दौलतनगर दि.०५ :- लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला
जीवनावश्यक साहित्य मिळत नसल्याने जनतेची मोठी अडचण होत असल्यामुळे ज्याठिकाणी
कोरोनाचे रुग्ण नाहीत अशा पाटण तालुक्यात जीवनावश्यक साहित्य खरेदी करायला सकाळी
०९ ते दुपारी ०२ पर्यंत अत्यावश्यक सेवेतील किराणा मालाची,औषधांची दुकाने उघडण्यास
सुट देण्याचे आदेश जिल्हाधिकारी,सातारा यांनी काढले आहेत.जीवनावश्यक साहित्य खरेदी
करायला दुकाने उघडण्याची सुट दिली तरी साहित्य खरेदी करणाऱ्या जनतेने सोशल
डिस्टटींग पाळावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंनी आज पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला केले त्याचबरोबर त्यांनी
मल्हारपेठ,नवारस्ता व पाटण येथील बाजारपेठेमध्ये प्रत्यक्ष जावून सोशल
डिस्टटींगचे नियम पाळले जातात का ? याचीही अधिकाऱ्यांसमवेत पहाणी करीत जीवनावश्यक
साहित्य खरेदी करणाऱ्यांची त्यांनी आपुलकीने विचारपुस करुन चौकशीही केली.
कालच जिल्हाधिकारी,सातारा यांनी पाटण
तालुक्यातील मल्हारपेठ,नवारस्ता,पाटण नगरपंचायत, तळमावले, ढेबेवाडी व तारळे येथील
बाजारपेठामध्ये पाटण तालुक्यातील डोंगरी भागातील जनतेला लॉकडाऊनच्या काळात
जीवनावश्यक साहित्य मिळत नसल्याने या सहा बाजारपेठांमध्ये जीवनावश्यक साहित्य
खरेदी करायला सकाळी ०९ ते दुपारी ०२ पर्यंत अत्यावश्यक सेवेतील किराणा
मालाची,औषधांची दुकाने उघडण्यास सुट देण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाची
अंमलबजावणी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून संबधित अत्यावश्यक सेवेतील दुकानदार,
केमिस्ट दुकाने यांच्याकडून होत आहे का? बाजारपेठांमध्ये जनतेकडून सोशल
डिस्टटींगचे नियम पाळले जात आहेत का ? याची प्रत्यक्ष पहाणी करण्याकरीता ते मल्हारपेठ, नवारस्ता व पाटण येथील बाजारपेठेमध्ये आले होते
त्यानंतर त्यांनी पाटण तहसिल कार्यालय येथे तालुका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची
बैठक घेतली यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे जनतेला सोशल
डिस्टटींगचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
केले.
यावेळी
ना.शंभूराज देसाईंनी लॉकडाऊनच्या काळात जनतेला येणाऱ्या अडीअडचणींची माहिती तालुका
प्रशासनातील अधिकाऱ्यांना देत जनतेला लॉकडाऊनच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा
लागत आहे. यावर उपाययोजना म्हणून कालच जिल्हाधिकारी,सातारा यांना सुचना करुन किमान
डोंगरी भागातील जनतेला दोनवेळचे अन्न सुरळीत मिळण्याकरीता जीवनावश्यक साहित्य
खरेदी करण्याकरीता सकाळी ०९ ते दुपारी ०२ पर्यंत अत्यावश्यक सेवेतील किराणा
मालाची,औषधांची दुकाने उघडण्यास आपण आदेशित केले त्यानुसार जीवनावश्यक साहित्यांची
दुकाने उघडली गेली परंतू याठिकाणी सोशल डिस्टटींग राहते का? जनतेला सुरुळीत
जीवनावश्यक साहित्य मिळते का? हे पहाणे प्रशासनाचे काम आहे.त्यामुळे अशा
बाजारपेठांमध्ये तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी त्याकरीता
मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यामार्फत दुकानदारांना सुचित
करण्यात यावे.ज्या दुकानदारांकडून सोशल डिस्टटींगचे पालन केले जात नाही अशा
दुकानदारांवर कारवाई करावी अशा सक्त सुचना त्यांनी यावेळी पोलीस व महसूल
विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
आपल्या
तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही ही आनंदाची बाब आहे.कोरोनाचा संसर्ग आपल्या
तालुक्यात होवू नये याकरीता आतापर्यंत जी काळजी आपण घेतली आहे तीच काळजी पुढील
काळातही आपण सर्वांनी घ्यायची आहे असे सांगून शेतकऱ्यांना शेतामध्ये टाकण्याकरीता
खते मिळत नाहीत बिबियाणे मिळत नाही तसेच बँकामध्ये जमा झालेले अनुदान बँका बंद
असल्यामुळे मिळत नाही अशा अनेक तक्रारी आल्या आहेत यासंदर्भात जिल्हाधिकारी,सातारा
यांना सुचना करुन शेतकऱ्यांना वेळेवर खते,बि बीयाणे देणेकरीता त्याचबरोबर बँकामधील
अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळणेकरीताच्या उपाययोजना करण्याचे सुचित केले जाईल
असे सांगून तीनचार दिवसापुर्वी झालेल्या वादळी पाऊसामुळे तालुक्यातील अनेक विभागात
घरांचे, शेडांचे पत्रे उडून गेले आहेत याची दुरुस्ती करणेकरीता आवश्यक असणारे
पत्रे, खिळेमुळे देणेकरीता हार्डवेअरची दुकानेही सुरु करण्यासंदर्भात सुचित केले
जाईल याचेही नियोजन तालुका प्रशासनाने करावे असे त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना
सुचित केले.यावेळी ना.शंभूराज देसाईं यांचेसोबत पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग
तांबे,पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी
अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे,पाटण ग्रामीण
रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव,तालुका वैद्यकीय अधिकारी
डॉ.आर.बी.पाटील,पाटणच्या सहा.पोलिस निरिक्षक तृप्ती सोनावणे,पाटण नगरपंचायतीचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी,नायब तहसिलदार प्रशांत थोरात यांची
उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment