Saturday 21 September 2019

1766 कोटी 79 लाख रुपयांच्या विकासकामांच्या लेखाजोखा प्रकाशनानंतर 34 कोटी 77 लाख रुपयांच्या 123 कामांना मंजुरी. पाच वर्षात एकूण 1801 कोटी 56 लाख 28 हजार रुपयांची विविध विकासकामे मंजुर आमदार शंभूराज देसाई.




दौलतनगर दि.२1:- सन 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या कालावधीत पाटण विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मतदारसंघातील विविध विकासकामांकरीता 1766 कोटी 79 लाख 12 हजार रुपयांचा निधी मंजुर केला असल्याचा लेखाजोखा मागील महिन्यात प्रकाशित केल्यानंतर सन 2019 या आर्थिक वर्षात प्रस्तावित केलेल्या आणि मंजुरीच्या अपेक्षेत असणारी 108 कोटी 10 लाख 54 हजार रुपयांच्या निधीच्या कामांपैकी 123 विविध विकासकामांना आचारसंहितेच्या शेवठच्या क्षणापर्यंत 34 कोटी 77 लाख 16 हजार रुपयांचा निधी शासनाकडून मंजुर करुन घेण्यात यश आल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी दिली असून आमदार शंभूराज देसाईंनी सन 2014 ते 2019 या पंचवार्षिकमध्ये एकूण 1801 कोटी 56 लाख 28 हजार रुपयांचा निधी पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबीत कामांना युतीच्या शासनाकडून मंजुर करुन आणला असल्याचे जाहीर केले आहे.
                             पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने सन 2014 च्या विधानसभा निवडणूकीत आमदार शंभूराज देसाईंना 18,824 इतक्या भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतर सलग पाच वर्षे त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबीत राहिलेल्या विकासकामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करुन आणण्याकरीता आपली संपुर्ण राजकीय ताकत युतीच्या शासनाकडे वापरली आणि पाच वर्षात त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहराच बदलून टाकला.मतदारसंघातील प्रत्येक गांवामध्ये आणि वाडीवस्तीवर आमदार शंभूराज देसाईंच्या माध्यमातून अनेक प्रलंबीत विविध विकासकामे मार्गी लागली आहेत.पाच वर्षात त्यांनी मतदार संघातील विविध विकासकामांकरीता 1766 कोटी 79 लाख 12 हजार रुपयांचा निधी मंजुर करुन आणला मंजुर केलेल्या निधीचा आणि या निधीतून केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा त्यांनी पाटण मतदारसंघातील जनतेला अर्पण करण्याकरीता दौलतनगरला कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मोठा समारंभ घेवून पाच वर्षातील कामांचा आढावा देणारा अहवाल मतदारसंघातील गणवाईज प्रसिध्द करुन तो प्रकाशित केला.आणि केलेली विकासकामे त्यांनी मतदारसंघातील घराघरात पोहचविली या समारंभात त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला सन 2019 या आर्थिक वर्षात मंजुरीच्या अपेक्षेत असणारी 108 कोटी 10 लाख 54 हजार रुपयांच्या निधीची कामे प्रस्तावित केली असल्याचे जाहीर केले होते. लेखाजोखा प्रकाशनानंतर हा निधी मिळविण्याकरीता त्यांचे शासनाकडे आणि शासनाच्या संबधित विभागाकडे दिवसरात्र प्रयत्न सुरु होते त्यानुसार आचारसंहितेच्या शेवठच्या क्षणापर्यंत त्यांनी 123 विकासकामांकरीता 34 कोटी 77 लाख 16 हजार रुपयांचा निधी मंजुर करुन आणण्यात त्यांना यश मिळाले असून आमदार शंभूराज देसाईंच्या माध्यमातून या पाच वर्षामध्ये एकूण 1801 कोटी 56 लाख 28 हजार रुपयांचा निधी मंजुर झाला असून सातारा जिल्हयात सर्वात जास्त निधी विकासकामांकरीता आणण्यात ते प्रथम क्रंमाकात आहेत.आचारसंहितेच्या शेवठच्या क्षणापर्यंत त्यांनी मंजुर करुन आणलेल्या निधीमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दोन कामे 1 कोटी 87 लाख 06 हजार,जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत कार्यालये व  स्मशानभूमी शेड बांधणे व स्मशानभूमी रस्ता सुधारणा करणे या 12 कामांकरीता 68 लाख, क वर्ग तिर्थक्षेत्र विकास योजना 4 कामे 27.00 लाख,मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधा पुरविणे 2 कामे 12.00 लाख,रस्ते व पुल दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत 06 कामांकरीता 10 कोटी,नैसर्गिक आपत्ती निवारणांतर्गत धोकादायक परिस्थितीमध्ये असलेल्या गावांच्या तात्पुरते पुनर्वसन करण्याकरीता 08 कामे 2 कोटी 31 लाख 04 हजार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून 04 कामे 50 लाख,डोंगरी विकास निधी कार्यक्रमांतर्गत 05 कामे 39 लाख 15 हजार,स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत 16 कामे 1 कोटी 25 लाख 29 हजार,लघु पाटबंधारे विभागांतर्गत 09 कामे 1 कोटी 1 लाख 63 हजार,अल्पसंख्यांक वस्त्यांमध्ये मुलभूत/पायाभूत सुविधा पुरविणे 3 कामे 24 लाख, सर्वसाधारण व विशेष घटक साकव योजने अंतर्गत 06 कामे 1 कोटी 73 लाख 37 हजार, रस्ते विकास महामंडळांतर्गत ग्रामीण पायाभूत सुविधामधून रस्ते करणेकरीता 16 कामे 2 कोटी, कोयना पुनर्वसन निधीमधून कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसित गांवामध्ये नागरी सुविधांची कामे करण्याकरीता 34 कामे 11 कोटी 88 लाख 86 हजार व कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून 04 कामे 49 लाख 76 हजार असे एकूण  34 कोटी 77 लाख 16 हजार रुपयांच्या 123 विकास कामांना मंजूरी मिळविण्यात त्यांना यश मिळाले असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.आचारसंहितेच्या शेवठच्या क्षणापर्यंत आमदार शंभूराज देसाई हे आवश्यक असणारा निधी मिळविण्या करीता प्रयत्नशील असल्याचे पाहून निधी मंजुर झालेल्या 123 गावांतील जनतेने आमदार शंभूराज देसाईंचे जाहीर आभार मानले आहे.

No comments:

Post a Comment