दौलतनगर दि.२६:- लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या सुज्ञ सभासदांनी आणि कारखान्यांस ऊस
पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनी माजी आमदार पुत्र सत्यजितसिंह पाटणकरांना देसाई
कारखान्याकडे ढुंकुनही न पाहण्याचा सल्ला अनेक निवडणूकामधून दिला असताना येवू नको
तर कुठल्या गाडीत बसू अशी अवस्था माजी आमदार पुत्रांची झाली आहे.निवडणूक कुठलीही
असली तरी कारखान्यावर बोलण्याशिवाय यांचेकडे दुसरे काहीच नाही आपल ठेवायचं झाकून
अन् दुसऱ्याच बघायचं वाकून ही त्यांची सवय जाता जाईना झाली आहे. सत्यजितसिंह
पाटणकरांनी देसाई कारखान्याच्या एफआरपीची काळजी करण्यापेक्षा त्यांच्या पिताश्रींनी
आणि त्यांनी २० वर्षापासून घोषणा करीत असलेल्या कोयना शुगर का पाटण शुगर फॅक्टरीची वीट आदी
रचावी मगच शेतकऱ्यांच्या हक्काच्या देसाई कारखान्याची मापे काढावीत असा प्रतिटोला
आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना लगाविला आहे.
तारळे विभागातील राहूडे व महाडिकवाडी नुने येथील
जाहीर प्रवेश सभेत आमदार शंभूराज देसाई बोलत होते.यावेळी तारळे विभागातील सर्व
संस्थांचे विविध पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी बोलताना आमदार
शंभूराज देसाई म्हणाले,येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत सत्यजितसिंह पाटणकर
राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी करण्यास इच्छूक आहेत. आता राज्यात राष्ट्रवादी
पक्षाची काय अवस्था झाली आहे हे आपण रोजच पहात आहोत त्याच्याहून वाईट परिस्थिती
पाटणमधून उमेदवारी मागणाऱ्यांची झाली आहे.त्यांच्या पिताश्रींचे नेतृत्व मानणारे
१०८ गावांतील सुमारे १८६१ त्यांचे प्रमुख सक्रीय कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी
माझे नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.लोकसभा निवडणूकीवेळी आपण
शिवसेनेच्या उमेदवाराला मला मागील विधानसभा निवडणूकीला जेवढे मताधिक्क दिले तेवढेच
मताधिक्कय दिले असून या मताधिक्कयामध्ये आता या १८६१ मतदारांची वाढ झाली आहे
त्यामुळे २० हजारांहून अधिक मतांनी मोठा पराभव समोर दिसत असल्याने माजी आमदारपुत्र
सैरभैर झाले आहेत निवडणूकीच्या तोंडावर काय करु आणि काय नको अशी त्यांची अवस्था
झाली आहे.पाच वर्षात निवडणूकीच्या तोंडावर मतदारांच्या पुढे मते मागायला काहीतरी
मुद्दा पाहिजे म्हणून देसाई कारखान्याचा अपप्रचार करण्याचा नेहमीचाच उद्योग
सत्यजितसिंहाकडून सुरु आहे.परंतू याचा काहीएक परिणाम मतदारसंघातील मतदारांवर होणार
नाही कारण देसाई कारखान्याचा कारभार आपण ३३ वर्षे अत्यंत पारदर्शक आणि सभासदांच्या
हिताच्या दृष्टीनेच राबविला आहे.म्हणून कारखान्याच्या सुज्ञ सभासदांनी या माजी
आमदार पुत्रांना एकदा नव्हे अनेकदा देसाई कारखान्याकडे तुम्ही ढुंकुनही पाहू नका
तुमच्या सल्लयाची आम्हाला गरज नाही असा उघड सल्ला मताच्या रुपाने सभासदांनीच दिला
आहे.
एफआरपी दयायला लावली म्हणणाऱ्या सत्यजितसिंहांना साखर
उद्योगातले काय कळते, स्वत:चा घोषणा केलेल्या खांडसरी फॅक्टरी आदी उभी करा नुसत्या
घोषणांवर किती दिवस तालुक्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल करणार आहात ? सत्यजितसिंह
पाटणकर तुम्हाला सहकारातले किती ज्ञान आहे हे तुमच्या वक्तव्यावरुनच लक्षात आले.
शासनाकडून आमचे कारखान्याला येणेबाकी असल्याचा कांगावा करण्याची काहीएक आम्हाला गरज
नाही जे आहे ते आहे तेच सभासदांच्या पुढे आम्ही मांडले आहे.शेतकऱ्यांना दयायला
आमच्याकडे पैसे नाहीत असे आम्ही कधीही शेतकऱ्यांना सांगितले नाही.कारखान्याच्या
शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा निवडणूकीकरीता वापरण्याची वेळ माझेवर कधी आली नाही
सत्यजितसिंह पाटणकरांनी त्याची काळजी करु नये.सगळया संस्था खाजगी करुन आपण आणि
आपल्या पिताश्रींनी तालुक्यातील किती शेतकऱ्यांचे भले केले आहे हे अवघा तालुका
जाणतो.एफआरपीचा मुद्दा विधानसभेच्या निवडणूकीत अडचणीचा येवू शकतो असल्या वावडया
उठविण्याची गरज तुम्हाला असेल मला नाही कारण निवडणूक कारखान्याची नाही विधानसभेची
आहे.विधानसभेचा सदस्य म्हणून जनतेने माझेवर टाकलेल्या विश्वासातून जनतेला भरभरुन
देण्याचे काम मी केले आहे आणि याचे धडधडीत पुरावे जनतेनेच तुम्हाला दिले आहेत.
विधानसभेच्या निवडणूकीला सामोरे जाताना तुम्ही पाच वर्षात जनतेसाठी काय केले हे
सांगा सारखे सारखे कारखान्यावर बोलून आपला बालिशपणा सारखा सारखा सिध्द करुन दाखवू
नका.आणि राहता राहिला विषय सुट्टी देण्याचा व पळता भूई थोडी होण्याचा तर
सत्यजितसिंह पाटणकर घोडमैदान लांब नाही त्यामुळे थोडासा धीर धरा महिना सुध्दा राहिला नाही निवडणूकीला मतदार संघातील जनतेनेच
तुम्हालाच कायमची सुट्टी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे येत्या २४ तारखेला
तो तुमच्या लक्षात येईल.मग बसा खांडसरी उभी करीत असा टोलाही आमदार शंभूराज
देसाईंनी शेवठी बोलताना लगाविला.
No comments:
Post a Comment