Saturday 28 April 2018

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचेवरील श्रध्देला बुवाबाजी म्हणणा-या पवारांनी तालुक्याच्या उद्रेकाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. आमदार शंभूराज देसाईंचा आमदार अजित पवारांना इशारा.


आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई हे आमचे दैवत आणि तालुक्याचे भाग्यविधाते आहेत.त्यांनी तालुक्याच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अतुलनीय योगदान दिले आहे.म्हणूनच तालुक्यातील जनतेबरोबर महाराष्ट्रातील जनतेची लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावर श्रध्दा आहे तालुक्यातील जनता घरातील देव्हा-यात लोकनेतेसाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करते. लोकनेतेसाहेबांच्या पुजनाला १५ दिवसापुर्वी राष्ट्रवादीच्या झालेल्या हल्लाबोल मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी बुवाबाजी म्हंटले आहे.आमदार अजित पवार माझे मित्र असले तरी माझे त्यांना परत जाहीर आवाहन आहे. त्यांनी तुमच्या पुर्वजांनी कोणते योगदान दिले आहे हे पहिल्यांदा तपासून पहावे.जलसंपदा विभागात ७० हजार कोटी रुपयांचा डल्लाबोल करणा-यांनी परत तालुक्यात येताना लोकनेतेसाहेब यांच्याविषयी भाष्य करु नये आम्ही तर ते सहन करणारच नाही पंरतू तालुक्यातील जनताही हे सहन करणार नाही.लोकनेतेसाहेब यांचे श्रध्देला बुवाबाजी म्हणणा-या पवारांनी तालुक्याच्या उद्रेकाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. आणि यात मध्ये मध्ये त्यांच्या पक्षाचे पाटणच्या माजी आमदारांच्या सुपुत्रांनी नाक खुपसु नये असा इशारा आमदार शंभूराज देसाईंनी आमदार अजित पवार आणि सत्यजितसिंह पाटणकर यांना दिला.
मारुल तर्फ पाटण याठिकाणी आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत मारुल तर्फ पाटण ते बाजेगांव रस्त्याचे तसेच सन २०१७-१८ चे जिल्हा नियोजन समितीच्या विशेष घटक योजनेतंर्गत मारुल तर्फ पाटण बौध्दवस्ती व शेळकेवस्ती अश्या दोन साकव पुलांचे भूमिपुजन करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील, संचालक अशोकराव पाटील, सुनिल पवार,पंचायत समिती माजी सदस्य हरीष भोमकर,शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र पाटील,पांडूरंग बेबले,दिलीप सकपाळ, नथूराम सावंत,कारखाना संचालक बबनराव भिसे,राजेंद्र गुरव,शैलेंन्द्र शेलार,उपअभियंता विलास पानस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,पाटणच्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चात पाटणच्या माजी आमदारांनी आणि त्यांच्या सुपुत्रांनी राज्यातले राष्ट्रवादीचे मातब्बर मंडळी माझेविरोधात बोलण्यासाठी पाटणला आणली होती. या मोर्चात पाटणकरांचे नेते आमदार अजित पवार यांनी पाटणकरांना बरे वाटावे म्हणून माझेवर काहीतरी टिका केल्याचे मला समजल्यानंतर अजितदादा मला तोंड उघडायला लावू नका, असे आवाहन मी त्यांना केले होते. यात मध्येच माजी आमदारपुत्रांनी तोंड घातले आणि मला तोडं उघडाच म्हणून आवाहन केले त्यांचाही समाचार मी घेतला परंतू माझे त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आवाहन आहे.मी माझे तोंड उघडायला केव्हाही तयार आहे. वाडयात बसून पत्रकबाजी करण्यापेक्षा जनतेच्या समोरासमोर या. ठिकाण तुमचे वेळ तुमची प्रश्न तुमचे आणि उत्तरे माझी. असे अनेकदा आवाहन मी पाटणकर पितापुत्रांना दिले आहे पण निष्क्रीय पाटणकर पितापुत्र माझे आवाहन स्विकारत नाहीत. आणि मला आवाहन देण्याएवढे माजी आमदारांचे सुपुत्र अजुन मोठे झाले नाहीत.सत्यजितसिंह पाटणकरांनी या तालुक्याच्या हितासाठी कोणते योगदान दिले आहे ते त्यांनी जाहीरपणे सांगावे. गेल्या तीन वर्षात कामे झाली का नाही हे तालुक्यातील जनता उघडया डोळयांनी पहात आहे. २०१४ च्या निवडणूकीला मतदारांना मते मागून गेलेले सत्यजितसिंह पाटणकर २०१९ ची विधानसभा निवडणूक १ वर्षावर येवून ठेपली आहे. वाडयातून जरा बाहेर पडा आणि तालुक्यातल्या कानाकोप-यात फिरा म्हणजे कुठे कुठे आणि कशी कशी विकासकामे झाली आहेत हे तुमच्या लक्षात येईल.जनतेला देण्यासारखे स्वत:च्या हातात काही नाही त्यामुळे हे पाटणकर मंडळी सैरभैर झाले आहेत.काहीतरी टिका करायची आणि जनतेमध्ये बुध्दीभेद करायचा एवढाच काही तो उद्योग सध्या सुरु आहे. आज याच मारुल तर्फ पाटण गांवामध्ये मारुल तर्फ पाटण ते बाजेगांव हा २ कोटी ४० लाखांचा रस्ता मंजुर केला,बौध्दवस्ती आणि शेळकेवस्तीचे ४७ लाखांचे दोन पुल मंजुर केले,गतवर्षी शेळकेवस्तीचा रस्ता केला,यमकरवस्तीचा सभामंडप केला,मारुलच्या मंदीरास संरक्षक कठडा करुन दिला कोयना पुनर्वसित निधीमधून या गावाला रस्ता करुन दिला.काही भाग अपुरा आहे त्यास निधी मंजुर आहे.तर बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता व या समाजकरीता समाजमंदीर ही कामे यावर्षी प्रस्तावित केली आहेत. ही संगळी कामे पाहिली तर सुमारे ४ कोटी १ लाख ३० हजार रुपयांची कामे एकटया मारुल तर्फ पाटण मध्ये गेल्या साडेतीन वर्षात केली आहेत.जनतेला ही कामे दिसत आहेत. पाटणकरांनी डोळे झाकलेत त्याला आपण काय करणार.असा उपरोधिक टोलाही त्यांनी शेवटी बोलताना लगाविला. हरीष भोमकर, अशोकराव पाटील, जयवंतराव शेलार यांची याप्रसंगी भाषणे झाली यावेळी उपस्थितांचे स्वागत दिलीप संकपाळ यांनी केले.

Wednesday 25 April 2018

मुंबईत कै.सौ.वत्सलादेवी देसाई नामफलकाचे नुतनीकरण व अनावरण. मुंबई येथील हाजीअली चौकात अनावरणाचा कार्यक्रम संपन्न.


मुंबई येथील हाजीअली चौकास महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी दौलतराव देसाई यांचे नावाने वत्सलादेवी देसाई चौक असे नामकरण करण्यात आले होते.सदर चौकाची दुरुस्ती व सुशोभिकरण करताना सदरचा नामफलक काढण्यात आला होता.चौकाची दुरुस्ती झालेनंतर वत्सलादेवी देसाई चौक असे असणारे नामफलकाचे नव्याने नुतनीकरण व अनावरण करण्याचा कार्यक्रम नुकताच लोकनेते बाळासाहेब देसाई व कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे चिरंजीव अरुणराव देसाई व सौ.मंगलाताई थोरात यांचे शुभहस्ते मुंबई हाजीअली चौकामध्ये संपन्न झाला.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्याचे मंत्री असताना मुंबई येथील हाजीअली चौकास लोकनेते यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी दौलतराव देसाई यांचे नावाने वत्सलादेवी देसाई चौक असे नामकरण केले होते. अनेक वर्षापासून हा चौक वत्सलादेवी देसाई चौक या नावाने ओळखण्यात येत आहे. नुकतेच या चौकाची दुरुस्ती व सुशोभिकरण करताना सदरचा नामफलक काढण्यात आला होता. सदरचा नामफलक तात्काळ लावणेसंदर्भात लोकनेते व कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे नातू पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी बृन्हमुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचेकडे विनंती केली होती. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही या चौकाची दुरुस्ती व सुशोभिकरणाचे काम पुर्ण होताच एक महिन्याच्या आत नामफलकाचे नव्याने नुतनीकरण करुन हा नामफलक बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुर्वरत लावण्यात येईल असे आश्वासन दिले होते. बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या वतीने हा नामफलक हाजीअली चौकामध्ये पुर्ववत लावणेत आला असून या नामफलकाचे अनावरण लोकनेते बाळासाहेब देसाई व कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे चिरंजीव अरुणराव देसाई व सौ.मंगलाताई थोरात यांचे शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी याठिकाणी छोटेखानी कार्यक्रमही आयोजीत करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई व कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे चिरंजीव अरुणराव देसाई व सौ.मंगलाताई थोरात यांचे बरोबरीने प्रसाद हिरे, सौ.गितांजली हिरे, राजेंद्र देसाई, शिवराज देसाई, पृथ्वीराज देसाई, बृन्हमुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रमेश पवार,सहाययक आयुक्त विश्वासराव मोटे यांच्यासह देसाई कुंटुंबातील सदस्यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. यासंदर्भात आमदार शंभूराज देसाई यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचेसह महानगरपालिकेचे उपायुक्त रमेश पवार,सहाययक आयुक्त विश्वासराव मोटे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Monday 23 April 2018

दौलतनगरचे श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण उत्साहात साजरे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ३५ व्या पुण्यतिथीनिमित्त शासकीय इतमामात विनम्र अभिवादन. भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला भक्तीमय वातावरण


      महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३५ व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे गत आठ वर्षापासून यंदाही आयोजीत केलेल्या तीनदिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व पारायण सोहळयाच्या निमित्ताने आयोजीत केलेला पुण्यतिथी सोहळा मोठया उत्साहात साजरा झाला. पुण्यतिथी निमित्त आयोजीत पारायण सोहळयात तीन दिवस श्री.ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन झालेनंतर पुण्यतिथीदिवशी भव्य दिव्य दिंडी सोहळयाने कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयावर आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते पुष्पवृष्टी व याठिकाणी ध्वजारोहण करीत तालुक्यातील सर्व शासकीय अधिका-यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात व पारायण सोहळयातील भविक भक्तांच्या उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांना विन्रम अभिवादन करण्यात आले.
        दौलतनगर ता.पाटण येथील दौलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या भव्य प्रांगणात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३५ व्या पुण्यतिथीनिमित्त गत आठ वर्षापासून सुरु असलेल्या श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे यंदाचे नववे वर्ष होते. या पारायण सोहळयामध्ये ३६७ महिला तसेच ३०३ पुरुषांसह ६७० वाचक सहभागी झाले होते. तसेच तालुक्याबाहेरुन मोठया संख्येने भाविक भक्त या सोहळयामध्ये सहभागी होते. तर वारकरी साप्रंदयातील विविध मान्यवरांची प्रवचने, कीर्तने तसेच गावोगावच्या भजनांचे जागराचे कार्यक्रम या निमित्ताने आयोजीत करण्यात आले होते.या संपुर्ण पारायण सोहळयामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुत्र अरुणराव देसाई(काकासाहेब), सौ. मंगलाताई मुरारराव थोरात, आमदार शंभूराज देसाई,श्रीमती विजयादेवी देसाई मॉसाहेब,श्रीमती मंदाकिनीताई देसाई,रविराज देसाई,शिवराज देसाई,पृथ्वीराज देसाई, सौ.स्मितादेवी देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई, यशराज देसाई, ईश्वरी देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई यांचा विशेष सहभाग होता.
      तीन दिवस श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वर ग्रंथाचे वाचन पुर्ण झालेनंतर लोकनेते यांचे पुण्यतिथीदिवशी फुलाने सजविलेल्या पालखीत श्री.ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमा ठेवून टाळ मृदुंगाच्या तालावर, डोक्यावर कलश, तुळशी वृंदावन घेतलेल्या सुहासिनी ढोल वाद्यांसमवेत श्री.विठ्ठल नामाचा तसेच ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली यांचे गजरात आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयघोषात माऊलीच्या मंडपातून निघालेल्या भव्य दिंडीला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे मेघडंबरी येथून सुरुवात करण्यात आली.पारायण सोहळयाची भव्य दिंडी ही कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर आलेनंतर आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळयावर पुष्पवृष्टी करुन याठिकाणी आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करीत सातारा पोलीस बँन्डकडून राष्ट्रगीत सादर करीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अभिवादन करण्यात आले.तसेच २१ तोफांची सलामी देण्यात आली तर पुतळयासमोर अभंग व आरती करुन लोकनेते यांचा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी आमदार शंभूराज देसाई यांचेबरोबर पाटण तालुक्यातील शासकीय अधिकारी असणारे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, उपअभियंता सुरेश अहिरे,वसंत खाडे,वनसंरक्षक विलास काळे, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, सहाययक पोलीस निरीक्षक चौखुंडे यांचेसह पाटण तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे विभागप्रमुख, त्यांचे शासकीय सहकारी यांनीही उपस्थित राहून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सातारा जिल्हा पोलिस बॅंन्ड पथकानेही अभिवादन केले. त्यानंतर पुतळ्यासमोर भव्य असा रंगलेला रिंगण सोहळा हे दृष्य अत्यंत मनमोहक होते.चौथ्या दिवशी काल्याच्या किर्तनाने उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देवून या अखंड हरीनाम भव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली. पुण्यतिथी दिवशी दौलतनगरला प्रती पंढरपुर अवतरले होते.आठ वर्षापासून ह.भ.प.पुडंलिक महाराज कापसे आळंदीकर हे या पारायण सोहळ्यामध्ये व्यासपीठ चालक म्हणून आपली सेवा बजावीत आहेत.तर हा पारायण सोहळा यशस्वी करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प.जयवंतराव शेलार महाराज.ह.भ.प.अनिल पाटील महाराज ह.भ.प.जगन्नाथ ठोंबरे महाराज यांच्यासह त्यांचे सहकारी यांचेसोबत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील अधिकारी कर्मचारी यांनी कष्ट घेतले. या सर्वांचे आभार आमदार शंभूराज देसाईंनी मानले.या सोहळ्यास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
चौकट- रिंगणसोहळ्याने भाविक भक्तांबरोबर शासकीय अधिकारीही भारावले.
         लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्ताने गत चार वर्षापासून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुतळ्यास अभिवादन केलेनंतर पुतळ्यासमोर साजरा करण्यात येणारा रिंगण सोहळा हा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असते, या रिंगण सोहळ्यामध्ये अबाल वृध्दासंह लहानथोर सर्वजन मोठ्या संख्येने सहभागी असतात. पंढरपुरच्या वारीमध्ये ज्याप्रमाणे रिंगण सोहळा आयोजित केला जातो. त्याचप्रमाणे या ठिकाणीही रिंगण सोहळा आयोजित करण्यात येतो याचे नेतृत्व स्वत: आमदार शंभूराज देसाई करतात. यंदाच्या रिंगण सोहळ्यास भाविक भक्तांची मोठी गर्दी होती. हा रिंगण सोहळा पाहून उपस्थित शासकीय अधिकारी ही भारावले आणि संपु्र्ण रिंगण सोहळा पाहण्याचा मोह या अधिका-यांना सुध्दा आवरला नाही.


परमार्थाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून पारायण सोहळे आयोजीत करावेत. देसाई घराण्याचे योगदान मोलाचे ह.भ.प पारस महाराज मुथा यांचे प्रतिपादन.


      परमार्थात निरपेक्ष जीवन जगण्याची शक्ती आहे. मानवाने कोणतीही अपेक्षा न ठेवता आपले जीवन व्यतीत करावे. भगवंताने मानवाला खुप दिले आहे जेवढे दिले आहे त्यातच समाधान मानून मानवाने समाजकार्य करावे. परमार्थाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना जेव्हा मानवाच्या मनी जागी होते तेव्हा असे सोहळे साजरे होतात. आज महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३५ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे नातू आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नाने गत आठ वर्षापासून साजरा होत असलेल्या श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयामध्ये कीर्तनाचे दुसरे पुष्प गुंफण्याची संधी माझेसारखे पामराला मिळाली हे माझे भाग्य असून देसाई घराण्याचे योगदान आणि कार्य खुप मोलाचे असल्याचे प्रतिपादन अहमदनगर रामायणाचार्य, येथील ह.भ.प पारस महाराज मुथा यांनी केले.
        दौलतनगर ता.पाटण येथे महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३५ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजीत श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयामध्ये कीर्तनाचे दुसरे पुष्प ह.भ.प पारस महाराज मुथा यांनी गुंफले. याप्रसंगी बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले. कीर्तन सोहळयास आमदार शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
       याप्रसंगी बोलताना ह.भ.प पारस महाराज मुथा म्हणाले, देव कुणी पाहिला आहे. संत महंत सांगतात म्हणून आपण देव आहे असे म्हणतो, परंतू देवासारखी माणसे या भूतलावर जन्माला आली आहेत त्यातीलच एक नांव म्हणजे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई. परमार्थ सांगतो, राज्यकर्त्यांनी भगवंत रामासारखे असावे, माझे ते तुझे आणि तुझे ते ही तुझेच अशी भूमिका भगवंत रामचंद्राची होती.तोच आदर्श लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी ठेवून पाटण तालुक्यातील जनतेकरीता माझे ते तुझे आणि तुझे ते ही तुझेच ही भूमिका ठेवून कार्य केले. म्हणूनच कोयनेला एवढे मोठे धरण उभे राहू शकले आणि याचा प्रकाश संपुर्ण महाराष्ट्रभर पसरला. त्यांचे पाटण तालुक्यातील जनतेकरीता केलेले कार्य गौरवास्पद तर आहेच परंतू महाराष्ट्रातील जनतेकरीताही त्यांनी मंत्री या नात्याने घेतलेले निर्णय हे कौतुकास्पद आहेत. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक ही ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिज्ञा या प्रतिज्ञेचे तंतोतत पालन करणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुलांना ईबीसीची सवलत दिल्यामुळे आज माझेसारखे अनेक गरीब कुटुंबातील मुले शिकु शकली, मोठी होवू शकली. त्यामुळे अनेकांचे संसार आज सुखाचे पाहयला मिळत असून या कुंटुंबामध्ये आनंद पहावयाला मिळत आहे. लोकनेते नसते तर आज मीही आपणांपुढे कीर्तनाला उभा राहिलो शकलो नसतो.गोरगरीब जनतेकरीता अवर्णनीय कार्य करणा-या महात्मांचे पुतळे उभारुन त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जयंती व पुण्यतिथी साज-या केल्या जातात. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने लोकनेत्यांचे नातू आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नाने गत आठ वर्षापासून या प्रांगणात तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे ही बाब कौतुकास्पद आहे. यंदाचे हे ९ वे वर्ष आहे. आता काही अडचण नाही हा सोहळा अखंडीतपणे याठिकाणी सुरुच राहील अशी मला आशा वाटते. परमार्थाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना आमदार शंभूराज देसाई यांच्या मनी निर्माण झाली आणि त्यांनी पुढाकार घेवून आपले आजोबांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा पारायण सोहळा आपल्या भाविक भक्तांसाठी आयोजीत केला परमार्थांची सेवा करण्याची संधी तुम्हा आम्हाला मिळवून दिली याकरीता त्यांना दयावेत एवढे धन्यवाद कमी आहेत. ते स्वत: जातिनिशी या सोहळयामध्ये कायमस्वरुपी सहभागी असतात हे त्याहून अधिक चांगले आहे.असे सांगून त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाला अनुसरुन एक उदाहरण देताना म्हणाले, प्रत्येकाला विरोधक, स्पर्धक हे असावेत, विरोधक आणि स्पर्धक असल्याशिवाय मानवी जीवनाची प्रगती किंवा उध्दार होत नाही. संकटाविना मिळालेले यश हा विजय असतो परंतू संकटासह मिळालेले यश हा इतिहास असतो.आणि तो इतिहास प्रत्येक जन्माला आलेल्या मानवाने रचणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी कीर्तनाकरीता कन्या सासु-याशी जाय, मागे परतूनी पाहे तशे झाले माझया जीवा केव्हा भेटशी केशवा या निवडलेल्या अभंगामुळे पारायण सोहळयातील वातावरण भावनिक झालेचे पहावयास मिळाले. कीर्तनानंतर आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते ह.भ.प पारस महाराज मुथा यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.

Saturday 21 April 2018

जेवढे मातब्बर माझे विरोधात आणाल तेवढया पटीने मतदार माझे मताधिक्क्यात वाढ करतील. आमदार शंभूराज देसाईंचा सत्यजितसिंह पाटणकरांना टोला.

सन २०१४ च्या निवडणूकीत पाटणकरांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादीची मातब्बर नेतेमंडळी माझे विरोधात प्रचाराला पाटण तालुक्यात आणली होती.त्याचा काय परिणाम झाला तालुक्यातील मतदारांनी मला १८८२४ मताधिक्कयाने निवडून दिले.काल परवा राष्ट्रवादीचा हल्लाबोल पाटणला झाला हल्लाबोल करतय कोण तर, ज्यांनी सत्तर हजार कोटींवर डल्ला मारला तेच आता हल्लाबोल करीत आहेत. यातीलच काही मंडळीनी पाटणच्या हल्लाबोलमध्ये माझेवर व्यक्तीगत टिका केली आहे.राष्ट्रवादीच्या मातब्बरांनी केलेली टिका पाटण मतदारसंघातील मतदारांच्या जिव्हारी लागली असून निष्क्रीय पाटणकर पितापुत्र जेवढे मातब्बर माझे विरोधात पाटण तालुक्यात मतदारांचा बुध्दीभेद करायला आणतील त्याच पटीने मतदारसंघातील मतदार माझे मताधिक्कयात वाढ करतील असा विश्वास आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केला असून सत्यजितसिंह पाटणकर मी माझे तोंड उघडलेलेच आहे तुम्हीच माझे समोरासमोर येण्याचे आवाहन स्विकारुन तुमचेच तोंड आता उघडा असा सल्ला आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना दिला.
मल्हारपेठ ता.पाटण याठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याचे उदघाटन व नंदीवाले समाजाकरीता डोंगरी विकास निधीमधून देण्यात आलेल्या सभामंडपाचे भूमिपुजन अशा संयुक्त आयोजीत कार्यक्रमात आमदार शंभूराज देसाई बोलत होते यावेळी त्यांनी बोलताना राष्ट्रवादीच्या पाटणच्या हल्लाबोल मोर्चाचा आणि मोर्चातील मातब्बरांच्या भाषणांचा चांगलाच समाचार घेतला. याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, सदस्या सौ.सुभद्रा शिरवाडकर, प्रा.विश्‍वनाथ पानस्कर,मानसिंगराव नलवडे,मल्हारपेठ सरपंच गौरीहर दशवंत,मानसिंग कदम, उपसरंपच सुर्यकांत पानस्कर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,मल्हारपेठ विभाग हा लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब,स्व. आबासाहेब यांचे पासून आजपर्यंत देसाई गटाचा बालेकिल्ला आहे. सत्तेत नसताना सन २००१ ला मल्हारपेठ ग्रामसचिवालय इमारतीस ५० ते ५५ लाखांचा निधी मंजुर करुन आणला परंतू उलट दिशेला तालुक्यातील सर्व सत्ता आणि आमदार, मंत्री म्हणून अधिकार असताना पाटणकरांकडून तालुक्यातील अनेक गांवे वाड्यावस्त्या विकास कामांपासून वचिंत ठेवल्या. वर्षभरापुर्वीच या पशूवैद्यकीय दवाखान्याचे भूमीपुजन केले आज वर्ष पुर्ण होण्याच्या पुर्वी या इमारतीचे उदघाटन झाले मागील आठवडयात पाटणला राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा झाला या मार्चात टु व्हिलर रॅाली काढली माजी आमदार पुत्रांनी जोष दाखविला पण सन २०१४ मध्ये पाटण तालुक्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे आले होते त्यावेळची रॅली याच तालुक्याने पाहिली आहे. त्यामुळे माजी आमदारपुत्रांनी हुरळून जावू नये. पाटण तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते मंडळी आणायची आरेतुरेची भाषा करायची आणि विकास कामांवर बोलायचे नाही. एवढाच उद्योग पाटणकर पुत्रांचा सुरु असून हल्लाबोल मोर्चात सत्यजितसिंह पाटणकरांना मी मंजुर करुन आणलेल्या विकासकामांचे आकडे दिसतायत पण कामे कुठे दिसत नाहीत असे काहीतरी ते म्हणाले असे समजले त्यामध्ये म्हणे निवडणुकीपर्यंत माझे आकडे १००० कोटींच्या वर जातील आता आपले कसे होणार हा प्रश्न पडलेल्या सत्यजितसिंह पाटणकरांना या सभेच्या माध्यमातून सल्ला आहे की, पाटणकरसाहेब वाडयाच्या पाय-या उतरुन पाटण तालुक्यातील डोंगर कपारीतील वाडीवस्तीवर जावा तिथे तुम्हाला मी मंजूर केलेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे झालेली दिसतील. तर एका वर्षात पाटण मतदारसंघात एकावेळी ५३ नळ पाणी पुरवठा योजनांची कांमे मंजुर करुन आणलेली दिसतील. आपले पिताश्री पाटणकर दादा मंत्री असताना त्यांना पाटण तालुक्यात ५३ नळ पाणी पुरवठा योजनांची कामे एकाचवेळी मंजूर करता आली होती का? मंत्री असताना त्यांनी एकच केले २५ ते ३० कोटी रुपयांचा असेल असा कराड ते नवारस्ता आणि उंब्रज ते निसरे फाटा असा रस्ता केला त्या रस्त्यावर दोन ठिकाणी टोल बसविण्याचे काम केले.परंतू मी केवळ आमदार असताना राज्याच्या नव्हे तर केंद्राच्या निधीतून ३२० कोटी रुपयांचा रस्ता मंजुर करुन आणला तोही टोलमुक्त. या रस्त्याचे सुरु असलेले काम तरी सत्यजितसिंह पाटणकरांना दिसतेय का? तालुक्याच्या विकास कामांमध्ये सत्यजितसिंह पाटणकरांचे योगदान काय ?सन २००७ च्या दरम्यान सभापती असताना पाटण तालुका निर्मल केला म्हणून निर्मल सभापती म्हणून स्वता:ची पाठ स्वता:च थोपटून घेतली. त्यावेळी पाटण तालुका निर्मल झाला होता तर या पाच सात वर्षात पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे अधिकारी गावागावांत निर्मल ग्राम करण्यासाठी का फिरत आहेत असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगाविला. उपस्थितांचे स्वागत गणेश कदम यांनी केले व आभार अभिजीत पवार यांनी मानले.
चौकट :- विक्रमबाबाचा काटा कुणी काढला?
माझे निष्ठेचे माप काढणारे माजी आमदारपुत्र सत्यजितसिंह पाटणकरसाहेब, विक्रमबाबा तुमच्या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ता त्यांनी दादांसाठी आमच्या विरोधात अहोरात्र मेहनत घेतली त्या निष्ठावान कार्यकर्त्याला आपल्यावर अविश्वास ठराव उद्या होणार आहे हे सुध्दा कळू न देता अविश्वास ठराव आणून सभापतीपदावरुन कुणी दुर हटविले.हे एकदा स्पष्ट कराल काय?
चौकट :- नावाप्रमाणे तरी रामराजेंनी निधी दयायचा?
मल्हारपेठच्या दिंडूकलेवाडी येथील रस्त्याला म्हणे विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ४ का साडेचार लाख रुपयांचा निधी दिला आहे. अहो सभापती महोदय, विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आपले नाव एवढे मोठे.या नावाला शोभेल असा तरी निधी दयायचा.४ का साडेचार लाखात या रस्त्याचे खडीकरणही होणार नाही. गावाच्या तोडांला पाने पुसण्याचा हा प्रयत्न असून ग्रामस्थांच्या मागणीवरुन मी दुप्पट निध्री देणार असल्याचे आमदार देसाई म्हणाले.


Friday 20 April 2018

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३५ व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील दौलतनगरला प्रतिपंढरीचे रुप. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास उत्साहात प्रारंभ.



       महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,पाटण तालुक्यातील जनतेचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३५ व्या पुण्यतिथीनिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आणि पाटण तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग समुह पाटण तालुका वारकरी संघ यांचे सौजन्याने दौलतनगर, ता. पाटण येथील दौलत औद्योगिक प्रशिखण केंद्राचे भव्य प्रांगणात मागील आठ वर्षाप्रमाणे यंदा नवव्या वर्षी लोकनेते बाळासाहेब देसाई नगरीमध्ये भव्य प्रमाणांत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचा प्रारंभ शुक्रवार दि. २० एप्रिल,२०१७ रोजी भाविक भक्तांच्या उदंड प्रतिसादाने भक्तीमय वातावरणात ...जयवंतराव शेलार त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रंजना जयवंतराव शेलार यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन तसेच उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई त्यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांचे शुभहस्ते श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करुन करण्यात आला.
      सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून पाटण तालुक्यात दौलतनगर येथे भव्य प्रमाणांत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येत असून गत आठ वर्षात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास पाटण तसेच शेजारील तालुक्यातील भाविकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई यांची पुण्यतिथी हि दौलतनगर येथे तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयानेच साजरी करण्यात येत आहे. यंदा या पारायणाचे नववे वर्ष असून गत आठ वर्षाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३५ व्या पुण्यतिथीनिमित्त दि. २० ते २३ एप्रिल, २०१८ पर्यंत तीन दिवसीय पारायण या ठिकाणी होत आहे.
      दौलतनगर,ता.पाटण येथील दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात भव्य मंडपात सुरु झालेल्या पारायण सोहळयामध्ये ३१७ महिला तसेच २६६ पुरुषांसह ५८३ वाचक सहभागी झाले आहेत.महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाच्या निमित्ताने तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील किर्तनकार,प्रवनचनकारांना तालुकास्तरीय व्यासपिठ निर्माण झालेले असून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगरला लोकनेते बाळासाहेब देसाई नगरीमध्ये पारायण सोहळयामुळे प्रति पंढरीचे रुप अवतरले असल्याचे चित्र दिसत आहे. गतवर्षी प्रमाणे यंदाच्याही वर्षी वाचकांनी पारायण सोहळयास चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रतिवर्षावर्षाप्रमाणे व्यासपीठ चालक म्हणून ...पुंडलिक महाराज कापसे, आळंदीकर हे उपस्थित असून पहिल्याच दिवशी शुक्रवार दि. २० एप्रिल २०१८ रोजी ... बाजीराव मामा कराडकर, मठाधिपती, कराडकर मठ यांचे प्रवचन तर हभप मच्छिंद्र महाराज निकम, विनोदाचार्य नेवासा यांचे किर्तन,शनिवार दि. २१ एप्रिल, २०१८ रोजी हभप दशरथ महाराज जाधव, तडवळे, कोरेगाव यांचे प्रवचन तर हभप पारस महाराज मुथा,रामायणाचार्य,अहमदनगर यांचे किर्तन आणि रविवार दि. २२ एप्रिल, २०१८ रोजी हभप भिकाजी महाराज शिंदे,कोल्हापूर यांचे प्रवचन तर हभप पांडूरंग महाराज घुले, अध्यक्ष,गाथा मंदिर श्रीक्षेत्र देहु यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३५ व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त सोमवार दि. २३ एप्रिल २०१८ रोजी सकाळी .३० ते .३० वा.आमदार श्री.शंभूराज देसाईसाहेब सौ.स्मितादेवी देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा पुतळयावर पुष्पवृष्टी आणि विनम्र अभिवादन नंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत हभप तुकाराम हजारे महाराज अथणी बेळगाव यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता होणार आहे.या पारायण सोहळयाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचे विचाराने आपण या तालुक्यात कार्य करीत आहोत. त्यांनी स्व.आबासाहेब यांनी घालून दिलेला आदर्श पुढे नेण्याकरीता आपले सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जन्मशताब्दी निमित्त सुरु झालेले हा पारायण सोहळा अखंडीत गेली वर्षे सुरु आहे. या पारायणाच्या निमित्ताने पाटण तालुक्यातील जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन होत आहे.आमदार झाले झाले पहिल्या वर्षात लोकनेते साहेब यांचे जन्मशताब्दी निमित्त आपण सर्वांनी योजलेले शताब्दी स्मारक पुर्ण करण्याचे भाग्य मला मिळाले याबद्दल मी स्वत:ला खुप भाग्यवान समजतो,सन २०१५ साली आपण लोकनेतेसाहेब यांना पुण्यतिथी निमित्ताने हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली होती.असेही ते म्हणाले.कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण ... पुंडलिक महाराज कापसे आळंदीकर,...अनिल महाराज पापर्डेकर, ...जगन्नाथ ठोंबरे कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तसेच सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रमुख कार्यकर्ते लोकनेते प्रेमी जनतेची मोठया प्रमाणांत उपस्थिती होती. प्रारंभी आमदार शंभूराज देसाई यांनी यंदाच्या नवव्या वर्षी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास उपस्थित असणा-या वाचकांचे स्वागत केले या पारायण सोहळयास प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ही मानले. याप्रसंगी .. स्व.दत्ता महाराज सांगवडकर यांना पारायण सोहळयाच्या वतीने आमदार शंभूराज देसाई यांनी श्रध्दाजंली वाहिली.