महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,पाटण तालुक्यातील जनतेचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३५ व्या पुण्यतिथीनिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आणि पाटण तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग समुह व पाटण तालुका वारकरी संघ यांचे सौजन्याने दौलतनगर, ता. पाटण येथील दौलत औद्योगिक प्रशिखण केंद्राचे भव्य प्रांगणात मागील आठ वर्षाप्रमाणे यंदा नवव्या वर्षी लोकनेते बाळासाहेब देसाई नगरीमध्ये भव्य प्रमाणांत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचा प्रारंभ शुक्रवार दि. २० एप्रिल,२०१७ रोजी भाविक भक्तांच्या उदंड प्रतिसादाने भक्तीमय वातावरणात ह.भ.प.जयवंतराव शेलार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रंजना जयवंतराव शेलार यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन तसेच उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई व त्यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांचे शुभहस्ते श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करुन करण्यात आला.
सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून पाटण तालुक्यात दौलतनगर येथे भव्य प्रमाणांत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येत असून गत आठ वर्षात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास पाटण तसेच शेजारील तालुक्यातील भाविकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई यांची पुण्यतिथी हि दौलतनगर येथे तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयानेच साजरी करण्यात येत आहे. यंदा या पारायणाचे नववे वर्ष असून गत आठ वर्षाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३५ व्या पुण्यतिथीनिमित्त दि. २० ते २३ एप्रिल, २०१८ पर्यंत तीन दिवसीय पारायण या ठिकाणी होत आहे.
दौलतनगर,ता.पाटण येथील दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात भव्य मंडपात सुरु झालेल्या पारायण सोहळयामध्ये ३१७ महिला तसेच २६६ पुरुषांसह ५८३ वाचक सहभागी झाले आहेत.महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाच्या निमित्ताने तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील किर्तनकार,प्रवनचनकारांना तालुकास्तरीय व्यासपिठ निर्माण झालेले असून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगरला लोकनेते बाळासाहेब देसाई नगरीमध्ये पारायण सोहळयामुळे प्रति पंढरीचे रुप अवतरले असल्याचे चित्र दिसत आहे. गतवर्षी प्रमाणे यंदाच्याही वर्षी वाचकांनी पारायण सोहळयास चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रतिवर्षावर्षाप्रमाणे व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प.पुंडलिक महाराज कापसे, आळंदीकर हे उपस्थित असून पहिल्याच दिवशी शुक्रवार दि. २० एप्रिल २०१८ रोजी ह.भ.प. बाजीराव मामा कराडकर, मठाधिपती, कराडकर मठ यांचे प्रवचन तर हभप मच्छिंद्र महाराज निकम, विनोदाचार्य नेवासा यांचे किर्तन,शनिवार दि. २१ एप्रिल, २०१८ रोजी हभप दशरथ महाराज जाधव, तडवळे, कोरेगाव यांचे प्रवचन तर हभप पारस महाराज मुथा,रामायणाचार्य,अहमदनगर यांचे किर्तन आणि रविवार दि. २२ एप्रिल, २०१८ रोजी हभप भिकाजी महाराज शिंदे,कोल्हापूर यांचे प्रवचन तर हभप पांडूरंग महाराज घुले, अध्यक्ष,गाथा मंदिर श्रीक्षेत्र देहु यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३५ व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त सोमवार दि. २३ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ७.३० ते ८.३० वा.आमदार श्री.शंभूराज देसाईसाहेब व सौ.स्मितादेवी देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व पुतळयावर पुष्पवृष्टी आणि विनम्र अभिवादन व नंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत हभप तुकाराम हजारे महाराज अथणी बेळगाव यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता होणार आहे.या पारायण सोहळयाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचे विचाराने आपण या तालुक्यात कार्य करीत आहोत. त्यांनी व स्व.आबासाहेब यांनी घालून दिलेला आदर्श पुढे नेण्याकरीता आपले सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जन्मशताब्दी निमित्त सुरु झालेले हा पारायण सोहळा अखंडीत गेली ८ वर्षे सुरु आहे. या पारायणाच्या निमित्ताने पाटण तालुक्यातील जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन होत आहे.आमदार झाले झाले पहिल्या वर्षात लोकनेते साहेब यांचे जन्मशताब्दी निमित्त आपण सर्वांनी योजलेले शताब्दी स्मारक पुर्ण करण्याचे भाग्य मला मिळाले याबद्दल मी स्वत:ला खुप भाग्यवान समजतो,सन २०१५ साली आपण लोकनेतेसाहेब यांना पुण्यतिथी निमित्ताने हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली होती.असेही ते म्हणाले.कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण ह.भ.प. पुंडलिक महाराज कापसे आळंदीकर,ह.भ.प.अनिल महाराज पापर्डेकर, ह.भ.प.जगन्नाथ ठोंबरे व कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तसेच सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रमुख कार्यकर्ते व लोकनेते प्रेमी जनतेची मोठया प्रमाणांत उपस्थिती होती. प्रारंभी आमदार शंभूराज देसाई यांनी यंदाच्या नवव्या वर्षी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास उपस्थित असणा-या वाचकांचे स्वागत केले व या पारायण सोहळयास प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ही मानले. याप्रसंगी ह.भ.प स्व.दत्ता महाराज सांगवडकर यांना पारायण सोहळयाच्या वतीने आमदार शंभूराज देसाई यांनी श्रध्दाजंली वाहिली.
No comments:
Post a Comment