दौलतनगर दि.२४ :-गत दोन दिवसात पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढली असल्यामुळे पाटण तालुक्यात सर्वत्र काळजीचे सावट निर्माण झाले आहे.कोरोनांचा संसर्ग तालुक्यात होवू नये याकरीता गेले दोन महिने तालुक्याचे आमदार,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे सातत्याने अलर्ट राहून त्यांनी तालुक्यातील प्रशासन अलर्ट ठेवण्याचे काम केले.सुरवातीला दोन तीन रुग्ण सापडलेल्या पाटण तालुक्यात २५ कोरोनाचे रुग्ण सापडल्याने गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई अलर्ट टू हायअलर्ट झाले असून त्यांनी या सर्व पार्श्वभूमिवर तालुक्यातील सर्व प्रशासनही हायअलर्ट केले आहे. कोरोना रुग्ण सापडलेल्या म्हावशी गावात त्यांनी काल अधिकाऱ्यांना समवेत घेत प्रत्यक्ष भेट देवून तालुका प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सुचना केल्या आहेत.
पाटण तालुक्यातील बनपुरी,ताईचीवाडी (शिरळ) या दोन गावात प्रत्येकी एक कोरोनाचा रुग्ण सापडला असून या दोन्ही गांवाना भेटी दिल्यानंतर म्हावशी येथेही कोरोनाबाधित रुग्ण सापडला असल्याने राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी या गावातील जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन करण्याकरीता तसेच प्रशासनाने केलेल्या उपाययोजना पाहणेकरीता थेट म्हावशी गांवात अधिकाऱ्यासमवेत एन्ट्री करुन येथील सर्व परिस्थितीची पहाणी केली.
यावेळी गावामध्ये कुणीही भिऊन जावू नका असे आवाहन करीत त्यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याकरीता आम्ही सर्वजण कार्यरत आहोत असे म्हावशी गावातील जनतेला सांगितले.तसेच गावकऱ्यांना जीवनावश्यक साहित्य मिळणेसंदर्भात प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत.याचीही माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.गावकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी गावांमध्ये २४ तास पिण्याचे पाणी तसेच वीजपुरवठा सुरळीत राहील याची प्रशासनाने व्यवस्था करा.गावात नाकाबंदी करण्यात आलीच आहे परंतू बाहेरचे कोणी गांवात येत नाही ना? आणि गावातील कोण बाहेर जात नाही ना? याची तपासणी गावकऱ्यांनीच करावी जेणेकरुन संकट वाढणार नाही.सापडलेल्या रुग्णावर उपचार सुरुच आहे परंतू त्या व्यक्तीच्या कोण संपर्कात आले असतील तर त्यांनी माहिती न लपविता प्रशासनाला सांगावी. प्रशासनाचे सहकार्य आहेच गावकऱ्यांनीही प्रशासनाला सहकार्य करुन लवकरात लवकर हे गांव कोरोनामुक्त होईल याची काळजी गावकऱ्यांनीच घ्यावी असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.गावांत कसल्या प्रकारची अडचण तर नाही ना? अशा प्रकारे विचारणा करुन अडचणी असतील तर प्रशासनाला सांगा असेही ना.शंभूराज देसाईंनी गावचे सरपंच शंकर घाडगे, उपसरपंच सर्जेराव घाडगे, ग्रामपंचायत सदस्य नथूराम दाभाडे यांना सांगितले.
यावेळी पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सपोनि तृप्ती सोनावणे, कारखान्याचे माजी संचालक मधूकर भिसे, सरपंच शंकर घाडगे,उपसरपंच सर्जेराव घाडगे ग्रामपंचायत सदस्य नथूराम दाभाडे यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment