Monday 18 May 2020

दि.२० मे रोजी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६१ वी पुण्यतिथी होणार साध्यापध्दतीने. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शिष्यवृत्तीचे वितरणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.



दौलतनगर दि.1:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची वा पुण्यतिथी यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत साध्या पध्दतीने बुधवार दि.२० मे, २०२० रोजी सकाळी १०.०० वा.     “ महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण येथे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात येणार आहे.प्रतिवर्षाप्रमाणे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या शिष्यवृत्तीचे वितरणाचा कार्यक्रम कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आला असून या शिष्यवृत्तीचे वितरण कोरोनाचे संकट संपल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून त्यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम प्रतिवर्षी दि.२० मे रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने साजरा करण्यात येतो.राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे.यंदाचे हे अकरावे वर्ष असून आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील १५० हुन अधिक मुलींना प्रत्येकी ५००० रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. गरजू कुटुंबातील मुलींना शिक्षणाकरीता हातभार लागावा याकरीता या शिष्यवृत्तीबरोबर वहया,शालेय गरजांच्या साहित्याचे वितरणही करण्यात येते. मागील वर्षापासून ५५०० रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येत असून यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे शिष्यवृत्ती वितरणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.कोरोनाचे संकट कमी झालेनंतर या शिष्यवृत्तीचे वितरणाचे नियोजन करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची यंदाच्या वर्षीची१ वी पुण्यतिथी बुधवार दि. २० मे २०२० रोजी सकाळी १०.०० वाजता लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक व राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते कै.ताईसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करुन अत्यंत साध्या पध्दतीने दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न होणार असल्याचे पत्रकांत म्हंटले आहे.

1 comment: