दौलतनगर दि.१०:-सर्वसामान्यांचा लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण
पाटण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई आहेत.आमदार शंभूराज
देसाईंचे कार्य पाटण विधानसभा मतदारसंघातील कानाकोपऱ्यात पोहचले आहे. पाच
वर्षाच्या कालावधीत त्यांनी कोटयावधी रुपयांचा कधीही न होणारा विकास मतदारसंघातील
डोंगर कपारीत पोहचविला आहे.त्यांच्या कामांची पोहचपावती तारळे विभागातील डोंगरावर
वसलेल्या फडतरवाडी घोट येथील एका ७० वर्षीय वयोवृध्द आज्जींनी फडतरवाडी येथील
कार्यक्रमात दिली. लेकरा इतक्या वर्षात मी रहात असलेल्या फडतरवाडी सारख्या वाडीला पिण्याच्या
पाण्याची सोय नव्हती ती तु करुन दाखवलिस म्हणून मी स्वता:साठी पै पै साठवलेले ३४० रुपये आहेत ते तुला बक्षिस म्हणून
देण्यासाठी आणले आहेत. लेकरा,ते तेवढे घे,असे भावनिक बोल बोलून वैजयंता मारुती
साळुंखे रा.फडतरवाडी घोट या वयोवृध्द आज्जींनी आमदार शंभूराज देसाईंना ३४० रुपये
बक्षिस म्हणून दिले.व त्यांच्या कार्याचे तोंडभरुन कौतुक केले.
तारळे विभागातील फडतरवाडी घोट
येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपुजन कार्यक्रमाकरीता आमदार शंभूराज देसाई
फडतरवाडी याठिकाणी गेले होते.भूमिपुजनाचा समारंभ व मान्यवरांची भाषणे संपल्यानंतर
वैजयंता मारुती साळुंखे या ७० वर्षीय वयोवृध्द आज्जीं आमदार शंभूराज देसाईंची भेट
घेणेकरीता समोर आल्या आणि त्यांनी आमदार शंभूराज देसाईंना हातातून आणलेली ३४०
रुपयांची साठविलेली बारकी थैली हातात देत लेकरा, तुझे आजोबा लोकनेते यांनी पाटण
तालुक्याकरीता केलेले कार्य खुप मोठे आहे मी ५० वर्षापासून या वाडीत रहात आहे या
वाडीला पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती पिण्याच्या पाण्याची योजनेची सुरुवात
करायला तुझ्या कारकीर्दीत वाडीला रस्ता झाला, पिण्याच्या पाण्याच्या सुरुवात
करायला गावात येणार आहे म्हणून समजले आमचा तारळे भाग विकासकामांनी नटविला आहेस तेव्हा
तुला बक्षिस देण्यासाठी माझेसाठी साठवून ठेवलेले ३४० रुपये घेवून आले आहे तेवढे
माझे बक्षिस घे, असा आग्रह या आज्जींनी आमदार शंभूराज देसाईंना धरला आणि आमदार
देसाईंच्या हातात ३४० रुपयांची साठविलेली
बारकी थैली दिली. आमदार शंभूराज देसाईंनीही या आज्जींना आपण दिलेले बक्षिस मला
लाखमोलाचे आहे. ते मी कधीही विसणार नाही, ते मी कायम जपून ठेवणार आहे असे सांगून
त्यांनी वैजयंता मारुती साळुंखे या वयोवृध्द आज्जींचे आभार मानले. या बक्षिसाची
चर्चा संपुर्ण तारळे विभागात सुरु होती.
No comments:
Post a Comment