Monday 30 September 2019

शंभूराज देसाईंना इतक्या भरघोस मताधिक्क्याने विजयी करा की,विरोधकांचे पुन्हा आमदारकी लढविण्याचे धाडस झाले नाही पाहिजे. सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे पाटण तालुका मुंबई रहिवाशींना आवाहन.



           
               दौलतनगर दि.२९:- आमदार शंभूराज देसाई हे करारी माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू आहेत लोकप्रतिनिधी कसा असावा,आमदार कसा असावा तर तो आमदार शंभूराज देसाईंसारखा,आमदार शंभूराज देसाईंचे विधानसभेतील आणि विधानसभेच्या बाहेरील कार्य मी जवळून पाहिले आहे.आपल्या मतदारसंघातील कामांकरीता राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून राज्याच्या सचिव,उपसचिवापर्यंत सातत्याने शासनाकडे स्वत: फाईली हातात घेवून पाठपुरावा करणारे आणि आमदारकीच्या पाहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ट संसदपटू आमदार म्हणून सन्मान झालेले आमदार पाटण विधानसभा मतदारसंघाला मिळाले आहेत हा मतदारसंघाचा अभिमान आणि स्वाभिमान आहे. आज याठिकाणी जमलेल्या गर्दीने शंभूराज देसाई हे आमदारकीची हॅट्रीक करणार हे नक्की झाले असून आमदार शंभूराज देसाईंना इतक्या भरघोस मताधिक्कयाने पुन्हा विजयी करा, त्यांचा विजय पाहून विरोधकांनी पुन्हा आमदारकी लढविण्याचे धाडस केले नाही पाहिजे असे जाहीर आवाहन राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे केले.
                कोपरखैरणे नवी मुंबई येथील शेतकरी समाज हॉल याठिकाणी आमदार शंभूराज देसाईंच्या प्रचारार्थ पाटण तालुका मुंबई रहिवाशींचा महाविजय जाहिर मेळावा राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष ना.नरेंद्र पाटील,आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले.
                   यावेळी बोलताना सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे म्हणाले,आज याठिकाणी पाटण तालुका मुंबई रहिवाशींची गर्दी पाहून येणाऱ्या २४ तारखेला पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे तिसऱ्यांदा आमदार होवून हॅट्रीक मारणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.मी त्यांना आताच तिसऱ्यांदा आमदार होणार याच्या शुभेच्छा देतो. आमदार शंभूराज देसाई हे मतदारसंघातील जनतेशी नाळ जोडलेले,जनतेची कणव असणारे आमदार आहेत.लोकप्रतिनिधी आणि आपला आमदार कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे शंभूराज आहेत.लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने दिलेली जबाबदारी कशी पार पाडावी याची शिकवण त्यांना त्यांच्या आजोबांकडून मिळाली आहे.पाटण मतदारसंघात त्यांनी १८०६ कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन नेला याचे कौतुक करावे एवढे थोडेच आहे.त्यांचे कौतुक तर केलेच पाहिजे कारण त्यांनी आमदार म्हणून आपल्या तालुक्यातील गांवागांवात विकासकामे पोहचविण्याचे काम केले आहे.एक तडफदार आमदार म्हणून त्यांचे विधानसभेतील कामकाज वाखणण्याजोगे आहे.अनेकदा त्यांना विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणूनही निवड झाली तेव्हा त्यांनी संसदीय कामकाजाला कुठेही धक्का लागणार नाही याची दक्षता घेत विधानसभेचे कामकाज चालविले शिवसेना पक्षाची बाजू सभागृहात योग्य प्रकारे मांडण्याची भूमिका शंभूराज देसाई पार पडतात म्हणूनच शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी त्यांच्यावर विधानसभेतील पक्षप्रतोदाची जबाबदारी दिली ती त्यांनी लिलया पेलली.शिवसेना पक्षात प्रत्येकाच्या कामकाजाची कदर केली जाते. आपल्या आमदारांचे कामच एवढे मोठे आहे त्यांचे काम पाहून पक्षप्रमुखांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी दयावी याकरीता माझ्या त्यांना सदिच्छा आहेत.एकाच जिल्हयातील असून मी कायम शंभूराज यांचेशी पाठीशी ठाम आहे.परंतू आपल्याला गाफील राहून चालणार नाही विरोधकांना कायमचा धडा शिकवायचा असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आपण याठिकाणचे मतदारांनी जबाबदारीने गांवाकडे जावून मतदान करणे आवश्यक आहे माझे तर आपणां सर्वांना आवाहन आहे की,आमदार शंभूराज देसाईंना इतक्या भरघोस मताधिक्कयाने पुन्हा विजयी करा की, विरोधकांनी पुन्हा आमदारकी लढविण्याचे धाडसच केले नाही पाहिजे असे त्यांनी शेवठी सांगितले.
               याप्रसंगी बोलताना ना.नरेंद्र पाटील यांनी आमदार शंभूराज देसाई हे सातारा जिल्हयातील पाटण विधानसभा मतदारसंघाचे तडफदार आमदार आहेत. सातारा जिल्हयात सर्वांधिक निधी पाटण विधानसभा मतदारसंघात त्यांनी आणला आहे याचा अनुभव मी स्वत: लोकसभेची निवडणूक लढताना घेतला आहे.प्रत्येक गाववस्तीवर त्यांनी या पाच वर्षात विविध विकासकामे केली आहेत.जी विरोधकांना जमली नाहीत.कामासाठी विधानसभेत भांडणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे म्हणूनच मतदारसंघाचा कायापालट करण्यात त्यांना यश मिळाले आहे.लोकसभेच्या निवडणूकीत मला सर्वाधिक मताधिक्कय आमदार शंभूराज देसाईंनी मिळवून दिले आहे आता विधानसभा निवडणूकीत जास्तीचे सर्वाधिक मताधिक्कय देण्याची जबाबदारी माझी आहे.
               यावेळी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,ज्या विश्वासाने २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत मला चांगले मताधिक्कय देवून आपण सर्वांनी मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करण्याचे काम मी पाच वर्षात केले. जनतेच्या भरघोस पाठींबामुळेच मतदारसंघात न होणारी अनेक कामे करण्याकरीता तसेच प्रलंबीत अनेक कामांना मला भरघोस असा १८०६ कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणता आला. आपण प्रत्येकजण याचे साक्षीदार आहात. येणारी निवडणूक ही आपण विकासकामांच्या मुद्दावरच लढणार असून याकरीता मला आपणा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. विरोधकांकडे बोलण्यासारखे काही नाही त्यामुळे केवळ दिशाभूल करण्याचा उद्योग त्यांच्याकडून सुरु असून याकडे कुणीही लक्ष न देता आपल्या गावाच्या, वाडीच्या विकासाकरीता काम करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे आपण खंबीरपणे उभे रहावे  पाटण तालुका मुंबई रहिवाशी यांचे माझेवर किती प्रेम, माया आहे याचा प्रत्यय आज या मेळाव्याला जमलेल्या गर्दीवरुन लक्षात आले. आपला पाठींबा असाच मला मिळावा अशी मी आपणांकडे अपेक्षा व्यक्त करतो.असे आमदार शंभूराज देसाई शेवठी म्हणाले.उपस्थितांचे स्वागत पंचायत समितीचे माजी उपसभापती डी.आर.पाटील यांनी केले.याप्रसंगी सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख जयंवतराव शेलार, नगरसेविका दमयंती आचरे यांची भाषणे झाली.
चौकट:- आमदार शंभूराज देसाईंची मुंबईची उंच्चाकी सभा, मुंबई रहिवाशींचा उत्स्फुर्त प्रतिसाद.
            पाटण तालुका मुंबईकर रहिवाशी बंधू भगिनींनो मी येतोय आपल्या भेटीला, आपल्याशी संवाद साधायला असे आवाहन करणारे  आमदार शंभूराज देसाईंची कोपरखैरणे नवी मुंबई येथील महाविजय संकल्प सभा मोठया उत्साहात आणि उच्चांकी गर्दीने पार पडली, मुंबई रहिवाशींना उत्स्फुर्त प्रतिसाद देत आम्ही मुंबईकर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशीच ग्वाही आमदार देसाईंना दिली.शेतकरी समाज हॉलमध्ये आयोजीत सभेस मोठया प्रमाणात उच्चांकी गर्दी झाल्याने वेळप्रसंगी कार्यकर्त्यांनी हॉलच्या मोकळया जागेत बसून,उभे राहून लावण्यात आलेल्या स्क्रीनच्या माध्यमातून संपुर्ण सभा एैकली. या उच्चांकी गर्दीमुळे पाटण तालुका मुंबई रहिवाशी यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Thursday 26 September 2019

देसाई कारखान्याच्या एफआरपीची काळजी करण्यापेक्षा २० वर्षापासून घोषणा करीत असलेली फॅक्टरीची वीट आदी रचा. आमदार शंभूराज देसाईंचा सत्यजितसिंह पाटणकरांना प्रतिटोला.




               दौलतनगर दि.२६:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या सुज्ञ सभासदांनी आणि कारखान्यांस ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनी माजी आमदार पुत्र सत्यजितसिंह पाटणकरांना देसाई कारखान्याकडे ढुंकुनही न पाहण्याचा सल्ला अनेक निवडणूकामधून दिला असताना येवू नको तर कुठल्या गाडीत बसू अशी अवस्था माजी आमदार पुत्रांची झाली आहे.निवडणूक कुठलीही असली तरी कारखान्यावर बोलण्याशिवाय यांचेकडे दुसरे काहीच नाही आपल ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याच बघायचं वाकून ही त्यांची सवय जाता जाईना झाली आहे. सत्यजितसिंह पाटणकरांनी देसाई कारखान्याच्या एफआरपीची काळजी करण्यापेक्षा त्यांच्या पिताश्रींनी आणि त्यांनी २० वर्षापासून घोषणा करीत असलेल्या  कोयना शुगर का पाटण शुगर फॅक्टरीची वीट आदी रचावी मगच शेतकऱ्यांच्या हक्काच्या देसाई कारखान्याची मापे काढावीत असा प्रतिटोला आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना लगाविला आहे.
                       तारळे विभागातील राहूडे व महाडिकवाडी नुने येथील जाहीर प्रवेश सभेत आमदार शंभूराज देसाई बोलत होते.यावेळी तारळे विभागातील सर्व संस्थांचे विविध पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत सत्यजितसिंह पाटणकर राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी करण्यास इच्छूक आहेत. आता राज्यात राष्ट्रवादी पक्षाची काय अवस्था झाली आहे हे आपण रोजच पहात आहोत त्याच्याहून वाईट परिस्थिती पाटणमधून उमेदवारी मागणाऱ्यांची झाली आहे.त्यांच्या पिताश्रींचे नेतृत्व मानणारे १०८ गावांतील सुमारे १८६१ त्यांचे प्रमुख सक्रीय कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी माझे नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.लोकसभा निवडणूकीवेळी आपण शिवसेनेच्या उमेदवाराला मला मागील विधानसभा निवडणूकीला जेवढे मताधिक्क दिले तेवढेच मताधिक्कय दिले असून या मताधिक्कयामध्ये आता या १८६१ मतदारांची वाढ झाली आहे त्यामुळे २० हजारांहून अधिक मतांनी मोठा पराभव समोर दिसत असल्याने माजी आमदारपुत्र सैरभैर झाले आहेत निवडणूकीच्या तोंडावर काय करु आणि काय नको अशी त्यांची अवस्था झाली आहे.पाच वर्षात निवडणूकीच्या तोंडावर मतदारांच्या पुढे मते मागायला काहीतरी मुद्दा पाहिजे म्हणून देसाई कारखान्याचा अपप्रचार करण्याचा नेहमीचाच उद्योग सत्यजितसिंहाकडून सुरु आहे.परंतू याचा काहीएक परिणाम मतदारसंघातील मतदारांवर होणार नाही कारण देसाई कारखान्याचा कारभार आपण ३३ वर्षे अत्यंत पारदर्शक आणि सभासदांच्या हिताच्या दृष्टीनेच राबविला आहे.म्हणून कारखान्याच्या सुज्ञ सभासदांनी या माजी आमदार पुत्रांना एकदा नव्हे अनेकदा देसाई कारखान्याकडे तुम्ही ढुंकुनही पाहू नका तुमच्या सल्लयाची आम्हाला गरज नाही असा उघड सल्ला मताच्या रुपाने सभासदांनीच दिला आहे.
                 एफआरपी दयायला लावली म्हणणाऱ्या सत्यजितसिंहांना साखर उद्योगातले काय कळते, स्वत:चा घोषणा केलेल्या खांडसरी फॅक्टरी आदी उभी करा नुसत्या घोषणांवर किती दिवस तालुक्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल करणार आहात ? सत्यजितसिंह पाटणकर तुम्हाला सहकारातले किती ज्ञान आहे हे तुमच्या वक्तव्यावरुनच लक्षात आले. शासनाकडून आमचे कारखान्याला येणेबाकी असल्याचा कांगावा करण्याची काहीएक आम्हाला गरज नाही जे आहे ते आहे तेच सभासदांच्या पुढे आम्ही मांडले आहे.शेतकऱ्यांना दयायला आमच्याकडे पैसे नाहीत असे आम्ही कधीही शेतकऱ्यांना सांगितले नाही.कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा निवडणूकीकरीता वापरण्याची वेळ माझेवर कधी आली नाही सत्यजितसिंह पाटणकरांनी त्याची काळजी करु नये.सगळया संस्था खाजगी करुन आपण आणि आपल्या पिताश्रींनी तालुक्यातील किती शेतकऱ्यांचे भले केले आहे हे अवघा तालुका जाणतो.एफआरपीचा मुद्दा विधानसभेच्या निवडणूकीत अडचणीचा येवू शकतो असल्या वावडया उठविण्याची गरज तुम्हाला असेल मला नाही कारण निवडणूक कारखान्याची नाही विधानसभेची आहे.विधानसभेचा सदस्य म्हणून जनतेने माझेवर टाकलेल्या विश्वासातून जनतेला भरभरुन देण्याचे काम मी केले आहे आणि याचे धडधडीत पुरावे जनतेनेच तुम्हाला दिले आहेत. विधानसभेच्या निवडणूकीला सामोरे जाताना तुम्ही पाच वर्षात जनतेसाठी काय केले हे सांगा सारखे सारखे कारखान्यावर बोलून आपला बालिशपणा सारखा सारखा सिध्द करुन दाखवू नका.आणि राहता राहिला विषय सुट्टी देण्याचा व पळता भूई थोडी होण्याचा तर सत्यजितसिंह पाटणकर घोडमैदान लांब नाही त्यामुळे थोडासा धीर धरा महिना सुध्दा राहिला नाही निवडणूकीला मतदार संघातील जनतेनेच तुम्हालाच कायमची सुट्टी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे येत्या २४ तारखेला तो तुमच्या लक्षात येईल.मग बसा खांडसरी उभी करीत असा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना लगाविला.



Tuesday 24 September 2019

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याची एफ.आर.पी.ची पुर्ण रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.




दौलतनगर दि.२३:- ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि. दौलतनगर मरळी ता. पाटण या कारखान्याने हंगाम 2018-19 मध्ये गाळप केलेल्या संपूर्ण ऊसाची एफ.आर.पी.नुसार प्रतिटन रु. 2722/- प्रमाणे होणारी सर्वच्या सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाती दि.२३.०९.२०१९ रोजी वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकांव्दारे दिली आहे.
                           प्रसिध्दीपत्रकांत त्यांनी पुढे म्हंटले आहे की,कारखान्याने सन 2018-19 चे गळीत हंगामात 1,96315.307 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 11.78% सरासरी साखर उताऱ्यांने 2,30,575 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याचे सन 2018-19 चे गळीत हंगामातील ऊसबिलाची एफ.आर.पी. रक्कम प्र.मे.टन रुपये 2722.00 इतकी आहे. एफ.आर.पी.प्रमाणे एकूण गळीतच्या ऊसबिलाची रक्कम रुपये 5343.70 लाख इतकी होत असून कारखान्याने आतापर्यंत रुपये 5109.26 लाख रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली होती व उर्वरित एफ.आर.पी.प्रमाणे शिल्लक असणारी रक्कम रुपये 234.44 लाख कारखान्याने आजरोजी दि. 23.09.2019 रेाजी ऊस पुरवठादारांच्या बँक खाती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा मरळी दौलतनगर येथे वर्ग केलेली आहे. सद्यस्थितीला सन 2018-19 चे गळीत हंगामातील कारखान्याकडे ऊसबिलाची एफ.आर.पी.ची रक्कम थकीत नाही. एफ.आर.पी.प्रमाणे शिल्लक असणारी रक्कम रुपये 234.44 लाख कारखान्याने दि. 23.09.2019 रेाजी ऊस पुरवठादारांच्या बँक खाती जमा केली असलेबाबतचे लेखी पत्र बँकेच्या तपशिलासह साखर आयुक्त, जिल्हाधिकारी सातारा व तहसिलदार पाटण यांना आज रोजी सादरही केले आहे.महाराष्ट्राचा सन 2018-19 चा गळीत हंगाम संपलेपासून गेले 6 महिन्यात साखरेची बाजारातील कमी झालेली मागणी वेळोवेळी विक्री दरामध्ये झालेला बदल कामगारांची देणी, वाहतुक खर्च वित्तीय कर्जाची उपलब्धता आदी अनेक आव्हांनांना तोंड देत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2018-19 च्या गळीत हंगामातील 100 टक्के एफ.आर.पी.रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली आहे.
                    दरम्यान साखर आयुक्तांनी महसूल वसूली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीचे कारखान्यास काढलेले आदेश पाहून कारखान्याला सतत पाण्यात पाहणाऱ्या अनेकांना आनंदाच्या उकळया फुटल्या होत्या परंतू कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी तसेच ऊस पुरवठाधारकांचा कारखान्यावर आणि कारखान्याच्या व्यवस्थापनावर विश्वास असल्याने या आदेशाची काळजी न करता कारखान्याच्या विश्वस्थांच्या मागे खंबीर उभा राहिला याचा आम्हाला आनंद आहे. ज्यांनी २० वर्षे झाले कारखाना काढतोय, कारखाना काढतोय म्हणून पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांना फसवित ठेवले त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर कारखान्याचे भूमिपुजन केले, भूमिपुजन करुन अनेक दिवस उलटले तरी त्या कारखान्यांची साधी एक वीट उभी राहू शकली नाही कारखान्यावर आणि कारखान्यांच्या व्यवस्थापनावर आरोप करणाऱ्यांनी घोषणा आणि भूमिपुजन केलेल्या कारखान्याची पहिल्यांदा वीट रचावी आणि मगच आमचे नेते  कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शंभूराज देसाईंची मापे काढावित असा सल्लाही विरोधकांना कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी पत्रकात दिला आहे.


राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार शंभूराज देसाईंना पुन्हा आमदार करुन विधानसभेवर पाठवूया शिवसेना उपनेते प्रा.नितीन बानुगडे-पाटील यांचे आवाहन.



           
               दौलतनगर दि.२३:- दि.०१ मे,१९६० ला आपण महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली शिवसेना-भाजप पक्षाची १९९५ ते १९९९ आणि आताची  २०१४ ते २०१९ अशी दहा वर्षाची सत्ता सोडली तर महाराष्ट्र राज्यावर ५० वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती.५० वर्षे सत्तेवर असणाऱ्या या पक्षानी महाराष्ट्रात आमुलाग्र बदल घडविणे अपेक्षित होते परंतू ते त्यांना जमले नाही त्यासाठी राज्यात शिवसेना भाजप युतीचेच सरकार यावे लागले.२०१४ ला आपण सर्वांनी मोठया मताधिक्क्याने आमदार शंभूराज देसाईंना निवडून दिले आणि त्यांनी या पाच वर्षात पाटण मतदारसंघाचा कायापालट करुन दाखविला आता त्यांना राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा एकदा आमदार म्हणून त्यांना विधानसभेवर मागीलपेक्षा जादा मताधिक्कयाने पाठविणे आपल्या सर्वांची जबाबदारी असून येणाऱ्या निवडणूकीत ही जबाबदारी आपण लिलया पेलूया असे आवाहन शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे यांनी केले.
                                    दौलतनगर ता.पाटण येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित मी महाराष्ट्र निश्चिय मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उत्कृष्ट संसदपटू आमदार शंभूराज देसाई होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील यांच्यासह कराड पाटण तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, शिवसैनकांची प्रमुख उपस्थिती होती. 
                                      याप्रसंगी बोलताना प्रा. नितीन बानुगडे पाटील म्हणाले, उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी  मी महाराष्ट्र असा निश्चय करुन महाराष्ट्र एकजुटीने काम शिवसेना पक्षाने सुरु केले आहे. शिवसेनेच्या या भूमिकेला आपण सर्वांनी पाठबळ देणे अत्यंत गरजेचे आहे.मराठी हक्कासाठी लढणारा पक्ष म्हणून शिवसेना पक्षाची ओळख आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रश्न सोडवण्याकरिता विधानसभेवर भगवा फडकला पाहिजे आणि याकरीता आपण सर्वांनी पुन्हा एकदा २०१४ प्रमाणे यंदाच्या विधानसभेच्या निवडणूकीत आमदार शंभूराज देसाईंना भरघोस मतांनी निवडून देत पुन्हा विधानसभेवर पाठवून त्यांच्यावर राज्याचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी देण्याचे काम आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे.एक खमक्या आमदार आपण सर्व पाटण विधानसभा मतदारसंघ वाशियांनी शिवसेना पक्षाला मिळवून दिला आहे.त्यांनी या पाच वर्षात पाटण विधानसभा मतदारसंघात केलेले कार्य डोळे दिपवून टाकणारे आहे.मतदार संघातील प्रत्येक घटकाचे प्रश्न पोटतिडकीने मांडून ते सोडवून घेणेकरीता त्यांची सुरु असलेली धडपड ही आम्ही जवळून पाहिली आहे.पाटण मतदारसंघातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत आता त्यांच्यावर राज्याचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी मिळावी याकरीता आपण सर्वांनी कसोशिने प्रयत्न करणे गरजेचे आहे.आपल्या मतदार संघाचा कायापालट घडवून आणण्याकरीता पाच वर्षातून आपल्याला एकच दिवसाची संधी मिळते आणि ती असते निवडणूकीत आपला धाडसी लोकप्रतिनिधी ठरवून देण्याची हा एकच दिवस संपुर्ण पाच वर्षातील पुढील कार्याची दिशा ठरविणारा असतो याकरीता आपण या महिन्याभरातच काम करुन दाखवायचे आहे.असे सांगून त्यांनी शिवस्वराज्य यात्रा काढणारे राष्ट्रवादी कॉग्रेसवाले पंधरा वर्ष राज्यात सत्तेत होते त्यावेळी त्यांना शिवस्वराज्य आणि भगव्याचे महत्व कळलं नाही ते त्यांना आता कळू लागले आहे. असा टोला लगावून सातारा जिल्ह्यात सर्वाधिक जास्त विकासकामे आमदार शंभूराज देसाईंनी खेचून आणत पाटण मतदारसंघात विकासाची क्रांती घडवल्याचे सांगितले. 
                                      यावेळी आमदार शंभूराज देसाई म्हणाले की, पक्षाची संकल्पना कशी असावी याकरिता या मी महाराष्ट्र निश्चय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.१२ महिने 24 तास आपण लोकांच्यामध्ये  राहणारे कार्यकर्ते आहेत. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याकरिता आपण प्रयत्न केले आहेत. निवडणूक आल्यानंतर दारात जाणाऱ्यांपैकी मी नाही. माजी आमदार पाटणकरांच्या कारकिर्दीत जी कामे झाली नाहीत. ती कामे पूर्ण करण्याचे काम आपण पाच वर्षांत केले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एक नंबरची मते मिळवून मला पाटण मतदारसंघातील जनतेने आमदार केले आहे. त्याच पद्धतीने मीसुध्दा त्यांना दिलेले वचन आणि विकास कामे पूर्ण करण्याचे काम पाच वर्षात केले असून मागील महिन्यात पाच वर्षातील विकासकांमाचा लेखाजोखा प्रकाशित केल्यानंतर सन 2019 या आर्थिक वर्षात प्रस्तावित केलेल्या आणि मंजुरीच्या अपेक्षेत असणाऱ्या 123 विविध विकासकामांना आचारसंहितेच्या शेवठच्या क्षणापर्यंत 34 कोटी 77 लाख 16 हजार रुपयांचा निधी शासनाकडून मंजुर करुन आणता आला याचे मला समाधान असल्याचेही यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले.यावेळी जयवंतराव शेलार यांनी प्रस्ताविक केले. जिल्हा परीषद सदस्य प्रदीप पाटील यांनी आभार मानले. 


Saturday 21 September 2019

1766 कोटी 79 लाख रुपयांच्या विकासकामांच्या लेखाजोखा प्रकाशनानंतर 34 कोटी 77 लाख रुपयांच्या 123 कामांना मंजुरी. पाच वर्षात एकूण 1801 कोटी 56 लाख 28 हजार रुपयांची विविध विकासकामे मंजुर आमदार शंभूराज देसाई.




दौलतनगर दि.२1:- सन 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या कालावधीत पाटण विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मतदारसंघातील विविध विकासकामांकरीता 1766 कोटी 79 लाख 12 हजार रुपयांचा निधी मंजुर केला असल्याचा लेखाजोखा मागील महिन्यात प्रकाशित केल्यानंतर सन 2019 या आर्थिक वर्षात प्रस्तावित केलेल्या आणि मंजुरीच्या अपेक्षेत असणारी 108 कोटी 10 लाख 54 हजार रुपयांच्या निधीच्या कामांपैकी 123 विविध विकासकामांना आचारसंहितेच्या शेवठच्या क्षणापर्यंत 34 कोटी 77 लाख 16 हजार रुपयांचा निधी शासनाकडून मंजुर करुन घेण्यात यश आल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी दिली असून आमदार शंभूराज देसाईंनी सन 2014 ते 2019 या पंचवार्षिकमध्ये एकूण 1801 कोटी 56 लाख 28 हजार रुपयांचा निधी पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबीत कामांना युतीच्या शासनाकडून मंजुर करुन आणला असल्याचे जाहीर केले आहे.
                             पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने सन 2014 च्या विधानसभा निवडणूकीत आमदार शंभूराज देसाईंना 18,824 इतक्या भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतर सलग पाच वर्षे त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबीत राहिलेल्या विकासकामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करुन आणण्याकरीता आपली संपुर्ण राजकीय ताकत युतीच्या शासनाकडे वापरली आणि पाच वर्षात त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहराच बदलून टाकला.मतदारसंघातील प्रत्येक गांवामध्ये आणि वाडीवस्तीवर आमदार शंभूराज देसाईंच्या माध्यमातून अनेक प्रलंबीत विविध विकासकामे मार्गी लागली आहेत.पाच वर्षात त्यांनी मतदार संघातील विविध विकासकामांकरीता 1766 कोटी 79 लाख 12 हजार रुपयांचा निधी मंजुर करुन आणला मंजुर केलेल्या निधीचा आणि या निधीतून केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा त्यांनी पाटण मतदारसंघातील जनतेला अर्पण करण्याकरीता दौलतनगरला कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मोठा समारंभ घेवून पाच वर्षातील कामांचा आढावा देणारा अहवाल मतदारसंघातील गणवाईज प्रसिध्द करुन तो प्रकाशित केला.आणि केलेली विकासकामे त्यांनी मतदारसंघातील घराघरात पोहचविली या समारंभात त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला सन 2019 या आर्थिक वर्षात मंजुरीच्या अपेक्षेत असणारी 108 कोटी 10 लाख 54 हजार रुपयांच्या निधीची कामे प्रस्तावित केली असल्याचे जाहीर केले होते. लेखाजोखा प्रकाशनानंतर हा निधी मिळविण्याकरीता त्यांचे शासनाकडे आणि शासनाच्या संबधित विभागाकडे दिवसरात्र प्रयत्न सुरु होते त्यानुसार आचारसंहितेच्या शेवठच्या क्षणापर्यंत त्यांनी 123 विकासकामांकरीता 34 कोटी 77 लाख 16 हजार रुपयांचा निधी मंजुर करुन आणण्यात त्यांना यश मिळाले असून आमदार शंभूराज देसाईंच्या माध्यमातून या पाच वर्षामध्ये एकूण 1801 कोटी 56 लाख 28 हजार रुपयांचा निधी मंजुर झाला असून सातारा जिल्हयात सर्वात जास्त निधी विकासकामांकरीता आणण्यात ते प्रथम क्रंमाकात आहेत.आचारसंहितेच्या शेवठच्या क्षणापर्यंत त्यांनी मंजुर करुन आणलेल्या निधीमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दोन कामे 1 कोटी 87 लाख 06 हजार,जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत कार्यालये व  स्मशानभूमी शेड बांधणे व स्मशानभूमी रस्ता सुधारणा करणे या 12 कामांकरीता 68 लाख, क वर्ग तिर्थक्षेत्र विकास योजना 4 कामे 27.00 लाख,मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधा पुरविणे 2 कामे 12.00 लाख,रस्ते व पुल दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत 06 कामांकरीता 10 कोटी,नैसर्गिक आपत्ती निवारणांतर्गत धोकादायक परिस्थितीमध्ये असलेल्या गावांच्या तात्पुरते पुनर्वसन करण्याकरीता 08 कामे 2 कोटी 31 लाख 04 हजार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून 04 कामे 50 लाख,डोंगरी विकास निधी कार्यक्रमांतर्गत 05 कामे 39 लाख 15 हजार,स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत 16 कामे 1 कोटी 25 लाख 29 हजार,लघु पाटबंधारे विभागांतर्गत 09 कामे 1 कोटी 1 लाख 63 हजार,अल्पसंख्यांक वस्त्यांमध्ये मुलभूत/पायाभूत सुविधा पुरविणे 3 कामे 24 लाख, सर्वसाधारण व विशेष घटक साकव योजने अंतर्गत 06 कामे 1 कोटी 73 लाख 37 हजार, रस्ते विकास महामंडळांतर्गत ग्रामीण पायाभूत सुविधामधून रस्ते करणेकरीता 16 कामे 2 कोटी, कोयना पुनर्वसन निधीमधून कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसित गांवामध्ये नागरी सुविधांची कामे करण्याकरीता 34 कामे 11 कोटी 88 लाख 86 हजार व कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून 04 कामे 49 लाख 76 हजार असे एकूण  34 कोटी 77 लाख 16 हजार रुपयांच्या 123 विकास कामांना मंजूरी मिळविण्यात त्यांना यश मिळाले असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.आचारसंहितेच्या शेवठच्या क्षणापर्यंत आमदार शंभूराज देसाई हे आवश्यक असणारा निधी मिळविण्या करीता प्रयत्नशील असल्याचे पाहून निधी मंजुर झालेल्या 123 गावांतील जनतेने आमदार शंभूराज देसाईंचे जाहीर आभार मानले आहे.

दौलतनगर,ता.पाटण येथे मंगळवार दि. 24 सप्टेंबर रोजी मी महाराष्ट्र निश्चय मेळाव्याचे आयोजन.






दौलतनगर दि.२०:-  शिवसेना पक्षाचेवतीने मंगळवार दि. 24 सप्टेंबर, 2019 रोजी सकाळी 10.30 वा. दौलतनगर,ता.पाटण या ठिकाणी मी महाराष्ट्र निश्चय मेळावा शिवसेना उपनेते संपर्कप्रमुख प्रा.नितीन बानुगडे यांचे मार्गदर्शनाखाली व पाटण विधानसभा मतदारसंघाचे उत्कृष्ट ससंसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या निश्चिय मेळाव्यास शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांनी केले आहे.









Friday 20 September 2019

देसाई कारखान्यावर साखर आयुक्तांनी आरआरसी जप्तीचे काढलेले आदेश चुकीचे. केंद्र व राज्य शासनाकडेच देसाई कारखान्याचे २ कोटी ८३ लाख रुपये अनुदानाची रक्कम येणेबाकी. चेअरमन अशोकराव पाटील यांची माहिती.





दौलतनगर दि.२०:- सन 2018-19 गळीत हंगामामध्ये गळीत केलेल्या ऊसाची एफआरपीची उर्वरीत रक्कम आम्ही लवकरच ऊस पुरवठाधारकांना देणार असून याची पुर्व कल्पना साखर आयुक्तांना कारखाना व्यवस्थापनाकडून दिली होती २ कोटी ३३ लाख ५९ हजार रुपयांची रक्कम ऊस पुरवठाधारकांना दिली नसल्याने साखर आयुक्तांनी महसूल वसूली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीचे काढलेले आदेश पुर्णत: चुकीचे असून केंद्र आणि राज्य शासनाकडेच देसाई कारखान्याचे सुमारे २ कोटी ८३ लाख रुपयांचे अनुदानाची रक्कम येणेबाकी आहे.केद्र व राज्य शासनाकडे असणारी येणेबाकीची रक्कम ही ऊस पुरवठाधारकांना उर्वरीत एफआरपीची रक्कम देणेकरीता देण्यात यावी याकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री ना.सुभाषराव देशमुख यांचेकडे आमचा पाठपुरावाही सुरु असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                       चेअरमन अशोकराव पाटील यांनी म्हंटले आहे की, आमचे लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखाना लि.दौलतनगर ता.पाटण जि.सातारा यांनी सन 2018-19 गळीत हंगामामध्ये 1,96315.307 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 11.78% सरासरी साखर उताऱ्यांने 2,30,575 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. एफआरपीप्रमाणे कारखान्याचे एकूण गळीताच्या ऊसबिलाची रक्कम रु.53 कोटी 43 लाख 70 हजार होत असून आजअखेर कारखान्याने रुपये 5१ कोटी ०९ लाख २६ हजार इतकी रक्कम ऊस पुरवठाधारकांना एफआरपीपोटी अदा केली आहे. ही रक्कम एकूण एफआरपीच्या 9६ % होत आहे व कारखान्याकडून ऊस पुरवठाधारकांना रुपये ०२ कोटी ३३ लाख ५९ हजार एवढी रक्कम अजुन देय आहे. केंद्र व महाराष्ट्र शासन यांचेकडे आमचे कारखान्याची एकूण ०2 कोटी ८३ लाख रुपये एवढी अनुदानाची रक्कम येणे बाकी असून या उपलब्ध रक्कमेतून उर्वरीत एफआरपीची असणारी एकुण 2 कोटी 3३ लाख ५९ हजार इतकी रक्कम ही आम्ही ऊस पुरवठाधारकांना देण्याचे नियोजन केले आहे. परंतू त्यापुर्वी साखर आयुक्तांनी महसूल वसूली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीचे काढलेले आदेश पुर्णत: चुकीचे आहेत. केंद्र व महाराष्ट्र शासन यांचेकडे कारखान्याची येणेबाकी असतानाही एफआरपीची रक्कम अदा केली नसल्याचे आदेश काढणे हे पुर्णत: चुकीचे असून सदरची येणेबाकीची रक्कम शासनाकडून तात्काळ ऊस पुरवठाधारकांची एफआरपीची उर्वरीत रक्कम देणेकरीता देण्यात यावी याकरीता कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री ना. सुभाषराव देशमुख यांचेकडे मागणीही केली आहे. लवकरच ही अनुदानाची रक्कम कारखान्यास प्राप्त होईल असेही चेअरमन अशोकराव पाटील यांनी सांगितले आहे

पाटण तालुक्यातील कोयना पुनर्वसित गावठाणातील कामांना 11 कोटी 88 लाखांचा निधी मंजूर. आमदार शंभूराज देसाई.



दौलतनगर दि.२०:- कोयना प्रकल्प टप्पा 1 2 अंतर्गत पाटण तालुक्यातील कोयना पुनर्वसित गावठाणामधील  गांवातील नागरी सुविधांच्या ३४ कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करणेबाबत राज्य शासनाचे महसूल व वन विभागाकडे  मागणी केलेनुसार महसूल व वन विभागाने 11 कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून सदरचा निधी मंजूर केल्याचे शासन निर्णय शासनाच्या महसूल व वनविभागाने दि.१९.09.२०१९ रोजी पारित केले असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                       आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे,महाराष्ट्र विधीमंडळाच्या सन २०१८ च्या पहिल्या अधिवेशनामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत व कोयना प्रकल्प टप्पा १ व २ अंतर्गत पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधांच्या कामांना आवश्यक असणारा निधी तातडीने राज्य शासनाने मंजूर करणेकरीता लक्षवेधी सुचना उपस्थित केली होती. सदर लक्षवेधी सुचनेवर झालेल्या चर्चेदरम्यान मदत व पुनर्वसन राज्यमंत्री महोदय यांनी कार्यवाहीच्या अनुषंगाने आश्वासने दिली होती. या आश्वासनानंतर कोयना प्रकल्पातील पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधांच्या कामांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देणेबाबत राज्याचे महसूल विभागाचे मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील व मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री ना.सुभाष देशमुख यांच्याकडे मी सातत्याने पाठपुरावा करीत होतो.त्यानुसार पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधांच्या 34 कामांना नुकताच 11 कोटी ८८ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने मंजूर केला असून सदरचा निधी मंजूर केल्याचे शासन निर्णय शासनाच्या महसूल व वनविभागाने दि. 19.०९.2019 रोजी पारित केले आहेत. या 34 कामांमध्ये मिरगाव तोरणे येथे पाणी पुरवठा योजना 99.16 लाख, नहिंबे लाडवस्ती शिवंदेश्वर पाणी पुरवठा योजना 95.35 लाख, करंजवडे शिवंदेश्वर येथे पाणी पुरवठा योजना 84.97 लाख, किसरुळे भराडवस्ती येथे पाणी पुरवठा योजना 84.19 लाख, पुनवली ढोकावळे येथे पाणी पुरवठा योजना 92.16 लाख,काढोली सावंतवस्ती विंधन विहिरीवरील पाणी पुरवठा योजना 35.44 लाख, बाजे वरसरकुन येथे स्मशानभूमी शेड 2.80,चिरंबे विहे स्मशानभूमी शेड  2.74 लाख,जुंगठी येथे मागासवर्गीय रस्त्यावर छोटा पूल व पोहोचरस्ता 18.36 लाख,बाजे वरसरकून येथे गाढखोप ते बाजे रस्त्यावर छोटया पुलाचे बांधकाम 31.91 लाख,जुंगटी दिवशी सुतारवस्ती अंतर्गत मार्ग संधाणकीकरण 21.41 लाख, कुसवडे झाकडे अंतर्गत मार्ग संधाणकीकरण 11.13 लाख,नहिंबे (तळीये) मोरी बांधकामे व डांबरीकरण 58.14 लाख,वाजेगाव बी मारुल पोहोच रस्ता डांबरीकरण 24.76 लाख,मिरगाव तोरणे रस्ता डांबरीकरण 58.55 लाख,किसरुळे ढाणकल पोहोच रस्ता डांबरीकरण 19.05 लाख,चिरंबे विहे- नहिंबे चिरंबे ग्रामपंचायत कार्यालय  22.34 लाख,चिरंबे काढोली ग्रामपंचायत कार्यालय 22.76 लाख,देवघर गोवारे ग्रामपंचायत कार्यालय 22.66 लाख,मिरगांव (बोपोली) ग्रामपंचायत कार्यालय इमारत 22.84 लाख,नहिंबे (मेंढेघर) ग्रामपंचायत कार्यालय इमारत 22.80 लाख,बाजे (व.स.) ग्रामपंचायत कार्यालय इमारत 22.79 लाख,चिरंबे (मणेरी) ग्रामपंचायत कार्यालय इमारत 22.56 लाख,दास्तान (रासाटी) ग्रामपंचायत कार्यालय इमारत 22.78 लाख,किसरुळे शिंवेदश्वर येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत 22.96 लाख,ढोकावळे (रिसवड) बस थांबा 3.18 लाख,गाढखोप (रासाटी) बस थांबा 3.०० लाख,जुंगटी दिवशी बसथांबा 3.०० लाख,देवघर गोवारे येथे पाणी पुरवठा योजना 85.97 लाख,मिरगाव चाफेर येथे पाणी पुरवठा योजना 87.87 लाख,चिरंबे मणेरी अंतर्गत रस्ते दुरुस्ती 1९.३६ लाख,मानाईनगर येथे  अंतर्गत रस्ते दुरुस्ती 3.70 लाख,रिसवड येथे शाळा इमारतीच्या दोन खोल्यांच बांधकाम  13.57 लाख,वाजेगाव बी मारुल पोहोच रस्ता डांबरीकरण 24.76 लाख या कामांचा समावेश असून अशाप्रकारे एकूण ११ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजुर केला असून सदरच्या निधीमुळे कोयना प्रकल्पातील पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधांतर्गत प्रलंबित राहिलेल्या कामांना चालना मिळणार आहे.कोयना पुनर्वसित गावठाणांतील नागरी सुविधांच्या ३४ कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर केलेबदृल महसूल विभागाचे मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील व मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री ना.सुभाष देशमुख यांचे आभारही आमदार देसाई यांनी शेवटी पत्रकांत मानले आहेत.

Tuesday 17 September 2019

आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली विकासप्रवाहात सामील झाल्याचा आनंद. सर्वांना बरोबर घेवून अधिक वेगाने विकास करणार आमदार शंभूराज देसाईंची जाहीर मेळाव्यात ग्वाही.





दौलतनगर दि.:- पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्कृष्ट संसदपटू शंभूराज देसाई यांचे पाच वर्षात मतदारसंघात सुरु असलेले विकासात्मक कामामुळेच आम्ही त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर आणि उघड प्रवेश करीत असून आम्हाला आमदार शंभूराज देसाईंच्या सोबतीने विकासप्रवाहात सामील झाल्याचा आम्हाला आनंद होत असल्याचे जाहीर मत पाटण तालुक्यातील १०२ गावांतील पाटणकर गटातील १६२१ कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी दौलतनगर येथील जाहीर मेळाव्या दरम्यान दिले.विकासाची दुरदृष्टी असणारे आमदार शंभूराज देसाई हेच मतदारसंघाचा कुशलपणे विकास करु शकतात अशी आमची खात्री झाल्यानेच आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य केले असून याचा आम्हाला अजिबात पश्चाताप नसल्याचेही १६२१ कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.नवे जुने न करता सर्वांना बरोबर घेवून अधिक वेगाने मतदारसंघाचा विकास करणार असल्याची ग्वाही आमदार शंभूराज देसाईंनी आज मेळाव्यात उपस्थित सर्व पाटणकर गटातून शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्यांना दिली.
                                 दौलतनगर ता.पाटण येथे आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली गत महिन्याभरामध्ये शिवसेना पक्षात १०२ गांवातील पाटणकर गटाच्या १६२१ कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला असून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलेल्या या १०२ गावातील १६२१ कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांचा जाहीर मेळावा आमदार शंभूराज देसाईंच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत केला होता.याप्रसंगी प्रवेश केलेले सर्वच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी या मेळाव्यास आर्वजुन उपस्थित होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्यासह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील प्रमुख सर्व पदाधिकारी व १०२ गावातील पाटणकर गटाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे जाहीर प्रवेश शिवसेना पक्षात घडवून आणणारे देसाई गटाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
                          याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,गत महिन्याभरात आपले पारंपारिक विरोधक असणाऱ्या पाटणकर गटातील त्यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पाटणकर गटाला कंटाळून माझे नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला आजअखेर पाटण तालुक्यातील १०२ गावातील १६२१ पाटणकर गटाच्या प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी हे शिवसेना पक्षात दाखल झाले आहेत.गत पाच वर्षात प्रत्येक गांवात विकासाचे प्रलंबीत काम देण्याचे आपण काम केल्यामुळेच विकासाच्या प्रवाहापासून अनेक वर्षे दुर राहिलेल्या नागरिकांनी आणि महिलांनी मोठया संख्येने विकासाच्या प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेवून काम करणाऱ्या नेत्याला जाहिर पाठींबा देण्याची भूमिका या नागरिकांनी आणि महिलांनी घेतल्यामुळेच एवढया मोठया प्रमाणात नागरिक व महिला एकत्र आपणांस पहावयास मिळत आहेत. आतापर्यंत विकासाच्या अपेक्षित या १०२ गावांतील १६२१ नागरिक आणि महिला होत्या परंतू त्यांचा मुलभूत विकास त्यांच्या यापुर्वीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या चिरंजीवाकडून न झाल्यानेच या नागरिकांमध्ये आणि महिलांमध्ये परिवर्तन झाले आणि माझे नेतृत्व स्विकारले याचा मला खुप आनंद आहे. पाटणकर गटाला कंटाळून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलेल्या सर्व पुरुष आणि महिलांचे,मातांचे मी शिवसेना पक्षात पक्षाचा आमदार या नात्याने जाहीर स्वागत करतो.तुम्ही आता आमचे झाला आहात त्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज नाही. ज्या विकासाच्या मुद्दयासाठी आपण एकत्र येवून माझेवर विश्वास दाखविला तो विश्वास सार्थ करण्याचेच काम मी भविष्यात करणार असून नवे जुने पदाधिकारी,कार्यकर्ते असा भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेवून अधिक वेगाने आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यास मी कटीबध्द आहे.असे सांगून ते म्हणाले,२०१४ च्या विधानसभा निवडणूकीत पाटण मतदारसंघातील जनतेने मोठया विश्वासाने १८८२४ मताधिक्क्याने मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली.जनतेने दिलेल्या संधीचे मी सोनंच करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यामुळेच पाच वर्षात १७६६ कोटी ७९ लाख रुपयांचा विकासनिधी पाटण मतदार संघाच्या विकासासाठी आणू शकलो,जनतेचे आर्शिवाद आणि तुम्हा कार्यकर्त्यांचे पाठबळ यामुळेच हे सर्व मला शक्य झाले. शिवसेना पक्षात पाटणकर गटाच्या नेतृत्वाला कंटाळून रोज नव्याने अनेक गांवाचा जाहीर प्रवेश होत आहे यावरुनच मतदार संघाचे विकासात्मक नेतृत्व कोण आहे हे सिध्द होत आहे.आज याठिकाणी जमलेले सर्व पाटणकर गटातील कार्यकर्ते व पदाधिकारी शिवसेना पक्षात ठाम आहेत हे आजच्या उपस्थितीवरुन जाहीरपणे स्पष्ट होत आहे असेही आमदार शंभूराज देसाई शेवठी म्हणाले.
चौकट:- उपस्थितांनी हात वर करुन दिले आमदार शंभूराज देसाईंना पाठबळाचे वचन.
           जाहीर मेळाव्याकरीता उपस्थित राहिलेल्या पाटणकर गटातील कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी सभागृहात आमदार शंभूराज देसाईचे भाषण सुरु असताना आमदारसाहेब आम्ही तुमच्या सोबत कायम राहणार आहे असे सांगण्याकरीता हात वर केले व आमदार शंभूराज देसाईंना हात उंचावूनच पाठबळाचे वचन दिले.
चौकट:- १६२१ पदाधिकारी व सक्रीय कार्यकर्ते यांनी पाटणकरांना का सोडले याचा पाटणकरांनी विचार करावा.
           गत महिन्याभरात पाटण तालुक्यातील १०२ गावातील १६२१ जनतेने पाटणकरांचे नेतृत्व धुडकारुन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षात प्रवेश केलेली जनता शिवसेना पक्षाच्या आणि माझ्या पाठीशी ठाम उभी आहे हे आजच्या मेळाव्यावरुन स्पष्ट झाले असून माझे नेतृत्व स्विकारलेल्या १६२१ पदाधिकारी व सक्रीय कार्यकर्ते यांनी पाटणकरांना निवडणूकीच्या तोंडावर का सोडले याचा विचार पाटणकर पितापुत्रांनी करावा असा सल्लाही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी दिला...

Monday 16 September 2019

महाजनादेश यात्रेला कराडला आलेले मुख्यमंत्री यांचे आमदार शंभूराज देसाईंनी केले स्वागत. कराड याठिकाणी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची घेतली सदिच्छा भेट.





दौलतनगर दि.:- राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा संपुर्ण महाराष्ट्रभर सुरु असून ना.फडणवीस हे काल महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सातारा जिल्हयाच्या दौऱ्यावर आले असताना कराड येथे पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे भगवी शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी सातारा जिल्हयाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे याठिकाणी उपस्थित होते.
                      मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे महाजनादेश यात्रेचा काल रात्री कराड येथे पुर्वनियोजीत कार्यक्रम होता. कराड यठिकाणी मुक्काम असणारे मुख्यमंत्री यांची आज सकाळी आमदार शंभूराज देसाईंनी सदिच्छा भेट घेत त्यांचे महाजनादेश यात्रेस शुभेच्छा देत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी कराड याठिकाणी सत्कार केला तसेच त्यांचेशी पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रलंबीत राहिलेल्या विकासकामांच्या संदर्भात चर्चाही केली.


महाजनादेश यात्रेला कराडला आलेले मुख्यमंत्री यांचे आमदार शंभूराज देसाईंनी केले स्वागत. कराड याठिकाणी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची घेतली सदिच्छा भेट.





दौलतनगर दि.:- राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा संपुर्ण महाराष्ट्रभर सुरु असून ना.फडणवीस हे काल महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सातारा जिल्हयाच्या दौऱ्यावर आले असताना कराड येथे पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे भगवी शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी सातारा जिल्हयाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे याठिकाणी उपस्थित होते.
                      मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे महाजनादेश यात्रेचा काल रात्री कराड येथे पुर्वनियोजीत कार्यक्रम होता. कराड यठिकाणी मुक्काम असणारे मुख्यमंत्री यांची आज सकाळी आमदार शंभूराज देसाईंनी सदिच्छा भेट घेत त्यांचे महाजनादेश यात्रेस शुभेच्छा देत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी कराड याठिकाणी सत्कार केला तसेच त्यांचेशी पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रलंबीत राहिलेल्या विकासकामांच्या संदर्भात चर्चाही केली.


महाजनादेश यात्रेला कराडला आलेले मुख्यमंत्री यांचे आमदार शंभूराज देसाईंनी केले स्वागत. कराड याठिकाणी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची घेतली सदिच्छा भेट.





दौलतनगर दि.:- राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा संपुर्ण महाराष्ट्रभर सुरु असून ना.फडणवीस हे काल महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सातारा जिल्हयाच्या दौऱ्यावर आले असताना कराड येथे पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे भगवी शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी सातारा जिल्हयाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे याठिकाणी उपस्थित होते.
                      मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे महाजनादेश यात्रेचा काल रात्री कराड येथे पुर्वनियोजीत कार्यक्रम होता. कराड यठिकाणी मुक्काम असणारे मुख्यमंत्री यांची आज सकाळी आमदार शंभूराज देसाईंनी सदिच्छा भेट घेत त्यांचे महाजनादेश यात्रेस शुभेच्छा देत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी कराड याठिकाणी सत्कार केला तसेच त्यांचेशी पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रलंबीत राहिलेल्या विकासकामांच्या संदर्भात चर्चाही केली.


Wednesday 11 September 2019

फडतरवाडीच्या आज्जींनी दिले आमदार शंभूराज देसाईंना ३४० रुपयांचे बक्षिस. कधीही न झालेला विकास करुन दाखविलेबद्दल बक्षिस देवून आज्जींकडून आमदार देसाईेचे कौतुक





दौलतनगर दि.१०:-सर्वसामान्यांचा लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण पाटण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई आहेत.आमदार शंभूराज देसाईंचे कार्य पाटण विधानसभा मतदारसंघातील कानाकोपऱ्यात पोहचले आहे. पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी कोटयावधी रुपयांचा कधीही न होणारा विकास मतदारसंघातील डोंगर कपारीत पोहचविला आहे.त्यांच्या कामांची पोहचपावती तारळे विभागातील डोंगरावर वसलेल्या फडतरवाडी घोट येथील एका ७० वर्षीय वयोवृध्द आज्जींनी फडतरवाडी येथील कार्यक्रमात दिली. लेकरा इतक्या वर्षात मी रहात असलेल्या फडतरवाडी सारख्या वाडीला पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती ती तु करुन दाखवलिस म्हणून मी स्वता:साठी पै पै साठवलेले  ३४० रुपये आहेत ते तुला बक्षिस म्हणून देण्यासाठी आणले आहेत. लेकरा,ते तेवढे घे,असे भावनिक बोल बोलून वैजयंता मारुती साळुंखे रा.फडतरवाडी घोट या वयोवृध्द आज्जींनी आमदार शंभूराज देसाईंना ३४० रुपये बक्षिस म्हणून दिले.व त्यांच्या कार्याचे तोंडभरुन कौतुक केले.
               तारळे विभागातील फडतरवाडी घोट येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपुजन कार्यक्रमाकरीता आमदार शंभूराज देसाई फडतरवाडी याठिकाणी गेले होते.भूमिपुजनाचा समारंभ व मान्यवरांची भाषणे संपल्यानंतर वैजयंता मारुती साळुंखे या ७० वर्षीय वयोवृध्द आज्जीं आमदार शंभूराज देसाईंची भेट घेणेकरीता समोर आल्या आणि त्यांनी आमदार शंभूराज देसाईंना हातातून आणलेली ३४० रुपयांची साठविलेली बारकी थैली हातात देत लेकरा, तुझे आजोबा लोकनेते यांनी पाटण तालुक्याकरीता केलेले कार्य खुप मोठे आहे मी ५० वर्षापासून या वाडीत रहात आहे या वाडीला पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती पिण्याच्या पाण्याची योजनेची सुरुवात करायला तुझ्या कारकीर्दीत वाडीला रस्ता झाला, पिण्याच्या पाण्याच्या सुरुवात करायला गावात येणार आहे म्हणून समजले आमचा तारळे भाग विकासकामांनी नटविला आहेस तेव्हा तुला बक्षिस देण्यासाठी माझेसाठी साठवून ठेवलेले ३४० रुपये घेवून आले आहे तेवढे माझे बक्षिस घे, असा आग्रह या आज्जींनी आमदार शंभूराज देसाईंना धरला आणि आमदार देसाईंच्या हातात  ३४० रुपयांची साठविलेली बारकी थैली दिली. आमदार शंभूराज देसाईंनीही या आज्जींना आपण दिलेले बक्षिस मला लाखमोलाचे आहे. ते मी कधीही विसणार नाही, ते मी कायम जपून ठेवणार आहे असे सांगून त्यांनी वैजयंता मारुती साळुंखे या वयोवृध्द आज्जींचे आभार मानले. या बक्षिसाची चर्चा संपुर्ण तारळे विभागात सुरु होती.

Tuesday 10 September 2019

सत्यजितसिंह, यापुर्वी शंभरवेळा समोरा समोर येण्याचे दिलेले आवाहन पहिले स्विकारा, मगच कोयना दौलतवर यायची वल्गना करा. आमदार शंभूराज देसाईंचे सत्यजितसिंह पाटणकरांना सल्ला.





दौलतनगर दि.१०:- सत्यजितसिंह पाटणकर,माझे कर्तृत्व पाटण मतदारसंघातील जनतेने कधीच सिध्द करुन दाखविले आहे त्यासाठी मला स्वत: तुमच्यासारखी स्वत:चीच टिमकी वाजवून घेण्याची गरज नाही.आपलेच कर्तृत्व अजून सिध्द व्हायचे आहे आणि आपले निष्क्रीय कर्तृत्व सिध्द करायला मतदारसंघातील जनताच तयार नाही. त्याला माझा काय दोष? आपण किती कर्तृत्वान नेते आहात हे पाटण मतदारसंघातील जनतेला चांगलेच माहिती आहे.नुसत्या टिवल्या बावल्या करुन तेच तेच प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मतदारसंघातील जनता थारा देत नाही. याचा विसर पडू देवू नका? शिवसेना पक्षात येणाऱ्या तुमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची दौलतनगरवरील गर्दी पाहून तुमची बोबडी वळली असल्याने काहीही बरळण्याचे उद्योग तुम्ही सुरु केला असला तरी जनतेच्या मनावर त्याचा काहीएक परीणाम होणार नाही.कारण मतदारसंघातील जनतेने त्यांचा कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी निवडला आहे.मला केलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी आहेत ना? मग ही उत्तरे पत्रकातून घेण्यापेक्षा मी जे वाडयाच्या खाली जनतेसमोर येण्याचे आवाहन तुम्हाला केले आहे ते तुम्ही पहिले स्विकारा आणि मगच कोयना दौलतवर येण्याची भाषा करा. असा सल्ला आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना तारळे येथे दिला असून पाटणमध्ये येईना अन् म्हणे कोयना दौलतवर येतो असा टोलाही त्यांनी लगाविला आहे.
          तारळे ता.पाटण विभागामध्ये आमदार शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत मंजुर झालेल्या घोट बोर्गेवाडी  तसेच नुने गावपोहोच रस्ता,अर्थसंकल्पातून मंजुर आंबळे येथील मोठया पुलाचे त्याचबरोबर तारळे स्टॅन्ड ते ढोरोशी फाटा रस्ता,कोजंवडे ते कडवे,आवर्डे ते मुरुड रस्ता,जाधववाडी नुने पोहोच रस्ता फडतरवाडी घोट पिण्याच्या पाण्याची योजना,घोट येथील पिण्याच्या पाण्याची योजनांच्या एकूण १३ कोटी ९२ लाख ७६ हजार रुपयांच्या कामांचे भूमिपुजन व वजरोशी येथील सेवा सोसायटीच्या नुतन इमारतीचे उदघाटन अशा आयोजीत संयुक्तीक कार्यक्रमानंतर तारळे ता.पाटण येथील जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बबनराव शिंदे,संचालक गजानन जाधव, सेामनाथ खामकर,बबनराव भिसे, शिवदौलत बँकेचे व्हा.चेअरमन संजय देशमुख,संचालक अभिजीत पाटील,रणजित पाटील,नामदेवराव साळुंखे, अशोकराव शिंदे,माणिक पवार,विजय पवार फौजी,विकास जाधव,एस.के.वाघडोळे,गौरव परदेशी आदी मान्यवरांसह तारळे विभागातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
             याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,कर्तृत्वशुन्य माजी आमदार पुत्र सत्यजितसिंह पाटणकर आपले कर्तृत्व काय आहे हे मी सांगण्यापेक्षा मतदारसंघातील जनतेनेच तुम्हाला २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत पहिल्याच झटक्यात तुम्हाला दाखवून दिले आहे.१८८२४ इतक्या मताधिक्क्याचा फटका तुम्हाला देवून  माझ्या शिवसेना पक्षाच्या भाषेतच सांगायचे झाल्यास आपल्या निष्क्रीय नेतृत्वाला जनतेनेच फटकारे मारले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत गतवेळेप्रमाणे शिवसेना भाजप युतीचेच सरकार पुन्हा सत्तेवर येणार असल्याने आणि दौलतनगरला माझे निवासस्थानी तुमच्या कर्तृत्वशुन्य नेतृत्वाला कायमचा रामराम करुन तुमचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने माझे कर्तृत्ववान नेतृत्व स्विकारुन शिवसेनेत जाहीर प्रवेश करीत आहेत.यावरुनच आपले कर्तृत्व काय आहे हे जाहीरपणे सिध्द होत आहे.एकदा पंचायत समितीचा सभापती होण्याची जनतेने संधी दिली तर या महाशयांना मतदारसंघाचा आमदार होण्याची दिवास्वप्ने पडू लागली आहेत. आमदारकीची दिवास्वप्ने पाहणारे सत्यजितसिंह पाटणकर आपण आतापर्यंत स्वकर्तृत्वावर पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेकरीता केले तरी काय ? हे उघडपणे जनतेला सांगू शकता का? सभापती असताना ज्यांना स्वत:च्या गांवात विकास करता आला नाही ते मतदारसंघाचा काय विकास करणार? मतदारसंघाचा विकास कसा करायचा याचा पहिल्यांदा अभ्यास करा टिवल्या बावल्या करण्याचे आता आपले वय राहिले नाही.मी देसाई कारखान्याची क्षमता का वाढविली नाही,शिवशंभो दुध संघ,शिवतेज बाजार,मेमोरियल हॉस्पीटल कुठल्या पुरात बुडविले याची काळजी करण्यापेक्षा यातील तुम्ही काय काय केले ? हे जरा जनतेला सांगा,मतदारसंघातील शेतकरी बांधवानी उभा केलेला पाटण तालुक्याचा दुधसंघ मोडीत काढून वाडवडिलांनी उभा केलेला खाजगी दुध संघ चालविणाऱ्या सत्यजितसिंह पाटणकरांना माझे नेतृत्वाखालील संस्थाचे काय झाले हे विचारण्याचा नैतिक अधिकार तरी आहे काय? याचा त्यांनी विचार करावा.पन्नाशी ओलंडलेल्या युवा नेत्यांनी राजकारणात,समाजकारणात आल्यापासून पाटण मतदारसंघातील किती बेरोजगारांना नेाकऱ्या मिळवून दिल्या हे उघडपणे जाहीर करावे.स्वत: संपुर्ण आयुष्यात डोळयाला दिसेल असे काही केले नाही,कोणता प्रकल्प उभा केला नाही आणि निघाले दुसऱ्यांच्या संस्थांची मापे काढायला.मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आमदारांना देता येत नाहीत असे सांगणाऱ्या सत्यजितसिंहांना माझा सल्ला राहील तुमच्यात एवढीच हिंमत असेल तर मी वाडयाखाली जनतेसमोर येण्याचे माझे आवाहन पहिले स्विकारा, बैठकामध्ये पोपटपंची अनेकांना करता येते परंतू प्रत्यक्षात वेळ आल्यावर अनेकांची बोबडी वळते तशीच परिस्थिती सध्या तुमची झाली आहे त्यामुळे रोज उठून तोच तोच विषय घेवून बातम्या प्रसिध्द करवून आणायच्या असल्या आरोपांना, प्रश्नांना आणि बातम्यांना ना कधी मतदारसंघातील जनतेने भीक घातली आहे ना मी. मला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला दयायला एका पायावर तयार आहे परंतू उत्तरे पत्रकातून घेण्यापेक्षा बच्चूदादा जरा हिम्मत करा वाडयाच्या खाली येण्याची मग कळेल कोण कर्तृत्ववान आहे आणि कोण कर्तृत्वशुन्य.पाटण मतदारसंघातच येण्याअगोदर तुमची बोबडी वळतेय तर कोयना दौलत खुप लांब आहे असा टोला आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना लगाविला आहे.

पाटण तालुक्यातील बौध्द, मातंग वस्तीतील विकासकामांना ५० लक्ष रुपयांचा निधी मंजुर.






           दौलतनगर दि.१०:- सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील बौध्द,मातंगवस्तीतील अंतर्गत रस्ते करण्याच्या कामांना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.सुरेश खाडे यांचेकडे मागणी केलेप्रमाणे त्यांनी पाटण तालुक्यातील ४ गांवातील बौध्द, मातंगवस्तीमध्ये ५० लक्ष रुपयांची विविध विकासकामे करण्याकरीता निधीस मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी दिली आहे.
                    सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील बौध्द, मातंगवस्तीमध्ये अंतर्गत रस्ते करण्याच्या कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करणेकरीता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.सुरेश खाडे यांचेकडे पावसाळी अधिवेशनामध्ये मागणी केली होती त्यानुसार त्यांनी पहिल्या टप्पयात पाटण तालुक्यातील ०९ गावांतील विविध विकासकामांना ०१ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला असून निधी मंजुरीचा शासन निर्णय शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि.१६ ऑगस्ट, २०१९ रोजी पारित केला आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी दि.०६ सप्टेंबर,२०१९ रोजी दुसरा शासन निर्णय पारीत करुन या निर्णयामध्ये पाटण तालुक्यातील ०४ गावांतील बौध्द,मातंगवस्तीमधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा समावेश केला असून समावेश असणारी कामे आडदेव येथील बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १५ लाख,सळवे येथील बौध्दवस्तीतील  अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १५ लाख,मुळगांव येथे मातंगवस्ती येथील अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १० लाख,सातेवाडी नाटोशी येथील मातंगवस्ती व चर्मकारवस्ती येथील अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १० लाख असा एकूण ५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.पाटण तालुक्यातील बौध्द, मातंग व दलितवस्तीतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते तसेच संरक्षक भिंती बांधणे अशा विविध विकासकामांना आवश्यक असणारा १.५० कोटी रुपयांचा निधी दोन टप्प्यांमध्ये राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.सुरेश खाडे यांनी मंजुर केलेबद्दल ना.सुरेश खाडे यांचे आभार व्यक्त केले आहेत दरम्यान यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून या कामांच्या तातडीने निविदा प्रसिध्द कराव्यात अशा सुचनाही दिल्या आहेत लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.