दौलतनगर दि.२०:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६१ वी पुण्यतिथी दौलतनगर
ता.पाटण येथे अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.कै.ताईसाहेब यांचे ६१ व्या पुण्यतिथीनिमित्त मरळी ता.पाटण येथील कै.सौ. वत्सलादेवी देसाई
हायस्कुलच्या प्रांगणातील पुतळयास तसेच “ महाराष्ट्र दौलत ” लोकनेते बाळासाहेब देसाई
शताब्दी स्मारकामध्ये प्रतिमेस पुष्प्हार अर्पण
करुन राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी विनम्र अभिवादन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत
साध्या पध्दतीने केवळ पुष्प्हार अर्पण करुन राज्याचे
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ६१ वी पुण्यतिथी करण्याचा
निर्णय ना.देसाईंनी घेतला व पुण्यतिथीनिमित्त त्यांनी पुतळयास व प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील
गरजू मुलींना महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता देण्यात
येणाऱ्या शिष्यवृत्तीचा कार्यक्रम कोरोनाच्या संकटामुळे आम्ही पुढे ढकलण्याचा
निर्णय घेतला.या शिष्यवृत्तीचे वितरण कोरोनाचे संकट संपल्यानंतर करण्यात येणार
असल्याचे यावेळी ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले.
यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष
रविराज देसाई,जयराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन
अशोकराव पाटील,ॲड.डी.पी जाधव,जिल्हा परीषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्य
संतोष गिरी,माजी सदस्य राजेंद्र चव्हाण,बबनराव भिसे,कारखान्याचे संचालक पांडूरंग
नलवडे,माजी संचालक मधूकर भिसे,मरळी सरपंच राजाराम माळी, माजी सरपंच प्रवीण पाटील
यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment