Monday, 20 August 2018

वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष जपण्याचेही काम करु या.- युवा नेते यशराज देसाई यशराज देसाई यांच्या हस्ते मरळी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.


      


                            

दौलतनगर दि. २०:  राज्य शासनाच्या वन विभागाने संपुर्ण राज्यामध्ये मोठया प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे.राज्यातील ३३ टक्के भूभाग वृक्षाखाली आणणे आवश्यक आहे.याकरीता वनविभागाच्या बरोबर विविध सामाजिक संस्था,शैक्षणिक विभाग,शाळा,महाविद्यालये,नगरपंचायती,ग्रामपंचायती याचेमार्फत सर्वत्र वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून केवळ वृक्षलागवड केली दाखविण्याकरीता वृक्षलागवड केल्याचे फोटो काढून प्रसिध्द करण्यापुरता हा उपक्रम हाती घेण्यात येवू नये तर वृक्ष लागवडीबरोबर लावलेल्या वृक्षाची जपणूक, त्याची वाढ होणकरीता काळजी घेण्याचेही काम सर्वांनी एकत्रित येवून करुया असे आवाहन युवा नेते यशराज देसाई यांनी केले आहे.
             मरळी ता.पाटण येथे मरळी ग्रामपंचायतीच्या वतीने दि.१४ ऑगस्ट रोजी १५ ऑगस्टच्या पुर्वसंध्येला युवा नेते यशराज देसाई यांचे हस्ते वृक्षलागवडीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जालंदर पाटील,पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,मरळी गावचे सरपंच राजाराम माळी,उपसरपंच विनोद कदम,संजय सणस,संतोष पाटसुते,विलास कदम,प्रशांत देसाई,पोलिस पाटील साईनाथ सुतार, ग्रामविकास अधिकारी गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
                 याप्रसंगी बोलताना युवा नेते यशराज देसाई म्हणाले, गत दोन वर्षामध्ये आपले संपुर्ण राज्यात प्रत्येकी २ कोटी व ४ कोटी वृक्षलागवड करण्याचे उदिष्ट राज्य शासनाच्या वन विभागाने केले होते तर यंदाच्या वर्षी एकूण १३ कोटी वृक्षलागवडीचे उदिष्ट शासनाने ठरविले आहे. हे आपण रोज वाचतो आहोत त्यानुसार राज्याच्या वनविभागाच्या बरोबरीने संपुर्ण राज्यातील विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक विभाग, शाळा, महाविद्यालये, नगरपंचायती,ग्रामपंचायती यांनी सहभाग घेवून वृक्षलागवड हा उपक्रम लोकचळवळ म्हणून आपण सर्वजण करीत आहोत.राज्य शासनाने आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून राज्य शासनाचा व शासनाच्या वन विभागाचा निर्धार पुर्णत्वाकडे नेणेकरीता वृक्षलागवडीचा उपक्रम केवळ दिखाव्यापुरता न होता. तो उपक्रम लोकचळवळीतून सर्वांनीच हाती घेण्याची आणि या वृक्षांची चांगल्या प्रकारे जपणूक करण्याची गरज आहे. सध्या झाडांची संख्या मोठया प्रमाणांत कमी झाली असल्याने सर्वांनाच अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळासारख्या आपत्तीला प्रतिवर्षी सामना करावा लागत असून पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत असल्याने आजही अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई निर्माण होत आहे.या सर्वातून मार्ग काढण्यासाठी शासनाने जनजागृती सुरु केली असून आपणही वृक्षलागवड करुन त्याचा एक भाग झालो आहोत. आज १५ ऑगस्टच्या पुर्वसंध्येला केवळ वृक्ष लावणे हा उपक्रम आपण करायचा नाही तर लावलेले वृक्ष चांगल्या प्रकारे जगले पाहिजे, वाढले पाहिजे याकरीता सर्वानीच प्रयत्न करायचे आहेत. आणि सर्वजण याकरीता प्रयत्नशील आहोत असे आपण मनाशी ठाम ठरवून भविष्यात आणखीन वृक्षांची लागवड करुन वृक्ष जगविण्यासाठी एकसंघ राहूया असेही आवाहन त्यांनी शेवठी बोलताना केले.उपस्थितांचे स्वागत माजी सदस्य जालंदर पाटील यांनी केले व आभार सरपंच राजाराम माळी यांनी मानले.


रविराज देसाई यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.



दौलतनगर दि.20 :- पाटण तालुक्याचे युवा नेते व मोरणा  शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांचा वाढदिवस रविवार दि. 12 ऑगस्ट, 2018 रोजी मोठया उत्साहात साजरा झाला.सकाळी श्री गणेश व साईबाबांच्या देवदर्शनानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर रविराज देसाई यांच्या सुविद्य पत्नी अस्मितादेवी देसाई यांनी औक्षण केले. यावेळी मॉसाहेब श्रीमती विजयादेवी देसाई, पाटण तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई,सौ.स्मितादेवी देसाई,चि.यशराज देसाई,जयराज देसाई, आदित्यराज देसाई, कु.ईश्वरी देसाई आणि रमेश देसाई यांच्यासह कुटुंबातील सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.       
                  वाढदिवसानिमित्त रविराज देसाई यांना दुरध्वनीवरुन सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंती छत्रपती शिवेंद्रसिहराजे भोसले, आमदार आनंदराव पाटील, आमदार मकरंद पाटील, नगरसेवक निशांत पाटील, आनंदराव कणसे, समीर गांधी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, प्रकाश्‍ देसाई, माजी उपसभापती डी.आर.पाटील या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.तालुक्यातील तसेच सातारा शहरातील कार्यकर्ते व चाहत्यांनी त्यांना सातारा येथील शिवविजय या त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, माजी चेअरमन दिलीपराव चव्हाण, शिवसेना पाटण तालुका संपर्कप्रमुख जयवंतराव शेलार, शिवसेना तालुकाप्रमुख राजेश चव्हाण,शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलिंद पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू, जालिंदर पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,आशिष आचरे, पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई, संतोष गिरी,ॲङ डी.पी.जाधव,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भरत साळूंखे, शंभूराज युवा संघटनेचे उपाध्यक्ष अभिजित पाटील,सचिव उत्तम मोळावडे, मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव डी. एम. शेजवळ,गुढेचे सचिन पाटील,मनोज मोहिते,नाना साबळे,संजय पाटील,अंकूश महाडिक,विजयराव मोरे,शिवाजीराव शेवाळे, टी.डी.जाधव, एकनाथराव जाधव,आप्पासाहेब मगरे, अब्दुलगणी इस्माईल चाफेरकर,बबन भिसे, जयवंतराव जानुगडे, दिपक गव्हाणे, शंकर गव्हाणे,नानासाहेब पवार, आनंदा मोहिते, गणेश भिसे, शरद देसाई, प्रा. विश्रांत कदम, उत्तमराव खराडे, अशोकराव खराडे, चेअरमन शंकर पाटील, महेश राजेमहाडीक, नारायण कारंडे, मरळीचे माजी सरंपच प्रवीण पाटील, विजयराव जंबुरे, अनिल निकम, अनिल खराडे, बाबाशेठ तांबोळी, दादासाहेब देसाई, बसाप्पा शिऊर, विकास गिरीगोसावी, शिवसेना उपतालुकाप्रमुख सचिन जाधव, प्रा. यशवंतराव काळे,सोनवडे अशोकराव घाडगे,महादेव पाटील, रघुनाथ माटेकर, सचिन कदम, शिवाजीराव देसाई विद्यालयाचे मुख्याध्यापक के.जे.चव्हाण,न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ धावडेचे मुख्याध्यापक एस.व्ही.रेवडे, यांच्यासह न्यू इंग्लिश नाटोशी, विजयादेवी देसाई ज्यूनिअर व सिनिअर कॉलेज,आय.टी.आय. व पॉलिटेक्निक कॉलेजचे शिक्षक,कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.


Sunday, 19 August 2018

पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळाने केली कै.रोहन तोडकर याचे कुटुंबियांना आर्थिक मदत. रविराज देसाई यांचे हस्ते सुपुर्द केला आर्थिक मदतीचा धनादेश.



दौलतनगर दि.1८ :-  मराठा आरक्षणासाठी राज्यामध्ये आंदोलनाचे रान पेटले असताना मुंबईतील दंगलीमध्ये बळी गेलेल्या पाटण तालुक्यातील खोणोली गावच्या २१ वर्षीय कै.रोहन तोडकर या युवकाच्या कुटुंबिंयाना आधार देणेकरीता पाटण तालुका सातारा मित्र मंडळाचेवतीने मित्र मंडळाचे व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे हस्ते कै. रोहन तोडकर याचे वडील श्री. दिलीप तोडकर यांना आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.
         नवी मुंबई येथील कोपरखैरणे येथे नोकरीकरीता गेलेल्या रोहन तोडकर या २१ वर्षीय तरुणाचा झालेल्या मृत्यूमुळे तोडकर कुटुंबावर मोठा आघात झाला असून घरीची आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याने आपल्या कुटुंबाच्या उदर-निर्वाहासाठी मुंबई येथे नोकरीला गेलेला  घरातला कमवता एकुलता एक मुलाच्या  अचानक जाण्याने तोडकर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी या कुटुंबांला मुख्यमंत्री यांचे आश्वासनानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन या कुटुंबाला दिले असून सदरची मदत मिळणेकरीताचा प्रस्ताव लवकरात लवकर मुख्यमंत्री यांचे कार्यालयाकडे पाठविणेकरीता आमदार शंभूराज देसाई यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. येत्या दोन तीन दिवसात हा प्रस्ताव मुख्यमंत्री यांचे कार्यालयाकडे पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान या तोडकर कुटुंबियांची पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळाचे व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई व मित्र मंडळातील पदाधिकारी यांनी कुटुंबिंयाची खोनोली येथे जावून प्रत्यक्ष भेट घेतली व या कुंटुंबातील सदस्यांचे त्यांनी सात्वंन केले. तसेच पाटण तालुका सातारा रहिवाशी  मित्रमंडळाच्यावतीने  रविराज देसाई यांचे हस्ते कै. रोहन तोडकर याचे वडील  श्री. दिलीप तोडकर यांना आर्थिक मदतीचा धनादेश देऊन तोडकर कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला आहे. यावेळी पाटण तालुका सातारा रहिवाशी मंडळातील अनिल निकम, अनिल खराडे, देवानंद चव्हाण, रघुनाथ मगर, तुकाराम मोळावडे, अविनाश मोरे, शंकर मोरे, नरेंद्र शेलार, चंद्रकांत निकम, दत्तात्रय कुंभार, भरत साळुंखे, प्रकाश नेवगे, जयदिप पाटील, बळवंत तोडकर,उमेश पवार या प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Friday, 17 August 2018

आमदार शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात महामॅरेथॉन बैठका. विविध विषयांवर चर्चा व तातडीने निर्णय.




दौलतनगर दि.18:  गुरूवार दिवस पाटण तालुक्यातील तहसिल कार्यालयात महामॅरेथॉन बैठकांचा ठरला.पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली यादिवशी तहसिल कार्यालयात पाटण तालुक्यातील विविध विषयासंदर्भात महामॅरेथॉन बैठका पार पडल्या.विविध विषयावंर आमदार शंभूराज देसाईंनी चर्चा करुन यावर तातडीने निर्णयही घेतले.यामध्ये प्रामुख्यांने कराड चिपळूण रस्त्याचे सुरु असलेले काम या कामामुळे नागरिकांना आणि प्रवाशाना होणा-या अडचणी व रस्त्यांवर कराड ते घाटमाथा पर्यंत पडलेले मोठमोठे खड्डे संदर्भात सविस्तर अशी चर्चा झाली यावर येत्या आठ दिवसात रस्त्यावर पडलेले खड्डे भरुन घेण्याच्या तसेच रस्त्याच्या कामांस गती देण्याच्या सुचना करीत नुसते हो ला हो नको तर रिर्झल्ट दाखवा, अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जा असा गर्भीत इशाराच आमदार शंभूराज देसाईंनी राष्ट्रीय महामार्गाचे संबधित अधिकारी आणि एल ॲन्ड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांना बैठकीत दिला.
               गुरूवार आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालयात कराड चिपळूण रस्त्याचे सुरु असलेले कामांच्यासंदर्भात व यामुळे जनतेला निर्माण होणा-या अडचणींच्या संदर्भात तसेच तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कामांचा आढावा,स्वच्छ भारत अभियानातंर्गत पाटण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात करावयाच्या उपाययोजना आणि पाटण येथील बसस्थानकाच्या कामांस लवकरात लवकर सुरुवात करणेसंदर्भात बैठका आयोजीत करण्यात आल्या होत्या. आमदार देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे चार तास या बैठका याठिकाणी पार पडल्या.यावेळी विविध बैठकीस पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले, सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता कांडगांवे,उपअभियंता पन्हाळकर,एल ॲन्ड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर घोष,बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजाराम खंडागळे, नाईक,घोडके,तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे, लपा जिल्हास्तर उपअभियंता अविनाश पदमाळे,शाखा अभियंता बंगे,श्रीमती गायकवाड,सहाय्यक गटविकास अधिकारी वाघ, तालुका आरोग्य अधिकारी दिपक साळुंखे,पाणी पुरवठा शाखा अभियंता खाबडे,एस.टी महामंडळ बांधकाम विभागाच्या उपअभियंता श्रीमती अडसूळ,पाटण आगार व्यवस्थापक निलेश उथळे या अधिका-यांची तसेच महसूल विभागाचे सर्व मंडला धिकारी, तलाठी यांची प्रमुख उपस्थिती होती.
               आमदार शंभूराज देसाईंनी वरीलप्रमाणे विविध विषयांचा आढावा या बैठकांमधून घेतला.कराड चिपळूण रस्त्याच्या सुरु असलेल्या कामांसंदर्भात व या कामामुळे नागरिकांना तसेच प्रवाशांना जाणवणा-या अडीअडचणीसंदर्भात आमदार शंभूराज देसाईंनी बैठकीत राष्ट्रीय महामार्गाचे संबधित अधिकारी आणि एल ॲन्ड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांना चांगलेच खडसावले. कराड ते घाटमाथा मार्गावर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. येत्या आठ दिवसात रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे भरुन घ्या. आठदिवसानंतर काहीएक एैकले जाणार नाही. कंपनीच्या विरोधात वरीष्ठाकडे तक्रार करुन नोटीशी देण्याची वेळ आणू नका. नुसते हो करतो हे अजिबात चालणार नाही मोठया प्रमाणात यंत्रणा लावा मला रिर्झल्ट हवा आहे.आठ दिवसात रिर्झल्ट दिसायला हवा असा इशाराच त्यांनी बैठकीत दिल्यानंतर येत्या आठ दिवसात या मार्गावरील खड्डे भरुन घेत असल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे संबधित अधिकारी आणि एल ॲन्ड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांनी सांगितले.त्यांनतर विभागवार त्यांनी पाटण तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतंर्गत सन २०१७-१८ मध्ये करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला तसेच सन २०१८-१९ मध्ये जी कामे प्रस्तावित केली आहेत त्या कामांची आजची स्थिती काय आहे हेही आमदार शंभूराज देसाईंनी जाणून घेतले.पावसाळा संपताच या कामांना सुरुवात करण्याच्या सुचना त्यांनी अधिका-यांना दिल्या. डोंगरपठारावरील गांवामध्ये पावसाळयाचे पाणी अडले पाहिजे याकरीता जलयुक्त शिवार योजनेतंर्गत आपण गतवर्षी केलेल्या कामांतून किती प्रमाणात पाणी अडले याचीही माहिती त्यांनी अधिकारी यांना विचारली व या योजनेतंर्गत डोंगंरपठारावरील कामांना प्रथम प्राधान्य दयावे असेही त्यांनी सुचित केले.लघू पाटबंधारे विभाग,वनविभाग,पाणी पुरवठा विभाग व कृषी विभागाने केलेल्या कामांची माहिती त्यांच्या त्यांच्या संकेतस्थळावर अपलोड करावी जेणेकरुन केलेली कामे जनतेपर्यंत पोहचतील असे सांगून त्यांनी शहरी व ग्रामीण भागात आज मोठया प्रमाणात रस्त्यांच्या बाजूला कचरा टाकण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्वच्छ भारत अभियांनातंर्गत विविध उपाययोजना ग्रामीण आणि शहरी भागांना देण्यात आल्या आहेत. रस्त्यांच्या बाजूला टाकण्यात येणारा कचरा आरोग्याला धोका निर्माण करणारा असून यासंदर्भात महसूल आणि ग्रामविकास विभागाने तात्काळ अशा जागांची पहाणी करुन कच-यांची विल्हेवाट लावणेसंदर्भात योग्य ती उपाययोजना करावी.ज्या गावांच्या लगत अशाप्रकारे कचरा टाकण्यात येत आहे त्या गावांमध्ये यासंदर्भात जनजागृती करावी अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.त्यानंतर पाटण बसस्थानकाचे कामांस पहिल्या टप्प्यात १.७० कोटी व आता २.४४ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.कामाचे भूमिपुजन होवून दोन महिने उलटले काम का सुरु नाही ? निधीची काही अडचण नसताना पावसाचे कारण सांगून कामाला विलंब लागत असल्याचे सांगणे चुकीचे आहे.तात्काळ या कामांना सुरुवात करा. प्रथम बसस्थानकात पडलेले खड्डे भरण्याकरीता या कामात समाविष्ट असणारे काँकीटचे काम हाती घ्यावे व त्यानंतर इमारतीचे काम हाती घ्यावे असेही आमदार देसाईंनी यावेळी सांगितले.उपस्थितांचे आभार तहसिलदार रामहरी भोसले यांनी मानले.
चौकट:- आमदार शंभूराज देसाईंच्या माध्यमातून कामांचा तातडीने निपटारा.

             महामॅरेथॉन बैठका संपल्यानंतर तहसिल कार्यालयात वैयक्तीक कामांकरीता आलेल्या सुमारे दोनशेहून अधिक लोकांनी आपल्या समस्या आमदार शंभूराज देसाईंच्या निदर्शनास आणून दिल्या व त्यांच्या माध्यमातून आपल्या कामांचा तातडीने निपटारा करीत तहसिल कार्यालयातील अधिका-याकडून त्या समस्या सोडवून घेतल्या.


आमदार शंभूराज देसाईंनी केली पुरपरिस्थितीची पहाणी. आमदार मतदारसंघात अलर्ट. अधिकारीवर्गही तत्पर.




दौलतनगर दि. १७:  पाटण तालुक्यात पावसाचा जोर कायम असून तालुक्यातील कोयना धरणातून गेली दोन दिवस ५० हजारहून अधिक क्युकेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जात असल्यामुळे कोयना नदीवरील मुळगांव येथील पुल पाण्याखाली गेला आहे. मुसळधार कोसळणा-या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक मोठया प्रमाणात होत आहे. दि.१६ व १७ ऑगस्ट रोजी प्रतिदिन अनुक्रमे ५०४२० व ४९९४३ क्युकेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीपात्रातील पाण्यामुळे मुळगांव पुल दि.१६ रोजी रात्रीच पाण्याखाली गेला असल्यामुळे तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई हे मतदारसंघात रात्रीपासून अलर्ट असून त्यांनी आज सकाळी पाण्याखाली गेलेल्या मुळगांव पुलाची व तालुक्यातील पुरपरिस्थितीची पहाणी केली.आमदार शंभूराज देसाईंच्या या अलर्टपणामुळे तालुक्यातील प्रशासन व प्रशासकीय अधिकारीही तत्पर असून पहाणी दौ-यात अधिकारीवर्गही आमदार देसाई यांचेसमवेत उपस्थित होता.
             कोयना धरणातून मोठया प्रमाणात सोडण्यात येणा-या पाण्यामुळे पाटण तालुक्यातील कोयना नदीकाठच्या पाटण,जमदाडवाडी, मंद्रुळहवेली व नावडी या गावांना पाण्याचा धोका निर्माण होतो. सध्या कोयना नदीपात्रात पावसाच्या पाण्याबरोबर कोयना धरणातून सोडण्यात येणा-या ५० हजारहून अधिक क्युकेक्स पाण्याचा विसर्ग असल्यामुळे कोयना नदीपात्र तुंडुब भरुन वहात आहे. मुळगांव पुल पाण्याखाली गेला असल्याचे वृत्त मिळताच त्यांनी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,पाटण पोलिस निरिक्षक भापकर यांना दुरध्वनीवरून पाटण, जमदाडवाडी, मंद्रुळहवेली व नावडी याठिकाणी कुठे नदीपात्रातील पाणी आले आहे काय? याची पहाणी महसूल आणि ग्रामविकास यंत्रणेने तातडीने करावी अशा सुचना रात्री १०.०० वाजताच अधिका-यांना दिल्या.मुळगांव पुल वगळता कुठेही पाणी आले नसल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंना अधिका-यांकडून देण्यात आल्यानंतर त्यांनी सकाळी मुळगांव पुलाची अधिका-यांना घेवून पहाणी केली व मुळगांव पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरेकेटींग लावून पुलाचा मार्ग बंद करण्याच्या सुचना पोलीस यंत्रणा व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिल्या. पोलीस निरीक्षक भापकर यांना याठिकाणी दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्याच्याही सुचना आमदार देसाईंनी दिल्या. त्यानुसार याठिकाणी दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
             पहाणी दौरा झालेनंतर आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण विश्रामगृह याठिकाणी तालुकास्तरीय अधिका-यांची बैठक झाली या बैठकीत निर्माण होणा-या पुरपरिस्थितीच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने आमदार शंभूराज देसाईंनी तालुकास्तरीय सर्व अधिका-यांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या. यावेळी पाटण पोलीस स्टेशनला ४९ पोलीस कर्मचारी यांच्या नियुक्त्या असून केवळ ३७ कर्मचारी आहेत. १२ कर्मचारी नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे पोलीस निरीक्षक भापकर यांनी सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना दुरध्वनीवरुन येथील पुरपरिस्थितीची माहिती देवून पाटण पोलीस स्टेशनला आवश्यक कर्मचारी देणेबाबत तसेच येथील अधिकारी यांना बाहेरील बंदोबस्त न लावणेबाबतही कल्पना दिली यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ यापुढे पाटण येथील पोलीस अधिकारी कुठेही बंदोबस्ताकरीता न पाठविण्याचे आणि पाटण पोलीस स्टेशनला आवश्यक पोलीस मनुष्यबळ तसेच आज दुपारपर्यंत जादा पोलीस यंत्रणा पाठविण्याचे आश्वासन आमदार शंभूराज देसाईंना दिले.आज पारसी दिनाची सुट्टी असली तरी सर्व अधिकारी या परिस्थितीची पहाणी करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांच्या सोबत तत्परतेने हजर होते. आपतकालीन कक्षामध्ये सक्षम मंडलाधिकारी यास बोलावून घेवून तालुक्यातील इतर ठिकाणच्या परिस्थितीचाही अहवाल घ्यावा अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी तहसिलदार यांना दिल्या व तालुक्यातील म्हारवंड, बाटेवाडी, जिमनवाडी, मसुगडेवाडी पाडळोशी येथील कडयाखालच्या गांवातील घरांची पावसाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने माहिती घेतली.तर मोठा पाऊस कोसळत असल्यामुळे वाटोळे,घाणबी,मरड भिकाडी,काठी अवसरी,पांढरेपाणी,आटोली,पाचगणी याठिकाणी लाईट जाण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचनाही त्यांनी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांना दिल्या. आमदार शंभूराज देसाई यांचेसोबत पहाणी दौ-यामध्ये पाटणचे तहसिलदार रामहरी भोसले,पाटण पोलिस निरिक्षक भापकर,पाटणचे मंडलाधिकारी,तलाठी, गटविस्तार अधिकारी,सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सर्व शाखा अभियंता हे शासकीय अधिकारी व पाटण शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट:- आमदार शंभूराज देसाईंच्या आदेशामुळे शासकीय यंत्रणा रात्रीपासूनच अलर्ट.

                            मुळगांव पुल पाण्याखाली गेल्याची बातमी मिळताच तातडीने रात्री आमदार शंभूराज देसाईंनी प्रातांधिकारी, तहसिलदार,पाटण पोलीस निरीक्षक यांना दुरध्वनीवरुन तात्काळ पुलाच्या ठिकाणी पोहचून येथील दोन्ही बाजू वाहतूकी करीता बंद करण्याच्या सुचना दिल्या.दोन दिवस ते वैयक्तीक कामासाठी बाहेरगांवी दौ-यावर जाणार होते तो दौरा रद्द करुन आमदार शंभूराज देसाईंनी दुसरेदिवशी सकाळी मुळगांव पुल गाठणे व तालुक्यातील पुरपरिस्थितीचा आढावा घेणे पसंत केले.आमदार शंभूराज देसाईंच्या आदेशामुळे रात्रीपासूनच शासकीय यंत्रणा तालुक्यात अलर्ट होती

Tuesday, 14 August 2018

100 टीएमसी हून अधिक पाणीसाठा झालेल्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते ओटी भरण व जलपुजन. धरणातून १९०४१ क्युसेक्स पाण्याचा आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते विसर्ग.



दौलतनगर दि.१4 :- महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणा-या कोयना धरणातील शिवसागर जलाशयामध्ये मंगळवार दि. 14 ऑगस्ट, 2018 रोजी सकाळी १०१.१३ टीएमसी पाणीसाठा झाला असून 100 टीएमसी हून अधिक पाणीसाठा झालेल्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे  ओटीभरण व जलपुजन पाटण तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते सकाळी १०.१० वा. करण्यात आले.धरणातील शिवसागर जलाशयाचे  ओटीभरण व जलपुजन केल्यानंतर लगेचच धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते एकूण १९०४१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला.
           यावेळी कोयना धरण बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, यांची प्रमुख उपस्थिती होती.एकूण 105 टीएमसी पाणीसाठा क्षमता असणा-या कोयना धरणात दि. 14 ऑगस्ट, 2018 रोजी सकाळी १०१.१३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
               प्रतिवर्षी दि.15 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा पुर्ण करणा-या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये दि.14 ऑगस्टला सकाळीच 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा ओलाडूंन १०१.१३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी दि.३० ऑगस्ट रोजी तालुक्याचे लोकप्रतिनिधी उत्कृष्ट संसदपटु  आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते शिवसागर जलाशयातील या जलाशयाचे  ओटी भरण आणि जलपुजन करण्यात आले होते.यंदा १५ दिवस अगोदर परंपरेनुसार कोयना धरणाच्या भिंतीच्या आतील बाजूस आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते कोयना शिवसागर जलाशयाचे विधिवत पुजन करण्यात आले व त्यानंतर आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते व त्यांचे सोबत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जलाशयात खणनारळाची ओटी सोडून जलाशयाचे पुजन व ओटीभरण करण्यात आले.
          याप्रसंगी प्रतिक्रिया देताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, प्रतिवर्षी दि.15 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा पुर्ण होतो गतवर्षीच १०० टीएमसी पाणीसाठा होणेकरीता दि.३० ऑगस्ट पर्यंत कालावधी लागला होता. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस १५ दिवस अगोदर कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाने आज सकाळपर्यंत १०० हुन अधिक पाणीसाठयाचा टप्पा ओलांडून आतापर्यंत कोयना धरणात १०१.१३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.१०० टीएमसी पाणीसाठा झालेनंतर प्रतिवर्षी परंपरेनुसार कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे जलपुजन व ओटीभरण करण्याची पंरपरा आहे.पाटण तालुक्यातील तमाम जनतेने मला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यामुळे राज्यातील सर्वात मोठया आपले कोयना धरणातील जलाशयाचे जलपुजन व ओटीभरण करण्याची संधी मला गेली चार वर्षे मिळत आहे मी स्वत:ला खुप भाग्यवान समजत असून ही संधी मला मिळवून देणा-या पाटण तालुक्यातील तमाम जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. कोयना धरण बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर,कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, उपअभियंता मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी व व्यवस्थापन कोयना धरणाच्या संदर्भात २४ तास कार्यरत आहेत. तसेच कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीकाठच्या गांवामध्ये दक्षता घेण्याचे कार्य उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले हे अधिकारी व त्यांच्या देखरेखीखाली महसूल प्रशासन कार्यरत आहे. कोयना धरणातील पाण्यामुळे अवघा महाराष्ट्र प्रकाशमान होत असून शेतीकरीताही या पाण्याचा चांगला वापर होत असल्याचे सांगून ते म्हणाले कोयना धरण आपले तालुक्यात आहे हे आपले सर्वांचे भाग्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी बोलताना व्यक्त केली.कोयना धरणातील शिवसागर जलाशयातील ओटी भरण व जलपुजन कार्यक्रमानंतर आमदार शंभूराज देसाई यांनी कोयना धरण प्रकल्पाचे अधिका-यांसमवेत कोयनानगर येथे बैठक घेतली. या बैठकीमध्ये कोयना धरण प्रकल्पाच्या संदर्भात त्यांनी विविध विषयांवर अधिकारी यांचेबरोबर चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व ज्या काही समस्या शासन दरबारी प्रलंबीत आहेत त्या सोडविण्यासाठी वेळप्रसंगी मुख्यमंत्री यांची वेळ घेवून या समस्यांचे आपण निरसण करु अशी ग्वाही त्यांनी अधिका-यांना दिली.याप्रसंगी शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,धोंडीराम भोमकर, माजी पंचायत समिती सदस्य हरीश भोमकर,संचालक बबनराव भिसे,प्रदीप पाटील,शैलेंद्र शेलार,दिलीप सकपाळ  या प्रमुख पदाधिकारी व कोयना धरण व्यवस्थापनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.



Saturday, 11 August 2018

मराठा क्रांती आंदोलनाच्या निमित्ताने भूकंपग्रस्त दाखले व भूकंपनिधीसाठी आमदार शंभूराज देसाईंनी केलेल्या आंदोलनाच्या आठवणी जाग्या.





काल संपुर्ण राज्यामध्ये राज्यातील सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणाकरीता व विविध मागण्याकरीता मराठा ठिय्या आंदोलने करुन संपुर्ण महाराष्ट्र बंद आंदोलन केले.सातारा जिल्हयाच्या सर्व तालुक्यात मोठया प्रमाणात शांततेच्या मार्गाने मराठा ठिय्या आंदोलने पार पडली.पाटणच्या मराठा ठिय्या आंदोलनात पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचा सक्रीय सहभाग हा लक्षवेदी ठरला.सातारा जिल्हयात हजारो मराठा नागरिकांना सोबत घेवून अत्यंत शांततेच्या मार्गाने व शिस्तबध्दपणांने ठिय्या आंदोलन करणारे ते एकमेव आमदार ठरले.या मराठा ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने आमदार शंभूराज देसाईंनी याअगोदर पाटण याठिकाणीच पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्तांच्या दाखल्यांकरीता तसेच कोयना भूकंप निधी मिळणेकरीता अत्यंत शिस्तप्रिय भूमिकेतून दोन दोन दिवस केलेल्या आंदोलनांच्या आठवणी तालुक्यातील जनतेमध्ये जाग्या झाल्याचे पहावयास मिळाले.
              एखादया आंदोलनात वा मोर्चात शिस्तबध्दपणा कसा असावा तसेच शिस्तीचे पालन कसे करावे हे शिकावे तर पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्याकडून.सर्वसामान्य जनमानसात उठबस करणारा हा नेता किती नेतृत्वसंपन्न आहे याचे दर्शन घडले ते काल झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनामध्ये.आमदार शंभूराज देसाई यांच्या सहभागामुळे तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.सुमारे दोन ते अडीच हजार सकल मराठा समाजातील युवक,नागरिक नवारस्ता याठिकाणी जमले आणि आमदार शंभूराज देसाई यांच्या समवेत ठिय्या आंदोलनात सहभागी होणेकरीता पाटणला येवून त्यांनी पाटण जुना स्टॅन्ड ते तहसिल कार्यालय असे अत्यंत शांतपणे पायी गेले.आमदार शंभूराज देसाईंबरोबर पायी चालणा-या सर्वच युवकांमध्ये एकप्रकारचा उत्साह व शिस्तबध्दपणा पाहायला मिळाला. ठिय्या आंदोलनात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळयाचे दर्शन घेवून ठिय्या आंदोलन करणारे आमदार शंभूराज देसाई यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करीत मराठा आरक्षणासंदर्भातील तसेच इतर काही मागण्या त्यांनी शासनापर्यंत पोहचविण्याकरीता आम्ही मराठा लोकप्रतिनिधी यांनी विधानसभा या सर्वोच्च सभागृहात आणि सभागृहाबाहेर कसे प्रयत्न केले आहेत ही भूमिका अत्यंत शांतपणे मराठा समाजापुढे मांडली.त्यांनी मांडलेली भूमिका तालुक्यातील सकल मराठा समाजाला ऊर्जा देणारी ठरली.
दरम्यान यापुर्वी आमदार शंभूराज देसाईंनी तालुक्यातील जनतेला बरोबर घेवून तालुक्याच्या ठिकाणी केलेली आंदोलने असो वा सलग तीन तीन दिवस केलेले आमरण उपोषण असो किंवा इतर जनहितार्थ काढलेले मोर्चे असोत हे नेहमीच लक्षवेदी ठरले आहेत.यामध्ये महत्वाचे मानले जाणारी दोन आंदोलने पाटण तालुक्याच्या कायमस्वरुपी लक्षात राहणारी आहेत त्यामध्ये  पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्तांना त्यांचे हक्काचे भूकंपाचे दाखले मिळवून देणेकरीता केलेले आंदोलन तसेच त्यांनी सन २००४ ते २००९ या आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये तालुक्यातील कोयना धरणाच्या वीजनिर्मितीमधून पाटण तालुक्याला मिळणारा कोयना भूकंप निधी वाढवून मिळणेकरीता केलेले प्रयत्न आणि प्रतिवर्षी ३५ टक्कयाप्रमाणे तालुक्याला मिळणारा ५ कोटी रुपयांचा मंजुर करुन आणलेला निधी जो आघाडी शासनाने दुसरीकडे वळविला तो तालुक्यातील ७९ गावातींलच कामांना मिळणेकरीता जीवावर बेतणारे त्यांनी केलेले तीन दिवसीय आमरण उपोषण हे अविस्मरणीय असून सलग तीन दिवस या आमरण उपोषणाकरीता ते तहसिल कार्यालया समोर तालुक्यातील जनतेच्या बरोबर बसले होते.आज ते मराठा ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने तहसिल कार्यालयासमोरच्या मंडपात मराठा आरक्षणाकरीता आमदार शंभूराज देसाई यांना बसलेले पाहून त्यांच्या आमरण उपोषणाच्या आठवणी तालुक्यातील जनतेच्या मनात जाग्या झाल्या.तालुक्यातील जनतेच्या हिताकरीता त्यांनी केलेल्या या आंदोलनाच्या आणि आमरण उपोषणांच्यांमुळे पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्तांना त्यांचे हक्काचे भूकंपग्रस्तांचे दाखले मिळाले आणि प्रतिवर्षी कोयना भूकंप निधी जो त्यांनी शासनाकडून वाढवून आणला तो पाटण तालुक्यातील विविध विकासकामांकरीता मिळत आहे.शंभूराज देसाईंचा आंदोलनातील आणि उपोषणातील शिस्तबध्द पणाने असलेला सहभाग आणि त्यांच्या सोबत उपोषणात असो वा आंदोलनात सहभागी होण्याचा तालुक्यातील जनतेचा उत्साह व नेत्यांनी घालून दिलेले शिस्तीचे धडे हे तालुक्याच्या दृष्टीने अनेकदा फलदायी ठरले असून आता तर ते आमदार आहेत सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यासाठी त्यांनी आंदोलनामध्ये घेतलेला सहभाग हा नक्कीच पाटण तालुक्यातील सकल मराठा समाजाकरीता फलदायी ठरणार असल्याची चर्चा कालपासून पाटण तालुकयात सुरु असून मराठा ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी यापुर्वी केलेल्या आंदोलनाच्या व उपोषणाच्या चर्चा यानिमित्ताने करीत जुन्या आठवणींना तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये उजाळा मिळाल्याचे दिसून आले.