दौलतनगर दि.२०:- कोयना
प्रकल्प टप्पा 1 व 2 अंतर्गत पाटण
तालुक्यातील कोयना पुनर्वसित गावठाणामधील
गांवातील नागरी सुविधांच्या ३४ कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करणेबाबत
राज्य शासनाचे महसूल व वन विभागाकडे मागणी
केलेनुसार महसूल व वन विभागाने 11 कोटी ८८ लाख रुपयांचा निधी
मंजूर केला असून सदरचा निधी मंजूर केल्याचे शासन निर्णय शासनाच्या महसूल व
वनविभागाने दि.१९.09.२०१९ रोजी पारित केले असल्याची माहिती
आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकांत म्हंटले आहे,महाराष्ट्र विधीमंडळाच्या सन २०१८ च्या पहिल्या अधिवेशनामध्ये कोयना
प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत व कोयना प्रकल्प टप्पा १ व २ अंतर्गत पाटण
तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधांच्या कामांना आवश्यक असणारा निधी
तातडीने राज्य शासनाने मंजूर करणेकरीता लक्षवेधी सुचना उपस्थित केली होती. सदर लक्षवेधी सुचनेवर झालेल्या चर्चेदरम्यान मदत व पुनर्वसन राज्यमंत्री
महोदय यांनी कार्यवाहीच्या अनुषंगाने आश्वासने दिली होती. या आश्वासनानंतर कोयना प्रकल्पातील पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधांच्या कामांना आवश्यक
असणारा निधी उपलब्ध करुन देणेबाबत राज्याचे महसूल विभागाचे मंत्री
ना.चंद्रकांतदादा पाटील व मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री ना.सुभाष देशमुख यांच्याकडे मी सातत्याने पाठपुरावा करीत होतो.त्यानुसार पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधांच्या 34
कामांना नुकताच 11 कोटी ८८ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने मंजूर केला असून
सदरचा निधी मंजूर केल्याचे शासन निर्णय शासनाच्या महसूल व वनविभागाने दि. 19.०९.2019
रोजी पारित केले आहेत. या 34 कामांमध्ये मिरगाव तोरणे येथे पाणी पुरवठा योजना 99.16 लाख, नहिंबे लाडवस्ती
शिवंदेश्वर पाणी पुरवठा योजना 95.35 लाख, करंजवडे शिवंदेश्वर येथे पाणी पुरवठा योजना
84.97 लाख, किसरुळे भराडवस्ती येथे पाणी पुरवठा योजना 84.19 लाख, पुनवली ढोकावळे येथे
पाणी पुरवठा योजना 92.16 लाख,काढोली सावंतवस्ती विंधन विहिरीवरील पाणी पुरवठा योजना
35.44 लाख, बाजे वरसरकुन येथे स्मशानभूमी शेड 2.80,चिरंबे विहे स्मशानभूमी शेड 2.74 लाख,जुंगठी येथे मागासवर्गीय रस्त्यावर छोटा
पूल व पोहोचरस्ता 18.36 लाख,बाजे वरसरकून येथे गाढखोप ते बाजे रस्त्यावर छोटया पुलाचे
बांधकाम 31.91 लाख,जुंगटी दिवशी सुतारवस्ती अंतर्गत मार्ग संधाणकीकरण 21.41 लाख, कुसवडे
झाकडे अंतर्गत मार्ग संधाणकीकरण 11.13 लाख,नहिंबे (तळीये) मोरी बांधकामे व डांबरीकरण
58.14 लाख,वाजेगाव बी मारुल पोहोच रस्ता डांबरीकरण 24.76 लाख,मिरगाव तोरणे रस्ता डांबरीकरण
58.55 लाख,किसरुळे ढाणकल पोहोच रस्ता डांबरीकरण 19.05 लाख,चिरंबे विहे- नहिंबे चिरंबे
ग्रामपंचायत कार्यालय 22.34 लाख,चिरंबे काढोली
ग्रामपंचायत कार्यालय 22.76 लाख,देवघर गोवारे ग्रामपंचायत कार्यालय 22.66 लाख,मिरगांव
(बोपोली) ग्रामपंचायत कार्यालय इमारत 22.84 लाख,नहिंबे (मेंढेघर) ग्रामपंचायत कार्यालय
इमारत 22.80 लाख,बाजे (व.स.) ग्रामपंचायत कार्यालय इमारत 22.79 लाख,चिरंबे (मणेरी)
ग्रामपंचायत कार्यालय इमारत 22.56 लाख,दास्तान (रासाटी) ग्रामपंचायत कार्यालय इमारत
22.78 लाख,किसरुळे शिंवेदश्वर येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत 22.96 लाख,ढोकावळे
(रिसवड) बस थांबा 3.18 लाख,गाढखोप (रासाटी) बस थांबा 3.०० लाख,जुंगटी दिवशी बसथांबा
3.०० लाख,देवघर गोवारे येथे पाणी पुरवठा योजना 85.97 लाख,मिरगाव चाफेर येथे पाणी पुरवठा
योजना 87.87 लाख,चिरंबे मणेरी अंतर्गत रस्ते दुरुस्ती 1९.३६ लाख,मानाईनगर येथे अंतर्गत रस्ते दुरुस्ती 3.70 लाख,रिसवड येथे शाळा
इमारतीच्या दोन खोल्यांच बांधकाम 13.57 लाख,वाजेगाव
बी मारुल पोहोच रस्ता डांबरीकरण 24.76 लाख या कामांचा समावेश असून
अशाप्रकारे एकूण ११ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजुर केला असून सदरच्या निधीमुळे
कोयना प्रकल्पातील पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधांतर्गत प्रलंबित राहिलेल्या
कामांना चालना मिळणार आहे.कोयना पुनर्वसित गावठाणांतील नागरी सुविधांच्या ३४
कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर केलेबदृल महसूल विभागाचे मंत्री
ना.चंद्रकांतदादा पाटील व मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री ना.सुभाष देशमुख यांचे आभारही आमदार देसाई यांनी शेवटी पत्रकांत मानले आहेत.
No comments:
Post a Comment