Monday 17 June 2019

महाराष्ट्र विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी आमदार शंभूराज देसाई यांची चौथ्यांदा निवड.




दौलतनगर दि.१७:- महाराष्ट्र विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित झालेले शिवसेना पक्षाचे विधिमंडळ पक्षप्रतोद पाटणचे लोकप्रिय व विधानसभेतील अभ्यासू आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमदार शंभूराज देसाई यांची मुंबई येथे आज सुरु झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्षपदी पहिल्याच दिवशी निवड करण्यात आली असून या पंचवार्षिकमध्ये आमदार शंभूराज देसाईंची चौथ्यांदा निवड झाली आहे.पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार शंभूराज देसाईंची तालिकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे यांनी दि.१७ जुन,२०१९ रोजी विधानसभा सभागृहात केली आहे.
                                    महाराष्ट्र विधानसभा हे लोकशाहीचे महामंदीर असून राज्यातील सर्वोच्च असे सभागृह आहे. या सभागृहात अधिवेशन काळात विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हे महाराष्ट्र विधानसभा नियम ८ अन्वये विधानसभेच्या सदस्यांमधून सभाध्यक्ष तालिकेवर विविध पक्षाच्या विधानसभा सदस्यांची नियुक्ती करण्यात येते.शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेतील आमदार उत्कृष्ट संसदपटु शंभूराज देसाई यांचे विधानसभेतील कामकाज पाहून त्यांची महाराष्ट्र विधानमंडळाने सन २०१४ ते २०१९ या पंचवार्षिक मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या तालिकाध्यक्षपदी चौथ्यांदा नियुक्ती केली आहे.सन २०१६  चे पावसाळी अधिवेशन, २०१८ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन, २०१९ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन व सध्या सुरु असलेले पावसाळी अधिवेशन अशा चार अधिवेशनात आमदार शंभूराज देसाईंना तालिकाध्यक्ष म्हणून बसण्याचा बहूमान मिळाला आहे. आमदार शंभूराज देसाई यांना चौथ्यांदा तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन केले जात आहे.
                                 महाराष्ट्र विधानमंडळाला देशामध्ये आगळी वेगळी प्रतिष्ठा लाभली आहे.अनेकविध क्षेत्रात देशपातळीवर तसेच राज्यपातळीवर नेतृत्व करणारे नेते या विधानमंडळाने घडविले आहेत.आमदार शंभूराज देसाई हे पाटणसारख्या डोंगरी आणि दुर्गम तालुक्यातून आमदार म्हणून निवडून आले असून आमदारकीचा कोणताही पुर्वानुभव नसताना सन २००४ ला आमदार म्हणून विधानसभेची पायरी चढल्यानंतर संसदीय कामकाजाचा खडान्‌खडा अभ्यास करुन त्यांनी आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये आपल्या हुशारीचे कर्तृत्व सिध्द करुन दाखविले आहे.त्यांच्या हुशारीचे मुल्यमापन महाराष्ट्राचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या विधानसभेने करुन त्यांना पहिल्याच टर्ममध्ये विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.आमदार शंभूराज देसाई यांची ही दुसरी टर्म असून विधानसभेतील कामकाजाचा व्यासंग त्यांनी इतका वाढविला आहे की विधानसभेतील त्यांच्या उत्कृष्ट ज्ञानामुळे त्यांच्यावर शिवसेना पक्षाच्या वतीने विधानसभेतील उत्कृष्ट जबाबदाऱ्याही सोपविण्यात आल्या आहेत व येत आहेत.पक्षाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पेलल्याही आहेत.विधानसभेतील शिवसेनेचा बलस्थान चेहरा म्हणून त्यांच्यावर शिवसेना पक्षाचे विधिमंडळ पक्षप्रतोद म्हणून जबाबदारी सोपविली असतानाच राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे महाराष्ट्राचे कार्यकारीणीवरही त्यांची निवड करण्यात आली आहे.विधानसभेचा तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेचे संपुर्ण कामकाज पाहताना निपक्ष:पातीपणे सभागृहाचे कामकाज चालवितात त्यामुळे आमदार शंभूराज देसाईंना तालिकाध्यक्ष म्हणून सर्वच पक्षाच्या वतीने नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे व मिळत आहे.आजच सुरु झालेल्या अधिवेशनामध्ये विधानसभेचे अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे यांनी सभाध्यक्ष तालिकेवर त्यांची नियुक्ती केलेनंतर त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
चौकटः- मतदारसंघातील जनतेच्या पाठीब्यांमुळेच अध्यक्षांच्या खुर्चीवर बसण्याचा बहूमान.
           तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर ज्या खुर्चीवर लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब विधानसभा अध्यक्ष म्हणून बसले होते त्याच खुर्चीवर तालिका अध्यक्ष म्हणून मला बसण्याची संधी मिळते. ती केवळ आणि केवळ पाटण मतदारसंघातील जनतेचा मला मिळालेला पाठींबा यामुळेच.मतदारसंघातील जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिले म्हणूनच मी विधानसभेचा तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदाच्या खुर्चीवर चारवेळा बसू शकलो ही माझेकरीता अभिमानास्पद बाब आहे.

No comments:

Post a Comment