सन २०१४ च्या निवडणूकीत पाटणकरांनी
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादीची मातब्बर नेतेमंडळी माझे विरोधात प्रचाराला
पाटण तालुक्यात आणली होती.त्याचा काय परिणाम झाला तालुक्यातील मतदारांनी मला १८८२४
मताधिक्कयाने निवडून दिले.काल परवा राष्ट्रवादीचा हल्लाबोल पाटणला झाला हल्लाबोल करतय
कोण तर, ज्यांनी सत्तर हजार कोटींवर डल्ला मारला तेच आता हल्लाबोल करीत आहेत. यातीलच
काही मंडळीनी पाटणच्या हल्लाबोलमध्ये माझेवर व्यक्तीगत टिका केली आहे.राष्ट्रवादीच्या
मातब्बरांनी केलेली टिका पाटण मतदारसंघातील मतदारांच्या जिव्हारी लागली असून निष्क्रीय
पाटणकर पितापुत्र जेवढे मातब्बर माझे विरोधात पाटण तालुक्यात मतदारांचा बुध्दीभेद करायला
आणतील त्याच पटीने मतदारसंघातील मतदार माझे मताधिक्कयात वाढ करतील असा विश्वास आमदार
शंभूराज देसाईंनी व्यक्त केला असून सत्यजितसिंह पाटणकर मी माझे तोंड उघडलेलेच आहे तुम्हीच
माझे समोरासमोर येण्याचे आवाहन स्विकारुन तुमचेच तोंड आता उघडा असा सल्ला आमदार शंभूराज
देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना दिला.
मल्हारपेठ ता.पाटण याठिकाणी पशुवैद्यकीय
दवाखान्याचे उदघाटन व नंदीवाले समाजाकरीता डोंगरी विकास निधीमधून देण्यात आलेल्या सभामंडपाचे
भूमिपुजन अशा संयुक्त आयोजीत कार्यक्रमात आमदार शंभूराज देसाई बोलत होते यावेळी त्यांनी
बोलताना राष्ट्रवादीच्या पाटणच्या हल्लाबोल मोर्चाचा आणि मोर्चातील मातब्बरांच्या भाषणांचा
चांगलाच समाचार घेतला. याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, कारखान्याचे
चेअरमन अशोकराव पाटील, शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील, जिल्हा परिषद सदस्य
विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, सदस्या सौ.सुभद्रा शिरवाडकर, प्रा.विश्वनाथ
पानस्कर,मानसिंगराव नलवडे,मल्हारपेठ सरपंच गौरीहर दशवंत,मानसिंग कदम, उपसरंपच सुर्यकांत
पानस्कर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई
म्हणाले,मल्हारपेठ विभाग हा लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब,स्व. आबासाहेब यांचे पासून
आजपर्यंत देसाई गटाचा बालेकिल्ला आहे. सत्तेत नसताना सन २००१ ला मल्हारपेठ ग्रामसचिवालय
इमारतीस ५० ते ५५ लाखांचा निधी मंजुर करुन आणला परंतू उलट दिशेला तालुक्यातील सर्व
सत्ता आणि आमदार, मंत्री म्हणून अधिकार असताना पाटणकरांकडून तालुक्यातील अनेक गांवे
वाड्यावस्त्या विकास कामांपासून वचिंत ठेवल्या. वर्षभरापुर्वीच या पशूवैद्यकीय दवाखान्याचे
भूमीपुजन केले आज वर्ष पुर्ण होण्याच्या पुर्वी या इमारतीचे उदघाटन झाले मागील आठवडयात
पाटणला राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चा झाला या मार्चात टु व्हिलर रॅाली काढली माजी
आमदार पुत्रांनी जोष दाखविला पण सन २०१४ मध्ये पाटण तालुक्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी
ठाकरे आले होते त्यावेळची रॅली याच तालुक्याने पाहिली आहे. त्यामुळे माजी आमदारपुत्रांनी
हुरळून जावू नये. पाटण तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते मंडळी आणायची आरेतुरेची भाषा करायची
आणि विकास कामांवर बोलायचे नाही. एवढाच उद्योग पाटणकर पुत्रांचा सुरु असून हल्लाबोल
मोर्चात सत्यजितसिंह पाटणकरांना मी मंजुर करुन आणलेल्या विकासकामांचे आकडे दिसतायत
पण कामे कुठे दिसत नाहीत असे काहीतरी ते म्हणाले असे समजले त्यामध्ये म्हणे निवडणुकीपर्यंत
माझे आकडे १००० कोटींच्या वर जातील आता आपले कसे होणार हा प्रश्न पडलेल्या सत्यजितसिंह
पाटणकरांना या सभेच्या माध्यमातून सल्ला आहे की, पाटणकरसाहेब वाडयाच्या पाय-या उतरुन
पाटण तालुक्यातील डोंगर कपारीतील वाडीवस्तीवर जावा तिथे तुम्हाला मी मंजूर केलेल्या
रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे झालेली दिसतील. तर एका वर्षात पाटण मतदारसंघात एकावेळी
५३ नळ पाणी पुरवठा योजनांची कांमे मंजुर करुन आणलेली दिसतील. आपले पिताश्री पाटणकर
दादा मंत्री असताना त्यांना पाटण तालुक्यात ५३ नळ पाणी पुरवठा योजनांची कामे एकाचवेळी
मंजूर करता आली होती का? मंत्री असताना त्यांनी एकच केले २५ ते ३० कोटी रुपयांचा असेल
असा कराड ते नवारस्ता आणि उंब्रज ते निसरे फाटा असा रस्ता केला त्या रस्त्यावर दोन
ठिकाणी टोल बसविण्याचे काम केले.परंतू मी केवळ आमदार असताना राज्याच्या नव्हे तर केंद्राच्या
निधीतून ३२० कोटी रुपयांचा रस्ता मंजुर करुन आणला तोही टोलमुक्त. या रस्त्याचे सुरु
असलेले काम तरी सत्यजितसिंह पाटणकरांना दिसतेय का? तालुक्याच्या विकास कामांमध्ये सत्यजितसिंह
पाटणकरांचे योगदान काय ?सन २००७ च्या दरम्यान सभापती असताना पाटण तालुका निर्मल केला
म्हणून निर्मल सभापती म्हणून स्वता:ची पाठ स्वता:च थोपटून घेतली. त्यावेळी पाटण तालुका
निर्मल झाला होता तर या पाच सात वर्षात पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे अधिकारी गावागावांत
निर्मल ग्राम करण्यासाठी का फिरत आहेत असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगाविला.
उपस्थितांचे स्वागत गणेश कदम यांनी केले व आभार अभिजीत पवार यांनी मानले.
चौकट
:- विक्रमबाबाचा काटा कुणी काढला?
माझे निष्ठेचे माप काढणारे माजी आमदारपुत्र
सत्यजितसिंह पाटणकरसाहेब, विक्रमबाबा तुमच्या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ता त्यांनी
दादांसाठी आमच्या विरोधात अहोरात्र मेहनत घेतली त्या निष्ठावान कार्यकर्त्याला आपल्यावर
अविश्वास ठराव उद्या होणार आहे हे सुध्दा कळू न देता अविश्वास ठराव आणून सभापतीपदावरुन
कुणी दुर हटविले.हे एकदा स्पष्ट कराल काय?
चौकट
:- नावाप्रमाणे तरी रामराजेंनी निधी दयायचा?
मल्हारपेठच्या दिंडूकलेवाडी येथील
रस्त्याला म्हणे विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ४ का साडेचार
लाख रुपयांचा निधी दिला आहे. अहो सभापती महोदय, विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे
नाईक निंबाळकर आपले नाव एवढे मोठे.या नावाला शोभेल असा तरी निधी दयायचा.४ का साडेचार
लाखात या रस्त्याचे खडीकरणही होणार नाही. गावाच्या तोडांला पाने पुसण्याचा हा प्रयत्न
असून ग्रामस्थांच्या मागणीवरुन मी दुप्पट निध्री देणार असल्याचे आमदार देसाई म्हणाले.
No comments:
Post a Comment