Tuesday 17 September 2019

आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली विकासप्रवाहात सामील झाल्याचा आनंद. सर्वांना बरोबर घेवून अधिक वेगाने विकास करणार आमदार शंभूराज देसाईंची जाहीर मेळाव्यात ग्वाही.





दौलतनगर दि.:- पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्कृष्ट संसदपटू शंभूराज देसाई यांचे पाच वर्षात मतदारसंघात सुरु असलेले विकासात्मक कामामुळेच आम्ही त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर आणि उघड प्रवेश करीत असून आम्हाला आमदार शंभूराज देसाईंच्या सोबतीने विकासप्रवाहात सामील झाल्याचा आम्हाला आनंद होत असल्याचे जाहीर मत पाटण तालुक्यातील १०२ गावांतील पाटणकर गटातील १६२१ कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी दौलतनगर येथील जाहीर मेळाव्या दरम्यान दिले.विकासाची दुरदृष्टी असणारे आमदार शंभूराज देसाई हेच मतदारसंघाचा कुशलपणे विकास करु शकतात अशी आमची खात्री झाल्यानेच आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य केले असून याचा आम्हाला अजिबात पश्चाताप नसल्याचेही १६२१ कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.नवे जुने न करता सर्वांना बरोबर घेवून अधिक वेगाने मतदारसंघाचा विकास करणार असल्याची ग्वाही आमदार शंभूराज देसाईंनी आज मेळाव्यात उपस्थित सर्व पाटणकर गटातून शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्यांना दिली.
                                 दौलतनगर ता.पाटण येथे आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली गत महिन्याभरामध्ये शिवसेना पक्षात १०२ गांवातील पाटणकर गटाच्या १६२१ कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला असून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलेल्या या १०२ गावातील १६२१ कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांचा जाहीर मेळावा आमदार शंभूराज देसाईंच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत केला होता.याप्रसंगी प्रवेश केलेले सर्वच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी या मेळाव्यास आर्वजुन उपस्थित होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्यासह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील प्रमुख सर्व पदाधिकारी व १०२ गावातील पाटणकर गटाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे जाहीर प्रवेश शिवसेना पक्षात घडवून आणणारे देसाई गटाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
                          याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,गत महिन्याभरात आपले पारंपारिक विरोधक असणाऱ्या पाटणकर गटातील त्यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पाटणकर गटाला कंटाळून माझे नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला आजअखेर पाटण तालुक्यातील १०२ गावातील १६२१ पाटणकर गटाच्या प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी हे शिवसेना पक्षात दाखल झाले आहेत.गत पाच वर्षात प्रत्येक गांवात विकासाचे प्रलंबीत काम देण्याचे आपण काम केल्यामुळेच विकासाच्या प्रवाहापासून अनेक वर्षे दुर राहिलेल्या नागरिकांनी आणि महिलांनी मोठया संख्येने विकासाच्या प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेवून काम करणाऱ्या नेत्याला जाहिर पाठींबा देण्याची भूमिका या नागरिकांनी आणि महिलांनी घेतल्यामुळेच एवढया मोठया प्रमाणात नागरिक व महिला एकत्र आपणांस पहावयास मिळत आहेत. आतापर्यंत विकासाच्या अपेक्षित या १०२ गावांतील १६२१ नागरिक आणि महिला होत्या परंतू त्यांचा मुलभूत विकास त्यांच्या यापुर्वीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या चिरंजीवाकडून न झाल्यानेच या नागरिकांमध्ये आणि महिलांमध्ये परिवर्तन झाले आणि माझे नेतृत्व स्विकारले याचा मला खुप आनंद आहे. पाटणकर गटाला कंटाळून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलेल्या सर्व पुरुष आणि महिलांचे,मातांचे मी शिवसेना पक्षात पक्षाचा आमदार या नात्याने जाहीर स्वागत करतो.तुम्ही आता आमचे झाला आहात त्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज नाही. ज्या विकासाच्या मुद्दयासाठी आपण एकत्र येवून माझेवर विश्वास दाखविला तो विश्वास सार्थ करण्याचेच काम मी भविष्यात करणार असून नवे जुने पदाधिकारी,कार्यकर्ते असा भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेवून अधिक वेगाने आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यास मी कटीबध्द आहे.असे सांगून ते म्हणाले,२०१४ च्या विधानसभा निवडणूकीत पाटण मतदारसंघातील जनतेने मोठया विश्वासाने १८८२४ मताधिक्क्याने मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली.जनतेने दिलेल्या संधीचे मी सोनंच करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यामुळेच पाच वर्षात १७६६ कोटी ७९ लाख रुपयांचा विकासनिधी पाटण मतदार संघाच्या विकासासाठी आणू शकलो,जनतेचे आर्शिवाद आणि तुम्हा कार्यकर्त्यांचे पाठबळ यामुळेच हे सर्व मला शक्य झाले. शिवसेना पक्षात पाटणकर गटाच्या नेतृत्वाला कंटाळून रोज नव्याने अनेक गांवाचा जाहीर प्रवेश होत आहे यावरुनच मतदार संघाचे विकासात्मक नेतृत्व कोण आहे हे सिध्द होत आहे.आज याठिकाणी जमलेले सर्व पाटणकर गटातील कार्यकर्ते व पदाधिकारी शिवसेना पक्षात ठाम आहेत हे आजच्या उपस्थितीवरुन जाहीरपणे स्पष्ट होत आहे असेही आमदार शंभूराज देसाई शेवठी म्हणाले.
चौकट:- उपस्थितांनी हात वर करुन दिले आमदार शंभूराज देसाईंना पाठबळाचे वचन.
           जाहीर मेळाव्याकरीता उपस्थित राहिलेल्या पाटणकर गटातील कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी सभागृहात आमदार शंभूराज देसाईचे भाषण सुरु असताना आमदारसाहेब आम्ही तुमच्या सोबत कायम राहणार आहे असे सांगण्याकरीता हात वर केले व आमदार शंभूराज देसाईंना हात उंचावूनच पाठबळाचे वचन दिले.
चौकट:- १६२१ पदाधिकारी व सक्रीय कार्यकर्ते यांनी पाटणकरांना का सोडले याचा पाटणकरांनी विचार करावा.
           गत महिन्याभरात पाटण तालुक्यातील १०२ गावातील १६२१ जनतेने पाटणकरांचे नेतृत्व धुडकारुन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षात प्रवेश केलेली जनता शिवसेना पक्षाच्या आणि माझ्या पाठीशी ठाम उभी आहे हे आजच्या मेळाव्यावरुन स्पष्ट झाले असून माझे नेतृत्व स्विकारलेल्या १६२१ पदाधिकारी व सक्रीय कार्यकर्ते यांनी पाटणकरांना निवडणूकीच्या तोंडावर का सोडले याचा विचार पाटणकर पितापुत्रांनी करावा असा सल्लाही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी दिला...

No comments:

Post a Comment