दौलतनगर दि.२३:- ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि. दौलतनगर मरळी ता. पाटण या कारखान्याने
हंगाम 2018-19 मध्ये गाळप केलेल्या संपूर्ण ऊसाची एफ.आर.पी.नुसार प्रतिटन रु.
2722/- प्रमाणे होणारी सर्वच्या सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाती दि.२३.०९.२०१९
रोजी वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दी
पत्रकांव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत
त्यांनी पुढे म्हंटले आहे की,कारखान्याने सन 2018-19 चे गळीत हंगामात 1,96315.307
मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 11.78% सरासरी साखर उताऱ्यांने 2,30,575 क्विंटल साखर
उत्पादन केले आहे. कारखान्याचे सन 2018-19 चे गळीत हंगामातील ऊसबिलाची एफ.आर.पी.
रक्कम प्र.मे.टन रुपये 2722.00 इतकी आहे. एफ.आर.पी.प्रमाणे एकूण गळीतच्या ऊसबिलाची
रक्कम रुपये 5343.70 लाख इतकी होत असून कारखान्याने आतापर्यंत रुपये 5109.26 लाख
रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली होती व उर्वरित एफ.आर.पी.प्रमाणे शिल्लक असणारी
रक्कम रुपये 234.44 लाख कारखान्याने आजरोजी दि. 23.09.2019 रेाजी ऊस
पुरवठादारांच्या बँक खाती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा मरळी
दौलतनगर येथे वर्ग केलेली आहे. सद्यस्थितीला सन 2018-19 चे गळीत हंगामातील कारखान्याकडे
ऊसबिलाची एफ.आर.पी.ची रक्कम थकीत नाही. एफ.आर.पी.प्रमाणे शिल्लक असणारी रक्कम
रुपये 234.44 लाख कारखान्याने दि. 23.09.2019 रेाजी ऊस पुरवठादारांच्या बँक खाती
जमा केली असलेबाबतचे लेखी पत्र बँकेच्या तपशिलासह साखर आयुक्त, जिल्हाधिकारी
सातारा व तहसिलदार पाटण यांना आज रोजी सादरही केले आहे.महाराष्ट्राचा सन 2018-19 चा
गळीत हंगाम संपलेपासून गेले 6 महिन्यात साखरेची बाजारातील कमी झालेली मागणी
वेळोवेळी विक्री दरामध्ये झालेला बदल कामगारांची देणी, वाहतुक खर्च वित्तीय
कर्जाची उपलब्धता आदी अनेक आव्हांनांना तोंड देत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी
साखर कारखान्याने सन 2018-19 च्या गळीत हंगामातील 100 टक्के एफ.आर.पी.रक्कम ऊस
उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली आहे.
दरम्यान साखर आयुक्तांनी
महसूल वसूली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीचे कारखान्यास काढलेले आदेश पाहून कारखान्याला
सतत पाण्यात पाहणाऱ्या अनेकांना आनंदाच्या उकळया फुटल्या होत्या परंतू कारखाना
कार्यक्षेत्रातील शेतकरी तसेच ऊस पुरवठाधारकांचा कारखान्यावर आणि कारखान्याच्या
व्यवस्थापनावर विश्वास असल्याने या आदेशाची काळजी न करता कारखान्याच्या
विश्वस्थांच्या मागे खंबीर उभा राहिला याचा आम्हाला आनंद आहे. ज्यांनी २० वर्षे
झाले कारखाना काढतोय, कारखाना काढतोय म्हणून पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांना फसवित
ठेवले त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर कारखान्याचे भूमिपुजन केले, भूमिपुजन
करुन अनेक दिवस उलटले तरी त्या कारखान्यांची साधी एक वीट उभी राहू शकली नाही
कारखान्यावर आणि कारखान्यांच्या व्यवस्थापनावर आरोप करणाऱ्यांनी घोषणा आणि
भूमिपुजन केलेल्या कारखान्याची पहिल्यांदा वीट रचावी आणि मगच आमचे नेते कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शंभूराज
देसाईंची मापे काढावित असा सल्लाही विरोधकांना कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील
यांनी पत्रकात दिला आहे.
No comments:
Post a Comment