दौलतनगर दि.२७ : - कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेली दोन
महिने झाले राज्यभर संचारबंदी करण्यात आली असून लॉकडाऊनमुळे पाटण विधानसभा
मतदारसंघात रोजगार तसेच व्यवसाय बंद झालेल्या जीप,रिक्षा,टमटम यातून प्रवासी व माल
वाहतूक करणारे,सलून तसेच पानटपरी चालविणारे आणि मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब व हातावर
पोट असणाऱ्या कुटुंबाना शिवसेना पक्षाच्या वतीने सार्वजनीक बांधकाममंत्री ना.एकनाथ
शिंदे व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई या दोघांनी मायेचा आधार देत १०-१० किलोचे
पॅकेट तयार करुन ११५०० कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यास पहिल्या टप्प्यात सुरुवात
करण्यात आली आहे.मागील महिन्यात लॉकडाऊनच्या काळात ना.शिंदे व ना.देसाईंनी पाटण मतदारसंघात
हातावर पोट असणाऱ्या ९५०० कुटुंबाना १०-१० किलो धान्याचे वाटप करुन सामाजिक
बांधिलकी जपण्याचे काम केले होते. त्यांच्या या उपक्रमामुळे मतदारसंघातील २१ हजार
कुटुंबाना आधार देण्याचे काम ना.शिंदे व ना.देसाईंनी केले आहे.
कोरोनामुळे
गेले दोन महिने झाले लॉकडाऊनच्या काळात सर्वत्रच रोजगार,व्यवसाय बंद झाले आहेत. ग्रामीण भागात तर रोजगार आणि
व्यवसाय बंद झाल्याने हातावर पोट असणाऱ्या जीप,रिक्षा,टमटम वाहतूक करणारे,सलून
तसेच पानटपरी चालविणारे आणि मोलमजुरी करणारी कुटुंबे ही गेली दोन महिने घरीच बसून
आहेत. पाटण या ग्रामीण व डोंगरी मतदारसंघातही तीच परिस्थिती असून पाटण
मतदारसंघातील रेशनिंग कार्ड धारकांना शासकीय यंत्रणेमार्फत तीन महिन्याचे धान्य
देणेची व्यवस्था गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सुरवातीसच केली होती. परंतू हातावर
पोट असणाऱ्या गोरगरीब कुटुंबांना तसेच ज्यांचे रेशनिगंचे कार्ड नाही अशा कुटुंबाना
शिवसेना पक्षाच्या वतीने राज्याचे सार्वजनीक बांधकाममंत्री व विधानसभेतील पक्षाचे
गटनेते ना.एकनाथ शिंदे व राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण
मतदारसंघात मागील महिन्यात सुमारे ९५०० कुटुबांना १०-१० किलोचे अन्नधान्याचे एक
पॅकेट तयार करुन ते वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली व आता रोजगार व व्यवसाय बंद
झालेल्या जीप,रिक्षा,टमटम वाहतूक करणारे,सलून तसेच पानटपरी चालविणारे आणि मोलमजुरी
करणाऱ्या गरीब ११५०० कुटुबांना दुसऱ्या टप्प्यात वाटप करावयाचे १०-१० किलो
धान्याचे कीट तयार केले असून ११५०० कुटुंबांना दयावयाच्या धान्याच्या कीटचे वाटपास
आज पहिल्या टप्प्यात सुरुवात करण्यात आली आहे.
या पॅकेटमध्ये
गहू,मैदा,तांदूळ,डाळ,तेल व साखर अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. पाटण
विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक भागामध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी
दिलेल्या सुचनानुसार त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत ही धान्याची
पॅकेट व्यवसाय व रोजगार बंद झालेल्या प्रत्येक कुटुंबाच्या घरी जावून कोरोनाच्या
पार्श्वभूमिवर गांवागांवामध्ये तसेच वाडीवस्तीमध्ये शासनाच्या सर्व नियमांचे पालन
करुन सामाजीक अंतर ठेवून वाटप करण्याचे काम सुरु झाले आहे.मतदारसंघातील प्रत्येक
विभागात दोन टप्प्यामध्ये हे धान्य वाटप करण्यात येणार असून आज पहिल्या टप्प्यातील
धान्याच्या वाटपास सुरुवात करण्यात झाली आहे. मंगळवार दि.२९ ते ३० मे पर्यंत पाटण
विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील गांवागावांतील तसेच वाडीवस्तीतील या
कुटुंबापर्यंत या धान्याचे वाटप पुर्ण होईल असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले
आहे.
अडचणीच्या काळात
पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे
पाटण विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब जनतेकरीता नेहमीच धावून आले आहेत.कोरोनाच्या
पार्श्वभूमिवर मागील दोन महिने झाले ते पाटण मतदारसंघात कोरोनाचा संसर्ग होवू नये तसेच
कोरोनाच्या संसर्गावर नियत्रंण राहावे याकरीता दररोज रस्त्यावर उतरुन काम करीत
आहेत. रोजगार व व्यवसाय बंद झालेल्यांच्या व्यथा ओळखून प्राधान्यक्रमाने जीप,रिक्षा,टमटम
वाहतूक करणारे,सलून तसेच पानटपरी चालविणारे आणि मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबांना
मायेचा आधार मिळावा लॉकडाऊनच्या काळात त्यांची धान्याची अडचण दुर व्हावी याकरीता
त्यांनी पक्षाच्यावतीने तसेच राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे
यांच्या सहकार्याने पुढाकार घेतला असून या दोघांच्या प्रयत्नातून पाटण विधानसभा
मतदारसंघात पहिल्या टप्प्यात ९५०० गरीब कुटुंबापर्यंत व आता दुसऱ्या टप्प्यात
११५०० असे एकूण २१००० कुटुंबापर्यंत जीवनावश्यक अशा धान्याचे पॅकेट पोहचणार आहे.
That's good job..... i like it.. ....
ReplyDeleteGood job
ReplyDeleteGreat work saheb
ReplyDeleteGood work done
ReplyDeleteSaheb dhany गरजुंपर्यंत पोहोचत नाही,ते पोहोचेल याची काळजी घ्या.
ReplyDeleteGreat Superb
ReplyDeleteसाहेब कारखान्याच्या सभासदांना मिळणारी ५किलो साखर तेवढी चालू करा
ReplyDeleteGreat work heartily congratulations
ReplyDelete