर दुचाकीवरून फेरफटका मारुन बंदोबस्तातील पोलिस अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विचारपुस करणारे ते पहिले गृहराज्यमंत्री ठरले आहेत.सातारा जिल्हयात कराड तालुक्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यांनी जिल्हयातील एक मंत्री या नात्याने येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेवून कोरोनावर प्रतिबंध आणण्यासाठीही पुढाकार घेतला.जिल्हयाचे जिल्हाधिकारी असो वा पोलिस अधीक्षक असो आपला सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्यांच्या कार्यालयात जावून ना.शंभूराज देसाई कोरोनाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना राबवून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांकरीता जनतेचा आधार बनत जनतेकरीता ते सातत्याने लढा देताना दिसून येत आहेत.

No comments:

Post a Comment