Tuesday 10 September 2019

सत्यजितसिंह, यापुर्वी शंभरवेळा समोरा समोर येण्याचे दिलेले आवाहन पहिले स्विकारा, मगच कोयना दौलतवर यायची वल्गना करा. आमदार शंभूराज देसाईंचे सत्यजितसिंह पाटणकरांना सल्ला.





दौलतनगर दि.१०:- सत्यजितसिंह पाटणकर,माझे कर्तृत्व पाटण मतदारसंघातील जनतेने कधीच सिध्द करुन दाखविले आहे त्यासाठी मला स्वत: तुमच्यासारखी स्वत:चीच टिमकी वाजवून घेण्याची गरज नाही.आपलेच कर्तृत्व अजून सिध्द व्हायचे आहे आणि आपले निष्क्रीय कर्तृत्व सिध्द करायला मतदारसंघातील जनताच तयार नाही. त्याला माझा काय दोष? आपण किती कर्तृत्वान नेते आहात हे पाटण मतदारसंघातील जनतेला चांगलेच माहिती आहे.नुसत्या टिवल्या बावल्या करुन तेच तेच प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मतदारसंघातील जनता थारा देत नाही. याचा विसर पडू देवू नका? शिवसेना पक्षात येणाऱ्या तुमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची दौलतनगरवरील गर्दी पाहून तुमची बोबडी वळली असल्याने काहीही बरळण्याचे उद्योग तुम्ही सुरु केला असला तरी जनतेच्या मनावर त्याचा काहीएक परीणाम होणार नाही.कारण मतदारसंघातील जनतेने त्यांचा कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी निवडला आहे.मला केलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी आहेत ना? मग ही उत्तरे पत्रकातून घेण्यापेक्षा मी जे वाडयाच्या खाली जनतेसमोर येण्याचे आवाहन तुम्हाला केले आहे ते तुम्ही पहिले स्विकारा आणि मगच कोयना दौलतवर येण्याची भाषा करा. असा सल्ला आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना तारळे येथे दिला असून पाटणमध्ये येईना अन् म्हणे कोयना दौलतवर येतो असा टोलाही त्यांनी लगाविला आहे.
          तारळे ता.पाटण विभागामध्ये आमदार शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत मंजुर झालेल्या घोट बोर्गेवाडी  तसेच नुने गावपोहोच रस्ता,अर्थसंकल्पातून मंजुर आंबळे येथील मोठया पुलाचे त्याचबरोबर तारळे स्टॅन्ड ते ढोरोशी फाटा रस्ता,कोजंवडे ते कडवे,आवर्डे ते मुरुड रस्ता,जाधववाडी नुने पोहोच रस्ता फडतरवाडी घोट पिण्याच्या पाण्याची योजना,घोट येथील पिण्याच्या पाण्याची योजनांच्या एकूण १३ कोटी ९२ लाख ७६ हजार रुपयांच्या कामांचे भूमिपुजन व वजरोशी येथील सेवा सोसायटीच्या नुतन इमारतीचे उदघाटन अशा आयोजीत संयुक्तीक कार्यक्रमानंतर तारळे ता.पाटण येथील जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बबनराव शिंदे,संचालक गजानन जाधव, सेामनाथ खामकर,बबनराव भिसे, शिवदौलत बँकेचे व्हा.चेअरमन संजय देशमुख,संचालक अभिजीत पाटील,रणजित पाटील,नामदेवराव साळुंखे, अशोकराव शिंदे,माणिक पवार,विजय पवार फौजी,विकास जाधव,एस.के.वाघडोळे,गौरव परदेशी आदी मान्यवरांसह तारळे विभागातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
             याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,कर्तृत्वशुन्य माजी आमदार पुत्र सत्यजितसिंह पाटणकर आपले कर्तृत्व काय आहे हे मी सांगण्यापेक्षा मतदारसंघातील जनतेनेच तुम्हाला २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत पहिल्याच झटक्यात तुम्हाला दाखवून दिले आहे.१८८२४ इतक्या मताधिक्क्याचा फटका तुम्हाला देवून  माझ्या शिवसेना पक्षाच्या भाषेतच सांगायचे झाल्यास आपल्या निष्क्रीय नेतृत्वाला जनतेनेच फटकारे मारले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत गतवेळेप्रमाणे शिवसेना भाजप युतीचेच सरकार पुन्हा सत्तेवर येणार असल्याने आणि दौलतनगरला माझे निवासस्थानी तुमच्या कर्तृत्वशुन्य नेतृत्वाला कायमचा रामराम करुन तुमचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने माझे कर्तृत्ववान नेतृत्व स्विकारुन शिवसेनेत जाहीर प्रवेश करीत आहेत.यावरुनच आपले कर्तृत्व काय आहे हे जाहीरपणे सिध्द होत आहे.एकदा पंचायत समितीचा सभापती होण्याची जनतेने संधी दिली तर या महाशयांना मतदारसंघाचा आमदार होण्याची दिवास्वप्ने पडू लागली आहेत. आमदारकीची दिवास्वप्ने पाहणारे सत्यजितसिंह पाटणकर आपण आतापर्यंत स्वकर्तृत्वावर पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेकरीता केले तरी काय ? हे उघडपणे जनतेला सांगू शकता का? सभापती असताना ज्यांना स्वत:च्या गांवात विकास करता आला नाही ते मतदारसंघाचा काय विकास करणार? मतदारसंघाचा विकास कसा करायचा याचा पहिल्यांदा अभ्यास करा टिवल्या बावल्या करण्याचे आता आपले वय राहिले नाही.मी देसाई कारखान्याची क्षमता का वाढविली नाही,शिवशंभो दुध संघ,शिवतेज बाजार,मेमोरियल हॉस्पीटल कुठल्या पुरात बुडविले याची काळजी करण्यापेक्षा यातील तुम्ही काय काय केले ? हे जरा जनतेला सांगा,मतदारसंघातील शेतकरी बांधवानी उभा केलेला पाटण तालुक्याचा दुधसंघ मोडीत काढून वाडवडिलांनी उभा केलेला खाजगी दुध संघ चालविणाऱ्या सत्यजितसिंह पाटणकरांना माझे नेतृत्वाखालील संस्थाचे काय झाले हे विचारण्याचा नैतिक अधिकार तरी आहे काय? याचा त्यांनी विचार करावा.पन्नाशी ओलंडलेल्या युवा नेत्यांनी राजकारणात,समाजकारणात आल्यापासून पाटण मतदारसंघातील किती बेरोजगारांना नेाकऱ्या मिळवून दिल्या हे उघडपणे जाहीर करावे.स्वत: संपुर्ण आयुष्यात डोळयाला दिसेल असे काही केले नाही,कोणता प्रकल्प उभा केला नाही आणि निघाले दुसऱ्यांच्या संस्थांची मापे काढायला.मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आमदारांना देता येत नाहीत असे सांगणाऱ्या सत्यजितसिंहांना माझा सल्ला राहील तुमच्यात एवढीच हिंमत असेल तर मी वाडयाखाली जनतेसमोर येण्याचे माझे आवाहन पहिले स्विकारा, बैठकामध्ये पोपटपंची अनेकांना करता येते परंतू प्रत्यक्षात वेळ आल्यावर अनेकांची बोबडी वळते तशीच परिस्थिती सध्या तुमची झाली आहे त्यामुळे रोज उठून तोच तोच विषय घेवून बातम्या प्रसिध्द करवून आणायच्या असल्या आरोपांना, प्रश्नांना आणि बातम्यांना ना कधी मतदारसंघातील जनतेने भीक घातली आहे ना मी. मला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला दयायला एका पायावर तयार आहे परंतू उत्तरे पत्रकातून घेण्यापेक्षा बच्चूदादा जरा हिम्मत करा वाडयाच्या खाली येण्याची मग कळेल कोण कर्तृत्ववान आहे आणि कोण कर्तृत्वशुन्य.पाटण मतदारसंघातच येण्याअगोदर तुमची बोबडी वळतेय तर कोयना दौलत खुप लांब आहे असा टोला आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना लगाविला आहे.

No comments:

Post a Comment