Wednesday 25 April 2018

मुंबईत कै.सौ.वत्सलादेवी देसाई नामफलकाचे नुतनीकरण व अनावरण. मुंबई येथील हाजीअली चौकात अनावरणाचा कार्यक्रम संपन्न.


मुंबई येथील हाजीअली चौकास महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी दौलतराव देसाई यांचे नावाने वत्सलादेवी देसाई चौक असे नामकरण करण्यात आले होते.सदर चौकाची दुरुस्ती व सुशोभिकरण करताना सदरचा नामफलक काढण्यात आला होता.चौकाची दुरुस्ती झालेनंतर वत्सलादेवी देसाई चौक असे असणारे नामफलकाचे नव्याने नुतनीकरण व अनावरण करण्याचा कार्यक्रम नुकताच लोकनेते बाळासाहेब देसाई व कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे चिरंजीव अरुणराव देसाई व सौ.मंगलाताई थोरात यांचे शुभहस्ते मुंबई हाजीअली चौकामध्ये संपन्न झाला.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्याचे मंत्री असताना मुंबई येथील हाजीअली चौकास लोकनेते यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी दौलतराव देसाई यांचे नावाने वत्सलादेवी देसाई चौक असे नामकरण केले होते. अनेक वर्षापासून हा चौक वत्सलादेवी देसाई चौक या नावाने ओळखण्यात येत आहे. नुकतेच या चौकाची दुरुस्ती व सुशोभिकरण करताना सदरचा नामफलक काढण्यात आला होता. सदरचा नामफलक तात्काळ लावणेसंदर्भात लोकनेते व कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे नातू पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी बृन्हमुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचेकडे विनंती केली होती. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही या चौकाची दुरुस्ती व सुशोभिकरणाचे काम पुर्ण होताच एक महिन्याच्या आत नामफलकाचे नव्याने नुतनीकरण करुन हा नामफलक बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुर्वरत लावण्यात येईल असे आश्वासन दिले होते. बृन्हमुंबई महानगरपालिकेच्या वतीने हा नामफलक हाजीअली चौकामध्ये पुर्ववत लावणेत आला असून या नामफलकाचे अनावरण लोकनेते बाळासाहेब देसाई व कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे चिरंजीव अरुणराव देसाई व सौ.मंगलाताई थोरात यांचे शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी याठिकाणी छोटेखानी कार्यक्रमही आयोजीत करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई व कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे चिरंजीव अरुणराव देसाई व सौ.मंगलाताई थोरात यांचे बरोबरीने प्रसाद हिरे, सौ.गितांजली हिरे, राजेंद्र देसाई, शिवराज देसाई, पृथ्वीराज देसाई, बृन्हमुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रमेश पवार,सहाययक आयुक्त विश्वासराव मोटे यांच्यासह देसाई कुंटुंबातील सदस्यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. यासंदर्भात आमदार शंभूराज देसाई यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचेसह महानगरपालिकेचे उपायुक्त रमेश पवार,सहाययक आयुक्त विश्वासराव मोटे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

No comments:

Post a Comment