Wednesday 27 May 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोरोनाच्या दोन महिन्यातील कामांचा अहवाल मुख्यमंत्र्याकडे केला सादर.अहवालात पाटण मतदारसंघ,सातारा,वाशिम व इतर जिल्हयात मंत्री म्हणून केलेल्या कामांचा तपशिल.



 
          

             
                 दौलतनगर दि.२७ :- महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोनाच्या लढयात गेली दोन महिने ज्याप्रमाणे संपुर्ण राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,आरोग्यमंत्री,पर्यावरणमंत्री हे अहोरात्र लढा देण्याचे काम करीत आहेत त्याप्रमाणे राज्याच्या ग्रामीण भागात सलग दोन महिने राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे रस्त्यावर उतरुन कोरोनासंदर्भात लढा देत आहेत.२२ मार्चला सुरु झालेल्या लॉकडाऊनपासून मे महिन्यांतील कालच्या तारखेपर्यंत मागील ६० दिवसात त्यांनी प्रतीरोज केलेल्या कामांचा अहवाल काल राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे अवलोकनार्थ सादर केला आहे.या अहवालात त्यांनी दोन महिन्यात पाटण मतदारसंघात,सातारा वाशिम व राज्यातील इतर जिल्हयातील ग्रामीण भागातील जनतेच्या विविध अडीअडचणी सोडविण्याकरीता व कोरोनावर नियंत्रण आणणेकरीता केलेल्या कामांचा तपशिलच मुख्यमंत्र्याकडे सादर केला आहे.
               मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे सादर केलेल्या अहवालात मंत्री ना.शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, कोरोनामुळे ओढवलेल्या संकटाला पावणेतीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असून राज्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे संकट पोहचून दोन महिने झाले आहेत.या महामारी संकटातून महाराष्ट्र राज्यातील जनतेला सुखरुप बाहेर काढणेकरीता आपण राज्याचे मुख्यमंत्री व राज्यातील तमाम जनतेचे, आमचे प्रमुख या नात्याने गेली दोन महिन्याहून अधिक काळ अहोरात्र कष्ट घेत आहात.सद्यपरिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजनबध्द उपक्रम, सुनियोजीत पध्दतीने जागेवर धाडसी निर्णय घेवून येणाऱ्या संकटावर ठोस कृतीव्दारे मात करीत असून संकट काळात जनतेला कणखर आणि प्रगल्भ नेतृत्वच उपयोगी पडते हे आपण आपले कार्यातून दाखवून दिले आहे.याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे.
              या दोन महिन्याच्या काळात आपण वेळोवेळी दिलेल्या सुचनांनुसार पाटण मतदारसंघात,सातारा व वाशिम जिल्हयामध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी,जनता यांना बरोबर घेवून कोरोना संकटाचा सामना करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करीत आहोत. कोरोना काळात पाटण मतदारसंघात सातारा व वाशिम जिल्हयात बाहेरगांवाहून येणाऱ्यांची संख्या मोठी असली तरीही पाटण मतदारसंघात,सातारा जिल्हा व वाशिम जिल्हयामध्ये कोरोनावर नियंत्रण आणण्यास आम्हास यश मिळाले आहे.आपल्या सुचना या तळागाळातील लोकापर्यंत पोहचविल्यामुळेच व संकटावर मात करण्याचे योग्य नियोजन केल्यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे.
              आपण माझेवर गृहराज्यमंत्री तसेच वाशिम जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी दिली आहे त्यानुसार मी मागील दोन महिन्यातील ६० दिवसांमध्ये किमान ४७ दिवसात माझे अधिकारात सातारा असो वा वाशिम जिल्हयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून कोरोनाशी लढण्याचे योग्य नियोजन केले आहे.या ४७ दिवसात मी प्रतिरोज रस्त्यावर उतरुन सर्वांना बरोबर घेत कोरोनाच्या संकटाशी लढण्याचे काम करीत आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील अनेक जिल्हयातील ग्रामीण भागातील जनतेला विविध अडचणींचा सामना करावा लागला.कोरोनाचा संसर्ग थांबविण्याकरीता मी पाटण मतदारसंघात,सातारा व वाशिम जिल्हयात आवश्यक त्या उपाययोजना राबवून कोरोनाचा संसर्ग थांबविण्या बरोबरच राज्यातील इतर जिल्हयातील ग्रामीण भागातील लोकांच्या ज्या ज्या अडीअडचणी माझेपर्यंत आल्या त्या सर्व अडीअडचणी हिरीरीने सोडविण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.
             संचारबंदीच्या काळात पाटण मतदारसंघ,सातारा व वाशिम जिल्हयातील जनतेला जीवनावश्यक वस्तू वेळेत मिळण्याचे नियोजन केल्यामुळे संचारबंदीमध्ये जनतेला काही अडचणी आल्या नाहीत तसेच लॉकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेला गृहविभागाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या मार्फत आवश्यक असणारे सर्व सहकार्य करण्याची भूमिका बजावली काही ठिकाणी विघ्नसंतोषी लोक वगळता दोन महिन्यांच्या काळात गृह विभागातील पोलीस अधिकारी असो वा कर्मचारी यांच्यामुळे राज्यातील जनतेला कोणताही त्रास झाला नाही.हे त्यांनी आर्वजुन अहवालात मांडले असून पाटण विधानसभा मतदारसंघ,सातारा जिल्हा व वाशिम जिल्हयामध्ये तसेच राज्याच्या अनेक जिल्हयामध्ये गत दोन महिन्यात त्यांनी ४७ दिवसात प्रत्यक्षात फिल्डवर जावून केलेल्या पाटण,सातारा येथून केलेल्या प्रत्येक घडामोडीची माहिती अहवाल रुपाने मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे अवलोकनार्थ सादर केली असल्याचे मंत्री ना.शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment