Tuesday 11 June 2019

शिवदौलत सहकारी बँकेच्या व्हा.चेअरमनपदी संजय देशमुख, संचालकपदी रणजित शिंदे यांची बिनविरोध निवड. आमदार शंभूराज देसाईंकडून निवड झालेल्यांचा सत्कार.





दौलतनगर दि.11 :- शिवदौलत सहकारी बँक लि.मल्हारपेठ बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी तारळे विभागातील मुरुड गावचे संजय देशमुख यांची तर घोट गावचे कै.रघूनाथ शिंदे यांच्या दु:खद निधनाने रिक्त झालेल्या संचालकपदी घोट गावचेच रणजित शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.शिवदौलत सहकारी बँकेचे संस्थापक व पाटण विधानसभा मतदारसंघाचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांनी नवनियुक्त व्हाईस चेअरमन संजय देशमुख व संचालक रणजित शिंदे यांचा कारखाना कार्यस्थळावर शाल,श्रीफळ देवून सत्कार केला.
                                शिवदौलत सहकारी बँक लि.मल्हारपेठ बँकेच्या व्हाईस चेअरपदी असणारे घोट गावचे कै.रघूनाथ शिंदे यांच्या दु:खद निधनाने बँकेचे व्हा.चेअरमन व संचालकपद रिक्त झाले होते. व्हाईस चेअरमन व संचालक पदाची निवडणूक आज बँकेच्या मल्हारपेठ ता.पाटण येथील मुख्य शाखेत पार पडली यामध्ये व्हाईस चेअरमनपदी तारळे विभागातील मुरुड गावचे संजय देशमुख यांची तर घोट गावचेच रणजित शिंदे यांची एकमुखाने बिनविरोध निवड करण्यात आली.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थामध्ये तारळे विभागाला पदाधिकारी निवडीमध्ये उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईंनी नेहमीच झुकते माप दिले आहे. देसाई कुटुंबियांशी निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे तर रणजित शिंदे हे शंभूराज युवा संघटनेच्या माध्यमातून घोट विभागामध्ये सक्रीय कार्यकर्ते म्हणून काम करतात.या दोघांच्या निवडीने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईंकडून नेहमीच न्याय दिला जातो याचा प्रत्यय आला.निवड झालेले नवनियुक्त व्हाईस चेअरमन संजय देशमुख व संचालक रणजित शिंदे यांचा उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांनी कारखाना कार्यस्थळावर शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. व्हाईस चेअरमन संजय देशमुख व संचालक रणजित शिंदे यांनी निवडीबद्दल आमदार शंभूराज देसाईंचे विशेष आभार व्यक्त केले.
                                          तर त्यांच्या निवडीबद्दल मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलींद पाटील,कारखान्याचे माजी संचालक व माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे,नामदेवराव साळूंखे, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,अभिजित पाटील,दिपक झेंडे,नेताजी मोरे,पांडूरंग निकम, जयसिंगराव बोडके,धोंडीराम भोमकर,मधूकर पाटील,मोहन पानस्कर,यशवंत जाधव,सुनिल पवार,पी.डी. घाडगे,चंद्रकांत कोळेकर,दगडू शेळके, चंद्रकात पाटील,सुधीर पाटील,सौ. कुसुम मोहिते,श्रीमती मालतीताई घार्गे, कारखाना संचालक गजानन जाधव, सोमनाथ खामकर, बबनराव भिसे, पांडूरंग नलवडे माणिक पवार, यांनी अभिनंदन केले.
चौकट:- देसाई कुटुंबियांशी तीन पिढयांपासून निष्ठावान असलेल्या देशमुख कुटुंबाचा यथोचित सन्मान.
           लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यापासून देसाई कुटुंबियांशी निष्ठावान असणारे मुरुडचे शिवराम देशमुख (तात्या) यांचे कुटुंब असून देशमुख (तात्या) यांनी देसाई कुटुंबाबरोबर तीन पिढया काम करताना कोणत्याही संस्थेच्या पदाची किंवा कसलीच अपेक्षा केली नव्हती.संजय देशमुख हे देशमुख (तात्या) यांचे चिरंजीव असून त्यांची शिवदौलत बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी निवड करुन उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांनी निष्ठावान कुटुंबाचा यथोचित असा सन्मान केला असल्याची चर्चा या निवडीनंतर कारखाना कार्यस्थळावर एैकावयास मिळाली.   

No comments:

Post a Comment