Tuesday 24 September 2019

राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार शंभूराज देसाईंना पुन्हा आमदार करुन विधानसभेवर पाठवूया शिवसेना उपनेते प्रा.नितीन बानुगडे-पाटील यांचे आवाहन.



           
               दौलतनगर दि.२३:- दि.०१ मे,१९६० ला आपण महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली शिवसेना-भाजप पक्षाची १९९५ ते १९९९ आणि आताची  २०१४ ते २०१९ अशी दहा वर्षाची सत्ता सोडली तर महाराष्ट्र राज्यावर ५० वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती.५० वर्षे सत्तेवर असणाऱ्या या पक्षानी महाराष्ट्रात आमुलाग्र बदल घडविणे अपेक्षित होते परंतू ते त्यांना जमले नाही त्यासाठी राज्यात शिवसेना भाजप युतीचेच सरकार यावे लागले.२०१४ ला आपण सर्वांनी मोठया मताधिक्क्याने आमदार शंभूराज देसाईंना निवडून दिले आणि त्यांनी या पाच वर्षात पाटण मतदारसंघाचा कायापालट करुन दाखविला आता त्यांना राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा एकदा आमदार म्हणून त्यांना विधानसभेवर मागीलपेक्षा जादा मताधिक्कयाने पाठविणे आपल्या सर्वांची जबाबदारी असून येणाऱ्या निवडणूकीत ही जबाबदारी आपण लिलया पेलूया असे आवाहन शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे यांनी केले.
                                    दौलतनगर ता.पाटण येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित मी महाराष्ट्र निश्चिय मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उत्कृष्ट संसदपटू आमदार शंभूराज देसाई होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील यांच्यासह कराड पाटण तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, शिवसैनकांची प्रमुख उपस्थिती होती. 
                                      याप्रसंगी बोलताना प्रा. नितीन बानुगडे पाटील म्हणाले, उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी  मी महाराष्ट्र असा निश्चय करुन महाराष्ट्र एकजुटीने काम शिवसेना पक्षाने सुरु केले आहे. शिवसेनेच्या या भूमिकेला आपण सर्वांनी पाठबळ देणे अत्यंत गरजेचे आहे.मराठी हक्कासाठी लढणारा पक्ष म्हणून शिवसेना पक्षाची ओळख आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रश्न सोडवण्याकरिता विधानसभेवर भगवा फडकला पाहिजे आणि याकरीता आपण सर्वांनी पुन्हा एकदा २०१४ प्रमाणे यंदाच्या विधानसभेच्या निवडणूकीत आमदार शंभूराज देसाईंना भरघोस मतांनी निवडून देत पुन्हा विधानसभेवर पाठवून त्यांच्यावर राज्याचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी देण्याचे काम आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे.एक खमक्या आमदार आपण सर्व पाटण विधानसभा मतदारसंघ वाशियांनी शिवसेना पक्षाला मिळवून दिला आहे.त्यांनी या पाच वर्षात पाटण विधानसभा मतदारसंघात केलेले कार्य डोळे दिपवून टाकणारे आहे.मतदार संघातील प्रत्येक घटकाचे प्रश्न पोटतिडकीने मांडून ते सोडवून घेणेकरीता त्यांची सुरु असलेली धडपड ही आम्ही जवळून पाहिली आहे.पाटण मतदारसंघातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत आता त्यांच्यावर राज्याचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी मिळावी याकरीता आपण सर्वांनी कसोशिने प्रयत्न करणे गरजेचे आहे.आपल्या मतदार संघाचा कायापालट घडवून आणण्याकरीता पाच वर्षातून आपल्याला एकच दिवसाची संधी मिळते आणि ती असते निवडणूकीत आपला धाडसी लोकप्रतिनिधी ठरवून देण्याची हा एकच दिवस संपुर्ण पाच वर्षातील पुढील कार्याची दिशा ठरविणारा असतो याकरीता आपण या महिन्याभरातच काम करुन दाखवायचे आहे.असे सांगून त्यांनी शिवस्वराज्य यात्रा काढणारे राष्ट्रवादी कॉग्रेसवाले पंधरा वर्ष राज्यात सत्तेत होते त्यावेळी त्यांना शिवस्वराज्य आणि भगव्याचे महत्व कळलं नाही ते त्यांना आता कळू लागले आहे. असा टोला लगावून सातारा जिल्ह्यात सर्वाधिक जास्त विकासकामे आमदार शंभूराज देसाईंनी खेचून आणत पाटण मतदारसंघात विकासाची क्रांती घडवल्याचे सांगितले. 
                                      यावेळी आमदार शंभूराज देसाई म्हणाले की, पक्षाची संकल्पना कशी असावी याकरिता या मी महाराष्ट्र निश्चय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.१२ महिने 24 तास आपण लोकांच्यामध्ये  राहणारे कार्यकर्ते आहेत. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याकरिता आपण प्रयत्न केले आहेत. निवडणूक आल्यानंतर दारात जाणाऱ्यांपैकी मी नाही. माजी आमदार पाटणकरांच्या कारकिर्दीत जी कामे झाली नाहीत. ती कामे पूर्ण करण्याचे काम आपण पाच वर्षांत केले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एक नंबरची मते मिळवून मला पाटण मतदारसंघातील जनतेने आमदार केले आहे. त्याच पद्धतीने मीसुध्दा त्यांना दिलेले वचन आणि विकास कामे पूर्ण करण्याचे काम पाच वर्षात केले असून मागील महिन्यात पाच वर्षातील विकासकांमाचा लेखाजोखा प्रकाशित केल्यानंतर सन 2019 या आर्थिक वर्षात प्रस्तावित केलेल्या आणि मंजुरीच्या अपेक्षेत असणाऱ्या 123 विविध विकासकामांना आचारसंहितेच्या शेवठच्या क्षणापर्यंत 34 कोटी 77 लाख 16 हजार रुपयांचा निधी शासनाकडून मंजुर करुन आणता आला याचे मला समाधान असल्याचेही यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले.यावेळी जयवंतराव शेलार यांनी प्रस्ताविक केले. जिल्हा परीषद सदस्य प्रदीप पाटील यांनी आभार मानले. 


No comments:

Post a Comment