दौलतनगर दि.१०:- सन
२०१९-२० या आर्थिक वर्षासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास
योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील बौध्द,मातंगवस्तीतील अंतर्गत रस्ते करण्याच्या कामांना
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.सुरेश खाडे यांचेकडे मागणी केलेप्रमाणे त्यांनी
पाटण तालुक्यातील ४ गांवातील बौध्द, मातंगवस्तीमध्ये ५० लक्ष रुपयांची विविध
विकासकामे करण्याकरीता निधीस मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी
दिली आहे.
सन
२०१९-२० या आर्थिक वर्षासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास
योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील बौध्द, मातंगवस्तीमध्ये अंतर्गत रस्ते करण्याच्या कामांना
आवश्यक असणारा निधी मंजुर करणेकरीता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.सुरेश खाडे
यांचेकडे पावसाळी अधिवेशनामध्ये मागणी केली होती त्यानुसार त्यांनी पहिल्या
टप्पयात पाटण तालुक्यातील ०९ गावांतील विविध विकासकामांना ०१ कोटी रुपयांचा निधी
मंजुर केला असून निधी मंजुरीचा शासन निर्णय शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभागाने दि.१६ ऑगस्ट, २०१९ रोजी पारित केला आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये
त्यांनी दि.०६ सप्टेंबर,२०१९ रोजी दुसरा शासन निर्णय पारीत करुन या निर्णयामध्ये
पाटण तालुक्यातील ०४ गावांतील बौध्द,मातंगवस्तीमधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा
समावेश केला असून समावेश असणारी कामे आडदेव येथील बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता
सुधारणा करणे १५ लाख,सळवे येथील बौध्दवस्तीतील अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १५ लाख,मुळगांव येथे
मातंगवस्ती येथील अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १० लाख,सातेवाडी नाटोशी येथील
मातंगवस्ती व चर्मकारवस्ती येथील अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १० लाख असा एकूण ५०
लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.पाटण तालुक्यातील बौध्द, मातंग व
दलितवस्तीतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते तसेच संरक्षक भिंती बांधणे अशा विविध
विकासकामांना आवश्यक असणारा १.५० कोटी रुपयांचा निधी दोन टप्प्यांमध्ये राज्याचे
सामाजिक न्यायमंत्री ना.सुरेश खाडे यांनी मंजुर केलेबद्दल ना.सुरेश खाडे
यांचे आभार व्यक्त केले आहेत दरम्यान यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित
अधिकाऱ्यांची बैठक घेवून या कामांच्या तातडीने निविदा प्रसिध्द कराव्यात अशा सुचनाही
दिल्या आहेत लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होणार असल्याचेही आमदार शंभूराज
देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment